Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मूग फ्लेक्स ची चाट चांगली
मूग फ्लेक्स ची चाट चांगली होते.किंवा पाप ऍड करायचे असल्यास पाणीपुरी ची पुरी आणून त्यात मूग फ्लेक्स चिरलेला कांदा कोथिंबीर चिंच चटणी घालून पाणीपुरी.
मूग फ्लेक्स सूप वर भुरभुरून
मूग फ्लेक्स सूप वर भुरभुरून क्रिस्पी
ज्वारी फ्लेक्स मिक्सर वर रवाळ फिरवून कटलेट ला कोटिंग
चना फ्लेक्स उकळत्या रशशात सोडून भाजी - not sure कशी लागेल ते.
Thanks. मस्त आयडिया दिल्यात.
Thanks. मस्त आयडिया दिल्यात.
डबा भरून ब्लू चीझ संपवायच्या
डबा भरून ब्लू चीझ संपवायच्या आयडिया सांगा. गुगलवरच्या सर्व रेसिपीज नालासाठी घोडा टाईप आहेत.
काल कॉस्कोचं सॅलेड मिक्स
काल कॉस्कोचं सॅलेड मिक्स आणलेलं त्यात ड्रेसिंग बरोबर क्रंबल्ड ब्लू चीज होतं. तितकं छान लागलं. कुठल्याही सॅलेड बरोबर छान लागेल. मेबी नाचोज/ चिकन विंग्ज असं काही असेल तर ब्लू चीजचं डिपिंग सॉसही छान लागेल. फार जास्त वास नाही आवडत पण थोडं छान लागतं.
अंजली चे मेदु वडा यंत्र कोणी
अंजली चे मेदु वडा यंत्र कोणी वापरले आहे का...किती उपयोगी आहे ?
मला तरी जमले नाही केया...
मला तरी जमले नाही केया...
ओह..okey
ओह..okey
अंजली चे मेदु वडा यंत्र कोणी
अंजली चे मेदु वडा यंत्र कोणी वापरले आहे का...किती उपयोगी आहे ?> मी गेली ३० वर्ष वापरतेय. मला साबाईंसारखे थापून तेलात सोडणे वगैरे अजिबातच जमणार नव्हते आणि इथे स्वतः केल्याशिवाय ... अशी परीस्थिती असल्याने , त्यांनीच घेवून दिले होते आणि कसे वापरायचे ते आम्हा दोघांनाही शिकवले होते. एकेकाळी बरेच वापरले गेले. आता फारसे तळण होत नाही तरी वर्षातून एक-दोनदा वापर होतोच.
केया, मेदूवड्याचं पीठ वाटताना
केया, मेदूवड्याचं पीठ वाटताना ते घट्ट वाटणंंअपेक्षित आहे. तसं घट्ट वाटलं गेलं तर हाताला पाणी लावून हातावरच भोक पाडून तेलात सोडता येऊ शकतात. किंवा कापड ओलं करुन वगैरे आहेच.
ते हाताला पाणी लावून प्रकरण
ते हाताला पाणी लावून प्रकरण मला फारच डेंजर वाटले. त्यात अंजलीच्या यंत्राने +१ ला पण जमते म्हटल्यावर यंत्र आवडलेच.
सायो अगं हाताला पाणी लावून
सायो अगं हाताला पाणी लावून काल च प्रयोग करून बघितला पण जमलं नाही मला.. youtube video पण बघितले त्यात झार्याला मागे पीठ लावून भोक पाडून तेलात सोडले ..पण ते ही मला जमले नाही
पीठ जास्त सैल झाले त्यामुळे का..
स्वाती ताई thnx .. आणते मग आता
केया, माझं झालं होतं असं. मी
केया, माझं झालं होतं असं. मी तसेच तळले व देवकीतैने त्याला गोव्यात कसलीतरी बिस्किटे म्हणतात असं सांगितलं. त्यामुळे कुठली का होईना रेसिपी झाली.
थोडं तांदुळाचं पीठ टाकून बघितलं तर ?
(असं करत करत मी मूळ पाककृती पासून इतकी दूर जाते की परत यायला उबर घ्यायची वेळ येते. )
धाग्या, पाककृती माहिती नाही पण प्रेग्नंट स्त्रियांनी ब्लू चीझ खाऊ नये असं सांगतात म्हणून लिहून ठेवतेय.
अगदी
अगदी
याच विषयावर काल एका हलवायाशी झालेला संवाद.
आज एका हलवाया कडे तळत होते
मी नवऱ्याशी 'बघ आपल्या वड्याला असं छान भोक का नाही पडत' म्हणत होते
मालकाला माझ्या यातना कळल्या असाव्या
तो म्हणे आदत से पडणे लगेगा
त्याला म्हटलं हम भी हाथ डालते है मगर हमारे वडे का होल तवे मे गिरने से पहिले बुझ जाता है
मग अपार करुणेने म्हणाला' हां वो वेट ग्राइंडर का आटा और मिक्सर आटा मे फरक होगा'
(अस्मिता, परत जायला उबर भन्नाट!! आता वाचलं)
काय चुकलं हे तितकं महत्त्वाचे
काय चुकलं हे तितकं महत्त्वाचं नाही. दोष देता येणं, तो व्यवस्थित शोधून काढणं, त्याला वेगळं नाव देणं, जगात कुठंनंकुठं असं खातच असतील हा विश्वास बाळगणं, हे
खरं कसब आहे. ते मला जमायला लागलेय.
कुठल्याही सॅलेड बरोबर छान
कुठल्याही सॅलेड बरोबर छान लागेल>> आठदहा वेळा सॅलेड वर घातल्यावर एक दशांश डबा संपला.
क्रॅकर्स वर पसरवून रेड वाइनबरोबर सद्गति द्यायची आयडिया नेटवर मिळाली ती खूप आवडली आहे
अस्मिता..तुझ्यासाठी कायपण
अस्मिता..तुझ्यासाठी कायपण तांदूळ पीठ घालते next time
उबर ची उपमा आवडून घेतली आहे .
अनु हो ना..हॉटेल मध्ये किती छान भोक पाडून देतात..पण पीठ घट्ट केलं तर spongy होणार नाहीत असं वाटतंय...
आमटी/वरणाचा जरा खोलगट डाव
आमटी/वरणाचा जरा खोलगट डाव असतो तो पाण्यात डिप करून पालथ्या बाजूवर वडा थापायचा, मध्ये भोक पाडायचं आणि तो वडा बोटांवर तोलून अलगद तेलात सोडायचा. १-२ वडे कसरतीचे होतात मग भराभरा होतात. डाळ वाटताना पाणि अगदी कमी घालायचं. फेटायचं भरपूर. तांदळाच्या पिठानं कुरकुरीत होतात.
केया एक चमचा तांदूळ पिठी आणि
केया एक चमचा तांदूळ पिठी आणि किमान पंधरा मिनिटे एकाच दिशेने फेटले की होतील नीट. फुलपात्राला प्लास्टिक कागद लावून पण करता येतील. गोटा उडीद वापरून बघा. वर लिहिले तसे एकदम कमी पाणी वापरा, जास्त वापरले की एकदम तेलकट होणार.
पीठ थोडं घट्ट हवं हेही खरं.
पीठ थोडं घट्ट हवं हेही खरं.
मग चार बोटांवर गोल घेऊन मधे अंगठ्याने भोक पाडायचं अन तेलात सोडताना, बोटांवरून वडा अंगठ्याने सोडवत न्यायचा.
म्हणजे तेलात पडायच्या आधी वडा पाच बोटांच्या टोकांवर येतो. मग पाचही बोटं एकमेकांपासून दूर न्यायची. आपोआप ताण पडून भोक न बुजता मोठं रहातं.
खरं तर एकदा प्रत्यक्ष समोर करताना बघायला हवं. म्हणजे कळेल नीट.
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=ms2WZShtFWA
३ मिन.वर व्हिडिओ बघा. सगळाच बघा, पीठ रेडी आहे की नाही याची परीक्षा आहे.
मस्त आहे व्हिडिओ. आता करायला
मस्त आहे व्हिडिओ. आता करायला हवेत.
यस.मनाचा निर्धार. पुढच्या
व्हिडीओ बघते, धन्यवाद.
यस.मनाचा निर्धार. पुढच्या वेळी परफेक्ट डोनट होल वाला वडा घरच्या घरी.
ता.क. यावेळी गोटा उडीद चे वडे एकदम मस्त हलके कुरकुरीत झाले होते.दहिवडे बेत असल्याने डोनट होल पाडण्याच्या फंदात पडले नाही.
त्याला गोव्यात कसलीतरी
त्याला गोव्यात कसलीतरी बिस्किटे म्हणतात असं सांगितलं. ........... बिस्कीट अंबाडी.गोवा कारवारकडे हे नाव आहे.
hmm.. पीठ घट्ट पाहिजे होत .
hmm.. पीठ घट्ट पाहिजे होत ..thnx all ..next time सर्व सुचनांचे पालन करण्यात येईल:)..
लंपन.. गोटा उडीद आणते..
थोडक्यात काय तर यंत्र नसले तरी चालते..
इडलीसोबत मी जी ओल्या नारळाची
इडलीसोबत मी जी ओल्या नारळाची चटणी बनविते ती ३-४ तासांनी खराब होते. ओले खोबरे, जिरे, कोथिंबीर, मिरची आणि मिठ वाटून घेऊन त्याला मोहरी, हिंग, कडीपत्त्याची फोडणी. मला हि चटणी थोडी पातळ आवडते. फ्रिजबाहेर ठेवली तर ती काही तासात खराब होते त्यामुळे पिकनीकला, डब्ब्यात वैगरे नेता येत नाही. चटणी खराब होऊ नये म्हणून काय करावे?
चटणी थंड करून थर्मास मधून
चटणी थंड करून थर्मास मधून न्यायची किंवा थर्मल लायनर पिशवीत बर्फाचे पॅक डब्याच्या वर-खाली ठेवायचे.
चटणी आइस ट्रे मध्ये घालून
चटणी आइस ट्रे मध्ये घालून छोटे फ्रोझन क्यूब्ज करून ठेवायचे. लागतील तसे डब्यात्/झिपलॉकमध्ये १-२ क्यूब्ज घालून द्यायचे.
फ्रिजबाहेर ठेवली तर ती काही
फ्रिजबाहेर ठेवली तर ती काही तासात खराब होते त्यामुळे पिकनीकला, डब्ब्यात वैगरे नेता येत नाही. चटणी खराब होऊ नये म्हणून काय करावे? >> कोकणी लोकांचा एक्झिस्टेंशियल प्रॉब्लेम आहे हा.
हे ज्येनांचे काही सल्ले - फोडणी पूर्ण गार झाल्यावर मग चटणीत मिसळायची. वाटताना थोडं आलं घातलं तर जास्त काळ चांगली राहते . आम्।
सॉफ्ट कूलर्स किंवा इंसुलेटेड लंच बॅग्स मिळत असतील तर त्यात चटणीचा डबा नेऊ शकता . हात /पाय मुरगळला तेंव्हा वापरायच्या जेल बेस्ड कोल्ड बॅग्स पण त्या कूलर मधे ठेवू शकता. नाहीतर मग झिप्लॉक बॅग मधे बर्फाचे क्यूब्स .
ओके. म्हन्जे फ्रीज शिवाय
ओके. म्हन्जे फ्रीज शिवाय दुसरा उपाय नाही.
फोडणी पूर्ण गार झाल्यावर मग चटणीत मिसळायची. वाटताना थोडं आलं घातलं तर जास्त काळ चांगली राहते >> हे करुन बघते.
Pages