Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्तच.
मस्तच.
आई करायची कोशिंबीर पण लोणचं मसाला नव्हती घालत. इथे थोडेच पेरू आणते, मग खातोच ते.
मेथीचे ठेपले शिळे झाले तरी
मेथीचे ठेपले शिळे झाले तरी तुकडे पडत नाही त्यासाठी काय घालतात?
दही + अधिकचे मोहन >>> हे घालतेच. तरी तुकडे पडतात..
दही कमी घालून बघा. दह्यातल्या
दही कमी घालून बघा. दह्यातल्या प्रोटीनमुळे ग्लूटेन असलेले पदार्थ चटकन करपतात व तुकडेही पडू शकतात.
बरेच प्रयोग करून झाले… त्यात
बरेच प्रयोग करून झाले… त्यात हा ही झाला अस्मिता! मोहन, बेसन कमी जास्त केलं वै वै पण विकतच्यासारखे ठ/थेपले जमले नाहीत.
जाऊ द्या मग.
जाऊ द्या मग.
इतके प्रयोग केलेत तर
इतके प्रयोग केलेत तर जलसमाधीचा सुध्दा करून पहा
मंजू ताई .केळ घालतात काही जण
मंजू ताई .केळ घालतात काही जण..हा प्रयोग करून बघायचा राहिला असेल तर
आणि माझी गुजराती मैत्रीण
आणि माझी गुजराती मैत्रीण सांगायची की पोळपाट दिसलं पाहिजे वरून इतका पातळ लाटायचा ठेपला
बटाटा प्रयोग झाला. आता केळं
बटाटा प्रयोग झाला. आता केळं जाड,पातळ लाटून झाले…. जलसमाधी जलसमाधीवाल्या पुपो ह्याच धाग्यावर होत्या का? पण त्यात कणिक चालेल का की मैदा/रवा घालावा लागेल?
मंजूताई तेल जरा जास्तच
मंजूताई तेल जरा जास्तच घालायचे मळताना. बेसन, दही लिहिले आहेच वर. थोडी (२ चमचे) भाजणी पण घालू शकता. शेकताना पण एकदा तवा गरम झाला की पुढचे मंद आचेवर भाजा. आमच्या मावशी तेलावरच लाटतात. मेन म्हणजे तेलच जास्त.
जलसमाधीवाल्या पुपो ह्याच
जलसमाधीवाल्या पुपो ह्याच धाग्यावर होत्या का? पण त्यात कणिक चालेल का >>>
हो मंजूताई. जलसमाधीला नुसती कणिक घेऊन चालेल. मी केल्या होत्या.
काय केलं finally ते लिहा इथ
काय केलं finally ते लिहा इथ मंजू ताई
पाव किलो जवस / flax seeds
पाव किलो जवस / flax seeds सापडलेत साठवणीच्या डब्यात . Salted & Roasted आहेत . Expiry date उलटून गेलेय . खाऊन बघितले तर थोडे कडवट लागतायत . त्यांचा खाण्याव्यतिरिक्त काय उपयोग करता येईल का ?
धन्यवाद .
केसांना लावा जेल बनवून. पण
केसांना लावा जेल बनवून. पण भाजलेल्याचा जेल बनेल का माहीत नाही.
कंपोस्ट करा.
कंपोस्ट करा.
मिक्सर मधून जाडसर दळून स्क्रब
मिक्सर मधून जाडसर दळून स्क्रब म्हणून वापरता येईल. किंवा अगदी बारीक दळून, दुधात मिसळून फेस पॅक?
पण सॉल्टेड असल्याने जरा संदेह वाट्तो.
प्रतिसादा बद्दल धन्यवाद सहेली
प्रतिसादा बद्दल धन्यवाद सहेली , भरत , छल्ला .
छल्ला >स्किनवर प्रयोग नाही करणार .
सहेली > थोड्याचा जेल बनवून बघते .
भरत > हा तर लास्ट पर्याय आहेच .
मला जास्त लोकांसाठी भाजी
मला जास्त लोकांसाठी भाजी बनवण्याच्या टिप्स पाहिजे.
दोघांपुरतं चांगलं जमतं. पण ७-८ लोक झाले की माझी गडबड होते. म्हणजे भाजी खायला लायक बनते पण मस्तं, भारी नाही बनत.
प्रमाण दुप्पट तिप्पट घेऊन चालत नाही हे नक्की कळलं आहे. दोन माणसांच्या स्वयंपाकाला जर एक चमचा तिखट चालत असेल तर ८ लोकांच्या स्वयंपाकाला ४ चमचे तिखट जास्त होते, अडीच ते तीन चमचेच लागते.
कोणाच्या यात काही टिप्स आहेत का?
८ लोकांचा स्वयंपाक क्वचित करावा लागतो, आणि बरेचदा वेगवेगळे पदार्थ होतात. त्यामुळे वहीत लिहून ठेवा वगैरे जमत नाही.
दोनाचे चार चालायचे आठ असं
दोनाचे चार चालायचे आठ असं स्टेप बाय स्टेप करा.... दोनाच्या पाढ्यातलेच हवे का तीनाचे करून पहा ... हळूहळू जमेल... टाईमपास प्रतिसाद हघ्या.
आठ लोकांना चविष्ट जेवण करायला
आठ लोकांना चविष्ट जेवण करायला टिपा विचारल्या तर माबोकर सांगतात 'दोनाचे चार' करा!
कसं व्हायचं!
हमखास यशस्वी पाकृंचं संकलन
हमखास यशस्वी पाकृंचं संकलन करा. उदा: डोकं न वापरता उंधियु. मिठापासून सगळं प्रमाण दिलेलं आहे, हमखास त्याच चवीचा होतो दर वेळी. लोकं वाढली की तेच प्रमाण दुपटीत तिपटीत घ्यायचं. सायोचा मसालेभात पण. वर्हाडाचा स्वयंपाक असला की मी असेच पदार्थ करते.
अमित,
अमित,
https://www.instagram.com
https://www.instagram.com/upgrade_my_food/
स्वयंपाकघरातलं विज्ञान / तंत्रज्ञान
भात चपाती आहार जरा कमी करून
भात चपाती आहार जरा कमी करून मिलेट्स सद्रुश भाकरी प्रकार कोणत्या पिठाचे करता येतात? जे भाजी/पिठल्यासोबत खाता येतील.
१) ज्वारी
२)बाजरी
३)कळणा (उडद्+ज्वारी)
.
.
.
प्लीज सुचवा
नाचणीची भाकरी,
नाचणीची भाकरी,
भाजणीचं थालीपीठ
मिश्र पिठांचं कांदा/मुळा घालून थालीपीठ
धिरडी (आंबोळ्या/मुगाची धिरडी इत्यादी)
उपवास थालीपीठ
उपवास थालीपीठ
भगरीची भाकरी (नवरात्रात करतात ती)
ज्वारीची उकड काढून केलेली भाकरी
अंबाडीची भाजी अगदी कमी पाण्यात शिजवून, त्यात भाकरीचे पीठ बसेल तितके मळून , चवीपुरते मीठ घालून केलेली भाकरी!
नाचणीच्या पिठाची उकड काढून
नाचणीच्या पिठाची उकड काढून चांगली मळून त्याचे फुलके. मऊ होतात. राजगिर्याचं (अख्खा राजगिरा) पीठ मिळत असेल तर त्याच्या नेहमीच्या पोळीसारख्या पोळ्या होतात (जरा कोरड्या होतात). राळं फोडणीवर परतून आवडीच्या भाज्या घालून कुकरात शिटी करून खिचडी आणि सॅलड (पण हे भाजी-पिठल्याबरोबर छान नाही लागणार).
थोडे इतर पर्यायः
मूगडाळ/ इतर मिश्र डाळी रात्रभर भिजवून सकाळी वाटून मग त्यात ज्वारी / बाजरी/ नाचणीचं पीठ घालून घावनसदृश डोसे/ धिरडी. त्यातही आवडतील त्या भाज्या वरून उत्तप्प्यासारख्या बारीक चिरून/ गाजर किंवा कोबी किसून आणी तिखटमीठ भुरभुरवून असं छान लागतं. बरोबर कोणतीही चटणी, दही, लोणचं, लोणी यातलं जे आवडेल ते.
कोडो आणि लिटल मिलेट्स.
कोडो आणि लिटल मिलेट्स.
पीठ दळून आणायचे असेल तर धुवून, आठ तास भिजवून, वाळवून मग दळून आणावे. अन्यथा मिळत असल्यास रेडिमेड आटा.
मी यातील कोडोच्या थापून केल्या आहेत.
पण लाटुन सुद्धा करता येतील.
वा! कित्ती छान आयडियास आल्यात
वा! कित्ती छान आयडियास आल्यात. मनापासून धन्यवाद
नाचणी नुसतीच भाकरी केल्यास कडवट लागत नाही का? (मी रवा घालून नाचणी डोसे केलेत ते छान लागतात)
राळं म्हणजे काय?
राजगिरा & कोडो पीठ आणुन भाकरी करून बघणार.
भगरीची भाकरी>>> मस्तं आयडिया. बाईंडींग साठी काय घालायचे?
राळं = foxtail millet.
राळं = foxtail millet.
अजून एक:
कोडो, लिटल, भगर यांचा बिर्लाव (बिर्याणी/ पुलाव म्हणुन बिर्लाव):
तिन्ही आठ तास भिजवायचे किंवा वेळेवर धुवून थोडे भाजून घ्यायचे.
प्रेशर कुकर मध्ये चमचा भर/त
तेल तुपात आधी कांदा मग टोमॅटो, हिरवी मिरची, ठेवलेले आले लसुण, पुदिना, कोथिंबीर, बिर्याणी मसाला, मग गाजर, बिन्स, बटाटे किंवा पनीर असे आवडीप्रमाणे घालुन, मिलेट्स च्या साडेतीन ते चौपट पाणी घालुन उकळी आणायची. मिलेट्स आणि मीठ घालुन चार शिट्ट्या काढायच्या.
बारीक कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर जाडसर ताक घालुन केलेला रायता किंवा बिर्याणी सोबत जे आवडेल त्या सोबत खायची.
Pages