Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नैसर्गिक गूळ वापरून बघा.
नैसर्गिक गूळ वापरून बघा.
आमच्याकडे माझ्या सासूबाई
आमच्याकडे माझ्या सासूबाई आल्या की कधी कधी गुळाचा चहा करतात, पूर्ण दुधाचा.
दूध फाटू नये म्हणुन एकीकडे चहा होत असताना दुसरी पाण्यात गुळ घालुन गरम करायला ठेवून गूळ पूर्ण विरघळवुन घेतात आणि चहा झाला की त्यात गरम गुळाचे पाणी घालतात. मी सेंद्रिय गूळ आणतो, पण त्यांच्याकडे साधा गुळच वापरतात.
हे मी स्वतः कधी केले नाही.
थोडया सॅम्पलवर प्रयोग करता आला तर बघा.
मीरा, गुळाचा खरवस जास्त छान
मीरा, गुळाचा खरवस जास्त छान लागतो साखरेपेक्षा. आपण लहानपणी गुळाचाच खाल्ला असल्याने ती चव जास्त आवडत असावी कदाचित. मी लहानपणी जेव्हा जेव्हा खाल्ला तेव्हा गुळाचाच खाल्ला आहे.
प्रमाण हे चीकानुसार ठरते. चीक कितव्या दिवसाचा आहे त्याप्रमाणे. पहिल्या दिवसाचा असेल तर दूध जास्त लागते. दुसऱ्या दिवसाचा असेल तर कमी. आम्हाला जेव्हा मिळतो तो ओळखीतूनच. मग विचारतो सरळ देणाऱ्याला कितव्या दिवसाचा आहे. दूध कधी मोजून घातलं नाही त्यामुळं मला अचूक प्रमाण सांगता येणार नाही. कूकरच्या स्टीलच्या दोन भांड्यात मिळून जेव्हा चीक शिजवायला ठेवला जातो तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या चीकासाठी अंदाजे पाऊण ते एक वाटी (१०० ml) दूध लागते मला. चीक+नेहमीचे दूध+गूळ एकत्र चमच्याने ढवळायचे मग कुकर लावायचा. कधीही दूध खराब झाल नाही या पद्धतीने. गूळ घरात असेल तो वापरला आहे. किराणा दुकानातून आणून बारीक चिरून ठेवलेला.
चहा/कॉफीसाठी रूचीयाना गूळ पावडर आणलेली आहे. गेली चार वर्षे हीच पावडर वापरली जाते घरी चहा कॉफीसाठी. दूध+पाणी+चहा/कॉफी पावडर एकत्र उकळून कपात गाळून घेणे, त्या कपात वरून हवी तेवढी गूळ पावडर चमच्याने घालून ढवळणे. पावडर असल्याने फार ढवळावे लागत नाही. दोनदा फिरवला चमचा की विरघळते लगेच. दूध आजपर्यंत कधी फाटले नाही या पद्धतीने.
मंजुताई नेहमी विकत आणताना
मंजुताई नेहमी विकत आणताना नैसर्गिक गुळ म्हणूनच आणला जातो, पण हे ऑरगॅनिक फूड जे आणतो त्याच्या मागील खरं खोटं देव जाणे. मागील वेळेस तोच वापरला तरी चीक खराब झाला.
मापृ, दुपारी तुमची पोस्ट वाचली आणि आता हे suggestion अंमलात आणुन चीक करायला ठेवला आहे. थोड्या कोमट दुधात गुळ विरघळवुन ते मिश्रण मुख्य चीक असलेल्या भांड्यात ओतलं आहे.
नोबिता, मला पूर्वी खरवस माहित देखील नव्हता. लहानपणी क्वचित आणलाच तर त्याच्या गुंईगुंई टेक्सचर मुळे खाल्ला नव्हता. नंतर आठवले डेअरी (पुणे) मधे दोन्ही - गुळ आणि साखर खरवस मिळतात, ते दोन्ही खाल्ल्यावर गुळाची चव जास्त आवडली. तुम्ही सांगितलेला गुळाचा ब्रँड आणुन ठेवते. कॉफी मधे आवडणार नाही, पण कोणाला हवा असल्यास थंडीत गुळाचा चहा ऑफर करू शकते.
तुम्हा तिघांना धन्यवाद !
दिवाळी फराळ चुका सुरू.
दिवाळी फराळ चुका सुरू.
काल पोह्यांचा चिवडा करताना फोडणीत लसूण घालायला विसरले. नंतर वेगळी फोडणी करून त्यात टाकून मग चिवड्यात मिसळून चालेल का? चाललं तर फोडणी गरमागरम मिसळावी की गार करून?
लसूण नाही घातली तरी चालेल.
लसूण नाही घातली तरी चालेल. आमच्याकडे लसूण घालत नाहीत त्यामुळे हा पर्याय सांगितला.
चाललं तर फोडणी गरमागरम मिसळावी की गार करून? >>> गार करुन. अर्थात जाणकार सांगतील.
परत फोडणी करून घातली तर जास्त
परत फोडणी करून घातली तर जास्त तेलकट नाही का होणार?
फक्त लसुण तळुन घेऊन ते झाऱ्याने काढुन गार झाल्यावर घातले तर कसे?
फक्त लसुण तळुन घेऊन ते
फक्त लसुण तळुन घेऊन ते झाऱ्याने काढुन गार झाल्यावर घातले तर कसे?>>>>
हे चालेल.
खरवस update -
खरवस update -
गुळाचा खरवस फुटला / फाटला / नासला नाही. छानशा मऊसर juicy वड्या कापता आल्या.
तुम्हा तिघांचे पुन्हा एकदा आभार.
लसूण नाही घातली तरी चालेल.
लसूण नाही घातली तरी चालेल. आमच्याकडे लसूण घालत नाहीत त्यामुळे हा पर्याय सांगितला.>>> नवऱ्याने पहिल्या घासातच विचारलं,"लसूण नाही टाकलीस का?". बाकी शेंगदाणे, खोबरं, डाळवं, काजू, मनूका हे सगळं असूनही दिसलं नाही त्याला. लसूण फॅन क्लब वाला आहे तो.
फक्त लसुण तळुन घेऊन ते झाऱ्याने काढुन गार झाल्यावर घातले तर कसे?>>>>
हे चालेल.>>>> हेच करते आता.
थैंक्यू अन्जू, मानव, साधना.
बाकी शेंगदाणे, खोबरं, डाळवं,
बाकी शेंगदाणे, खोबरं, डाळवं, काजू, मनूका हे सगळं असूनही दिसलं नाही त्याला. >>> दोषैकदृष्टी म्हणून तु क टाकायचा एक
ग्रोसरी मॅनेजमंटेसाठी कोणी अ
ग्रोसरी मॅनेजमंटेसाठी कोणी अॅप वा अन्य काही सॉफ्टवेअर वापरलं आहे का? काय अनुभव?
लसूण फॅन क्लब वाला आहे तो.>>>
लसूण फॅन क्लब वाला आहे तो.>>> चिवड्यात तळून टाकलेला खुसखुशीत लसूण वेचून खाणारा खरा रसिक. छान लागतो.
चिवड्यात तळून टाकलेला
चिवड्यात तळून टाकलेला खुसखुशीत लसूण वेचून खाणारा खरा रसिक. छान लागतो >>> +१. मी पण चिवड्यातला लसूण फॅक्ल वाली
आम्ही भडंग चिवडा केला तर
आम्ही भडंग चिवडा केला तर क्वचित लसूण घालते त्यात. एरवी नाही घालत.
हो. मला पण भडंग मधला खरपुस
हो. मला पण भडंग मधला खरपुस तळलेला, त्याला थोडं तिखट मीठ चिकटलेला असा लसूण फार आवडतो. पातळ पोह्यात नाही घालत पण छानच लागेल. तळलेला लसुण आवडत असेल तर तो आणि अंगासरशी जे तेल यईल तितकंच तेल वरुन घातलं तर चालून जावं. सगळी फोडणी ओतलीत तर तेलकट होईल.
Hi ek chiwda prakar patal
Hi ek chiwda prakar patal pohe. Hyat janseva kachcha amazing ase. Eke version amcha deshsthi. Aai aaramat karri. Bhajke pohe partin kurkure karaiche. Kanda laamb kaape sukawaoon taloon . W lasoon. Teva kachcha aawade Kanda limbu ghaloon. Aata nostalgia.
Mood uplift sathi Lawrence
Mood uplift sathi Lawrence Sanders chi pustake ghya. Bishnoi nahi. Macnally series. For small secrets crimes and fun English. No violence p RV vulgarity. My favourite s. If you love gentle Humour
I am also listening to the rain maker. Insurance reimbursement story. Old favourite and currently we are going through same cycles.
Mood uplift sathi Lawrence
Mood uplift sathi Lawrence Sanders chi pustake ghya. Bishnoi nahi. Macnally series. For small secrets crimes and fun English. No violence p RV vulgarity. My favourite s. If you love gentle Humour
I am also listening to the rain maker. Insurance reimbursement story. Old favourite and currently we are going through same cycles.
Also I have one audio
Wrong bb
Wrong bb
भरत, मी वापरते बिग बास्केट
भरत, मी वापरते बिग बास्केट आणि अन्य इन्स्टन्ट डिलिवरी अॅप्सपण. तुम्हाला काय माहिती हवी आहे?
शॉपिंग+डिलिव्हरी अॅप्स मीही
शॉपिंग+डिलिव्हरी अॅप्स मीही वापरतो. घरात असलेल्या ग्रोसरीची / पँट्री मॅनेजमेंट करण्यासाठी अॅप वापरलं आहे का? म्हणजे काय संपलंय, एखादा जिन्नस किती दिवस पडून आहे, याचा ट्रॅक ठेवायला.
एक जिन्नस घरात असताना पुन्हा मागवला जाणं, एखादा जिन्नस पडून राहून खराब होणं , या गोष्टी टाळण्यासाठी हवं आहे.
https://www.meetpenny.com/grocery-list-and-pantry-management-apps/ इथे दिलेली अॅप्स हायफाय आहेत. बार कोड स्कॅन करा, इ.
नाही, इतकं हायफाय काही करत
नाही, इतकं हायफाय काही करत नाही. मेंदू नामक पारंपरिक अॅप वापरते.
महिन्याचा किराणा भरताना एकदा डबेडुबे चेक करते काय आहे, नाही ते! अगदी काटेकोर मापाने महिन्याच्या हिशोबाने किराणा भरलेला असतो माझा. त्यामुळे क्वचित ट्रॅ़क ठेवायला लागतो. तेवढं महिना पंधरा दिवसांनी चेक करते.
मी हे अॅप वापरते. पॅन्ट्री
मी हे अॅप वापरते. पॅन्ट्री मॅनेज करत नाही ते, पण रोजच्या वापरात अमुक जिन्नस संपत आला आहे असं दिसलं, किंवा आता दिवाळी आली तर उदाहरणार्थ बेसन जास्त लागेल असं सुचलं की त्यात नोंदवून ठेवते. अॅपमध्ये दुकानांची लिस्ट आणि त्या-त्या दुकानातून काय घ्यायचं आहे त्याची सब-लिस्ट करता येते. खरेदी करताना मग ती हाताशी येते. जिन्नस घेतला की तो लिस्टमधून क्रॉस ऑफ किंवा डिलीट करता येतो - आणि अॅप फॅमिली मेम्बर्सबरोबर शेअर करता येतं. त्यामुळे एकच जिन्न्स संपतोय असं वाटून दोघांनी आणला असं होत नाही.
ग्रोसरी शॉपिंगला जाताना लिस्ट करायला घेण्यापेक्षा लक्षात येईल तेव्हा नोंदवून ठेवण्याची पद्धत मला सोयीची वाटते. याबाबत प्रत्येकाचे प्रेफरन्सेस निराळे असतील.
ग्रोसरी शॉपिंगला जाताना लिस्ट
ग्रोसरी शॉपिंगला जाताना लिस्ट करायला घेण्यापेक्षा लक्षात येईल तेव्हा नोंदवून ठेवण्याची पद्धत मला सोयीची वाटते>>>आमचं मम व्हर्जन:
जिन्नस संपला किंवा असूनही अधिक हवा असला की लगोलग त्याचं नाव फळ्यावर लिहायचं. त्यासाठी खास दुधी काचेची पाटी बाबांनी स्वयंपाकघरात बसवून घेतलेली होती. सामान बहुतेक वेळा बाबा किंवा आईबाबा दोघंही आणत त्यामुळे दोनदा आणलंय असं सहसा होत नव्हतं.
(किराणा, कामांची यादी, निरोप, फोन नंबर असं रोज काही ना काही असेच, ते रोजच्यारोज पुसून पुन्हा पाटी कोरी. मग आमची मुलं तिथेच चित्रं काढत असत.
जरा विषयांतर झालं, सॉरी..)
आम्ही पण फळा-खडू वालेच किचन
आम्ही पण फळा-खडू वालेच किचन पँट्री आणि फ्रिजच्या मधेच लावलाय बोर्ड.
इथून तिथून जे संपेल ते बोर्ड वर येऊन सगळे मेंबर लिहितात. जे कोणी जातंय दुकानात त्याचा फोटो काढून नेतात नाहीतर घरी फोन करून विचारत बसतात मी अमुक अमुक ठिकाणी आहे लिस्ट मधलं काय हवंय का?
अॅप वगैरे वापरण्याएवढी मी ऑर्गनाईज्ड नाहीये.
वेगळं अॅप वगैरे वापरत नाही.
वेगळं अॅप वगैरे वापरत नाही. गूगल कीप मधे लिस्ट तयार केली आहे. एखादी वस्तू संपली की लिस्ट अपडेट करत राहते. काहीकाही आयट्म्स दर आठवड्याला लागतात ते त्या लिस्ट मधे खालीच क्रॉस्ड स्वरूपात राहतात, ते अनचेक केले की परत लिस्टीत येतात. सोपं पडतं. शिवाय यात इंडेंट करता येत असल्याने दुकानवाइज लिस्ट केलेली आहे.
ऍपची गरज लागली नाही अजून.
ऍपची गरज लागली नाही अजून. दुकानातून काय आणायचं असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर सरळ त्यासाठी Whatsapp गृप केला आहे. कोणाला काही हवं असेल तर फॅमिली मेम्बर त्यात भर घालत रहातात. आणून झालं की तिथून delete करतो.
तसंही किराणा आणायला महिन्याची वाट पहात नाही. वेळ असेल तर रिलायन्स मधून किंवा बिग बास्केट वरून ऑर्डर करतो.
रोजच्या किरकोळ गोष्टी - दूध इ असतील तर त्यासाठी दुसरा गृप केला आहे त्यातले मेसेज २४ तासांनी आपोआप delete होतात.
आम्ही दुकानात जाऊन जे दिसेल
आम्ही दुकानात जाऊन जे दिसेल ते उचलतो. राहिलं काही आणि स्वयंपाक करायला लागलं की आठवतं. की परत दुकानात जातो किंवा मेन्यू बदलतो. कधी कागदावर लिस्ट करतो, कधी व्हॉट्सअॅपवर आठवेल ते लिहितो. डबल आलं तर संपवत बसतो. आलंच नाही तर बिन आल्याचा चहा करतो... आपलं .... काहीतरी वेगळंच करतो. किंवा जेवायला बाहेर जातो. किंवा सिरिअल खातो. किंवा मॅगी खातो. किंवा बरंच काय काय खातो. उबर ईट्स करतो.
भरतच्या प्रश्नाचं उत्तर न द्यायचा आटोकाट प्रयत्न केला आहे.
(No subject)
Pages