आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटावर मात करत आयुष्याला नवसंजीवनी देत आयुष्याचं फुलपाखरू
स्वछंद विहरू लागतं.
या साध्या सरळ गोष्टीला नाव काय द्यायच?
'ह्या गोष्टीला नावच नाही' (This story does not have a name) ही दिग्दर्शक संदीप सावंत यांची तिसरी फिल्म.
दिवाळीनंतर 8 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.
पॅनोरमा स्टुडिओज सादर करीत आहेत
'ह्या गोष्टीला नावच नाही'
Teaser Out Now !
८ नोव्हेंबर २०२४ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!!
उद्या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच होणार आहे.
अजून अपडेट्स साठी आमच्या या सोशल मिडिया हँडल्सना फॉलो करा.
www.facebook.com/HGNNmovie
www.instagram.com/hgnnmovie
ही चित्रपटाची IMDB लिंक
https://m.imdb.com/title/tt27682812/?ref_=ext_shr_lnk
मुख्य चित्र आहे ते फिल्मचे पोस्टर आहे. मी डिझाईन केले आहे. या चित्रपटात माझा तेवढाच सहभाग आहे.
एकीकडे लोकांनी आमचा हा
एकीकडे लोकांनी आमचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच अनुभवावा ही आमची धडपड आणि त्यासाठी अजिबात अनुकूल नसणारी व्यवस्था यातून आम्ही आमच्या परीने मार्ग काढायचा प्रयत्न करत होतो. जेवढ्यांना सिनेमा बघता आला त्यातल्या बहुतेकांना आवडतो आहे त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत सिनेमा पोचावा यासाठी प्रयत्न करायला अजून हुरूप येतो आहे. यात आपली नंदिनी देसाई, तिचे सहकारी आणि रत्नागिरी फिल्म सोसायटीने रत्नागिरीमध्ये शो घडवून आणण्यासाठी खूप छान काम केले आणि 16 नोव्हेंबरला सिटीप्राईड, रत्नागिरी येथे भरपूर प्रेक्षकांसमोर शो झाला.
आता या प्रयत्नात आम्हाला भरभक्कम साथ मिळते आहे ती आमचा मित्र प्रदीप वैद्य यांच्या द बॉक्स टू च्या रूपाने.
"ह्या गोष्टीला नावच नाही" या चित्रपटाचे 8 विशेष खेळ पुण्यात, द बॉक्स टू मध्ये होणार आहेत. 25-28 नोव्हेंबर 2024, दुपारी 3:30 आणि संध्याकाळी 7:30 असे रोज दोन खेळ आहेत.
तिकीट बुकिंगसाठी इथे जा
किंवा चित्रात दिलेला क्यू आर कोड स्कॅन करूनही बुकिंग करू शकता.
हे शोज यशस्वी झाले तर केवळ आमच्या सिनेमापुरते नव्हे तर अश्या प्रकारच्या सर्वच सिनेमांसाठी काहीतरी नवीन, आशादायक घडायची सुरुवात कदाचित होऊ शकते.
पुण्यात द बॉक्स टू या
पुण्यात द बॉक्स टू या प्रायोगिक नाटय अवकाशात आमच्या 'ह्या गोष्टीला नावच नाही' या सिनेमाचे आठ विशेष खेळ नोव्हेंम्बर महिन्यात आयोजित केले होते. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
सरत्या वर्षातले महत्वाचे मराठी सिनेमे आणि मराठी सिनेमाजगतातल्या महत्वाच्या घटनांचा आढावा घेताना हॉलिवूड रिपोर्टर इंडिया मध्ये आमच्या सिनेमाचा व सिनेमाच्या प्रयोगाचाही आवर्जून उल्लेख केला आहे.
ज्याला इंडिपेंडंट किंवा इंडी सिनेमा म्हणले जाते असे चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी अश्या प्रकारच्या समांतर व्यवस्थेची गरज हॉलिवूड रिपोर्टर इंडियामधल्या लेखात गणेश मतकरीने अधोरेखित केली आहे.
आयत्यावेळेला शोज कॅन्सल होणे, शोजच्या वेळा बदलल्या जाणे, सर्व शो अडनिड्या वेळांना असणे या सगळ्या समस्या दूर करून आम्ही परत शोज करत आहोत.
हे आमचे प्रयत्न. पण ही व्यवस्था अजून चांगल्या प्रकारे उभी राहायची, टिकायची असेल आणि इंडी सिनेमे पहायची तुम्हाला भूक असेल तर तुम्ही या प्रयोगांना येणे महत्वाचे आहे.
नक्की या. तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांनाही सांगा.
हे यावेळेसच्या प्रयोगांचे वेळापत्रक.
२१ डिसें : शनिवार - सकाळी १० आणि दुपारी २
२२ डिसें : रविवार - सकाळी १० आणि दुपारी २
२३ डिसें : सोमवार - दुपारी ४.३० आणि रात्री ८
२५ डिसें बुधवार (ख्रिसमस सुट्टी) - सकाळी १० आणि दुपारी २
तिकिटे फक्त तिकीटखिडकी या पोर्टलवर.
https://www.ticketkhidakee.com/hyagoshtilanavachnahi
नी>> २८ ला उशिरा पोहोचल्याने
नी>> २८ ला उशिरा पोहोचल्याने काही जमले नाही जायला. पण पेपर मध्ये काही खेळ हाऊसफुल्ल झाले असे वाचले त्याबद्दल अभिनंदन. आणि पुढील तारखांकरता शुभेच्छा.
थँक्स! आहेस का देशात अजून?
थँक्स! आहेस का देशात अजून? असशील तर ये 21-25 दरम्यान.
हो यार, अगदीच थोडक्याने हुकला
हो यार, अगदीच थोडक्याने हुकला शो
आहेस का देशात अजून>> नाही
आहेस का देशात अजून>> नाही जस्ट परत आलो. इकडे लावणार असशील तर सांग
एवढा मोठा का बनवला चित्रपट,
एवढा मोठा का बनवला चित्रपट, कथेचा जीव लहान आणि त्यात अनावश्यक लांबच्या लांब दृश्यमालिका घालून पाणी वाढवण्यासारखं का केलं असावं? साधारण एक किंवा डोक्यावरून पाणी दीड तासात संपवला असता तर रटाळ वाटलं नसतं.
कथा, दिग्दर्शन, चित्रीकरण, गावाकडचे घर वगैरे उत्तम. फक्त नको त्या मोठं मोठ्या दृश्यांना कात्री लावायला हवी होती, हेमावैम.
पोस्टरसाठी अभिनंदन.
Pages