Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पण रणधीर कपूर स्वत:ही मान्य
पण रणधीर कपूर स्वत:ही मान्य करेल की तो काही खजिना शोधणारा पार्टी शोभत नाही.
तो फक्त पगाराच्या दिवशी पाकीट मारली गेलेली पार्टी म्हणून शोभेल.
आईस स्टेशन झेब्रा विसरलेच होते. तशीच फ्रेडरिक फोर्सिथची पुस्तके द डे ऑफ जॅकल, द ओडेसा फाईल, फोर्थ प्रोटोकॉल आणि आयकॉन. जॉन ल कारसुद्धा. नुकतीच त्याच्या पुस्तकावर आधारित नाईट मॅनेजर पाहिली. अनिल कपूर नेहमीप्रमाणे झक्कास. आदित्य रॉय कपूर अभिनयात ठीकठाक पण त्याच्या पर्सनॅलिटीला साजेसा रोल त्यामुळे इम्प्रेसिव्ह, तिलोत्तमा शोम, शाश्वत चॅटर्जी छान काम. प्रशांत नारायणन आणि अरिस्टा मेहता यांचे छोटेसे रोलपण उल्लेखनीय. शोभिता धूलिपाला उगीचच.
तो फक्त पगाराच्या दिवशी पाकीट
तो फक्त पगाराच्या दिवशी पाकीट मारली गेलेली पार्टी म्हणून शोभेल
>>
हाथ की सफाई मधे तोच पाकिटमार होता
इतका गोरा गोमटा मवाली पहिल्यांदा पाहिला...
शोभिता धूलिपाला उगीचच
>>
Tell me something I don't know.. मला जे माहिती नाही ते सांगा...!!
Meiyazhagan - मीयळगा - य आणि
Meiyazhagan - मीयळगा - य आणि अ च्या मधलाच काहीतरी उच्चार आहे. बघितला, आवडला. ९६ च्याच दिग्दर्शकाचा आहे त्यामुळे जागोजागी त्याचे रेफ्स आहेत.
अस्वा व तो भुवनेश्वरीचा लग्नातला प्रसंग फार आवडला.
Meiyazhagan बद्दलच लिहायला
Meiyazhagan बद्दलच लिहायला आले.
मलाही आवडला. हे असं कसं शक्य आहे वगैरे सगळं लॉजिक बाजूला ठेवून बघितला. थोडा स्लो पेस आहे पण गाणी वगैरे ढकलत पाहिला.
काही लोकं असतात अशी ज्यांना तुम्ही कितीही वर्षांनी भेटलात तरी तो जिव्हाळा कायम असतो. ज्या लोकांना दुसर्याची प्रायव्हेट पर्सनल स्पेस म्हणजे काय हे खिजगणतीतही नसतं.... असतात अशी लोकं ज्यांना तुम्ही एकदम हक्काचे वाटता. प्रेमाने कानकोंडं करून टाकतात. परफेक्टली तेच सगळं कार्थीने दाखवलंय. त्यामगच्या त्याच्या भावना पण जेन्यूईन आहेत. कोणीतरी कुठेतरी केलेली मदत एखाद्याचं आयुष्य किती बदलवते याची कल्पनाही नसते आपल्याला. स्पेशली अशा भावनिक, मनाने साध्या असलेल्याचं. त्याची कायम जाण ठेवतात. सिनेमात दाखवलेले हत्ती त्याचेच प्रतिक असावे, त्यांची मेमरी, जीव लावण्याचा स्वभाव कार्थीशी साम्य दाखवत राहतात. कार्थीची अॅक्टींग कमाल आहे. इन फॅक्ट तो अॅक्टींग करतोय असं वाटलंच नाही. हसणारा, रडणारा, खोड्या काढणारा, शेवटी नंबर का चुकीचा देशील तू मला असं भाबडेपणाने विचारणारा, न सांगता भाऊ निघून गेला या बद्दल राग न धरता मीच झोपून राहिलो वगैरे बोलत राहणारा, पैशाची मदत देऊ पाहणारा कार्थी जेन्यूइन वाटला.
साऊथच्या वेंकटेशशी खूप साम्य वाटत होतं बर्याचदा त्याला बघताना.
अरविंद स्वामीला रोजा नंतर बघितलं असेल . मस्त आहे त्याचं पण काम. बहिणीला पैंजण घालण्याच्या प्रसंगात बाजी मारलीये त्याने. फार हळवा सीन आहे तो. इंट्रोव्हर्ट असला तरी एकदम धाडकन बदल झालेला नाही त्यात. अधे मधे त्याचा तो स्वभाव डोकवतोच पण हळूहळू थोडा का होईना खुलत जातो ते ट्रान्झिशन छान आहे. कार्थीच्या बायकोपुढे, आधीच्या मैत्रीणीबरोबर बोलतानाचा, बहिणीबरोबरच्या प्रसंगातला, बायकोबरोबरचा अरविंद स्वामी जसा प्रत्येक पुरूष आपापल्या कंफर्ट झोन प्रमाणे त्या त्या स्त्री नात्याशी जसा वागेल तसाच वागताना दाखवलाय. फार आवडलं ते. सापाला घाबरणं, पाय वर घेऊन बसणं, घरी आल्यावर कार्थीची आठवण म्हणून टाकीवर बसून मातीच्या भांड्यातून पिणं सो नॅचरल.
बाकी आवडलेलं - गावातलं लग्नाचं वातावरण, भलीमोठी केळीची पानं, तिथला ऑथेंटीक जेवणाचा मेनू, पहाटे असतो तो बाहेरचा एक टिपीकल धुसर प्रकाश आणि तेव्हा रांगोळी काढणार्या बायका, बहिणीला लग्नात दिलेले प्रत्येक ज्वेलरीचे छोटे छोटे वुडन बॉक्सेस फिट इन बिग बॉक्स वॉज क्यूट !
ओव्हरॉल फिल गुड.
खूप छान रिव्ह्यू अंजली
खूप छान रिव्ह्यू अंजली
***स्पोईलर ॲलर्ट***
शेवटच्या प्रसंगात कार्ती दार उघडत नाही, तेव्हा मला वाटलं की साप चावून मेला असेल हा. दारूण दुःखान्त वगैरे.
शेवटच्या प्रसंगात कार्ती दार
शेवटच्या प्रसंगात कार्ती दार उघडत नाही, तेव्हा मला वाटलं की साप चावून मेला असेल हा. दारूण दुःखान्त वगैरे.>>> अगदी अगदी
नंतर वाटलं बायको बाळंतीण झाली त्याची.
पण एकुणात सिनेमा आवडला खूप.
अन्जली आणी बाकी सगळ्याना खुप
अन्जली आणी बाकी सगळ्याना खुप अनुमोदन!! फार सुरेख सिनेमा आहे Meiyazhagan
कार्ती आणी अस्वा दोघानीही फार सुरेख काम केलय, अनेल छोटे छोटे प्रसन्ग अगदी छान खुलवलेत..कार्तीची बायको आणी भुवना दोघीही एकदम गोड घेतल्यात..गावाकडच वातावरण, लग्न पण परफेक्ट चित्रित केलय...एवढे पदार्थ आणि केळीच पान बघुन तर भुकच लागली.
अस्वाची बायको फॅमिली मॅन -२ मधली इन्स्पेक्टर उमायाळ!
फॅमिली मॅन -२ मधली
फॅमिली मॅन -२ मधली इन्स्पेक्टर उमायाळ >> तरीच म्हटलं हिला कुठेतरी पाहिलंय!
कुठे पाहिलास अंजली?
कुठे पाहिलास अंजली?
काल बांगला सिनेमा "शुभ
काल बांगला सिनेमा "शुभ मुहूर्त" बघायला सुरुवात केली आहे. अगाथा ख्रिस्तीच्या "द मिरर क्रकड फ्रॉम साईड टू साईड" चा बंगाली अवतार.
शर्मिला टैगोर, राखी गुलज़ार, नन्दिता दास ह्यांच्या प्रमुख भूमिका. सगळ्यांचा कमाल अभिनय. २००३ साली सर्वोत्कृष्ट बंगाली फिल्म चा राष्ट्रीय सन्मान आणि राखीला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार. यू ट्यूबवर आहे. इंग्लिश सब-टायटल्स. भरपूर निर्मिती मूल्य, मिस्टरी फिल्म च्या चाहत्यांसाठी.
इथे बंगला सिनेमा बद्दल चर्चा का होत नाही? आश्चर्य आहे.
यात सब टायटल नाहीयेत. त्याची
यात सब टायटल नाहीयेत. अनेबल केली तरी गूगलला काही झेपत नाहिये.
विथ सबटायटल लिंक असेल हाताशी तर देता का?
बंगला सिनेमा बद्दल चर्चा का
बंगला सिनेमा बद्दल चर्चा का होत नाही? आश्चर्य आहे.
वाचतेय तुमच्या पोस्टी.
>>> मला आवडेल झाली तर. कुतूहल आहे.
KLIKK नावाचा चानेल आहे. खूप
KLIKK नावाचा चानेल आहे. खूप बांगला मुवीस बघायला मिळतील. मी LAPTOP वर बघितला. उघडून बघेन आणि लिंक देईन.
Hoichoi pan subscribe kar
Hoichoi pan subscribe kar tyawar satyajeet rey w sharmila cha devi mhanun lai bhari cinema aahe.
बंगाली चित्रपट खूप पाहिले
बंगाली चित्रपट खूप पाहिले आहेत. शॉर्ट फिल्म्स सुद्धा पहिल्यात.
पण मराठी लोकांमधे त्यावर चर्चा न होण्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे ?
अवांतर अॅलर्ट : हिंदी, इंग्रजी आणि मराठी असे तीन सिनेमे मराठी माणूस पाहू शकतो. हिंदी प्रेक्षकांना मराठी, बंगाली किंवा इतर भारतीय भाषा येत नाहीत.
हिंदी पट्ट्यातच भोजपुरी, मैथिली, मगधी अशा भाषा बोलणारे शुद्ध हिंदी चित्रपट बघत नाहीत. (बंबैय्या हिंदी चालते).
बंगाल्यांना तर हिंदी सुद्धा धडकी येत नाही. कदाचित त्यामुळं तिथे प्रादेशिक सिनेमा जिवंत आहे.
राजस्थानने पहिली भाषा म्हणून हिंदीचा स्विकार केल्यापासून राजस्थानात राजस्थानी, मारवाडी अशा प्रादेशिक भाषांत सिनेमे बनणे बंद झाले आहे.
अवांतर समाप्त
शेवटच्या प्रसंगात कार्ती दार
शेवटच्या प्रसंगात कार्ती दार उघडत नाही, तेव्हा मला वाटलं की साप चावून मेला असेल हा
>>>>
मला पण धडकी भरलेली तो दार उघडत नव्हता तर. त्यातून प्रेग्नंट बायको. नकोसंच वाटलं ते साप प्रकरण. पण नंतर वाटलं की अस्वाने तरी शहरात जाऊन कुठे गावची जीवनशैली सोडलीय? कुत्रे, मांजरं आणि एवढे सगळे पोपट…. मग प्रत्यक्ष गावात राहणाऱ्याने सापाबरोबर कोएक्झिस्ट करणं नवल नाही.
बाकी भल्या पहाटे दारासमोर सडा घालून रांगोळ्या काढणाऱ्या बायका, लग्नातले साड्यांचे टिपीकल साऊदी रंग आणि प्लास्टिकच्या खुर्च्या, कॉटनच्या साड्या नेसलेल्या बायका, मंदिरात का जात नाहीस तर आंघोळ केली नाही सांगणं, वधूवरांच्या नावापुढे शैक्षणिक डिग्री लिहिलेल्या असणं उत्तम पकडलंय.
कुठे पाहिलास अंजली?>>
कुठे पाहिलास अंजली?>> Meiyazhagan नेटफ्लिक्स वर आहे.
ज्याना "शुभ मुहूर्त " सिनेमा
ज्याना "शुभ मुहूर्त " सिनेमा बघायचा असेल (with English sub) त्यांच्या साठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=7hP39bSTc-U
अंजली एकदम मस्त रिव्ह्यू.
अंजली एकदम मस्त रिव्ह्यू. विशेषतः अस्वाच त्या नातेवाईक स्त्रियांसोबतच्या वागण्याबद्दल जे तुम्ही लिहिलंय ते एकदम चपखल.
छान पिक्चर आहे. विशेष लक्षात राहिलेले प्रसंग म्हणजे
अस्वाचे बाबा फोन बंद झाल्यावर अगदी गदगदून रडतात तो, परत तो बहिणीला पैंजण घालण्याचा प्रसंग, पहाटेच्या रांगोळ्या आणि नंतरचा मंदिराबाहेरचा पूर्ण सीन. फार सुरेख. जेवणावळ तर अप्रतिम.
तामिळ येत असती तर मीयळगान मूळ
तामिळ येत असती तर मीयळगान मूळ बोलीभाषेत बघायला आवडला असता. जिथे तिथे भैयाच्या ऐवजी किमान अण्णा शब्द चालला असता. लग्नात आशीर्वाद देतानासुद्धा सलामत रहो टाईपचं हिंदी खटकलं. हिंदी अनुवाद करताना हिन्दी + तमिळचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करायला हवा होता.
येक नंबर... हहपुवा!
येक नंबर... हहपुवा!
चित्रपटात जेवढ्या लोकांनी काम केलंय ते तरी ह्या सुपारी किलर ला मानत असतील की नाही हा ही प्रश्नच आहे..
शिवाय, ह्या सिंगल आमदार पक्षाध्यक्षावर कुणी एक गोळी खर्च करेल हे ही खरे वाटत नाही!
शेवटच्या प्रसंगात कार्ती दार
शेवटच्या प्रसंगात कार्ती दार उघडत नाही>>>>>>>> मला दुसरी शक्यता वाटली की भावाला पैशाची गरज पुरवायची म्हणून हे घर विकून दुसरीकडे गेला की काय? कोणीतरी दार उघडून सांगेल वो अब यहां नही रहते वगैरे..
पण टीप्पीकल असं काही नाहिच्चे या सिनेमात
अय्यो, मला तर असे वाटलेच नाही
अय्यो, मला तर असे वाटलेच नाही की दार उघडायला फार उशीर वगैरे झालाय.. म्हटलं संथ आणि वास्तवदर्शी पिक्चर आहे तर येत असेल सावकाश आतल्या खोलीतून.. जेवढा वेळ आपण रिअल आयुष्यात दरवाजा उघडायला घेतो तेव्हढाच घेतलेला दाखवतील.
पुन्हा बघायला हवा तो सीन टायमर लावून..
.. म्हटलं संथ आणि वास्तवदर्शी
.. म्हटलं संथ आणि वास्तवदर्शी पिक्चर आहे तर येत असेल सावकाश आतल्या खोलीतून.. >>
हे भारी आहे.
@ Meiyazhagan
@ Meiyazhagan
सर्वत्र सो. मिडियावर प्रचंड स्तुती चालू असली तरी फार बोअर आणि संथ सिनेमा आहे. पूर्वी नाही का श्याम बेनेगल टाईप सिनेमे कितीही बोअर असले तरी वा, व्वा वाहव्वा च म्हणण्याची fashion होती, तसेच वाटले हे.
अरविंद स्वामी absolute dumb expressions in each frame. कार्ती टिपिकल सौथी ओव्हरएक्टींग की दुकान.
Cinematographer / cameraman मात्र जागे आहेत, त्यांचे काम उत्कृष्ट ! ग्रामीण- semi urban तमिलनाडुचे चित्रण is a delight for eyes.
दुसरा आवडलेला पॉइंट म्हणजे कुल्हड़ चाय सारखी मटका बियर ! That was superb stuff. हे ट्रायणार मी लवकरच.
मला ह्या सिनेमात एकच प्रश्न
मला ह्या सिनेमात एकच प्रश्न पडला, अस्वा आणि त्याची बहीण ह्यांची (बहिणीच्या ) लहानपणीच ताटातूट झाली आहे. (ती तेव्हा कडेवर hoti) नंतर कधी ते एकमेकांना भेटल्याचा उल्लेख नाही (की मी miss केलाय?)
तर बहीण भावाच्या नात्यात इतकी ओढ राहील का?
पूर्वी नाही का श्याम बेनेगल
पूर्वी नाही का श्याम बेनेगल टाईप सिनेमे कितीही बोअर असले तरी वा, व्वा वाहव्वा च म्हणण्याची fashion होती, तसेच वाटले हे.
आईच्या गावात, कोणीतरी खरे बोलले. डोक्याला शॉट असतात हे चित्रपट
"शुभो मुहूर्त" ची लिंक मी
"शुभो मुहूर्त" ची लिंक मी दिली होती. कुणी बघितला का नाही माहित नाही. बहुतेक बघितला नसणार. रहस्य कथा ,विज्ञान कथा किंवा भयकथा हे काही अभिजात साहित्य मानले जात नाही. अगाथा क्रिस्तीच्या मूळ कथेवर बेतलेल्या ह्या सिनेमाला दिग्दर्शकाने नवीन आयाम दिले आहेत. हे सगळे मी इथे लिहिण्यापेक्षा हे एक चांगले परीक्षण आहे ते वाचा.
https://www.youthkiawaaz.com/2017/02/shubho-mahurat-a-vow-to-prodigy-2/
वाचल्यावर कदाचित सिनेमा बघायची इच्छा होईल.
@केकू,
@केकू,
मी तो सिनेमा आज किंवा उद्या दुपारी बघायला ठेवला आहे.
अस्वा आणि त्याची बहीण ह्यांची
अस्वा आणि त्याची बहीण ह्यांची (बहिणीच्या ) लहानपणीच ताटातूट झाली आहे
त्यांचा कॉन्टॅक्ट असावा. लग्नात अस्वाने घातलेला शर्ट तिने कार्तीमार्फत पाठवलेला असतो.
Pages