Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
या धाग्यावरच्या महाराजा
या धाग्यावरच्या महाराजा बद्दलच्या सर्व पोस्ट्सना अनुमोदन.
दक्षिणी भडंग कमी तिखट असते तर अजून चांगला वाटला असता चित्रपट.
४५ करोड बजेट वर फक्त ६० हजार
४५ करोड बजेट वर फक्त ६० हजार रुपये गल्ला जमवलेला 'द लेडी किलर' यू ट्यूब वर आता मोफत आहे.
फा, श्रद्धा, अस्मिता, पायस, लक्ष असू द्या.
हा सिनेमा थियेटर मध्ये जाऊन पहाण्याचे धाडस करणार्या मोजक्याच बेडर जिगरबाज प्रेक्षकांत आपला अँकी नं १ असेल असे वाटते.
Spoilet Alert
Spoilet Alert
मलाही कळले नाही दो पत्ती मध्ये काजोल वकील कशी होते ती. जी पोलीस होऊन investigate करत होती तीच वकील झाली म्हणजे conflict of interest नाही का? अशा वेळी वकील पोलिसाला प्रश्नही विचारु शकतात. इथे मत्र वकील आणि पोलीस सेम. काजोललाच सगळ्या भूमिका करायच्या होत्या असे वाटले.
शेवट पण काहीही. अचानक आले काजोलच्या मना आणि नवीन पुरावे देईना. आणि बाकी सगळेजण including the judge were ok with it.
दो पत्ती बद्दलची फेसबुक
दो पत्ती बद्दलची फेसबुक पोस्ट
क्रिती सानोन चित्रपटाची निर्मातीही आहे.
लोकसत्तेतल्य परिचयात वाचलं की काजोलचे वडील पोलिस खात्यात असतात आणि आई वकील असते
अरविंद स्वामीच्या Meiyazhagan चे रिव्ह्युज चांगले आहेत.
अरविंद स्वामीच्या Meiyazhagan
अरविंद स्वामीच्या Meiyazhagan >> तो पाहायचा आहे. कार्ती पण आहे त्यात त्यामुळे. नेफी वर हिंदी मध्ये पण आला आहे त्यामुळे पाहून होईल.
दो पत्ती एकदा बघायला ठीक आहे. ती वकील आहे हे दोन तीन संवादातून येते की. conflict of interest वगैरे विचार आपल्याकडे करतात का?
काल नाईट श्यामलनचा 'ट्रॅप'
काल नाईट श्यामलनचा 'ट्रॅप' पिक्चर पाहिला. यातला नायक मनोरूग्ण आहे. हा ट्रॅप त्यालाच पकडायला लावलेला आहे आणि ते प्रेक्षकांना सुरूवातीलाच सांगितलं जातं. पण त्या ट्रॅपमधून सुटण्याची त्याची धडपड आणि प्रत्येक टप्प्यावर येणारं नवं चॅलेंज हे पाहणं रंजक वाटलं. थोडासा स्प्लिटच्या वळणाने जाणारा हा पिक्चर आहे. स्प्लिट अर्थात जास्त इंटेन्स होता. हा पिक्चर तेवढा इंटेन्स होत नाही. तरीही जॉश हार्नेटने उत्तम काम केलं आहे.
ट्रॅप इंट्रेस्टींग वाटतोय रमड
ट्रॅप इंट्रेस्टींग वाटतोय रमड. श्यामलनचे सिनेमे आजकाल कनेक्ट होत नाहीयेत पण हा बरा दिसतोय. स्प्लिट फारच इन्टेन्स होता, मी पूर्ण बघू शकले नव्हते.
-------------
दो पत्ती -
भरत, हहपुवा झाले. स्पेशली पोलिसच वकील होणार किंवा वकीलच पोलिस होणार ह्याची अजयच्या विमल गुटख्याशी तुलना केलेली आणि कृतीने जे रोबॉटचे झाड धरून ठेवले आहे ते आणि रोबोट नाही पण शाहीरचे एक्स्प्रेशन रोबोट सारखे आहेत ते.
मला ते पोलिसचे वकील होणे फार कन्विनियंट वाटले. त्यात काजोलपेक्षा पोलिस म्हणून चंद्रमुखी चौटाला जास्त खमकी वाटायची. वकील म्हणून जे केले तेही लुटूपुटूचेच वाटले. काजोलला ग्रेसच नाही, जन्मजात असावा लागतो त्यामुळे आता येणेही शक्य नाही. तेच वहिदा रेहमान, रेखा, शबाना कुठल्याही भूमिकेत ग्रेसफुल वाटायच्या.
गाणी अकस्मात सुरू होतात, थ्रिलरवाल्यांनी कमर्शियल सक्सेससाठी सुद्धा गाण्यांचा मोह आवरलेला बरा. कारण आता काही तरी रहस्यमय होते आहे, नंतर कृतीचा नवरा तिला हाणहाण हाणतोय, दुसऱ्या क्षणी दुसऱ्या कृतीचे जीन्स शॉर्ट्स व बिकिनी टॉप मधे होळीचे 'बलम पिचकारी' टाईप गाणे सुरू होते. त्याने दोन्ही भावनांची सरमिसळ होऊन कुठलीही तीव्रता पोचत नाही.
कृती निर्माती आहे याचे कौतुक वाटतेय, स्त्रिया अशाच सर्व क्षेत्रांत पुढे पुढे जावोत व त्यांना चुकतमाकत शिकत रहाण्याची संधी मिळो.
---------
विकु, धन्यवाद धन्यवाद. 'द लेडी किलर'ची पोस्ट वाचली. बघून बघते.
'Meiyazhagan' छान आहे..पोस्टर
'Meiyazhagan' छान आहे..पोस्टर वर अरविंद स्वामी आणि कार्ती ला पाहूनच बघितला..दोघेही आवडतात...अगदी साधी सरळ गोष्ट आहे...ज्यांना थ्रिलर किंवा ॲक्शन मुव्हीज आवडतात त्यांना फारच बोर वाटेल ..
हा सिनेमा थियेटर मध्ये जाऊन
हा सिनेमा थियेटर मध्ये जाऊन पहाण्याचे धाडस करणार्या मोजक्याच बेडर जिगरबाज प्रेक्षकांत आपला अँकी नं १ असेल असे वाटते.
>>
नाही नाही
इतकी ही हिम्मत नाही...
पण BADASS RAVIKUMAR आला तर तो मात्र थेटर ला बघणार...
दो पत्ती - म हा ब क वा स
दो पत्ती - म हा ब क वा स
काहीही म्हणजे काहीही चालू होतं. काजोल ला अज्जिबात हरियाणवी अॅक्सेंट बेरींग जमलेलं नाही. थाणे आणि अजून एक शब्द (विसरले) बोलता आले म्हणजे झालं असा समज करून घेतला बहुतेक तिने.
अ-घरेलु कृतीला अचानक घरेलू कृतीबद्दल का सहानुभुती वाटायला लागते? तन्वी पण फार नाही कन्विंसिंग वाटली. आधीच द्यायचे ना २ ठेवून अ-घरेलूला. का या दोघी गुंडी कृतीचं वागणं सहन करतात तेच कळलं नाही. ती पोसत असते का यांना?
विवेक मुश्रन कशासाठी आहे? तेही काही कळलं नाही.
तो चॉकलेट हिरो पण कुछ जम्या नही. बायपोलर पर्सनालिटी वाटला. एका क्षणात त्याचं प्रेम या कृतीवरून त्या कृतीवर बसतं.
एकूणातच दो पत्ती किस झाड की पत्तीच निघाला.
सिंघम ३ विरूद्ध भूलभुलैय्या ३
सिंघम ३ विरूद्ध भूलभुलैय्या ३ पैकी कुठला पाहणार अशा पोस्टी सोशल मीडीयात दिसू लागल्या आहेत.
सूर्यवंशी पाहिल्यानंतर सिंघम ३ ओटीटीवर सुद्धा पाहू नये. भरमसाठ हिरो आहेत. टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षयकुमार आणि दु ते म्हणून सलमान खान पण दिसणार आहे. हुकूमत बद्दल आमचे सर म्हणायचे कि त्या थिएटरच्या आजूबाजूला राहणारे लोक बंदूकींच्या आवाजाने बहीरे झाले होते. सूर्यवंशी मधे पण शेवटचा अर्धा तास नुसत्या गोळ्ञा सुटत होत्या. तिन्ही हिरो त्रिमूर्तीच्या पोज मधे रणभूमीच्या मधोमध येऊन तीन गुणिले ३.३३३३ दिशांना गोळ्या सोडत होते. त्यामुळे खलनायक पक्षाची एकही गोळी यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हती. मायनस मायनस प्लस होतं तसं गोळी गोळी पुरणपोळी होत होतं. पण नायकांकडच्या बंदूकीचा गोळ्या फेकण्याचा वेग जास्त असल्याने एकमेकांना धडकणार्या गोळ्यातून शिल्लक उरलेल्या काही गोळ्या खलनायक पक्षाला जाऊन टुचुककन लागत होत्या.
सिंघम ३ मधे चित्रपटभर गोळ्या सुटताना दिसतील. जमिनीवर तर तीन हिरो आहेतच पण आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी करावी त्या पद्धतीने अक्षयकुमार नवीन केस लावून गोळ्या सोडणार आहे.
त्यापेक्षा भूलभुलैय्या ३ पाहिलेला केव्हांही परवडला.
अर्थात मला जाणे शक्य नाही.
मी शक्यतो दुसरे तिसरे भाग बघत
मी शक्यतो दुसरे तिसरे भाग बघत नाही, जी मजा पहील्या भागात येते, ती येत नाही. अपवाद दृश्यम.
आयुष्यात एक तरी भूलभुलाईया
आयुष्यात एक तरी भूलभुलाईया आणि कार्तिक आर्यनचा एक तरी पिक्चर थेटरात बघायची इच्छा आहे. यंदा जर जमले तर दोन्ही इच्छा एकत्रच पूर्ण होतील.
बाकी भूलभुलैयाचा ट्रेलर आवडतोच. कारण ती टायटल ट्रॅक बॅकग्राउंड म्युजिकच भुरळ टाकते.
धूमबाबत सुद्धा असेच व्हायचे.. दोन्ही आयकॉनिक साऊंड ट्रॅक आहेत.
भूभु मध्ये नेने बाई आहेत,
भूभु मध्ये नेने बाई आहेत, त्यांना बघायला कोणी जाणार की नाही आणि बासिंच्या ट्रेलर मध्ये या वेळी गोळ्या पेक्षा तोफ बॉम्ब गोळे आणि आगीचे गोळे जास्त दिसले. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने भौतिकशास्त्राची कास केव्हाच सोडल्याने अ आणि अ प्रकारात चित्रपट येतो. तो OTT वर येईल तेव्हा बघण्याचा विचार करणार.
भूभुची टायटल ट्रॅक +१
मायनस मायनस प्लस होतं तसं
मायनस मायनस प्लस होतं तसं गोळी गोळी पुरणपोळी होत होतं. >>
“चित्रपटाच्या दिग्दर्शकाने
“चित्रपटाच्या दिग्दर्शकाने भौतिकशास्त्राची कास केव्हाच सोडल्याने अ आणि अ प्रकारात चित्रपट येतो.” - असले सिनेमे थिएटरमधे, आणि जमलं तर ग्रूपने जाऊन बघावे. त्याने आपल्या मेमरीज तयार होतात.
मायनस मायनस प्लस होतं तसं
मायनस मायनस प्लस होतं तसं गोळी गोळी पुरणपोळी>>>>>>>>>>>
अक्षयकुमार नवीन केस लावून गोळ्या> केसांचा काही संबंध आहे का गोळ्यांशी
खेल खेल मे बघितला. आवडला. काही काही पंचेस चांगलेत अक्षयचे.... वन टाईम वॉच! हल्ली परत परत कोण बघतं म्हणा
आचार्य, धमाल पोस्ट. मला
आचार्य, धमाल पोस्ट. मला कुतूहलही नव्हते या सिनेमाबद्दल पण तुम्ही लिहिल्याने आता ट्रेलर बघेन.
विकु, मी थोडा बघितला 'द लेडी किलर', काहीच कल्पना नव्हती. त्यात अर्जुन कपूर निघाला, शिवाय संथ सिनेमा आणि मंद हिरो असल्याचे लक्षात आल्याने हा 'पिसेबल' नसावा असे वाटते आहे पण आठवण काढून सांगितले त्याबद्दल धन्यवाद बरं का.
केसांचा काही संबंध आहे का
केसांचा काही संबंध आहे का गोळ्यांशी >> केस उगवलेत अक्षयच्या पुढच्या भागात. कपाळावर येताहेत गोळ्या झाडताना.
अस्मिता
Meiyazhagan
Meiyazhagan
एक अप्रतिम सिनेमा!
विस्मरण या विषयावर एक खूप सुंदर सिनेमा होता - अस्तु. आता त्याच विषयावर तितकाच सुंदर सिनेमा आलाय - Meiyazhagan. मूळ तमिळ असलेला सिनेमा नेटफ्लिक्सवर हिंदीत पण आहे.
सिनेमाला कथा अशी फारशी नाही. भाऊबंदकीच्या वादात घर सोडावे लागलेल्यामुळे नायकाच्या (अरविंद स्वामी) मनात त्या गावाबद्दल आणि एकूणच नातेवाईकांबद्दल एक आढी बसते. पुढे २४ वर्षांनी तो त्या परीसरात एका लग्नाकरता येतो - काहीसा मनाविरुद्धच. लग्नात त्याला त्याचा एक नातेवाईक (कार्ती) भेटतो. पण अस्वाला ना त्याचा चेहरा आठवत असतो ना त्याचे नाव. कार्ती काहीशा जबरदस्तीनेच त्याच्याबरोबर राहतो. पुढे काय प्रसंग घडतात ते म्हणजे हा सिनेमा.
लहानपणीच्या अस्वाचा रोल ज्या अभिनेत्याने केला आहे त्याचा अभिनय इतका सुंदर आहे की पहिल्या फ्रेमपासूनच सिनेमा कुठेतरी कनेक्ट होतो.
सिनेमात कुठेच झकपक नाहीये - अगदी अस्वा आणि कार्ती दोघेही साध्या चप्पलेवर लग्नात वावरतात. लग्नात कुठेच बडेजाव नाहीये. अगदी साध्या केळीच्या पानावर वाढलेल्या पंगती, काहीशा अस्वच्छ वॉशरुम्स (काहीही गलिच्छ न दाखवता ती अस्वच्छता कशी दाखवायची याचा उत्तम नमुना आहे तो प्रसंग), स्टेजवर वधूवरांना भेटण्याकरता रांगेत उभे असलेले लोक, स्टेजसमोरचे फोटोग्राफर, हॉलमध्ये ओळीत मांडलेल्या आणि मध्येमध्ये विस्कळीत झालेल्या खुर्च्या असे अगदी मध्यमवर्गीय लग्न आहे. चांद बडजात्या दिग्दर्शक असावा - सूरज बडजात्यासारखा डोळे दिपवणारा समारंभ कुठेच नाहीये पण त्यामुळेच कनेक्शन अजून बळकट होते.
सिनेमात एका प्रसंगात अस्वा आंघोळ करून येतो (फुलवंतीतल्या गश्मीरवर फिदा झालेल्या ताई माई अक्कांची कदाचीत निराशा होइल कारण आंघोळ करतानाचे काहीही दृष्य नाहीये ) तेंव्हा तो खरच एकदम फ्रेश दिसतो. अस्वासारख्या पिठ्ठ गोर्या माणसाच्या बाबतीत तो आंघोळीनंतरचा फ्रेश लुक दाखवणे कठीण आहे कारण अशी गोरी माणसे आधीही खूप फ्रेश दिसत असतात. मेकअप आर्टीस्टची खरच कमाल वाटली.
अस्वा मला कधी फारसा आवडला नव्हता - रोजामध्ये मधु आणि बॉम्बेमध्ये रेहमानचे संगीत यांच्यापुढे तो फिकाच वाटला होता. पण या सिनेमात मात्र तो खूप आवडला. कार्ती तर आवडतोच.
सिनेमातली गाणी मला तरी बेसुरी वाटली (कदाचीत हिंदीत डब करताना त्यांच्यावर जास्त लक्ष दिलं गेलं नसावं) आणि कार्तीचं पात्र खूप सरळ आणि स्वच्छ मनाचं दाखवलं आहे (अशी माणसं असतात यावरचा विश्वास उडत चालला आहे) या दोन बाबी वगळता सिनेमा खूपच आवडला. दिवाळीकरता परफेक्ट वॉच आहे.
सिनेमा बघता बघता एक जाणवलं की आपल्याला जी नाती (नातेवाईकांची नाती, मैत्रीची नाती नव्हे) हवीहवीशी वाटतात त्या नात्यांचा पाया हा लहानपणीच्या त्या व्यक्तीशी संबंधीत खूप सुंदर अशा आठवणींचा बनलेला असतो. सर्वच नाही पण बर्या वेळेला हे लागू पडते.
खूप सुंदर लिहिलं आहे माधव.
खूप सुंदर लिहिलं आहे माधव. बघेन मी नक्की हा सिनेमा.
बाकी ठिकाणी पण याचे रिव्हुज खूप चांगले आलेत.
जमलं तर ग्रूपने जाऊन बघावे.
जमलं तर ग्रूपने जाऊन बघावे. त्याने आपल्या मेमरीज तयार होतात
>>>
अगदी अगदी. कॉलेज मध्ये असताना अलका, विजय, वसंत आणि मंगला म्हणजे हक्काच्या जागा. आता विजय बंद झाली, बहुतेक अलका सुद्धा.
धन्यवाद माधव. हा पिक्चर
धन्यवाद माधव. हा पिक्चर बघायच्या लिस्ट मध्ये होताच. पण आता लगेचच बघेन.
Meiyazhagan
Meiyazhagan
बरेच जण चांगले लिहीत आहेत.
बघावाच लागेल
सुंदर लिहिलं आहे माधव. बघायला
सुंदर लिहिलं आहे माधव. बघायला हवा हा पिक्चर. उच्चार काय आहे?
अस्वा वाचताना सारखं अस्वल वाचलं जातंय
उच्चार काय आहे? >>> एक तर
उच्चार काय आहे? >>> एक तर तमिळ आख्या सिनेमात एकदाच तो उच्चार येतो - अगदी शेवटी. त्यामुळे तो नीट कळलाच नाही मला. (नावात काय आहे असे नाही म्हणत कारण सगळा सिनेमा नाव आठवण्यावरच बेतलेला आहे )
सुरेख परिचय माधव. मी थोड्सा
सुरेख परिचय माधव. मी थोडा वेळ बघून फराळाच्या मागे लागले पण नक्कीच बघणार आहे.
फुलवंतीतल्या गश्मीरवर फिदा झालेल्या ताई माई अक्कांची कदाचीत निराशा होइल कारण आंघोळ करतानाचे काहीही दृष्य नाहीये ) तेंव्हा तो खरच एकदम फ्रेश दिसतो.>>>> गोऱ्यापान अस्वाला 'पोलार बेअर' म्हणावे का ?
नावाचा उच्चार कदाचित 'अश्वा' असावा स ला श, श ला स करतात दक्षिणेत.
Meiyazhagan चा उच्चार शोधला तर 'मेयाळगन' असे ऐकू आले. Zh हे तमिळ मधे ळ सारखे उच्चारतात असे हर्पाने Ponniyan Sevan सिनेमाच्या पोस्टीत मी 'पुंगुळली' हवे होते व 'पुंगुझाळी' लिहिले होते तेव्हा सुचवले होते.
https://www.youtube.com/watch?v=lTyrfdy8Ta0
अस्वा वाचताना लक्षातच आले
अस्वा वाचताना लक्षातच आले नाही तो अरविंद स्वामींना शॉर्टकट मारलाय. मला ते कॅरेक्टरचे नावच वाटत होते.
आता पुन्हा वाचून थोडे स्वजो (स्वप्नील जोशी) सारखे vibes येत आहेत. असे शॉर्ट फॉर्म मायबोली बाहेर च्या जगात जास्त वापरले जात नसल्याने गोंधळायला होते. शाखा सुद्धा इथेच ऐकले पहिल्यांदा.
मी तमिळ एक्स्पर्ट नाही, पण
मी तमिळ एक्स्पर्ट नाही, पण अस्मिताने दिलेला उच्चार बरोबर वाटतो आहे. Zh चा उच्चार ळ आणि र याच्या मध्ये कुठेतरी आहे. अमेरिकन लोक R उच्चारताना जीभ रोल करून जो उच्चार करतात ना, त्याच्या साधारण जवळपास जाणारा, पण थोडा जास्त स्पष्ट, असा हा उच्चार आहे.
माधव, सुंदर रिव्ह्यू लिहिला आहे. बघायची इच्छा झाली ते वाचून.
छान परिचय. कुठे बघितला?
छान परिचय.
कुठे बघितला?
Pages