ह्या गोष्टीला नावच नाही!

Submitted by नीधप on 10 October, 2024 - 14:35

आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटावर मात करत आयुष्याला नवसंजीवनी देत आयुष्याचं फुलपाखरू
स्वछंद विहरू लागतं.
या साध्या सरळ गोष्टीला नाव काय द्यायच?

'ह्या गोष्टीला नावच नाही' (This story does not have a name) ही दिग्दर्शक संदीप सावंत यांची तिसरी फिल्म.

दिवाळीनंतर 8 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.

पॅनोरमा स्टुडिओज सादर करीत आहेत
'ह्या गोष्टीला नावच नाही'
Teaser Out Now !
८ नोव्हेंबर २०२४ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!!

हा नवीन टिझर

उद्या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच होणार आहे.

अजून अपडेट्स साठी आमच्या या सोशल मिडिया हँडल्सना फॉलो करा.
www.facebook.com/HGNNmovie
www.instagram.com/hgnnmovie

ही चित्रपटाची IMDB लिंक
https://m.imdb.com/title/tt27682812/?ref_=ext_shr_lnk

मुख्य चित्र आहे ते फिल्मचे पोस्टर आहे. मी डिझाईन केले आहे. या चित्रपटात माझा तेवढाच सहभाग आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोस्टर मस्त, नी!

टिझर पाहून खरंच काही अंदाज येत नाहीये. पण तेच चांगलं आहे. पिक्चर पहायची उत्सुकता राहते.

अभिनंदन आणि शुभेच्छा नी!

पोस्टरबद्दलही लिही योग्य वेळेस. त्यात स्पॉईलर असेल तर रिलीज झाल्यावर मग काही दिवसांनी.

पोस्टरबद्दल थँक्स सर्वांना!
एकूण 5 पोस्टर्स आहेत. सांगण्यासारखे स्पेशल काही नाही. लिहीन पण थोडेसे इथेच.

आज ट्रेलर लॉंच होतो आहे. लिंक देईनच.

अभिनंदन आणि शुभेच्छा
कॅन्स मध्ये निवड झाली होती या बद्दल अभिनंदन. मुर्त्युस्पर्श कादंबरी वाचली नाहीये त्यामुळे चित्रपट बघण्याची उत्सुकता.

अरे वाह
नवीन चित्रपट येणार
अभिनंदन तुमच्या संपूर्ण टीमचे

अरे वाह!
अभिनंदन आणि शुभेच्छा!

या चित्रपटाचा प्री रिलिज स्क्रीनिंग नाशिक ला कुसुमाग्रज प्रतिष्ठानात संदीप सर यांच्या उपस्थितीत झाला होता. ३ एक महिने झाले. उत्कृष्ट चित्रपट.
अन पोस्टर डि़आइन आपले आहे हे माहित नव्हते... सुंदर आहे... हार्दिक अभिनंदन

थँक्स रेव्यू!
शुभेच्छांबद्दल आभार लोकहो अन नुसत्या शुभेच्छा पुरेश्या नाहीत. सर्वांनी पहिल्या वीकेंडला/ पहिल्या आठवड्यातच थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचा प्रयत्न करा ही विनंती.
लाईफ म्हणजे गोंधळ नुसता
हे गाणं आहे या चित्रपटातलं.

८ नोव्हेंबर विसरायचा नाही काय!

लोकहो,
आज म्हणजे ८ नोव्हेम्बरपासून नवीन चित्रपट 'ह्या गोष्टीला नावच नाही' सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. पहिल्या वीकेंडला/ पहिल्या आठवड्यात नक्की बघा. आवडली तर अजून दहा जणांना सांगा. Spread the word!

ही बुकमायशोची लिंक. इथे सगळ्या थिएटर्सची यादी मिळेल
https://in.bookmyshow.com/movies/hya-goshtila-navach-nahi/ET00413842

Pages