चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

salem's lot पाहिला आहे का कुणी??>>>>>
नारायण धारपांच्या लुचाई कादंबरीवर आधारित आहे.

नवीन Submitted by जिन्क्स on 5 November, 2024 - 13:28>>>>>>>
लुचाई salems lot वरून लिहिलं आहे...
salems lot कोणी बघितला असेल तर review द्या...

मैयाळगन पाहिला. पहिल्या भेटीत नाव बिचारले असते तरी चालले असते. २५ वर्षांनी कोणी भेटले आसता न ओळखणे सहज आहे हेमावैम. अजुन काही गोष्टी पटल्या नाहीत पण जाऊदे. ते सोडता इतर प्रसंग छान घेतलेत.

नवीन salems lot चांगला आहे. हॉरर जास्ती करायला जम्प स्केअर्स टाकले आहेत ते चांगले जमले आहेत. पण मूळ कथा मोठी असल्याने थोडा उरकल्यासारखा वाटतो. हॉरर फॅन्स ना आवडेल.

आचार्य, मूळ कथा रिचर्ड नाही तर स्टीफन किंगची आहे.

पहिल्या भेटीत नाव बिचारले असते तरी चालले असते.
>>>>
नाही विचारता येत. स्वानुभव आहे याचा.
कारण मला माणसे कधीच लक्षात राहत नाहीत. त्यामुळे समोरची व्यक्ती जिला आपण ओळखत नाही ती तितकीच महत्त्वाची आहे की नाही ते सुद्धा कळत नाही. अश्यावेळी विचारायची हिंमत होत नाही.

जर समोरच्या माणसालाच फार अपेक्षा नसेल आणि त्यानेच चाचपायला विचारले नाही ओळखलं तर ओशाळून नाही बोलता येते.

पण तेच जर समोरच्याचा ओळखलेस ना मला विचारायचा टोन असा असला की ओळखायलाच हवे तर मी सुद्धा हो हो म्हणजे काय, तुम्हाला नाही ओळखणार का म्हणून वेळ मारून नेतो. त्यानंतर समोरच्या माणसाने सांग बरे कोण म्हटले तर पकडले जातो.

दर लग्नात हाच शॉट असतो माझ्या डोक्याला. त्यामुळे आई कधी मला एकटे सोडत नाही.
Infact या कारणास्तव मला फारच रिलेत झाला तो चित्रपट

आचार्य, मूळ कथा रिचर्ड नाही तर स्टीफन किंगची आहे. >> +१ पण तरीही लुचाई जबरदस्त आवडते. एकदम परफेक्ट देसी बनवले आहे. एक भा.रा. नि दुसरे धारप ह्यांनाच हे सातत्याने चपखल जमले. ('m not getting into plagiarism etc)

The Help (@Prime)
Emma Stone, Viola Davis, Octavia Spencer.

हा चित्रपट मीही काल पाहिला. चित्रपटाची कथा १९६५ च्या काळात मिसिसिपी राज्यातील छोट्याशा गावात घडते. हा काळ मानवी हक्क संरक्षणाच्या अविरत प्रवासातील जागृती होण्याचे छोटेसे पाऊल म्हणता येईल असा होता. अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांची गुलामगिरीतून 'औपचारिक' सुटका होऊन शतक उलटून गेले होते तरी मानसिकता आणि वंशभेद तितकाच ठळक आणि क्रूर वाटावा असाच होता. त्यातल्या दोन घरगुती कृष्णवर्णीय मदतनीसांना मिळणारी अन्याय्य वागणूक व त्यांचा केला जाणारा वापर व तशा सगळ्याच स्त्रियांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या आयुष्यातील या प्रवासातील छोट्याछोट्या गोष्टींचे पुस्तक छापण्याची ही कथा आहे. एका गोष्टींच्या पुस्तकाची गोष्ट असूनही त्याही पलिकडे हा एक समांतर घडणारा अनौपचारिक इतिहास सुद्धा आहे.

या गावातील तरुण श्वेतवर्णीय पत्रकार एमा आपल्याला लहानपणी सांभाळलेल्या आयाचा शोध घेत असते. कारण एकोणतीस वर्ष या घरात राहून एमाला पोटच्या मुलीसारखा सांभाळ करूनही तिचे वय झाले या कारणाने हकालपट्टी करण्यात आलेली असते. मुलगी भेटायला आलेली असताना घरातील पाहुण्या उच्चवर्णीय स्त्रियांसमोर ती मागच्या दाराने न येता सर्वांसमोरून येण्यामुळे तिचा व लेकीचा अपमान करून घालवून देण्यात आलेले असते. त्या काळात हा उच्चवर्णीयांचा अपमान समजला जायचा. 'कलर्ड पीपल' यांनी गुलामासारखी सेवा करावी, जे दिले त्यात 'देवाचे आणि गोऱ्यांचे' आभार मानावेत अशी अपेक्षा केली जायची. त्यांचा सेवेचा मोबदलाही त्यांना उपकृत केल्याच्या आवेशात दिला जायचा, कसलीही कृतज्ञता किंवा आदर त्यांच्या 'असण्याला' मिळायचा नाही.

घरातील वर्षानुवर्षे मुलांना मोठं करणाऱ्या या स्त्रियांवर तीच मुले मोठी झाल्यावर मालकी हक्क दाखवायची. गोऱ्यांची बाळं सांभाळताना त्यांना आपले मूल दुसऱ्याकडे वाढविण्यासाठी द्यावे लागायचे. यांच्या मुलांनी शिकावे, यातून त्यांची सुटका व्हावी असे कुणालाही न वाटता उलट कोंडी- अडवणूक करण्याकडे कल असायचा. हीही माणसेच आहेत ह्या जाणिवेची जाणिव करून देणाऱ्या या गोष्टी आहेत. ज्यात मुलाच्या फीस साठी सफाई करताना मिळालेली अंगठी घ्यावी वाटणे व त्याला अत्यंत अपमानास्पद शिक्षा होऊन नोकरी जाणे. दुसरीला घरातील बाथरूमचा वापर न करू देणे व घराबाहेर वादळीपावसात जायला सांगणे व पर्याय नसताना वापरल्याने नोकरी वरून कमी करणे. एकीच्या तरुण मुलाचा कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याने अपघात होणे व कलर्ड लोकांच्या हॉस्पिटलमध्ये 'असेच फेकून' येण्याने आईसमोर त्याचा मृत्यू होणे. ही फार हृदयद्रावक घटना वाटली, असे होतही असेल. या तिघींशिवाय अनेकींच्या गोष्टींचे संकलित रूप होऊन निनावी प्रकाशित केले जाणे व एमाने हे सगळे केलेले आहे हे लक्षात येताच तिचे ठरलेले लग्न मोडणे हेही त्या वंशवादाचाच भाग आहे.

एखाददुसरा प्रसंग सोडला तर चित्रपट गंभीर नाही. अधुनमधून या मेड्स हास्यविनोद करतात, मालिकिनींची थट्टा करतात व एकमेकींशी हसून खेळून बोलतात. अशाच परीघावरचे आयुष्य असले की सगळेच अंगवळणी पडून त्यातही गंमत शोधण्याचे कसब निर्माण होतेच आणि त्यामुळे ते ऑरगॅनिकही वाटते. त्याच सहजतेने सर्व प्रसंग येत जातात. एक प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे मुख्य फोकस वंशभेदावर असूनही चित्रपट पुरुषसत्ताक पद्धतीवर सुद्धा पुष्कळ भाष्य करतो. गोऱ्या स्त्रियांची नवरा मिळवण्याची धडपड, स्वैपाकघरापुरतीच निर्णयक्षमता, नोकरी करावी असे वाटणारीला विचित्र समजणे, आपल्या मुलीवर तरूणांनी कटाक्ष टाकावा म्हणून तंग कपडे घालून पार्ट्यांना आवर्जून पाठवणे. सगळ्या तरुण गोऱ्या स्त्रिया बार्बी बाहुली सारख्या दिसणे. स्त्री सौंदर्यांला आणि त्यानुसार मिळणाऱ्या अटेंशनला अवाजवी महत्त्व असणे.

सोशल लॅडर मधे सगळ्यात वर उच्चवर्णीय पुरुष मग उच्चवर्णीय स्त्रिया असणे, त्यामुळे या उतरंडीत कृष्णवर्णीय स्त्रिया या समाजातील सगळ्यात दुर्लक्षित व उपेक्षित असणे हे सुद्धा अधोरेखित केले आहे. ( जे आपल्याकडे जातीनुसार येते.)

चित्रपट मला आवडला, सर्वांचीच कामे उत्तम झाली आहेत. वायोला डेव्हिसचा अभिनय अप्रतिम वाटला ती डोळ्यांमधे सगळे भाव आणून उत्कटतेने वावरते. व्हायोला आणि ऑक्टेव्हिया यांची केमिस्ट्रीही छान जमली आहे. ऑक्टेव्हियाचा कॉमिक टायमिंग धमाल आहे, ती काही ठिकाणी धमाल उडवून देते. काहीकाही विनोदावर खरोखरच हसू आले.‌ एमाला रोज लपतछपत ह्यांच्या घरी जाऊन या गोष्टींची टिपणे घ्यावी लागतात व तीही हळूहळू गुंतत जाते हेही बघण्यासारखे आहे. शेवट सुखद असूनही कुठलाही अभिनिवेश किंवा खूप कलाटणी वगैरे न दाखवता सहज किंवा ऑब्हियसली येणारा वाटला. जरूर बघा.

अद्याप व्हेअर ईगल्स डेअर पाहिलेला नाही.
कितीदा तरी आला, पण अलकालाच प्रदर्शित व्हायचा.
एकदा गन्स ऑफ नेव्हरॉन आणि व्हेअर ईगल्स डेअर एकत्र आले होते.
गन्स राहुलला होता. काका मला सायकलवर घेऊन गेला होता.

ती सगळी सिरीजच मस्त होती. काकाने आवड लावली.
ईगल्स मात्र दर वेळी राहून गेला. बहुतेक प्रौढांसाठी असेल.
एकदा चुकून द ईगल हॅज लॅण्डेड पाहिला. तो ही आवडला.

पुन्हा चित्रपट सुरू करीन तेव्हां उद्घाटन ईगलने करणार.

आताच "छुपी छुपी आशेन" नावाचा जुना बंगाली चित्रपट बघितला. हा अगाथा ख्रिस्तीच्या च्या "माउसट्रॅप"वर बेतलेला आहे. सबटायटल्स होत्या. स्टोरी माहित असल्याने त्रास झाला नाही. (तस बंगला समजत मला.) बारा आहे. छबी व्बिश्वास चे काम आहे.

फार सुरेख लिहीले आहेस अस्मिता! हे जास्त सखोल आहे. यातले २-३ पैलू मला बघताना सुचले नव्हते पण आता जाणवले.

यातला तो मुलींना "प्रेझेंट करणे" हा एकूणच त्याकाळचा कॉमन पॅटर्न असावा. इंग्लंडमधेही मोठ्या घराण्यांमधे होता. डाउनटन अ‍ॅबीच्या धाग्यावर ती चर्चा आहे. एक तो भाग अमेरिकन साउथ स्पेसिफिक नसेल. अर्थात सेग्रेगेशन सुद्धा नॉर्थ मधेही होतेच.

व्हायोला आणि ऑक्टेव्हिया यांची केमिस्ट्रीही छान जमली आहे. >>> एक्झॅक्टली! पिक्चरमधला तो सर्वात मस्त भाग आहे, विशेषतः त्यांचे जनरल बॅण्टर. एरव्हीची एबी आणि मिमी सोबत असतानाची एबी, यातला फरक लगेच जाणवतो.

थॅंक्स, थॅंक्स फा. मनापासून अगदी. Happy

डाउनटन अ‍ॅबीच्या धाग्यावर ती चर्चा आहे. एक तो भाग अमेरिकन साउथ स्पेसिफिक नसेल. अर्थात सेग्रेगेशन सुद्धा नॉर्थ मधेही होतेच.
>>> मलाही डाउनटन अ‍ॅबीची आठवण आली. फक्त मुलींचे झगे थोडे कमी झगझगीत आणि आखूड होते. काळ त्यामानाने अलिकडचा असावा म्हणून असेल कदाचित.

एरव्हीची एबी आणि मिमी सोबत असतानाची एबी, यातला फरक लगेच जाणवतो.
>>> हो, त्या जवळच्या मैत्रिणीच वाटतात अगदी.‌

गन्स ऑफ नेव्हरॉन बाबांचा आवडता पिक्चर. त्यांनी कॉलेजला मित्रांसोबत पाहिलेला. मग आम्ही दोघांनी कुठल्यातरी चॅनेवर पाहिला होता एकत्र. मला पुस्तक जास्त आवडले.

मॅकेनाज गोल्ड एका मित्राकडून सिडी घेऊन पाहिला. तो बघण्याचं तेव्हाचं कारण म्हणजे शांतेचं कार्ट नाटकात त्याचा उल्लेख आला होता - "मॅडम, धीस इज नॉट मॅकेनाज गोल्ड; धिस इज अप्पाज गोल्ड". तो पिक्चर बघितल्यावर आवडला आणि ग्रेगरी पेकचा आणखी बघावा म्हणून गन्स ऑफ नॅव्हरॉन पाहिला. जबरी पिक्चर. त्याचा टु किल ए मॉकिंगबर्ड हा आणखी एक सुंदर पिक्चर. ते पुस्तक आवडलं होतंच, पिक्चरही आवडला.

मी पण याच क्रमाने पाहिले सिनेमे. त्यानंतर पाच एक वर्षांनी पॅसेज आला होता.
अँथनी क्वीन एक आवडता होता त्या सिरीज मधला.
काकाने राहुलला दाखवला, त्या वेळी पहिल्यांदा एव्हढा मोठा पडदा पाहिलेला.
त्यावर ती मोठीच्या मोठी लाट बघताना पैसे वसूल झाले. पण चित्रपटातले कित्येक संवाद समजले नव्हते.
तरी सुद्धा आवडला.
नंतर सरावल्यावर संवादासहीत नीट समजल्यावर जो भाग बोअरिंग वाटलेला तो जास्त आवडला.
आणखीही काही होते. हेरकथा / युद्धपटांचा धागा असेल तर तिकडे लिहूयात.

नवीन salems lot चांगला आहे. हॉरर जास्ती करायला जम्प स्केअर्स टाकले आहेत ते चांगले जमले आहेत. पण मूळ कथा मोठी असल्याने थोडा उरकल्यासारखा वाटतो. हॉरर फॅन्स ना आवडेल.

आचार्य, मूळ कथा रिचर्ड नाही तर स्टीफन किंगची आहे.

Submitted by धनि on 5 November, 2024 - 19:14
>>>>>>
काल रात्री पाहिला salems lot... पुस्तकातले बरेच प्रसंग गाळले आहेत स्पेशली ते वंपायर्स घरात येताना आमंत्रण मागतात ते...
पण आवडला मला मूव्ही..

ऍलिस्टर मॅक्लीनचे पुस्तक आहे गन्स ऑफ नॅवरोन. 'टू किल अ मॉकींगबर्ड' पुस्तक सुंदर आहे. पिक्चर नाही पाहिला. आणि ग्रेगरी पेक म्हटला की रोमन हॉलिडे

The help पूर्वी पहिला होता आणि खूप आवडला ही होता . पण आता वरच्या पोस्ट्स मुले परत एकदा पहावासा वाटत आहे .

दौलत की जंग आठवला >>> Lol तो त्यावर आहे का? ते ८०ज मधले लोहा, जागीर ई. त्यावरच होते ना?

मिथुनचा लोहा नाही (त्याची कॅटेगरीच वेगळी आहे Happy ). धर्मेंद्रचा.

लोहा वर अ आणि अ वर थोडीशी चर्चा हल्लीच झाली आहे. One of kind आहे >>> हो Happy

जलजलाबद्दलही ऐकले आहे Happy या रेटने बहुधा शोले सोडून धरमचे सगळे पिक्चर त्यावरच होते असे निष्पन्न होईल Happy

आचार्य - अलिस्टर मकलीन च्या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नोव्हेल, याच नावाने, प्रचंड गाजल्या
त्यांनतर त्याने तीच पात्रे घेऊन नव्हरॉन फोर्स 10 आणि थंडरबोल्ट अशी दोन पुस्तके लिहिली, तीही जबरदस्त आहेत पण मूळ कादंबरीची सर नाही
टिपिकल सिक्वेल चे जे होते तेच

एकदा मकलीन वाचायला सुरू केलंत तर जवळपास सगळ्या पुस्तकांचा फडशा पडाल
आईस स्टेशन झेब्रा, पपेट्स ऑन चेन, एचेमस युलिसिस (यावरही वेगळ्या नावाने सिनेमा आलेला नुकताच), गोल्डन गेट, नाईट विदाऊट एन्ड, साऊथ बाय जावा हेड
फुल्ल मेजवानी आहे मकलीन वाचणे म्हणजे

मिथुनचा लोहा नाही (त्याची कॅटेगरीच वेगळी आहे Happy ). धर्मेंद्रचा. >> मिथुनच्या लोह्यात धर्मेंद्र पण आहे. कांती शाहचा लोहा तो.

फुल्ल मेजवानी आहे मकलीन वाचणे म्हणजे >>> धन्यवाद.
फोर्स टेन फ्रॉम नेव्हरॉन आणि व्हेअर ईगल्स डेअर ही पुस्तके वाचलेली आहेत. लेखकाचे नाव लक्षात नव्हते.

दौलत की जंग >> लोल. पण त्यातला मॅकेनाज गोल्ड वाला पार्ट खूप कमी आहे. कादर खान झोपतो ते कॉफिन आणि ते कॉफिन ओढणारे गाढव तसेच ह्युमन कंप्युटर आमिर खान जास्त भारी प्रकरण आहे.
जलजला प्रॉपर मॅकेनाज गोल्ड आहे. आणखी एक खजाना म्हणून पण आहे. पण रणधीर कपूर स्वत:ही मान्य करेल की तो काही खजिना शोधणारा पार्टी शोभत नाही.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा