Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेफ >>
फेफ >>
बॉम्बे टू गोवा' ऑटाफे आहे, त्यातला विनोद धमाल आणि निरागस आहे >> सहमत.
हा सबकुछ मेहमूद सिनेमा नव्हता. गंमत म्हणजे काही काही नायकांचे सिनेमे त्यात मेहमूद आहे म्हणून चालत. सब कुछ मेहमूद थाटाचे पण काही सिनेमे निघाले ( जोहर मेहमूद इन गोवा / हाँगकाँग),
मेहमूद ने स्वतः जे सिनेमे बनवले त्यात त्याने जाणिवपूर्वक इतरांना महत्वाचे रोल्स दिले. पडोसन साठी किशोरकुमारला त्याने त्या काळच्या सर्वात महागड्या स्टार पेक्षा जास्त मानधन दिले होते. तो एक चांगला फिल्ममेकर होता.
मीही सचिनचा महागुरू अवतार आणि
मीही सचिनचा महागुरू अवतार आणि मुलाखती वगैरे पाहिलेल्या नाहीत त्यामुळे मला तो अजूनही आवडतो. ( खुपते तिथे गुप्तेमधे तो आणि सुप्रिया आले होते तो भाग बघितला होता त्यामुळे कल्पना आहे तो किती 'मी-माझं-मला' करतो त्याची. पण मी यूट्यूबवर वगैरे मुलाखती बघायला गेले नाही त्याच्या.)
बनवाबनवी, आमच्यासारखे आम्हीच, गंमत जंमत वगैरे आवडतातच, पण 'आत्मविश्वास' पण सचिनचाच आहे, तोही आवडतो. आता बघताना काही संवाद प्रतिगामी वाटतात पण बाकी पिक्चर छान आहे. सचिनने अभिनयही चांगला केलाय त्यात.
नवरा माझा नवसाचा थिएटरमध्ये बघितला होता तेव्हा खूप आवडला होता, नंतर बघताना मात्र नाही तेवढा आवडत. अशोक सराफचंही काम नाही आवडत. बॉम्बे टू गोवावरून बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत हे लगेचच लक्षात आलं होतं.
फेरफटका .
फेरफटका
.
बाकी हे "ट्यून - ट्यून" कुठे मिळेल?
वावे: महागुरुंच "आमची मुंबई" पाहा. आवड आपोआप नावडीमध्ये बदलेल.
कशाला नावडीत बदलायला हवय पण?
कशाला नावडीत बदलायला हवय पण?
मी ही महागुरू अवतार आणि इतर फार कमी गोष्टी बघितल्या आहेत. नमान मलाही तेव्हा आवडलेला. कशावरून घेतलाय वगैरेने मला काही फरक पडत नाही.
शाळा कॉलेजच्या काळात क्रश
शाळा कॉलेजच्या काळात क्रश असलेली अभिनेत्री आहे यात. कुणी मालिका पाहिलीय का ही ?
https://www.youtube.com/watch?v=sSDiaxl8OjE
अशी ही बनवाबनवी चान्गलाच होता
अशी ही बनवाबनवी चान्गलाच होता आणी आहे, तो कॉपि असला तरी त्यातले विनोद जबरदस्त गाजले...त्यात सचिनने सगळ्याना इक्वल फुटेज दिलय.
शाळा कॉलेजच्या काळात क्रश
शाळा कॉलेजच्या काळात क्रश असलेली अभिनेत्री
>>
अर्चना जोगळेकर...
माधुरी पेक्षा सुंदर
माधुरी पेक्षा सुंदर
कशाला नावडीत बदलायला हवय पण?
कशाला नावडीत बदलायला हवय पण? >>
हो ना.
इन ट्यून विथ द ट्यून असा मी असामीमधे मिळेल
अशी ही बनवाबनवी चान्गलाच होता
अशी ही बनवाबनवी चान्गलाच होता
>>>>>
चांगलाच हा शब्द देखील तोकडा आहे.
त्यातील कित्येक आयकोनिक संवाद, कित्येक सीन आजही लोकं आठवून आठवून हसतात, सोशल मीडियावर मिम्स आणि विनोदात वापरतात, हे असे इतक्या मोठ्या प्रमाणात इतर कुठल्या मराठी चित्रपटाबाबत पाहिले नाही.
त्यामुळे तो कॉपी आहे हा मुद्दा दिग्दर्शक म्हणून सचिनचे कर्तुत्व अमान्य करू शकत नाही.
चिकवा वरून कॉपी-पेस्टः
चिकवा वरून कॉपी-पेस्टः
‘घरत गणपती‘ बघितला. सिनेमॅटोग्राफीला एक नंबर!! अप्रतिम!!
कदाचित स्पॉयलर अॅलर्ट
रेखाच्या ‘खूबसूरत’ चा बाज आहे स्टोरीला
एण्ड ऑफ स्पॉयलर अॅलर्ट
बाकी पटकथेत लूपहोल्स पुष्कळ आहेत, पण 'काहीही चाललंय, बंद करून 'हास्य-जत्रा' बघू अश्या पातळीवर (म्हणजे 'कल्की') नाही. घरातले सगळे 'गजनी' आहेत, त्यामुळे 'तमाशा' म्हणता येईल अशी भांडणं झाली तरी पुढच्या सीनला नाच-गाणी व्यवस्थित करतात (गौरी-गणपतीला घरात सगळे नटून-थटून नाचतात ह्यातून करण जौहरला नवीन मार्केट ओपन होऊ शकतं). गणपती जर बोलायला लागला तर तो थकलेल्या अ तुल परचुरेच्या आवाजात बोलेल हे 'जरा' गुरूदेवांच्या 'आय इन द यू' इतकं अगम्य आहे.
रेखाच्या ‘खूबसूरत’ चा बाज आहे
रेखाच्या ‘खूबसूरत’ चा बाज आहे स्टोरीला
>>>
ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे. हा पिक्चर लहानपणी मी आणि आईने सात आठ वेळा पाहिला आहे. अचानक लक्षात आले की शेवटचा बघून कित्येक वर्षे झाली. घरत गणपती सुद्धा फॅमिली सोबत दुसऱ्यांदा बघायचा आहे. त्यानंतर आता खूबसुरत सुद्धा शोधून बघणार पुन्हा एकदा..
मी पण आत्ता प्राई म वर घरत च
मी पण आत्ता प्राई म वर घरत च बघितला. हल्ली हा ट्रेण्ड झालाय . एक सण त्या बॅक ग्राउंड वर फॅमिली टले झोल आणि एंड ला सगळ गोड. बाईपण मध्ये मंगळागौर आणि ह्यात गणपती...
खूबसूरत! फेफ - काल पाहताना
खूबसूरत! फेफ - काल पाहताना सारखे मला वाटत होते हा पॅटर्न पाहिला आहे. मी "बावर्ची" चा विचार करत होतो पण खूबसूरत जास्त जवळचा आहे. अर्थात त्यात जितकी सेंट्रल व्यक्तिरेखा रेखाची होती तितकी त्या मुलीची यात वाटली नाही. निदान सुरूवात तशी नाही, पण नंतर पुढे आहे.
मलाही पिक्चर एंगेजिंग वाटला. मधली १५ मिनिटे व शेवटची १५ मिनीटे राहिली आहेत बघायची. पण जनरल अंदाज आला. लोकांची कामे चांगली आहेत. संवादही बहुतांश जमले आहेत. एकदा बघण्यासारखा आहे. कोकणचे शूटिंग तर मस्त आहेच. संजय मोने व अजिंक्य देव यांच्यातले नंतरचे सीन एखाद्या दुसर्या दिग्दर्शकाने आणखी इफेक्टिव्ह केले असते, इथे त्यातले दिग्दर्शन हलकेफुलकेच आहे. पण कदाचित त्यामुळेच "इथे डायरेक्शन बघा", "हे या सीनमधले पुस्तक त्या पिक्चरच्या कथेशी असे संबंधित आहे" अशी जबरदस्तीची चित्रभाषाशिकवणी कोठे नाही. ते रिफ्रेशिंग वाटले. आश्विनी भावेचे नाव "अहिल्या" बघितल्यावर मला सारखे वाटत होते की अहिल्येच्या कथेशी काहीतरी रूपक जमवण्याचा खटाटोप करायला नको - आणि तसे काही दिसले नाही.
तो हुकलेला भाग पाहण्यात इंटरेस्ट आहे.
अमितव आणि वावे : सजेशन होत,
अमितव आणि वावे : सजेशन होत, सोडून द्या.
वावे: रेफरन्ससाठी धन्यवाद.
सचिन स्वप्नील जोशीचा बाप
सचिन स्वप्नील जोशीचा बाप /सासरा हे त्याच्या चाहत्यांना
रणा गण
वेळ जात नसल्यासhttps://www
वेळ जात नसल्यास
https://www.youtube.com/watch?v=0FhtmLTPbCo
घरातले सगळे 'गजनी' आहेत,
घरातले सगळे 'गजनी' आहेत, त्यामुळे 'तमाशा' म्हणता येईल अशी भांडणं झाली तरी पुढच्या सीनला नाच-गाणी व्यवस्थित करतात
>> हे घरात होताना बघितलं आहे. काहीही भांडण वाद तमाशे झाले तरी घरात गणपती बसलेले असताना ते तासाभरात सोडून द्यायचे असा अलिखित नियम आहे घरात. (एरवी भांडण लांबलेले चालते एकवेळ). आता आमच्या घरी नाच गाणी करत नाहीत. पण रीच्युअल्स चा भाग असता आणि करायला लागली असती तर ती पण आम्ही गळ्यात गळे घालून केली असती. मी म्हटलं ना.. घरत गणपती मधलं एकूण एक character आमच्या घरात आहे आणि हि सगळी पात्रं सेम सिनेमात दाखवली आहेत तशीच वागतात (आता कोण कोण आहे आणि मी कुठलं कॅरॅक्टर आहे हे विचारू नका
).
मात्र ते घरात आलेली नॉर्थची मुलगी आक्षेपार्ह कपडे घालते त्याबद्दल वरच्या कमेंट्स ना +१. भारतात कुठेही पूजेला एवढे डीप नेक कपडे घालू नयेत, प्रसाद आधी खाऊ नये हा सेन्स सगळ्या मुलींना असतोच. (म्हणजे जेव्हा तिला वुड बी इन् लॉज ना इंप्रेस करायचे असते तेव्हा तर नक्कीच).
गाणी आणि एरियल व्ह्यू एक नंबर आहे.
फार डीप नेक किंवा हॉट दिसावा
फार डीप नेक किंवा हॉट दिसावा असा वाटला नाही मला तो ड्रेस.. जेव्हा त्यावर मुद्दाम कॅमेरा मारून उल्लेख केला तेव्हा मला ते जाणवले. अर्थात मी फार श्रद्धाळू नसल्याने माझा दृष्टीकोन वेगळा असेल. जसा तिचा स्वतःचा.. तिलाही तो ड्रेस घालताना काही वावगे वाटले नसेल.
ब्रिटिश ललना स्वजोवरून जीव
ब्रिटिश ललना स्वजोवरून जीव ओवाळून टाकत होत्या. फारच वाईट दिसत होता तो, त्यामुळे शिशुपाल आणि कृष्णाची गोष्ट आठवून मोजायला सुरुवात केली.>>>
काय काय सहन करतेस गं बयो
चली आना तू पान की दुकानपे साडेतीन बजे' हे मंत्रघोषासारखे तोंडातून बाहेर पडले.
नी वेड्यासारखी हसतेय. जियो अस्मिता.
पाणी चा ट्रेलर आवडला, आदिनाथ
पाणी चा ट्रेलर आवडला, आदिनाथ आणी नविन हिरोईन आश्वासक वाटतेय..
https://www.youtube.com/watch?v=YsTRUFcOCkM&ab_channel=RajshriMarathi
हो! सही आहे ट्रेलर. बघणार
हो! सही आहे ट्रेलर. बघणार
अरे कमाल आहे पाणीचा ट्रेलर..
अरे कमाल आहे पाणीचा ट्रेलर.. त्या ट्रेलर धाग्यावर सुद्धा शेअर करतो. हा वेळीच समजायला हवा सर्वांना
टॉयलेट - एक प्रेमकथा सुद्धा असाच होता. पण तो अक्षय कुमारचा होता. त्यामुळे बरेपैकी उथळ होता. हा चित्रपट तसा वाटत नाहीये हे ट्रेलर आणि बॅकग्रांऊड म्युजिक वरून सुद्धा जाणवत आहे. हिरो-हिरोईन दोघांमधील केमिस्ट्री फार आवडली.
फुलवंती थिएटरमधे जाऊन पाहिला.
फुलवंती थिएटरमधे जाऊन पाहिला. चक्क आवडला की! सगळ्यात बेस्ट आहे सिनेमाची प्रॉडक्शन व्हॅल्यु. प्रत्येक फ्रेम सुरेख सजवलीये. कपडे, दागिने, भांडीकुंडी, खोल्या, वाडे .... वाह ! दाद देण्यासारखे आणि नेत्रसुखद.
त्यानंतर बेस्ट म्हणजे गश्मीर महाजनी. तो वेंकटशास्त्र्यांच्या वेशभुषेत इतका यम्मी दिसतो की बस्स! त्यातून त्याला दोन-तीनदा अंघोळ करायला लावलीये. पैसे इथेच वसूल होतात. थोरल्या बाजीरावांनी पायंडा घालून दिला आहे त्यानुसार एक शेंडी + एक धोतर = (किमान) एक आंघोळ. (अर्थात, no complains there)
बाकी,
कथा = ओक्केच. बाळबोध. अगदी अपेक्षित. तरीही थोडा ट्विस्ट आणि त्यावर ट्विस्ट आहे. शेवट छान केलाय मात्र.
गाणी = अतिशय सुरेख. फारा दिवसांनी इतकी सुश्राव्य गाणी आणि म्युझिक ऐकायला मिळाली. 'भो शंभो' गाणं (आणि त्यातला गश्मीर) अप्रतिम आहे.
प्राजक्ता माळी = चांगली आहे. गुणी आहे. मनापासून काम केलंय. नाच करतानाच्या तिच्या मर्यादा लक्षात येतात पण ठीक आहे. प्राजक्ताचा चेहरा अगदी मराठमोळा आहे. तिला बघून उषा चव्हाणची आठवण होते. एक 'दे रे कान्हा' टाईप प्रसंग घातलाय.
स्नेहल तरडे = डायरेक्टर आहे आणि ती जबाबदारी फारच छान पार पाडली आहे. कामही उत्तम केलंय. ती स्वयंपाकघरात असताना मनातील शंका तिथे मूर्तीमंत प्रकट होतात तो प्रसंग ही छान घेतलाय आणि त्यात स्नेहल तरडेनं जीव ओतलाय. तसाच तो शेवटचा ट्विस्टही तिनं अगदी understated आणि सहजरित्या केला आहे. दिसतेही छान.
शिवाय पात्रयोजनेत अनेकानेक ओळखीचे कलाकार आहेत.
काय खटकलं? = नृत्य आणि शास्त्र यांच्यातील संघर्ष हे बीज असल्याने या अनुषंगाने तत्त्वज्ञानाचे भुईनळे जरा अतिच फोडलेत. चालायचंच. शिवाय ही नृत्यांगना असली तरी म्हणे ' हिचं लुगडं कोरंच आहे' हे जरा गंमतीशीर वाटलं. अजून एक म्हणजे ज्या कारणास्तव फुलवंतीला उत्तरेतून पुण्यात आणलं जातं त्याचं पुढे काय होतं देव जाणे. एकदा पुण्याला पाय लागल्यावर बाईंचा ट्रॅकच बदलतो.
मी बहिणीबरोबर सिनेमा पाहिला तर तिनं शेवटी शेवटी 'त्या मूळ कारणाचं काय झालं?' असा प्रश्न विचारून मला भंडावून सोडलं. शेवटी 'या सिनेमाचा पुढचा भाग येईल त्यात कळेल' असं सांगून माझी सुटका करून घेतली.
नक्की बघाच. एकदा तरी बघाच. स्वच्छतेची आवड असेल तर जास्त वेळा बघायलाही काहीच हरकत नाही.
मला अर्चना जोगळेकर-अरुण गोवील
मला अर्चना जोगळेकर-अरुण गोवील- सविता प्रभुणे हे इतकं फिट्ट बसलंय डोक्यात की नवीन फुलवंती झेपतच नाहिये.
स्वच्छतेची आवड असेल तर जास्त
स्वच्छतेची आवड असेल तर जास्त वेळा बघायलाही काहीच हरकत नाही.

गश्मीर महाजनी प्राजक्ता
गश्मीर महाजनी प्राजक्ता माळीला उचलून बघतो आणि त्याला ती फुलासारखी हलकी फुलकी वाटल्याने तो तिचं नाव फुलवंती ठेवतो.
अशीच कथा आहे ना ?
मामी , मस्त रिव्ह्यू. माझेमन
मामी , मस्त रिव्ह्यू.
माझेमन
प्राजक्ता माळी स्वतः नाचात
प्राजक्ता माळी स्वतः नाचात पारंगत असताना तिच्या नाचाला मर्यादा का आहेत? स्टोरी वगैरे माहित नाही पण ती पिक्चरमध्ये असल्यावर मनात जरा शंकाच येतात. ओटीटीवर बघू म्हणजे नाही आवडला तर बंद करता येईल.
प्राजक्ता माळी स्वतः नाचात
प्राजक्ता माळी स्वतः नाचात पारंगत असताना तिच्या नाचाला मर्यादा का आहेत? >>> हो, हा प्रश्न मलाही पडला. यूट्यूबवर 'मदनमंजिरी' गाणं पाहताना तिचा पदन्यास फास्ट हवा आणि तो तसा नाहीये असंही वाटून गेलं होतं. पण मला काही त्यातलं कळत नाही त्यामुळे 'असेल असंच भरतनाट्यममधे' अशी मी माझी समजूत करून घेतली
Pages