चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

स्त्री २ आवडलाय. मला तर सरकट्याला पाहून रामसेंच्या नेवलाचीच आठवण आली. तसाच बेतलाय चेहरा बराचसा. बाकी पिक्चर मधे पंचेस जबरी आहेत. एक तो 'आप अटल हो' असा काहीसा पंच सटल आहे पण भारी टाकलाय Happy

हिलबिल्लि पाहिला नाही किंवा जेडी वांसबद्दलही माहिती नाही. लिंक वाचली.. वांसचे वैयक्तिक अनुभव अर्थात त्याचा वैयक्तिक इतिहास हा विषय असेल तर त्या इतिहासात कित्येकांचे नसणे शक्य आहे. कित्येक विषयांचे त्याचे आकलन फक्त त्याच्या अनुभवाइतकेच मर्यादीत असु शकते.

हिलबिली हा वेस्ट्वर्जिनियाचा इतिहास म्हणुन लिहिलेला असेल तर अशा चुका क्षम्य नाहीत.

Btw स्त्री आहे कुठे. बिग बॉस संपल्यावर इतर काही बघायला वेळ मिळेल. मुंजा, फ्रीलांसर सीझन दोन अशा lists केल्यात.

जान्हवी कपूर चा उलझ पाहिला.
जान्हवी फार smart n graceful दिसली आहे.
गुलशन देवरैया ने फार overreacting केलीय असं वाटलं.
बाकी सिनेमा काही विशेष वाटला नाही.
कोण काय असेल अंदाज येऊ लागतो अगोदरच.

प्राईमवर काल Growing up Smith बघितला. मस्त क्यूट मुव्ही आहे. १९७० -१९८० च्या काळात अमेरिकेत आलेली भारतीय फॅमिली आणि त्यांचे अमेरिकन ड्रीम लाईफ बरोबर अ‍ॅडजस्ट करत जगणे याबद्दलचा हा सिनेमा. यातला मेन हिरो १० वर्षाचा मुलगा आहे. आपल्या टिपीकल देसी परिवाराशी डील करत करत शेजारी असलेल्या अमेरिकन फॅमिली बरोबर यांचे कसे बंध जुळतात ते दाखवलंय.

स्त्री२ मलाही फार आवडला होता, सुंदर सरकट्यासकट Proud …. म्हणजे सरकट्याचा चेहरा बर्‍यापैकी भितीदायक आहे. बाकी आपल्या चारही सराईत कलाकारांबद्दल व त्यांना घेऊन केलेल्या कॉमेडीबद्दल सर्वांना अनुमोदन.

आज hotstar वर ' हिडन फिगर्स ' नावाचा सुंदर चित्रपट पाहिला. चित्रपट साधारण १९६०-७० चे दशकात घडतो. नासा मधील विविध अवकाश मोहिमा आहेत. त्यावेळेस चे बरेच जुने चित्रीकरण पण आहे . सर्वात जास्त लक्षात राहतात त्या कॅथरीन, डोरोथी, मेरी या स्त्रिया ! त्या काळातील वर्णभेद आणि केवळ स्त्री आहे म्हणून मिळणारी वागणूक बघून खरंच वाईट वाटते. पण या तिघी त्यावर मात करत कसे यश संपादन करतात ते बघण्यासारखे आहे . जरूर बघा .

Hidden Figures छान आहे. मला पण आवडला होता.

काल पासून चार चित्रपट बघितले.

CTRL ठिक आहे. एकदा बघायला. नाही बघितला तरी चालेल. अनन्याचा अभिनय सुधारतोय. ती Gehraaiyaan, Kho Gaye hum kaha मधे पण छान वाटली होती.

Ulajh नाही आवडला. पळवत पळवत संपवला.

Stree2 फायनली बघितला, आवडला. मधले मधले पंचेस धमाल आहेत.

Gifted फारच आवडला. स्टोरी व सगळ्यांचे अभिनय छान वाटले. कुठेच बोअर नाही झाला एकाही ठिकाणी १० सेकंदपण फॅारवर्ड केला नाही.

उलझ कशावर आहे? झान्वी अजिबात अवडत नाही, तिचे डोळे निर्जीव आहेत. तिच्या आईचा बेस्ट अ‍ॅसेट होता चमकदार & उत्साहाने सळसळणारे तेजस्वी डोळे Happy
पण गुलशन दे. आवडतो. पळवत बघेन.

उलझ नेफिवर आहे.
जान्हवी च्या डोळ्यांबद्दल अनुमोदन. पण यात तीच छान वाटते.
गुलशन out of place वाटला.
त्याचं character convincing वाटत नाही.

ok

स्त्री २- बर्‍यापैकी टिपी आहे. आवडला एकदा बघायला.
CTRL - हा पण सरप्रायजिंगली बरा घेतला आहे. सोशल मिडिया इन्फ्लुअन्सर्स, त्यांचे कन्टेन्ट साठी काहीही करणे वगैरे, चक्क तो एआय असिस्टन्ट, त्याचा युआय, रिलेटेड अ‍ॅनिमेशन वगैरे पण बिलिव्हेबल वाटते. ( कुठून ढापले असावे का? कारण सहसा हिंदीत टेक्नॉलॉजी वगैरे डीटेलिंग दाखवयाच्या नावाने बोंब असते!!)
पण आता काहीतरी होईल असे वाटता वाटता अचानक संपलाच. हाही एकदा बघण्याइतपत ओके आहे.

दोन चार दिवस कल्की चालू होता बहुतेक आमच्याकडे, कुठली भाषा होती काही माहीती नाही, इंग्लिश सबटायटल्स होती. मला बघायचा नव्हताच, येता जाता लक्ष जात होतं. अमिताभला ओळखलं. बाकी काही समजलं नाही, इंटरेस्ट काही वाटला नाही. एक खप्पड चेहेरा होता, तो ओळखीचा वाटला.

जोकर २ बघून आलो. मला डार्क, अनेक प्रश्न निर्माण करणारा, कंफर्ट लेव्हल बाहेरचा, परीघ रुंदावणारा असा काय काय वाटला. लोकांचे रिव्ह्यू अगदीच न आवडल्याचे आहेत. कदाचित कॉमिक्स फॅन्सना व्हीलन, सायकोपाथ जोकरचा स्ट्रगल आवडला नसावा, जोकर च्या कथेवर पूर्णविराम दिलेला आवडला नसावा.
मला आवडला.

Platform 2 आला आहे नेटफ्लिक्सवर. कोणी पाहिलाय का? कसा आहे?

चांगला आहे. पहिल्याच्या तुलनेत मला फार जास्त अपेक्षा होत्या, तितक्या पूर्ण होत नाहीत. मेटॅफरं अर्थात पुष्कळ आहेत. ती असायचीच.
कम्युनिझम - कॅपिटॅलिझम, धर्म, चौकट, नियम इ. इ.पुष्कळ! परत कुठेच काय वाईट काय चांगलं अशी विभागणी नाही. ते ही उत्तमच. प्लॅटफॉर्म बघितला असेल तर साधारण रुपकं काय असतील कल्पना असेलच. शेवट मला तितकासा झेपला नाही. आता प्लॅटफॉर्म -१ परत बघणे लिस्टवर टाकले आहे. म्हणजे एक सलग अनुभव होईल. Wink
चित्रपट बघुन मजा येते. अपेक्षा पूर्ण होत नाहीत, पण वेळ फुकट गेल फिलिंगही येत नाही. बघा. आणखी लिहित नाही.

लडकी : ड्रॅगन गर्लचे रिव्ह्यूज या धाग्यावर आलेले नाहीत.
आरजीव्ही फॅनक्लबातून कुणी तरी कसा आहे ते कळवावे प्लीज.

औरो में कहा दम था.. नावाचा अदे, तबू चित्रपट पाहीला. पिसं काढण्या एवढाही बघणेबल नाही. तबू आवडते म्हणून सुरू केला. इतका बोर मारला, इतका बोर की मी कधी डुलकी मारली, कधी घोरले, उठले ..परत बघत होते तरी चालूच होता.
इतका रटाळ आहे की बस रे बस. आणि प्रचंड आउट डेटेड.

ग्रेट ईंडीयन फॅमिली बघितला. १ टाईम वॉच आहे. विकी असल्याने ड्रामा सहन होतो छान काम करतो, निष्पाप दिसतो.. कुमुद मिश्रा नेहमीप्रमाणे छाप सोडून जातात. बिचारी मीस युनी. मानुषी काहीच काम नाही, मेकप करून २-४ संवाद आहेत. दिसते मस्त.

उलझ.. पाहिला मी पण.
अ आणि अ कॅटेगरी मधील वाटला.

मी जान्हवीचा पाहिलेला हा पहिलाच चित्रपट.
जान्हवी मठ्ठ वाटते, राहून राहून स्वप्ना / श्रद्धा ने राजेंद्रकुमार ला दिलेल्या "दगड" उपमेची आठवण होत होती. Lol

तिच्या भोवतीच सगळं कथानक फिरतं, एखादी ताकदीची अभिनेत्री असती तर न्याय मिळाला असता त्या भूमिकेला.

औरो में कहा दम था..
इतका रटाळ सिनेमा आहे की.. शब्द कमी पडत आहेत सांगायला..!
मी जेमतेम अर्धाच पाहू शकले...

औरो में कहा दम था.. >> मी शेवट पर्यंत काहीतरी भारी ट्विस्ट असेल म्हणून बघत बसलो. अगदीच फुसका निघाला. ती शक्यता इतकी घासुन गुळगुळीत झालेली की असूच शकत नाही इतकी खात्री होती माझी.
बाकी भव्यदिव्य लखलखीत चाळी, काही आगापिछा नसलेले उगाचच भव्य दाखवायचे म्हणून भव्य घर. पण त्या भव्य घराचं पार्किंग मात्र रस्त्यावर, त्यांच्या वस्तितला परत परत उगाळून दाखवलेला सीन इतका कचकड्याच्या फिल्म सिटीतला की असे रस्ते मुंबईततले वाटत सुद्धा नाहीत. तुरुंग पण एकदम फैस्टार! हा नक्की साउथचा हात असलेला असणार. बॉलिवुड मध्ये इतकं मंद कोणी आजच्या काळात असेल असं वाटत नाही.

औरो में कहा दम था >>> याचा तर प्रोमोच इतका कंटाळवाणा वाटला होता की पिक्चर पहायचा विचारही मी मनात आणला नाही. बरंच झालं म्हणायचं Happy

औरो में कहा दम था.. >> मी शेवट पर्यंत काहीतरी भारी ट्विस्ट असेल म्हणून बघत बसलो. अगदीच फुसका निघाला.
>>
माझा पण अर्धा झालाय अन् मला पण अपेक्षा होत्या की पूर्वार्धात इतकं स्लो घेतलंय तर उत्तरार्धात एकदम जबरी पलटी असेल... पण हे वाईटच दिसतंय..
ना तुम जानो ना हम पण असाच आता काहीतरी होईल, मग काहीतरी होईल अशा आशेवर पाहिला होता. पण फारसं काही झालंच नाही अन् सिनेमा संपला पण...

Pages