दृश्यावरून गाणे ओळखा - ५

Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
Puzzle

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.

आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कधी लिहू ते सांगा. Proud

या गाण्याला अजिबातच गरज नव्हती क्लु ची. Lol

Btw, माझेमन, मला आधी हे अनुचंच कोडं वाटलं इतके सिमिलर धाटणीतले क्लूज दिले आहेस. याला एक लाईक तर बनतोच.

नाही अनु.
श्रद्धा बाकीच्यांना पैठणीचा खण मिळाला की मग तू लिही.

पैठणी पण चालेल. बायडीला खुश करता येईल
<<<<<<
'धूमधडाका'मधल्या लक्ष्याच्या शब्दांत - टाळ्या! टाळ्या!! टाळ्यांचं वाक्य आहे हे! Proud

बाकी, याच सिच्युएशनवर संगीत मानापमान मध्ये पद आहे..
'खरा तो प्रेमा, ना धरि (पैठणी कुर्त्याचा) लोभ मनीं'

धन्यवाद _/\_

हे एक अजून सोपे -
यातल्या हिरोचे चित्रपटातल्या दुसऱ्याच नायिकेवर प्रेम होते.
यातल्या एका नायिकेच्या नवऱ्याच्या सिनेमात एका हिरोने काम केलेलं आहे

IMG-20240923-WA0005.jpg

बरोबर ..

माझ्या क्लूचा काही उपयोगच झाला नाही Lol

“ आप की महकी हुई’ त्रिशुलमधलं?” - हजार, दोन हजार कोड्यातलं एक सुटावं आणि ते ऑलरेडी कुणीतरी सोडवलेलं असावं - हाय रे कर्मा! Sad Happy

हे घ्या अजून एक

Screenshot_20240923-173424~2_0.png

क्लू
१) नायक नायिका दोघेही टिव्ही कलाकार सुद्धा आहेत.
२) नायकाच्या दुसऱ्या एका चित्रपटातल्या सहकलाकाराचे कुटुंबीय सुद्धा चित्रपट सृष्टीमध्ये आहेत

माझे क्लु ब्रह्मास्त्र माझ्यावर उलटले आहे >>> Lol Lol

नवीन क्लू देतो. याने कदाचित सोपे होईल.

नायक नायिकेने दुसऱ्या पिक्चर मध्ये भाऊ बहिणीचे काम केलेले आहे.

दंडवत आणि प्रणाम.
मी ग्रेसी सिंग आणि आयुष्यमान प्राची देसाई वगैरे शोधत बसले होते.

हे एक सोपे कोडे
IMG_20240924_223233.jpg

क्लु
1. नायकाने नायिकेबरोबर, आणि नायिकेच्या खऱ्या नवऱ्याबरोबर पण चित्रपट केलेत.
2. नायिकेने तिच्या खऱ्या नवऱ्याबरोबर चित्रपट केलेत.

Pages