Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला धाड मृणाली.>>>> हि सोपी
मला धाड मृणाली.>>>> हि सोपी युक्ती आहे..
मानव लिंकसाठी धन्यवाद.कधी खाल्ली, केली नाही..थोडी बनवून पाहता येईल.
मीही कढीपत्त्याची चटणी च
मीही कढीपत्त्याची चटणी च सांगणार होते, काहीजण microwave ला १ min चटका देऊन वाळवून बंद डब्यात साठवून ठेवतात
पण मी यातले काहीच केलेलं नाहीय
त्यातलेत्यात लेमन rice करू शकता यात जरा जास्तीचा कढीपत्ता लागतो मस्त स्वाद येतो .. किंवा अगदी साधा फोडणीचा भात,
पण तरी रोज असे किती भात करणार
टोमॅटो चटणी
टोमॅटो चटणी
कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, 8 भाग कापून टोमॅटो तेलावर साल करपेपर्यंत परतायचे
गार झाल्यावर मिक्सरमध्ये मीठ घालून वाटून त्यात थोडा दाणेकूट घालायचा
इडली डोसा बरोबर भरपूर संपते चटणी.
मृ कडीपत्ता खूपच जास्त असेल
मृ कडीपत्ता खूपच जास्त असेल तर केसांसाठी तेल बनवून ठेव ( कढीपत्ता, कांदा, लिंबू, आवळा, कोरफड) मी बनवून ठेवले आहे आणि तेच वापरते..
एकदा बनवलं होतं तेल श्रवू, पण
एकदा बनवलं होतं तेल श्रवू, पण त्याला खूप लवकर विचित्र वास यायला लागला..
तसा इथं कडिपत्ता ताजा उपलब्ध असतो नेहमी पण हा मित्राच्या शेतातला ऑरगॅनिक आहे..बराच आहे.
काहीजण मायक्रोवेव्हला चटका का
काहीजण मायक्रोवेव्हला चटका का देतात?
ती कढीपत्त्याची चटणी इजे बेश्ट ऑप्शन. तेलं वगैरे कुटाणे काही नाकार्ड्या लोकांनी केले होते घरात पण त्याचा भयाण वास राहातो, आणि ते तेल लवकर खराबही होतंच.
मी ४ वेळा बनवले आहे तेल. माझे
मी ४ वेळा बनवले आहे तेल. माझे तेल अजुनपर्येंत खराब नाही झाले ( कडीपत्ता, कांदा, लिंबू, आवळा, कोरफड, कलोंजी, मेथी, जास्वंदाची पाने, काळी मिरी) लोखंडाच्या कढईत पूर्णपणे जिन्नस काळे होईपर्यंत उकळते, फारसा वास पण येत नाही. मी तेच तेल लावून ऑफिस ला पण जाते ट्रेनने, (ट्रेनमध्ये फ्रेंड्सना विचारले पण वास येतो आहे का ? ) ते नाही म्हणाले.. अजूनही मी तेच वापरते..
१.एक डबाभरून कडिपत्ता
१.एक डबाभरून कडिपत्ता फ्रिजमध्ये ठेवला महिनाभर होईल.
२.अर्ध्या कडिपत्ता+चना डाळ+उडद डाळ+जीरे+मिरची पावडर,मीठ ड्राय रोस्ट करून..कडिपत्ता पोडी बनवली... इडली, डोसे, भात वगैरे बरोबर चांगली लागेल.
३.नुसता कडिपत्ता ड्राय रोस्ट करून पावडर..भाजीत वापरायला.
४.धने, तांदूळ जरा,कडिपत्ता ड्राय रोस्ट करून..धने पावडर..ग्रेवी, रस्सा वगैरेत वापरायला..दाटपणा येतो..
अशा तर्हेने कोवळा, ताजा, गावरान कडिपत्ता मार्गी लावला.
कीचन गार्डनमध्ये ओव्याची रोपं
कीचन गार्डनमध्ये ओव्याची रोपं फार वाढलीत .पानांच काय करू ?
पावसाळा आहे , भजी करता येईल पण ती फार होतील.
एकदा पाने सुकवण्याचा प्रयत्न केला होता पण सगळी पाने काळी पडली .
माबोवरच वाचले होते की पीठ
माबोवरच वाचले होते की पीठ पेरून ओव्याची भाजी चांगली होती.मला करून पहायची होती.
You can harvest the leaves
You can harvest the leaves and give for cold press. You will get good quality oil.
कुणी बाटी फ्रीझ करुन पाहिली
कुणी बाटी फ्रीझ करुन पाहिली आहे का?
किटो /ग्लुटेन फ्री डायटसाठी
किटो /ग्लुटेन फ्री डायटसाठी एक कि. कोकोनट फ्लोअर आहे. त्यावर बेकिंग करायला उपयुक्त असं लिहीलंय त्या व्यतिरिक्त काय करता येईल.
एक अबोली - I have tried it..
एक अबोली - I have tried it.. I stored it for 3 weeks and it was good after defrosting.
स्वस्ति,
स्वस्ति,
ओव्याची पाने पराठ्यामधे, आलू गोभी, चहामधे, रायता, नॉनवेज मॅरिनेट करणे, भात, वाळवून पावडर बनवून करीमधे वापरणे, वरण, सांबार, चटणी, अप्पे, दोसे, मुठिया, खारी बिस्किटे इत्यादी इत्यादी मधे वापरता येतात. हुश्श!
मी फक्त पराठे केले आहेत. फेसबूक वर euphoric delights ग्रूप आहे तिथे आहे माहिती, मी पण तिथेच विचारले होते घरी पाने भरपूर असताना
माझ्या आईचे बेसन लाडू सुके
माझ्या आईचे बेसन लाडू सुके असतात ती कमी तूप वापरते पण चवीला खूप छान लागतात. त्यामुळे मलापण जास्त तुपकट लाडू आवडत नाहीत. पण लाडू वळताना त्रास होतो म्हणुन मी मात्र नेहमी करताना तूप जास्त/प्रमाणात घालते.
काल रात्री बेसन लाडू साठी बेसन भाजले, तूप कमी झाले हे समजत होते पण तरीही तसेच त्यात साखर मिक्स केली. आता मिश्रण फार कोरडे वाटतंय. लाडू वळता येत नाही. काय करू?
दूध घालून वळले तर टिकणार नाहीत आणि फ्रीज मध्ये ठेवले तर कुणी खाणार नाही.
एक चमचा मिश्रण खाऊन पाहिले तर सुरुवातीला छान लागतंय पण शेवटी तोंडात डाळीचे बारीक कण राहत आहेत. हे बेसन कच्चे असल्याचे लक्षण आहे का?
तसे असेल तर मावे मध्ये थोडे थोडे मिश्रण गरम करून होईल का? नाहीतर साखरेचे दगड व्हायचे नंतर
काय करू उपाय सुचवा. मिश्रण तसेच झाकून ठेवून ऑफिसला आली आहे. घरी जाऊन प्रयोग करावे लागतील.
मला वाटते आधी एक वाटीभर
मला वाटते आधी एक वाटीभर मिश्रण कढईत थोडे तूप घालून परतून पहा.
अशाने साखर विरघळून पाक पण होईल आणि मिश्रण ओलसर होईल.
फार पुढे न जाता, लगेच लाडू वळून घ्या.
ते थंड झाल्यावर दगड न झाले तर उरलेल्या मिश्रणाचे ही असे करा..अन्यथा नवीन क्लृप्ती शोधावी lagel..
काल रात्री बेसन लाडू साठी
काल रात्री बेसन लाडू साठी बेसन भाजले, तूप कमी झाले हे समजत होते पण तरीही तसेच त्यात साखर मिक्स केली >>> इथेच इथेच!!!
आता आंगो म्हणताय तसं करून पा...
बेसन किंवा इतर जिन्नस (मिरच्या, रवा, कांदा, भाजीकरता भेंडी, अजूनही इतर प्रकार) भाजायची निन्जा टेक्निक मी इथेच शिकलोय ती अशी - पदार्थ कढईत आधी कोरडाच भाजायला घ्यायचा मंद आचेवर अन चार ते पाच मिनिटं चांगला शेकला गेला की मग चमचा चमचा तेल/तूप काय हवं ते घालत जायचं. फॅट कमी लागतं आणि पदार्थही चांगला खमंग होतो.
बेसन लाडवात तूप गगरम करून
बेसन लाडवात तूप गगरम करून टाका , मग वळता येतात , मी केले आहे असे बरेचदा
बेसन लाडवात तूप गगरम करून
बेसन लाडवात तूप गगरम करून टाका , मग वळता येतात >>> +१
किंवा सगळे एकदम न वळता लागतिल तसे दूध घालून वळा.
तूप कमी घालून करायचे असतील तर
तूप कमी घालून करायचे असतील तर बेसन खमंग भाजून झाल्यावर शेवटी दुधाचा हबका मारायचा.
आता थोडं दूध घालून वळता येतील.
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
तूप गरम करून टाकून लाडू वळले जातील हे माहीत होते पण मला बेसन थोडे कच्चे आहे असा संशय येत होता म्हणून मग शेवटी मावेमध्ये थोडे थोडे मिश्रण घेऊन चार मिनिटांवर हलके भाजून घेतले. एक एक मिनिटाच्या अंतराने पहले दोन मिनिटे सुके भाजले नंतर चमचाभर तूप घालून परत दोन मिनिटे भाजून घेतले. एकदम मस्त लाडू तयार झाले. रंगही सुंदर आलाय.
मस्त!
मस्त!
एंड प्रॉडक्ट सुपर दिसतय
एंड प्रॉडक्ट सुपर दिसतय निल्सन.
सुपर झालंय एन्ड प्रॉडक्ट.
सुपर झालंय एन्ड प्रॉडक्ट.
किती सुरेख दिसताहेत !! njoy
किती सुरेख दिसताहेत !! njoy
मस्त च !!! उचलून खावेसे वाटत
मस्त च !!! उचलून खावेसे वाटत आहेत
एंड प्रॉडक्ट सुपर दिसतय
एंड प्रॉडक्ट सुपर दिसतय निल्सन.....+1.
प्रचंड खमंग दिसतायत निल्सन.
प्रचंड खमंग दिसतायत निल्सन.
भारी दिसतायत लाडू! म्हणजे आधी
भारी दिसतायत लाडू! म्हणजे आधी थोडासाही काही प्रॉब्लेम झाला असेल अशी शंकाही येत नाहीये इतके मस्त दिसतायत.
Pages