Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
राजगिर्याच्या दशम्या मस्त
राजगिर्याच्या दशम्या मस्त होतात. आमची आई नवरात्रीच्या उपासांकरता नेहमी आणते ते पीठ.
धन्यवाद मानव.
धन्यवाद मानव & धनि.
राजगिर्यात बटाटा, दाणे कुट मिर्ची घालून मस्त थालिपीठ होतात.
कालच बरीच पिठं मागवलीत. आठवडी १ तरी वेळ भाकर करण्याचा इरादा आहे
foxtail millet..ह्यालाच मखाना म्हणतात का? ह्याचे भडंग टाईप केले जाते, भेळ छान लागते.
मखाणे म्हणजे कमळाच्या बिया ना
मखाणे म्हणजे कमळाच्या बिया ना?
कमळ नाही एक प्रकारची वॉटर
कमळ नाही एक प्रकारची वॉटर लीली.
राजगिर्याच्या दशम्या मस्त
राजगिर्याच्या दशम्या मस्त होतात. >>> रेसिपि देणे
मखाणे म्हणजे कमळाच्या बिया ना
मखाणे म्हणजे कमळाच्या बिया ना?>> हो. त्या कशा काढतात कमळातून (मुळांमधून) ह्याचा १ व्हिडीओ पाहिला होता. जिकीरीचं काम आहे. म्हणुन महाग आहे.
आत्ता गुगलले, फॉक्स टेल मिल्लेट ला काकूम असं काहीतरी नाव आहे. दिसायला ज्वारी दाण्यांसारखे दिसत आहे. पीठ मिळाले तर आणेन.
कमळ नाही एक प्रकारची वॉटर
कमळ नाही एक प्रकारची वॉटर लीली….
. त्या कशा काढतात कमळातून (मुळांमधून) ह्याचा १ व्हिडीओ पाहिला होता. जिकीरीचं काम आहे>>>>>
आता माझे डोके गरगरले….. कमळातुनच बिया काढतात आणि
कमलदलाच्या मध्ये जो भाग असतो त्यातुन बिया निघतात असा माझा समज होता.. पण ऋतुराजनी लिहिलेय म्हणजे बरोबरच असणार म्हणुन गुगलुन बघितले… काय किचकट काम आहे. फळ पक्व होऊन ते फुटते, बिया पाण्यावर तरंगतात आणि वरचे आवरण गेल्यावर खाली चिखलात रुततात… मग त्या गाळुन काढा आणि पुढची तितकीच किचकट प्रोसेस करा..
मखाने इतके महाग विकतात. विडिओतल्या प्रोसेसिन्ङ करणार्या जनतेकडे पाहुन त्यांना खुपच कमी पैसे मिळतात असे वाटले. हे असे सर्बत्रच आहे म्हणा…
फॉक्स टेल मिल्लेट ७-८ तास
फॉक्स टेल मिल्लेट ७-८ तास भिजवून नंतर भातासारखे शिजवून चपाती/भाकरी ऐवजी खाता येते. ते भाजीत मिसळून बाजूला कोशिंबीर, लोणचे घेते.
रेसिपि देणे >> जाई, आई कडून
रेसिपि देणे >> जाई, आई कडून घेऊन इथे टाकतो
:ड
राजगिर्याच्या दशम्या >>>>>>>
राजगिर्याच्या दशम्या >>>>>>>> मी जे करते त्याला दश्म्या म्हणायचं की नाही तुम्हीच ठरवा.
बटाटे उकडून किसायचे. साधारण मिडीयम २ घेते. त्या किसलेल्या बटाट्यात मळलं जाईल एवढं राजगिरा पिठ आणि भरपूर कोथींबिर हिरवी मिरची आल्याचे वाटण, थोडं दही, धनेजिरे पावडर, मीठ, चिमुटभर साखर घालून मळते. थापता येईल इतपत लहान लहान पराठे/थालिपिठं लावते.
छान आहे ही रेसिपी. थँक्स
छान आहे ही रेसिपी. थँक्स अंजली.
वेलकम सामो.
वेलकम सामो.
अंजली मी सेम असेच करते.
अंजली मी सेम असेच करते.
दशमी प्रकार मला वाटते, गुळ, दूध, वेलची घालून करतात.. ती जास्त टिकते.
जाई > आमच्याकडे दूध घालून
जाई > आमच्याकडे दूध घालून करतात पण गूळ वगैरे नाही घालत.
दुसरी कृती आई ने सांगितली ती अशी - पिठात थोडे तिखट मीठ पाणी घालून भिजवायचे. पाहिजे तर कोथिंबीर चिरून घालायची. लाटताना चिरा जातात म्हणून तेलाचा हात लावून घ्यायचा. पीठ चिकट होते म्हणून हाताला पण तेल लावायचे
एका बाजूने भाजायची मग त्याला तेल लावायचे असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे.
तिखट मिठाची केली तर थोडं आंबट
तिखट मिठाची केली तर थोडं आंबट ताक/ दही आणि मिरच्या चिरुन घालायच्या.
Pages