Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नवरा माझा नवसाचा २ पाहिला.
नवरा माझा नवसाचा २ पाहिला..नाही आवडला...सुप्रिया ची ओव्हर ॲक्टिंग बघवत नाही...सचिन त्या मानानी बराच सौम्य आहे..अशोक सराफ खूपच थकलेत...कळून येत...बाकी काहीं विशेष नाही...
पण हा असला इतका विचित्र नवस कोणी बोलत असेल का ? मला मुळात तेच नाही पटल...
त्याचा खांदेउडूउडू डान्स
त्याचा खांदेउडूउडू डान्स विलक्षण आहे >>>
ते उत्तम hiit आणि बर्पि वर्कआऊट बनू शकेल.बसणे, हात वर, उड्या मारणे, स्क्वॅट इत्यादी >>
र.आ, माझेमन, मी_अनु, अस्मिता - धमाल वर्णने आहेत
हाय हुकू हाय हुकू हाय हाय ची लोकप्रियता युनिव्हर्सल आहे!
नअभिनयातून 'निष्काम कर्मयोग'
नअभिनयातून 'निष्काम कर्मयोग' >>> आणि यावर माझे मन यांचे ‘पिक्चरमधे रोल करत रहा, प्रेक्षकांपर्यंत पात्राच्या भावभावना पोहोचल्यात का याकडे लक्ष देऊ नकोस’अशी निष्काम कर्मयोगाची सोपी व्याख्या हे निरूपण वाचल्यानंतर चिकवावाचकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्याशिवाय राहणार नाहीत. हा धागा आता एक निव्वळ धागा राहिलेला नाही, ते एक बहुआयामी विचारकेंद्र, सांस्कृतिक पीठ बनलेले आहे.
त्याला अनुसरूनच
हा दिव्य संदेश याठिकाणी ग्रहण करण्यात आलेला आहे. नव्हे नव्हे, कायमचा देव्हार्यात कोरून ठेवण्यात येत आहे.
चिकवाचे प्रथम दैवत भाभू आणि सुशे ! आपणाला तेहतीस कोटीपर्यंत जायचे आहे.
हम जहाँ पोस्ट डालते है, वो
हम जहाँ पोस्ट डालते है, वो धागा आपोआपच सांस्कृतिक पीठ बन जाता है.
- येथे सांस्कृतिक 'पीठे' दळून मिळतील.
(No subject)
सौंदर्याला दूषणांचा शाप असतो.
सौंदर्याला दूषणांचा शाप असतो. >>> आणि मधुबालाला (भारत) भूषणाचा शाप असतो
या पानावरच्या कमेण्ट्स आत्ता
या पानावरच्या कमेण्ट्स आत्ता पाहतोय.
फारेण्ड, रमड स्वागत आहे.
मधुबालाला (भारत) भूषणाचा शाप
मधुबालाला (भारत) भूषणाचा शाप असतो
हाय हुकू हाय हुकू हाय हाय ची
हाय हुकू हाय हुकू हाय हाय ची लोकप्रियता युनिव्हर्सल आहे!
>>
कोई शक...
आमच्या वाड्यातल्या एका 3- 4 वर्षीय पोराला आई बापानी SO-DA प्रिंट केलेला शर्ट आणला होता...
जर तुम्ही हॉरर सिनेमाचे रसिक
जर तुम्ही हॉरर सिनेमाचे रसिक असाल आणि तुम्ही poltergeist नावाचा सिनेमा पाहिला नसेल तर तुंबाड, स्त्री २ च्या आधी तो पाहून घ्या. मी काल रात्री १२३ वर पाहिला. आवाज खूप कमी आहे पण सब टायटल्स प्लीझिंग आहेत. त्यामुळे एन्जॉय करता आला.बहुतेक प्राईमवर आहे. अवश्य बघा.
माझे ऑटाफे सिनिमे आणि का?
माझे ऑटाफे सिनिमे आणि का?
१) “जब वुई मेट” जीवनाचे सार सांगणारा सिनेमा. गाणी, डान्स आणि करीना! और क्या चाहिये!
२)”कहो ना प्यार है” दैव जेव्हा हीरोला चाट मारते. माझा आवडता थीम.
३)”फॅन” शाखाचा कमाल अभिनय. माझ्या मते ह्या सिनेमात खूप काही गहन आहे. ते मला समजले असे नाही. पण मनाला एकदम भिडला,
४)”रंगीला” ह्या सिनेमाने हिंदी चित्रपटसृष्टीला नवा आयाम दिला असे तज्ञ म्हणतात. ते काहीही असो मला आवडला.
५) आमीरचा “तलाश” अंतर्मनाचा शोध आणि बोध.
६) “कहाणी” क़्वेस्ट! असे थीम बॉलीवूडमध्ये क्वचित भेटतात.
७) “बिल्लू” का आवडला? पुन्हा शाखा. डोळ्यातून प्रथमच पाणी आले.
८) “बादशहा” आणि “हंगामा” नीरज व्होरा मुळे. विशेषतः “बादशहा” चा ट्विस्टी शेवट. हिरो trapped and no help from anywhere. ग्रेट थीम.
९) आणि १०) विचार करून लिहितो.
जे. डी व्हॅन्स यांच्या
जे. डी व्हॅन्स यांच्या आयुष्यातील स्मृतींवर आधारित Hillbilly Elegy हा चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला. खूप आवडला.
व्हॅन्सची आई (एमी ॲडम्स) एक नर्स असते आणि उपचारांमुळे सहजपणे उपलब्ध असणाऱ्या ड्रग्सच्या विळख्यात जाते व संपूर्ण कुटुंब कसे उध्वस्त होते यावरच आहे. त्या प्रतिकूल परिस्थितीत व्हॅन्स संघर्ष करत जगतो, आजीकडे रहायला जातो. आईचे वागणे वरचेवर बेभरवशाचे होत जाते. त्याचा परिणाम त्याच्या व त्याच्या बहिणीच्या आयुष्यावर होत असतो. स्वतःला व स्वतःच्या मुलांच्या जीवाला संकटात टाकते, नशेखाली आयसीयूत स्केटिंग करते व नोकरी घालवून बसते, अचानक लग्न करते. रस्त्यावर राहते, तिला सांभाळून घेताना मुलांची अतिशय तगमग व हाल होतात.
पण आज्जी (Mamaw) ला व्हॅन्स वर भरवसा असतो ती त्याला व्यसनी आणि बेकार संगतीतून सोडवून अतिशय शिस्तीने वाढवते. आईला सतत तुरुंगातून सोडविताना, घरखर्च चालवताना व औषधोपचारासाठी खर्च करताना आजीची तुटपुंजी मिळकतही अपूरी पडते व त्यांना फूड डोनेशन वर जगावे लागते. जेव्हा तो आजीला 'अजून काही खायला आहे का माझा नातू माझ्यासोबत रहातो' असे फूड डोनेट करणाऱ्या माणसाला म्हणताना ऐकतो , व्हॅन्सचा 'सेल्फ रिअलायझेशन' क्षण येतो आणि तो एकदम जबाबदारीची जाणीव येऊन शहाणा होतो. तो बुद्धिमान असतोच पण घरातल्या अशा वातावरणामुळे त्याला ध्येयच राहिलेले नसते. हळूहळू अभ्यास करायला लागतो, छोटीशी नोकरी करतो, छान मार्क्स घेतो. आईचे तिकडे बिघडत-बिघडत जात असते.
असेच करत तो मिलिट्रीत काही वर्ष जातो व स्वबळावर Yale University मधे कायद्याचे शिक्षण घेतो. तेथेही तो सतत संघर्ष करत स्वतःची जागा निर्माण करतो, dysfunctional family चा एक न्यूनगंड किंवा एक असुरक्षितताही त्याच्या स्वभावात दिसते. तेथेच त्याला उषा नावाची एक गोड मैत्रीण भेटते, ती त्याला हरप्रकारे समजून घेते, सपोर्ट करते अक्षरशः मुलाखतीसाठी सुद्धा तयारी करवून घेते. त्यांचे नाते अतिशय गोड आणि निरागस असते.
आईला रिहॅब मधे सोडून शेवटी तीही सोबर होते. उषा आणि व्हॅन्स पुढे लग्न करतात व शेवट सुखांत आहे पण तेथपर्यंत परीक्षा बघणारा आहे. एमी ॲडम्स नेहमीच अप्रतिम काम करते, यातही तिने स्वनियंत्रण नसणे, मुलांबाबत जीव धोक्यात टाकणाऱ्या रिस्क घेणे व दुसऱ्या क्षणी जीव ओवाळून टाकणे असे टॉक्सिक/ ॲडिक्ट पॅटर्न सुरेख दाखवले आहेत. आजीचे आणि आईचेही पटत नसते, बहिण या सगळ्यात ही शक्य तितकी जबाबदारी घेते. आजोबाही दारूच्या आहारी गेलेले असतात. काही काही कुटुंबामधे पिढ्यानुपिढ्या असणाऱ्या शापाप्रमाणे वाटावा असा 'जनरेशनल ट्रॉमा' असतो, ती शृंखला येथे व्हॅन्स अमर्याद प्रयत्नांनी तोडून टाकतो. एवढे होऊनही मुलांचा आईवर अतिशय जीव असतो व ते दिवसरात्र तिच्या सेवेसाठी, उपचारासांठी व ती सुरक्षित रहावी यासाठी झटत असतात.
सर्वांचीच कामे उत्तम झाली आहेत. जे डी व्हॅन्स आता अमेरिकेन राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळे ह्या पुस्तकात/ चित्रपटात selective narrative असल्यास कल्पना नाही. तेवढे 'किंतुपरंतू' सोडून दिल्यास स्वतंत्र कलाकृती म्हणून हा चित्रपट अतिशय प्रभावी व प्रेरणादायी आहे.
मलाही खूप आवडला हा पिक्चर. मी
मलाही खूप आवडला हा पिक्चर. मी या बाफवर एक दोन वर्षांपूर्वी लिहीले होते. गेल्या काही दिवसांत व्हान्स पुन्हा चर्चेत आल्यावर पुन्हा एकदा पाहिला आणि पुन्हा आवडला. चपखल लिहीले आहेस विशेषतः त्याच्या आईबद्दल, जनरेशनल ट्रॉमबद्दल आणि त्या शृंखलेबद्दल.
यातील त्याचा जो संघर्ष आहे तो भारतातही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून वाढणार्या, हुशार व अभ्यासात इंटरेस्ट असणार्या मुलांनाही लागू होतो. आजूबाजूला - घरी, मित्रमंडळी, समजात सतत इतके "पिटफॉल्स" असतात एखादा चांगला हुशार विद्यार्थी सुद्धा कधीतरी त्यात सापडून भलतीकडेच जाण्याचेच चान्सेस जास्त असतात, आणि अशा वेळेस त्यांना शैक्षणिकदृष्ट्या पुन्हा लाइनीवर आणणार्या व्यक्ती कुटुंबात (किंवा मेन्टॉर म्हणून सर्कलमधे ) असतातच असे नाही. त्यातून वाट काढत काढत ठेचकाळत अशांनी मिळवलेले यश फार क्रेडिटेबल असते.
भाभू, सुशे चर्चा मस्तच
भाभू, सुशे चर्चा मस्तच माझेमन तू पण उडी घेतलीस ह्यात
रीस्पेक्ट च!!
सुशे नंतर अभिनयात सुधरला- हेराफेरी मधला रोल कमाल केलाय त्याने, तेरा घर मेरा घर मधला पण.
पण भाभू, राकू (दोन्ही) , प्रकू तसेच राहिले ठोकळे. म्हातारे होऊन ही सुरेख हिरोईनी असायच्या.>>> व्हाय शूड साउथ हिरोस हॅव ऑल द फन.
आजची ब्रेकिंग न्यूज घ्या.
आजची ब्रेकिंग न्यूज घ्या.
Kiran Rao's Laapataa Ladies has been picked as India's official entry for Oscars 2025, the Film Federation of India announced in Chennai on Monday.
आता बोला.
पूर्ण बातमी इथे वाचा
https://m.rediff.com/news/commentary/2024/sep/23/indias-entry-for-oscars...
मला बरं वाटलं, लापता लेडीज
मला बरं वाटलं, लापता लेडीज मध्ये बरेच विषय कव्हर केलेत.
चला एक सेन्सिबल आणि
चला एक सेन्सिबल आणि एन्टरटेनिंग पिक्चर ऍकेडमी अवॉर्डससाठी जातो आहे. नाहीतर नमुने पाठवलेत आपण...
थॅंक्स फा.
थॅंक्स फा.
दुसऱ्या परिच्छेदासाठी अनुमोदन. हा चित्रपट बघताना नाही, पण आता तू लिहिलेले वाचताना मला 12th Fail ची आठवण आली. साम्य नाही पण साधर्म्य नक्कीच आहे. त्याचेही येथे कौतुकच केले होते.
केकू
तुम्ही लिहिलेल्या यादीतले बहुतेक आवडतातच. तलाश बद्दल तुम्ही 'अंतर्मनाचा शोध आणि बोध' या अर्थाने लिहिले असेल तर मी हल्लीच ज्यावर रसग्रहण लिहिले तो दिठी, तलाश आणि विल स्मिथ आणि हेलन मिरन यांचा Collateral Beauty हे तिन्ही वेगवेगळ्या अंगाने जाणारे पण कथानक अपत्यशोकानंतर क्लोजर शोधणे व त्यासाठी अंतर्मनाचा ठाव घेणारे वाटले. जमल्यास Collateral Beauty बघा.
अस्मिता, छान पोस्ट.
अस्मिता, छान पोस्ट.
ओळख करून दिल्याबद्दल आभार.
लापता लेडीज चित्रपट उत्तमच
लापता लेडीज चित्रपट उत्तमच आहे पण ऑस्कर साठी निवडल्या जाण्याबाबत -
अमेरिकन इंडस्ट्रीतील लोकांचा किंवा फर्स्ट वर्ल्डचा साधारण आपली दैना, मागासलेपण, शोषण वगैरे दाखवण्यामागे एक पर्सनल अजेंडा असतो. उदा. स्लमडॉग मिलयनेयर.
त्यामुळे आता हे बघून हा बघून जगासमोर Fifteen year old child bride, dowry, illiterate women, abusive husband, buffalo at the front yard, women can't eat/ do/ say what they enjoy वगैरे वर जोर देऊन अनुकंपा तत्त्वावर स्वतःचे 'फील गूड' करतील अशी शंका आहे. आपला हिंदी चित्रपट फक्त आपला आहे. त्यांना त्यातले न्यूआंसेस, vibrant culture, भाषेचे बदलत जाणारे लहेजे, एकाच देशात वसणारे अनेक देश वगैरे कळत नाही. तेही असो, त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे असेही वाटत नाही. त्यांना थर्ड वर्ल्डची गरिबी बघून स्वतःचे फील गूड हवे असते फक्त. विनाकारण आपल्या गृहच्छिद्रांची 'पिटी पार्टी' होते. जिंकले तर मला आनंदच होईल फक्त हेतू वर मात्र शंका आहे.
-------------
धन्यवाद आचार्य. तुम्ही नेहमी पोच देता.
आशु
नाही नाही. बरेचदा अनोळखी
नाही नाही. बरेचदा अनोळखी चित्रपटांच्या परीक्षणाबद्दल काय प्रतिसाद द्यावा अशी अवस्था होते.
अशा वेळी मौन बाळगतो.
अस्मिता, हो हे सर्व डोक्यात
अस्मिता, हो हे सर्व डोक्यात आलं होतं.पश्चिमी देश इतके सुखी समर्थ आणि श्रीमंत आहेत की त्यांचं लक्ष वेधायला वेड्यासारखं सिरीयल किलिंग असलेले चित्रपट किंवा फर्स्ट वर्ल्ड ढळढळ रडवणारी गरिबी आणि रिप्रेसड स्त्रिया हेच आणावे लागते.जो बिकता है वो दिखता है.
हो, अनु. माझ्या डोक्यात तर
हो, अनु. माझ्या डोक्यात तर हेच आधी येते.
त्यामुळे RRR वगैरेच्या फक्त गाण्याचीच निवड झाली होती पण चित्रपटाची झाली असती तरी 'पीडा गेली' वाटले असते. ह्या चित्रपटाचा आणि आमचा काहीही संबंध आढळल्यास किंवा त्या नाचाचा आणि भारतीय माणसाचा किंवा कुठल्याही जिवंत माणसाचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा टाईप.
खरं तर सूर, श्राव्यता या
खरं तर सूर, श्राव्यता या दृष्टीने दोस्ती किंवा कोमुरम भिमुडो जास्त सरस होते.
ह्या चित्रपटाचा आणि आमचा
ह्या चित्रपटाचा आणि आमचा काहीही संबंध आढळल्यास किंवा त्या नाचाचा आणि भारतीय माणसाचा किंवा कुठल्याही जिवंत माणसाचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा टाईप
पिटी पार्टीबद्दल तुझं म्हणणं पटतं. पण जीन्ससारखे पिक्चर पाठवून समस्त भारतियांच्या आयक्यूबद्दल शंका निर्माण करण्यापेक्षा पिटी पार्टी परवडली.
भारतियांच्या आयक्यूबद्दल शंका
भारतियांच्या आयक्यूबद्दल शंका निर्माण करण्यापेक्षा पिटी पार्टी परवडली.
>>> कुठल्याही केसमध्ये आपला तमाशाच करतात एकुण.
अरे कोणी 'एक भिकार' म्हटलं की
अरे कोणी 'एक भिकार' म्हटलं की 'सात भिकार' म्हणून मोकळे व्हा!
'सात भिकार' तर येतेच मनात.
'सात भिकार' तर येतेच मनात. मला कुणी विचारत नाही तरीही वरचे लिहितानाही अमेरिकन फर्स्ट वर्ल्डसाठी 'माहिती तुमचे Roe V Wade, उगा बसा' आलेच होते. आज मी येथे येणाऱ्या सर्वांशी गप्पा मारत आहे.
कानमध्ये जिंकलेला All We
कानमध्ये जिंकलेला All We Imagine as Light हा भारताची ऑस्कर प्रवेशिका असायला हवा होता, असं काहींचं म्हणणं आहे. अर्थात त्या म्हणण्याला राजकारणाचा रंगही असावा.
All We Imagine as Light हा
All We Imagine as Light हा भारताची ऑस्कर प्रवेशिका असायला हवा होता, असं काहींचं म्हणणं आहे.
>>>> ह्याबाबत काहीच माहिती नाही. कुठे मिळाला तर बघेन.
Pages