चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

किती निर्जीव - जड डोळे आहेत. मंद एकदम. >> बिंगो. मला त्याचे डोळे बघितले कि मेलेल्या बोकडाचे निर्जीव डोळेच आठवतात. आर्यामधे तो लवकर मेला हे बरेच झाले पण त्याच्या फ्लॅशबॅकने उच्छाद मांडला नंतर. तो ए बी टॅलेंट सर्च ने फाईंड होता हे आठवले कि तेंव्हा अमिताभचे दिवाळे का निघाले होते ते लक्षात येते. Wink

मेलेला बोकड Proud असं डायरेक्ट म्हणू नये म्हणून मी चांगले शब्द वापरले होते पण तू घात केलास.

तो ए बी टॅलेंट सर्च ने फाईंड होता हे आठवले कि तेंव्हा अमिताभचे दिवाळे का निघाले होते ते लक्षात येते>>>

'तेरे मेरे सपने' हा एबीसिएलचा चित्रपट होता, ज्यात अर्शद वारसी व चंद्रचूड नवोदित कलाकार होते. ज्यात 'आंख मारे ओ लडका आंख मारे' गाणे होते. तोच आपटला होता आणि त्या वेळी अमिताभने 'एक रहे ईर, एक रहे बीर, एक रहे फत्ते ते एक रहे हम' असे गाणेही गाऊन अल्बम काढला होता. तोही बोंबलला बहुतेक. मग कौन बनेगा करोडपतीने त्याला या कर्जातून बाहेर काढले असे काही तरी वाचले होते.

काल "लाइक आणि सब्स्क्राइब" नावाचा मराठी ( (: ) चित्रपट थिएटर मधे पाहिला.
खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले. चित्रपट वेगळ्या धर्तीचा आहे. त्यात रहस्य आहे, आणि शेवटच्या मिनिटापर्यंत उत्कंठा टिकवणारे आहे. चित्रपटाची कथा जलद उलगडत जाते. अजिबात एक मिनिट सुद्धा चित्रपट रेंगाळत नाही. दोनच गाणी आहेत. एक गौतमी पाटीलची लावणी. आणि दुसरं ब्लॉगरच. अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा अभिनय उत्तम. जुई भागवतचा पदार्पणातही छान अभिनय. दिग्दर्षकाने प्रत्येक पात्राचा व्यवस्थित उपयोग करून घेतला आहे. एकही पात्र उगाचच आहे वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टीही अचूक आणि जिथल्या तिथे आहेत.
खूप चांगला सिनेमा अचानक पाहिला मिळाला आणि मराठी सिनेमा असल्याचा आनंदही झाला.

पण थिएटर मधे मोजून २५-३० माणसे होती. याचे आश्चर्य वाटले. असे का?. फक्त मराठी सिनेमाबाबत असे होते का सगळ्याच नविन चमुच्या चित्रपटांचे असेच होते.?

राजस्थानच्या राजघराण्यातील आहे चंद्रचूड सिंह.
>>
चंदीगड मधे म्यूझिक टीचर होता सिनेमात यायचा आधी...

'तेरे मेरे सपने' हा एबीसिएलचा चित्रपट होता, ज्यात अर्शद वारसी व चंद्रचूड नवोदित कलाकार होते. ज्यात 'आंख मारे ओ लडका आंख मारे' गाणे होते. तोच आपटला होता
>>
तेरे मेरे सपने हिट होता
त्या काळात 3 कोटी बजेट वर 13 कोटी कमावले होते... (Ref: box-office)

सगळीच माहिती चूक निघाली म्हणजे माझी. Happy धन्यवाद ॲन्की. गूगल केल्यास तो राजघराण्यातील आहे असे दिसतेय पण असो.

तेरे मेरे सपने हिट सुद्धा होता आणि त्याची हवा सुद्धा झाली होती. अर्थात अर्शदच भाव खाऊन गेलेला. पण ओपोजिट कॅरेक्टर जोडी म्हणून दोघे एकत्र चांगले वाटलेले.
त्यातले आंख मारे ओ लडकी गाणे तर अजरामर झाले आहे..

अजरामर थोडं जास्त झाले नाही का ऋ Lol
रामायण, महाभारत आणि 'आंख मारे ओ लडकी आंख मारे' ही तीन महाकाव्ये झाली मग. Wink

हे गाणे खरेच ऑल टाईम हिट आहे. मी खराखुरा नाईन्टीज किड आहे. त्या गाण्याची क्रेझ आणि तो काळ मी अनुभवला आहे. त्यासाठी मला गुगल करायची गरज नाही.

अर्शद आणि चंद्रचूर यांचा बेताबी सुद्धा धमाल होता. अर्शद वारसीच्या कॉमिक टायमिंगच्या तेव्हापासून प्रेमात आहे. मुन्नाभाई वगैरे फार नंतर आले.

अमिताभ शशी कपूर, अनिल कपूर जॅकी श्रॉफ, अक्षय सैफ, अशोक सराफ लक्ष्या, यांच्याप्रमाणे चंद्रचूर अर्शद जोडी जमायची लक्षणे होती तेव्हा. पण तीन खान आले आणि सोलो हिट देऊ लागले. जे यांना जमणारे नव्हते.

तरी सुद्धा चंद्रचूर हा दाग द फायर, जोश, क्या कहना चित्रपटात सुद्धा तो लक्षात राहिला होता.
ऐश्वर्याच्या अपोजिट काम करणे आणि ते सुद्धा ती शाहरुखची बहीण दाखवली असताना मजाक आहे का Happy

मेलेल्या बोकडाचे निर्जीव डोळेच >>
तेंव्हा अमिताभचे दिवाळे का निघाले होते ते लक्षात येते >>>
अजरामर थोडं जास्त झाले नाही का >>>
Rofl

धमाल चालू आहे इथं. पुन्हा बारीक लक्ष ठेवायला पाहीजे.

क्रिती, अनन्या राहिल्या आचार्य. घ्या बरे पळीतून पाणी नि सोडा हातावर >>> Lol
उजव्या हाताने गोकर्ण मुद्रा करून आत्मतीर्थ घेत टंकन करताना सर्कस करावी लागतेय. क्रिती, अनन्या बद्दल बोलायचं तर हे केलंच पाहीजे. Lol

क्रिती सेनॉन कंपनी सेक्रेटरी वाटते हे आधी पण लिहीलेले आहे.
अनन्या पांडे म्हणजे मोठ्या दादाची मुलगी, पुतणी असल्यासारखं वाटतं. तरतरीत , गोड चेहरा आहे.
{चंकी पांडे (अभिनयात) कसा का असेना शाळेत असताना तो गोविंदापेक्षा आवडायचा.}

का हो रआ, तुमची टंचनिका टंकनिका कुठे गेली..? Lol
(आम्ही तुम्हाला एक वेळ विसरु... पण तिला नाही)

ॲन्की, शक्य आहे खरे. Happy ते 'पण असो' याकरिता लिहिले होते कारण चंद्रचूड सिंह तेवढा इंट्रेस्टींग वाटत नाही.

उजव्या हाताने गोकर्ण मुद्रा करून आत्मतीर्थ घेत टंकन करताना सर्कस करावी लागतेय. >>>> Lol

मी खराखुरा नाईन्टीज किड आहे.>>>>
ऋ, तू 'खरोखरचा' नाईन्टीज किड आहेस पण मी मात्र प्लास्टिकची आहे का ? Lol

मधे कुठल्यातरी फूड चॅनल वर त्यांच्या राजस्थानी पाककृती सांगत होता. राजस्थानच्या राजघराण्यातील आहे चंद्रचूड सिंह>>>>

रॉयल रसोई ही मालिका होती ज्यात वेगवेगळ्या राजघराण्यातल्या पाकृ दाखवायचे. हा होस्ट होता शोचा.

https://www.hindustantimes.com/tv/chandrachur-singh-s-tv-debut/story-g1Y...

ते 'पण असो' याकरिता लिहिले होते कारण चंद्रचूड सिंह तेवढा इंट्रेस्टींग वाटत नाही.>>
ये तो आपने लाख रुपये की बात काही है...

पण मी मात्र प्लास्टिकची आहे का ?
>>
+१

पण मी मात्र प्लास्टिकची आहे का ? Lol Lol

नाही त्यामागे एक संदर्भ होता. ही पोस्ट लिहायच्या जेमतेम दहा मिनिटे आधी एका मैत्रिणीने एक व्हिडिओ शेअर केला होता. तोच टिपिकल नाईंटीज किड नोस्टेलजियावाला.. तिला तिची जन्मतारीख विचारली तर तिने नव्वदीतली सांगितली (काय माहीत खोटेही म्हणाली असेल) पण त्यावर तिला वैतागून म्हणालो होतो की ज्यांनी 80 च्या दशकात जन्म घेतला आणि ज्याना 90 च्या दशकात अक्कल आली होती ते खरे नाईंटीज किड, उगाच 90 च्या दशकात जन्म घेतलेल्यानी आमच्यात येऊ नये.. तोच टोन पोस्ट मध्ये सुद्धा आला Happy

ज्याना 90 च्या दशकात अक्कल आली होती
आणि द्वितीय सहस्त्रकाच्या प्रथम दशकात टक्कल पडले होते...

मीही गंमतच करत होते ऋ Happy

दो पत्ती ( नेटफ्लिक्स) काजोल, कृती सॅनन (डबल रोल) , शाहीर शेख, तन्वी आजमी
थ्रिलर म्हटलाय पण डोमेस्टिक व्हॉयलेंस वर आहे सगळा. सुरवातीला चांगला वाटला पण तासाभरात पकड सुटली आहे. कृतीच्या डबल रोल मधे एक साधीसरळ नैराश्यग्रस्त व एक कॉन्फिडन्ट, बोल्ड, सेक्सी, स्पोर्टी आहे. दोघींचेही ध्रुववर प्रेम असते, तो एकानंतर दुसरीच्या प्रेमात पडतो. वाईल्ड कृती सोडून होमली कृती निवडतो. शिवाय ती मार खाऊनही गप्प बसणाऱ्यातली असते, जे त्याच्या सोयीचे असते. लग्न झाल्यावर पुन्हा मेहुणीशी अफेअर सुरू होते, बायकोला मारहानही करत राहतो. मग काजोल जी त्याच्या मागावरच असते , तिच्या मदतीने कृती त्याला शिक्षा करते. शेवटी एक ट्विस्ट आहे, जो मला फुसका वाटला. विशेष आवडला नाही सिनेमा. जमेच्या बाजू म्हणजे अभिनय बरा आहे, शाहीर सोडून. तो दुष्ट न वाटता मृदु वाटतो व दिसतो. त्याच्या कामात कन्व्हिक्शन दिसत नाही, त्याचे उच्चार अस्पष्ट आहेत. सस्पेंस किंवा थ्रिलर न वाटता सामाजिक संदेश नव्या हॉट पद्धतीने मांडल्यासारखा वाटला. कौटुंबिक हिंसाचार अतिशय गंभीर गोष्ट आहे पण यांना ती नीट मांडता आली नाही. काजोलच्या हरयानवीचा 'आनंद' आहे, यापेक्षा 'आरण्यक' मधली रवीना जास्त चांगली पोलीस वाटली होती. मधेच काजोल पोलीसची वकील कशी झाली तेही कळले नाही. कृतीची दोन्ही कामे चांगली झाली आहेत. तन्वी आझमी नेहमीप्रमाणे छानच, घुसमट चांगली दाखवता येते हिला. लोकेशन्स सुंदर आहेत, गाणी लक्षात राहत नाहीत किंवा कमी असती तर बरे झाले असते असे वाटले. घरगुती व नवरा बायकोच्या भांडणात पडू नये, बोट पिरगाळले, हात भाजला, चापट मारली तर काय हे तर चालायचेच असे एका वकीलाच्याच तोंडचे वाक्य ऐकून धक्का बसला पण ते हेतुपुरस्सर असावे. कथेत फारसा दम नाही, बघा किंवा बघू नका.

अस्मिता, ती पोलिस असताना external शिकून डिग्री घेतलेली असते बहुदा.
पिक्चर मला बरा वाटला. एकच सीन अगदी अंगावर आला तो म्हणजे शाहीर तिला मारतो तेव्हा. मला शेवटपर्यंत वाटत होतं की उलटा ट्विस्ट असेल. पण जस तू म्हणालीस, फुसका ट्विस्ट होता.
काजोल तर अजूनही K3G च्या रोलचा extended पार्ट वठवतेय असं तिच्या नंतर आलेल्या प्रत्येक पिक्चर बद्दल वाटतं मला. तान्हाजी मध्ये पण अजय सोबत अशी लगबगीने चालत चालत निघते की कधी ही "जीत गये, हम जीत गये" चालू करेल.
आणि ती बिना हेल्मेट त्या रस्त्यावरून ड्राईव्ह करताना दाखवली आहे तेव्हा Hagrid वाटते..

ती पोलिस असताना external शिकून डिग्री घेतलेली असते बहुदा.
>>> धन्यवाद, मला काही क्लिक झाले नाही. 'चला हवा येऊ द्या' सारखे आधी पोलिस मग वकील वाटले. Happy

बाकीची पोस्ट Lol Lol K3G ला +१.

Pages