२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>तात्याच्या भाषेचा एक्स्पर्ट शेंडेनक्षत्र त्या कॅथलिक डीनरमधले तात्याचे विनोद आपल्याला समजावून सांगेल का ?
हे म्हणजे रंगांधळ्या माणसाला रंग समजावून सांगण्याइतके अवघड आहे. किंवा कर्णबधिर माणसाला संगीत समजावून सांगण्यासारखे.

चिले देशाने आपल्या देशात कुत्रे आणि मांजरे यासारखे पाळीव प्राणी मारून खायला बंदी घालण्याचे विधेयक मांडले आहे.
https://www.paiscircular.cl/medio-ambiente/despachan-a-sala-proyecto-que...
का बरे मांडले असेल असे विधेयक?
चिले देशाने प्रचंड प्रमाणात हेतीच्या नागरिकांना आश्रय दिलेला आहे. जवळपास दोन लाख.
https://liveglobal.org/partnerships/partner-update/haitian-immigration-h...
आता तुम्हीच ठरवा ह्या दोन गोष्टीत काय संबंध असू शकतो ते.

राजापेक्षा राजनिष्ठ? आता तर तात्याही म्हणतोय की he was just saying what was reported. ते "रिपोर्टेड" म्हणजे कोठे? त्याचा पत्ता नाही. आपल्याक्डे व्हॉट्सअ‍ॅप अंकल्स जसे "अहो तो राहुल गांधी मुसलमान" आहे म्हणून पाठवतात, बाकीचे लोक माना डोलावत "बर्‍याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात" असे त्यावर लिहीतात. ते एकाचे शंभर असे करत लाखोंवर पोहोचते. लौकरच "लोकांचा असा समज आहे" हे प्रस्थापित होते. यांचे असलेच प्रकार असतात.

जे डी व्हान्स, विवेक रामस्वामी असे नेते ओहायोचे रहिवासी आहेत. जे डी व्हान्स हा सिनेटर आहे. तो तिथल्या लोकांशी बोलतो. विवेक रामस्वामी त्या गावातील लोकांशी बोलतो. त्याने एक टाउनहॉल मीटिंग घेतली होती.
त्या स्प्रिंगफील्ड गावाचे निदान काही लोक तरी अशा घटना घडल्याचे कॅमेर्यावर सांगत आहेत. हे सगळे खोटारडे आहेत असे म्हणणे आहे का?
सरकार जे निवेदन देते ते अर्धसत्य किंवा धडधडीत खोटे असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे. उदा. एफ बी आयने अशी आकडेवारी दिली होती की २०२२ मधे गुन्हेगारी कमी झाली. पण नंतर गुपचूप त्यात सुधारणा करून "खरी" आकडेवारी देऊन गुन्हेगारी वाढल्याचे उघडकीस आणले होते.
सरकार सांगते ते साक्षात हरिश्चंद्री सत्य आणि जनता जे सांगते ते निखळ खोटे ही काय मांडणी आहे?
मुळात कुत्र्या मांजराचा मुद्दा हा मुख्य मुद्दा नसून अफाट संख्येने कायद्याच्या कसरती करून बेकायदा लोकांना पवित्र करुन छोट्या गावात आणून तिथे समस्या निर्माण करणे हा आहे. (अर्थात हे पालथ्या घड्यावर पाणी ओतणे आहे. पण रहावत नाही!)
कुत्रे मांजरे खाण्याचा मुद्दा आहे पण गौण आहे. चिले देशात काही ट्रंपचे कारस्थान चालत नसावे. पण तिथेही लोकांना कायदा बनवावा असे का वाटले?

अनंतकोटी ब्रह्मांड नायक ओबामाजी आपल्या वैकुंठ (की कैलास) स्थानाहून सामान्य लोकांच्या उद्धारासाठी उतरले होते. तेव्हा त्यांनी काळ्या लोकांची कान उघडणी केली. एक स्त्री आहे म्हणून तुम्ही कमलाबाईला मत देत नाही असे कळले आणि हे मला आजिबात चालणार नाही वगैरे वगैरे.
आपण एका श्वेतवर्णीय कुटुंबात वाढलो. आपण अर्धे श्वेतवर्णीय आहोत. हे विसरून आपण दिसायला काळे आहोत ह्या जोरावर समस्त काळ्या लोकांना उपदेश करण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असा समज करुन घेतलेला दिसतो ह्या त्रिकालज्ञानी दैवताने!

गुपचूप त्यात सुधारणा >>> Lol सरकारी खाती "गपचूप" काही करत नाहीत. प्रत्येक स्टेपची एक प्रोसेस असते. सरकारी खाती एकवेळ त्यांचे नेमलेले काम करणार नाहीत पण त्याबद्दलही "काम न करण्याची" प्रोसेस फॉलो करतील. याबद्दल काहीही चेक न करता मला खात्री आहे की एफबीआयच काय कोणत्याही सरकारी खात्याने स्वतःची करेक्शन जाहीर करायची जी पद्धत आहे तीच फॉलो केली असेल.

किंवा तुमच्या लॉजिक प्रमाणे २०२२ मधे किती गुन्हेगारी होती हा मुख्य मुद्दा नाही, काहीतरी वेगळाच असेल. जे ठोक बोलायचे तो प्रमुख मुद्दा नसला म्हणजे झाले. मग ते खरे असायची गरज नाही.

त्या स्प्रिंगफील्ड गावाचे निदान काही लोक तरी अशा घटना घडल्याचे कॅमेर्यावर सांगत आहेत. हे सगळे खोटारडे आहेत असे म्हणणे आहे का? >> तुम्हालाही ब्रेट बेअरची लागण झाली का? हे तुमचे शब्द आहेत. माझे नाहीत. गावातले लोक सांगत आहेत याला जगातील कोणत्याही कायदेशीर प्रोसेस मधे काहीही अर्थ नाही. अमेरिकाच काय जगात कोठेही. एका बाईने व्हिडीओ वर सांगितले. ती केस दुसरीकडचीच निघाली आणि त्यातली व्यक्ती अमेरिकन सिटिझन होती.

पुरावे द्या, नाहीतर "काय बुवा ऐकले आहे, खरे खोटे माहीत नाही" असे ढोबळ सांगा. इथे उमेदवारच छातीठोकपणे डिबेटमधे म्हणतो, इतकेच नव्हे तर त्याचे भक्त तेच रिपीट करतात. मग पुरावा मिळाला नाही की अहो तो प्रमुख मुद्दाच नाही म्हणून पुन्हा गोलपोस्ट फिरवतात.

एफबीआयने गपचूप का होईना चूक सुधारली. तात्याचे व तात्याभक्तांचे काय?

एनीवे चिल. बाकी अमेरिका काय म्हणते याने काही फरक पडत नाही. ४०-४५ राज्ये, पॉप्युलर वोट कमलाकडे गेले तरी फरक पडत नाही. स्विंग राज्यांत सध्यातरी तात्या आघाडीवर आहे (व्हान्सचा पोल्स वर विश्वास नसला तरी), आणि कमलाने अ‍ॅबॉर्शनचा मुद्दा आणखी आणला नाही तर तो निवडून येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हैतीच्या लोकांना नव्याने त्रास द्यायची गरज संपली आहे.

अनंतकोटी ब्रह्मांड नायक ओबामाजी आपल्या वैकुंठ (की कैलास) स्थानाहून सामान्य लोकांच्या उद्धारासाठी उतरले होते.>> smiley36.gif
मनोरजन नहि रुकना चाहिये! शेन्डेच्या पोस्ट्स फार करमणूक करतात हे निर्विवादित आहे.

"कमला जिंकल्या तर पूर्ण अमेरिका डेट्रॉइट सारखी होईल." हे वाक्य कोणाच्या रॅली मध्ये स्टेज वरून सांगितले गेले असावे ? अंदाज ?

हे म्हणजे रंगांधळ्या माणसाला रंग समजावून सांगण्याइतके अवघड आहे. किंवा कर्णबधिर माणसाला संगीत समजावून सांगण्यासारखे. >> तुलाहि तात्याचे विनोद झेपले नाही असे सरळ सांग ना , ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे Wink

सरकारी खाती "गपचूप" काही करत नाहीत >> २०२० ला तात्याच जिंकला ह्या गृहितकावर लिहिले असेल तात्याच्या फॉलोअर ने Wink

<<मुळात कुत्र्या मांजराचा मुद्दा हा मुख्य मुद्दा नसून अफाट संख्येने कायद्याच्या कसरती करून बेकायदा लोकांना पवित्र करुन छोट्या गावात आणून तिथे समस्या निर्माण करणे हा आहे.>>
खरे आहे.
पण ते रिपब्लिकन मतदारांसमोर बोलत होते. त्यांच्यासमोर असे काहीतरी अतिशयोक्ति करून , सनसनाटी पूर्ण सांगावे लागते. नाहीतर त्यांच्या डोक्यावरून जाते. ठासून खोटे जरी बोलले तरी त्यांना ते खरे वाटते.
तिथे पॉलीसी ची चर्चा होऊ शकत नाही. तेंव्हा ते तसेच बोलणार.

>>
गुपचूप त्यात सुधारणा >>> Lol सरकारी खाती "गपचूप" काही करत नाहीत. प्रत्येक स्टेपची एक प्रोसेस असते. सरकारी खाती एकवेळ त्यांचे नेमलेले काम करणार नाहीत पण त्याबद्दलही "काम न करण्याची" प्रोसेस फॉलो करतील. याबद्दल काहीही चेक न करता मला खात्री आहे की एफबीआयच काय कोणत्याही सरकारी खात्याने स्वतःची करेक्शन जाहीर करायची जी पद्धत आहे तीच फॉलो केली असेल.
<<
जेव्हा एखादी गोष्ट बायडन सरकारला खजिल करणारी असते तेव्हा ती फार बोभाटा न करता उघड करायची असे सरकारी धोरण आहे.
उदाहरणार्थ रंडीबाज हंटर बायडनचा रसभरित लॅपटॉप जेव्हा उघडकीस आला तेव्हा समस्त माध्यमे "रशियन कारस्थान" असे एका सुरात, कर्णकटूपणे आळवत होती. पण जेव्हा हंट्याचा लॅपटॉप हा १००% अस्सल आहे हे उघडकीस आले तेव्हा सगळे कसे चिडीचूप!
तीच गोष्ट एफ बी आयच्या तथाकथित दुरुस्तीची. तीच गोष्ट बेकारीच्या आकडेवारीच्या तथाकथित दुरुस्तीची.
ट्रंपविषयी कमालीचा द्वेष असल्यामुळे सरकार आणि माध्यमे अशाच बातम्या मोठ्या करून सांगतात ज्याने ट्रंपची बदनामी होईल. पण जेव्हा ट्रंप जे म्हणत होता ते खरे निघते तेव्हा सगळे चिडीचूप होतात. संबंधित आकडेवारी, बातमी वगैरे मधल्या सुधारणा फार गवगवा न करता नोंद केला जातो.
हे आता इतक्या वेळा घडले आहे की पुन्हा पुन्हा सांगणे कंटाळवाणे होत आहे. पण आडमुठ्या लोकांना समजावण्यासाठी पुनरुक्तीला पर्याय नाही. असो.

>>
तुलाहि तात्याचे विनोद झेपले नाही असे सरळ सांग ना , ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे
<<
तसे नाही. एखाद्याला विनोद समजावून सांगणे याकरता "विनोदहीनेषू विनोदविवेचनम शिरसि मा लिख मा लिख मा लिख" असे एक सुभाषित (सुधारित) लागू आहे. अर्थात, (परमेश्वरा) विनोदबुद्धी नसलेल्याला विनोद समजावून सांगण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस!

ट्रंपने काल पेन्सिल्वेनियातील एका मॅकडोनल्डमधे काही तास काम केले. फ्राईज बनवणे, ड्राईव्ह थ्रू मधील गिर्‍हाईकांना पार्सल देणे वगैरे. अनेक गिर्‍हाईके ट्रंपला बघून चाट पडले आणि बहुतेक जण खूष झाले.
ट्रंप हा लोकांत रमणारा माणूस आहे. इतका श्रीमंत घरात वाढलेला असून मॅकमधे फ्राईज कशा बनवाव्यात वगैरे शिकून घेताना कुठलाही आव न आणता सहज, हलके फुलके विनोद करत, लोकांशी गप्पा मारत त्याने काम केले. काल परवा एका न्हाव्याच्या सलूनमधे जाऊन तिथल्या गिर्‍हाईकांशी, मालकाशी गप्पा मारल्या. हे बघणार्‍या सामान्य अमेरिकनला कमलाबाईपेक्षा ट्रंप जास्त जमिनीवर वावरणारा माणूस आहे असे वाटले तर नवल नाही.
दोन तास काम केल्यावर "आता माझा मॅकडॉल्डमधे काम करण्याचा अनुभव कमलाबाईपेक्षा दोन तास जास्त आहे" असा टोमणा मारला!
कमलाबाईने एक लोणकढी थाप मारली की मी लहानपणी मॅकमधे नोकरी केली आहे त्याला हे उत्तर होते.
स्वाभाविक मुख्य प्रवाहातील माध्यमांत काम करणार्या, कमलाबाईंची तळी उचलणार्‍या पत्रकारांच्या (एम एस एन बी सी, सी बी एस , सी एन एन वगैरे वगैरे) तळपायाची आग मस्तकात गेली!

ओ ते मीडीया वाले करतात जे काही करायचे ते. "सरकारी खाती" गपचूप काही करत नाहीत.

मग मिडिया मधे फॉक्सवाले एकदम हरिश्चंद्राचा अवतार आहेत ना? ३ वर्षे डॉमिनियनच्या नावे ठणाणा केल्यावर माघार घेतली. "गपचूप" त्यांना ७०० मिलियन दिले व ती बकवास बंद केली. फॉक्सवर त्याबद्दल चकार शब्द नाही.

लिझो नामक एका अती वजनदार, कुरुप गायिकेने कमलाबाईच्या प्रचारसभेत असे विधान केले की कमलाबाई निवडून आली तर समस्त अमेरिकेचे डेट्रॉईट होईल. तसे होणे अमेरिकन लोकांना भूषणावह वाटेल का हा एक मोठा प्रश्न आहे!
लिझो बाई फार बुद्धीमान वाटत नाहीत. (प्रचंड स्थूल लोकांनाही सुंदर मानावे असा एक विचारप्रवाह वोकिज्म द्वारा पुढे केला जातो. त्यातून ह्या बाईला प्रसिद्धी मिळून ती लोकप्रिय झाली आहे असे वाटते. फ्याट शेमिंग हे रेसिज्मसारखेच वाईट आहे असा एक अतीपुरोगामी विचार आहे. व्हिक्टोरिया सिक्रेट वगैरे मंडळींनी ह्या वोकिज्मच्या आहारी जाऊन आपल्या जाहिरातींसाठी खास वजनदार मॉडेल्स निवडल्या होत्या पण लोकांना ते तितकेसे रुचले नाही! असो.)
टेलर स्विफ्टसारख्या अफाट लोकप्रिय असणार्‍या व्यक्तीने कमलाबाईला बिनशर्त पाठिंबा देऊनही म्हणावा तितका कल बदललेला नाही. आता ह्या अतिविशाल महिलेच्या प्रचाराने काय बदल होणार ते काळच सांगेल.

>>
मग मिडिया मधे फॉक्सवाले एकदम हरिश्चंद्राचा अवतार आहेत ना? ३ वर्षे डॉमिनियनच्या नावे ठणाणा केल्यावर माघार घेतली. "गपचूप" त्यांना ७०० मिलियन दिले व ती बकवास बंद केली. फॉक्सवर त्याबद्दल चकार शब्द नाही.
<<
कुणीही हरिश्चंद्र नाहीच. फॉक्स कसा अपवाद असेल. त्यांच्याही कपाटात सांगाडे सापडतीलच.
पण बायडन आणि हॅरिसच्या राज्यात काही माध्यमे इतकी एकांगी आणि पक्षपाती झाली आहेत त्या तुलनेत फॉक्स अगदीच फिके म्हणावे लागेल. पण दुर्दैवाने मायबोलीचे बहुतेक सदस्य बिगर फॉक्स माध्यमे जे काही सांगतात ते डोळे मिटून चिरंतन सत्य मानतात हे दुर्दैव.

माझे सगळे मत डेटा ड्रिव्हन आणि पुरावा ड्रिव्हन आहे. अमेरिकेच्या अध्यक्षाकडून माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या तात्या पूर्ण करत असेल तर तात्या आपला प्रेसिडेण्ट. प्रेग्नंसी, लग्न इ खाजगी बाबतीत नाक खुपसू नका. इमिग्रंट लोकांना त्रास देऊ नका पण बॉर्डर्स बद्दल भोळसट पॉलिसीज आणून तिथल्या राज्यांवर बोजा टाकू नका. रिझनेबल गन कंट्रोल आणा. निवडणुकीत हरलात तर खुलेपणाने स्वीकारा. बास. मग कमला असो वा तात्या.

इमिग्रंट लोकांना त्रास देऊ नका? म्हणजे काय बुवा? बेकायदाशीररित्या घुसलेल्या लोकांना सन्मानाने वागवायचे? का बरे?
देशात प्रवेश करतानाच देशाच्या इमिग्रेशन कायद्याला धुडकावणार्या उपर्या लोकांना सन्मान देण्यामागे काय बरे विचार आहे?
किती लोकांना, काय गुणवत्तेच्या लोकांना प्रवेश द्यावा ह्याविषयी त्या देशाच्या सरकारला पूर्ण अधिकार असायला हवेत.
जगी ज्यास कोणी नाही त्यास अमेरिका आहे अशा प्रकारचा बिनडोक, घातक विचार अमेरिकेला रसातळाला नेणार आहे.

लीगल इमिग्रंट लोकांना त्रास देऊ नका. बॉर्डर्स बद्दल भोळसट पॉलिसीज बद्दल ऑलरेडी लिहीले आहे.

बाय द वे, प्रश्न तुम्ही विचारून त्यावर तुम्हीच उत्तरे देऊन ते उत्तर बिनडोक आहे म्हणणे एकतर स्ट्रॉमॅन म्हणायला हवे किंवा सेल्फ-डेप्रकेटिंग ह्यूमर Happy

इव्हन इल्लिगल इमिग्रंट्सना सुद्धा कायद्याने जी प्रोसेस आहे ती फॉलो करून परत पाठवा.

जगी ज्यास कोणी नाही त्यास अमेरिका आहे अशा प्रकारचा बिनडोक, घातक विचार अमेरिकेला रसातळाला नेणार आहे. >>> हे सांगायला थोडा उशीरच झाला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर लिटरली असे लिहीलेले आहे. त्यानंतर अमेरिकेची भरभराटच झाली आहे.

Inhe bi legal immigrant tha na kabhi to bi. Phir bali public ko huckk nahi!!! Kya chichaa

>>
जगी ज्यास कोणी नाही त्यास अमेरिका आहे अशा प्रकारचा बिनडोक, घातक विचार अमेरिकेला रसातळाला नेणार आहे. >>> हे सांगायला थोडा उशीरच झाला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर लिटरली असे लिहीलेले आहे. त्यानंतर अमेरिकेची भरभराटच झाली आहे.
<<
कुठले वाक्य किती थराला न्यायचे ह्याला काही सीमा असावी. पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या गावात २५००० उपरे लोक जे तिथली भाषाही बोलत नाहीत. जे फारसे शिकलेले नाहीत असे आणून त्या गावाची भरभराट होणार का? अशा उपर्या लोकांना सरकारी भत्ते वगैरे देऊन स्थानिक लोकांना मात्र त्यापासून वंचित ठेवून त्या गावचे आधीचे लोक ह्या नव्या लोकांना आपल्यात सामावून घेणार का?
आज विज्ञान, तंत्रज्ञान ज्या दिशेला चालले आहे त्यानुसार कमी कौशल्याची कामे यंत्रे आणि यंत्रमानव करणार असे दिसत आहे. टॅक्सी चालवणे, ट्रक चालवणे, फास्ट फूड कर्मचारी, सफाई, कदाचित पुढे शेतमजूरही. अमेरिकेत अर्ध शिक्षित लोक, अशिक्षित लोक, इतक्या वर्षात आलेले बेकायदा घुसखोर हे उरल्या सुरल्या कमी कौशल्याच्या कामासाठी उपलब्ध असताना आणखी लाखो अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोक आणून अमेरिकेची काय डोंबल भरभराट होणार आहे? बेकायदा घुसखोर कमी पैशात काम करतात आणि ह्या क्षेत्रात नागरिकांना काम करणे अशक्य करतात. अशाने बेकारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी असे प्रश्न निर्माण होतात. तशात गुन्ह्यांना शि़क्षा न देणे म्हणजे उदारमतवाद वगैरे बिनडोक विचार समस्त पुरोगामी राज्यात आणि शहरात बोकाळला असल्यामुळे अशा लोकांना पकडले जात नाही. शिवाय एफ बी आय वगैरे बनावट आकडेवारी देऊन धडधडीत गुन्हे घडत असताना आकडेवारीचे खेळ करून गुन्हे कमी होत असल्याची धुळफेक करत असतेच.

आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञान ह्याची परिस्थिती पाहून आपले इमिग्रेशन नियंत्रणात ठेवायचे की निव्वळ त्या निर्जीव पुतळ्यावरील वाक्ये जणू कुठल्या प्रेषिताने सांगितली आहेत असे डोळे मिटून मानून बेकायदा घुसखोरांचे आणि कायदेशीर घुसखोरांचे लोंढे चालू ठेवायचे?

>>इव्हन इल्लिगल इमिग्रंट्सना सुद्धा कायद्याने जी प्रोसेस आहे ती फॉलो करून परत पाठवा.
हो अगदी. घुसखोर लोक बिनदिक्कत कायदे तोडणार गुन्हे करणार आणि त्यांना शिक्षा करणार्या सरकारी लोकांचे मात्र हात बांधून ठेवा. त्यांना कायम तारेवरची कसरत करायला लावा. अगदी न्याय्य विचार. कमलाबाईचा विचार होता की आईस विभाग हा के के के सारखा रेसिस्ट आहे. आणि तो कायमचा बंद करायला हवा. मग काय बेकायदा घुसखोरांना नम्र भाषेत "आपण आमच्या देशात बेकायदेशीररित्या घुसला आहात. तेव्हा शक्य तितक्या लवकर आमचा देश सोडून द्यायचा गंभीरपणे विचार करावा. तोवर आम्ही आपला शक्य तितका पाहुणचार करू" असे लिहिलेली पत्रके वाटून ते परत जातील असे समजावे का?

“ ट्रक चालवणे” - हा ब्ल्यू कॉलर जॉब आहे, पण तो ‘कमी कौशल्याचा‘ आहे हे म्हणणं आत्यंतिक अडाणीपणाचं आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा ट्रान्स्पोर्टेशन इंडस्ट्री आहे (if you got it, truck brought it’). ३०० गॅलन डिझेल भरलेला, ८०,००० पाऊंडाचा ट्रक, ७० मैलाच्या स्पीडने सुरक्षित चालवणारा ट्रक ड्रायव्हर हा इल्लिगल इमिग्रंट वगैरे नसतो. १.६ ट्रिलियन डॉलर इंडस्ट्रीतला तो महत्वाचा घटक आहे. सहा आकडी पगार कमावणारा चाकरमाना/ स्वतंत्र व्यावसायिक आहे.

राजकीय धुराळा उडवताना कुठल्याही विषयातले आपण तज्ञ आहोत हा आविर्भाव सोडून द्या.

ट्रक चालवणे हा व्यवसाय पुढील काही वर्षात नष्ट होणार आहे हा मुद्दा आहे. टॅक्सी, ट्रक, बस इत्यादी वाहने स्वयंचलित असणार आहेत हे उघड दिसत आहे. मुख्य मुद्दा तो आहे. अनेक मोठ्या कंपन्या त्या दिशेने पावले उचलत आहेत. ह्यातून पैसे वाचत असल्यामुळे अशा प्रयोगांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळताना दिसत आहे. कधी ना कधी ते होणारच.
आणि हो, अमेरिकेतील सगळे ट्रक हे प्रचंड, घातक सामान घेऊन जाणारे, १८ चाकी अवाढव्य असतातच असे नाही. अनेक आकारात, अनेक प्रकारात ट्रक असतात. ते चालवायला वेगवेगळ्या क्षमता लागतात.
घातक रसायने वगैरे घेऊन जाणारे ट्रक चालवण्याकरता जास्त परीक्षा द्याव्या लागतात.
दुसर्‍याला शिव्या घालताना आधी मुद्दा समजावून घ्या.
राजकीय विषयात व्यक्त होणारे तंत्रज्ञान विषयात बिनडोक आहेत आणि आपण मात्र सर्वज्ञ आहोत हा आविर्भाव सोडून द्या.

ट्रक चालवणे काही वर्षांमध्ये स्वयंचलित होईल हे नक्की नाहीये. इलोन मस्क गेल्या दशकापासून "पुढच्या दोन वर्षात FSD" असे म्हणत आला आहे.

“ ट्रक चालवणे हा व्यवसाय पुढील काही वर्षात नष्ट होणार आहे हा मुद्दा आहे.” - मोठे - क्लास ८ - चालवणारे ड्रायव्हर्स कालबाह्य व्हायला बराच काळ लागेल (पुढच्या ‘काही’ वर्षांपेक्षा जास्त).

वेगवेगळ्या आकाराचे कमर्शियल ट्रक्स स्वयंचलित होण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि रेग्युलेटरी स्ट्रक्चर संपूर्ण देशात तयार होणं, ती टेक्नॉलॉजी संपूर्ण डेव्हलप होणं ह्या ‘काही’ वर्षात होणार्या गोष्टी नाहीत इतकच. बाकी कुठला आव, आविर्भाव काही नाही. राजकीय धुराळ्यात तर अजिबात रस नाही. ते तुमचं चालू द्या.

बाय द वे, प्रश्न तुम्ही विचारून त्यावर तुम्हीच उत्तरे देऊन ते उत्तर बिनडोक आहे म्हणणे एकतर स्ट्रॉमॅन म्हणायला हवे किंवा सेल्फ-डेप्रकेटिंग ह्यूमर >> आता वर त्याने म्हटलेय ना कि विनोदाचा मक्ता फक्त तात्या नि त्याला दिलाय. त्यामूळे दुसरा पर्याय असावा Wink

हे सांगायला थोडा उशीरच झाला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर लिटरली असे लिहीलेले आहे. त्यानंतर अमेरिकेची भरभराटच झाली आहे. >> असा धोतराला हात घालू नये रे फा.

आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञान ह्याची परिस्थिती पाहून आपले इमिग्रेशन नियंत्रणात ठेवायचे की निव्वळ त्या निर्जीव पुतळ्यावरील वाक्ये जणू कुठल्या प्रेषिताने सांगितली आहेत असे डोळे मिटून >> अर्रर्र हे ब्रह्मज्ञान फाउंअडींग फादरनाही अपेक्षित नसलेले अर्थ काढणार्‍या फेडरेलिस्ट सोसायटि ने ग्रस्त झालेल्या सुप्रीम कोर्टाबद्दल पण लागू करणार का ? कि परत आपला तो बाब्या सुरू Wink

स्वयंचलित >> फेफ स्वयंचलित वाहनांमधे पुढाकार घेणार्‍या मस्क च्या पाठींब्याबद्दल विचारतोस का ?

तात्याच्या बरळण्याचे सामान्य लोकांना समजावून सांगण्याचा वारसा घेतलेल्या आयडी कडून अर्नोल्ड पामरबद्दल तात्या जे बकला त्यातले मर्म समजावले जाईल का ? कि उगाच असंबंद्ध सुभाषित डकवले जाईल ? * एक सर्वज्ञ नसल्यामूळे विचारात पडलेला बाहुला*

“ स्वयंचलित वाहनांमधे पुढाकार घेणार्‍या मस्क च्या पाठींब्याबद्दल विचारतोस का ?” - नाही रे. मी खरंच राजकारणाविषयी नाही, फक्त ट्रान्स्पोर्टेशन इंडस्ट्रीविषयी बोलत होतो. ‘सेल्फ ड्रायव्हिंग ट्रक्स / (इव्हन फुल्ली इलेक्ट्रिक ट्रक्स) येणार‘ ही ऐकायला/वाचायला छान हेडलाईन असली तरी संपूर्ण कमर्शियल सोल्युशन व्हायला बराच काळ जावा लागणार आहे.

दुसरं म्हणजे ट्रक ड्रायव्हिंग हा ‘लो-स्किल्ड जॉब‘ नाहीये. लो-स्किल्ड जॉब ला शिक्षण/ पूर्वानुभव नसला/कमी असला, तरी चालतं. कॉम्प्लेक्स मशिनरी / कंप्युटिंग ची गरज नसते. ह्या दोन्ही निकषांवर ट्रक ड्रायव्हिंग - ब्ल्यू कॉलर असला तरी ‘लो-स्किल्ड‘ जॉब नक्कीच नाहीये. काही वर्षांपूर्वी पूर्व युरोपमधून H2-B व्हिसावर ड्रायव्हर्स आणायचा प्रयत्न झालेला आहे (ड्रायव्हर शॉर्टेज वर तोडगा म्हणून). उगाच आपलं राजकीय घोडं दामटायचं म्हणून काहीही आर्ग्युमेंट्स काय करायची!

>>> उगाच आपलं राजकीय घोडं दामटायचं म्हणून काहीही आर्ग्युमेंट्स काय करायची!
आँ?! मग हा धागा आहे तरी कशासाठी म्हणते मी?! Proud

उगाच आपलं राजकीय घोडं दामटायचं म्हणून काहीही आर्ग्युमेंट्स काय करायची! >> तात्या नि वान्स ला अभिप्रेत नसलेले अर्थ काढून दाखवतात तर जॉब चे असलेले नसलेले स्किल्ड दाखवणे वगैरे तर फारच क्षुल्लक बाब रे !

दुसर्‍याला शिव्या घालताना आधी मुद्दा समजावून घ्या. >> हे किती निर्विकारपणे लिहिले आहे हे पाहिले आहे का ? बहुधा हाच तो विनोद इत्यादि असावा Wink

Pages