Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आमच्य ऑफिसात निनावी मास इमेल
आमच्य ऑफिसात निनावी मास इमेल पाठवुन कौन चा सस्पेन्स फोडलेला कोणीतरी
रागोव आणि उर्मिला - दोघंही
रागोव आणि उर्मिला - दोघंही तेच ते करायला लागल्यावर कंटाळवाणे झाले. उर्मिलाने तिच्यातला ‘बालकलाकार’ जिवंत ठेवला होता तोपर्यंत निरागस वाटायची. पुढे पुढे त्या बालकलाकाराची बालिश-कलाकार झाल्यावर त्याची माती झाली.
येत्या शुक्रवारी तुंबाड आणि
येत्या शुक्रवारी तुंबाड आणि गँग्ज ऑफ वासेपूर री रिलीज होताहेत.
इच्छुकांनी लाभ घ्या...
बालकलाकाराची बालिश-कलाकार >>>
बालकलाकाराची बालिश-कलाकार >>> फेफ
उर्मिलाने तिच्यातला
उर्मिलाने तिच्यातला ‘बालकलाकार’ जिवंत ठेवला होता तोपर्यंत निरागस वाटायची. पुढे पुढे त्या बालकलाकाराची बालिश-कलाकार झाल्यावर त्याची माती झाली. >> फेफ रंगिला तू किती निरागसपणे बघितला होतास रे ?
फेफ रंगिला तू किती निरागसपणे
फेफ रंगिला तू किती निरागसपणे बघितला होतास रे ? >>> त्याने उर्मिला इतकाच निरागसपणा ठेवला असणार, असाम्या!
(No subject)
एचबीओ वर ब्राउज करता करता
एचबीओ वर ब्राउज करता करता केविन कोस्टनरचा "Horizon - An American Saga - Chapter 1" हा चित्रपट समोर आला. १९ व्या शतकात अमेरिकेत पश्विमेला जात जात स्वतःचे बस्तान बसवणारे सेटलर्स आणि तेथील स्थानिक नेटिव ट्राइब्ज यातला संघर्ष सुरूवातीला आहे. पण चित्रपटाबद्दलच्या एचबीओ वरच्या माहितीनुसार अमेरिकन सिव्हिल वॉर शी नंतर काहीतरी संबंध असावा किंवा त्या काळापर्यंतचा पट यात असावा.
पहिली दहा मिनीटे कसाबसा पाहिला. दोन तीन वेगवेगळ्या टेरिटरीज मधल्या अगम्य घटना दाखवल्या होत्या. अगदी बंद करणारच होतो तेवढ्यात पिक्चरने एकदम वेग पकडला. आणि मग खूप इंटरेस्ट आला. जो पाहिला तो भाग अपाची इण्डियन टेरिटरीजवळ स्थानिक टोळ्या व हे सेटलर्स, अमेरिकन मिलिटरी यांच्यात होणारे हल्ले/लढाया यांच्याबद्दल आहे. सुमारे तासभर झाला असेल. आता पुढे पाहायची उत्सुकता आहे. हा पहिला भागही तीन तासांपेक्षा मोठा आहे.
पुढे पुढे त्या बालकलाकाराची
पुढे पुढे त्या बालकलाकाराची बालिश-कलाकार झाल्यावर त्याची माती झाली. >>> फेफ - म्हणजे कोठपासून? सत्या, कौन, एक हसीना थी ई पिक्चरमधे चांगली वाटली होती ती. रंगीला थोडा आधीचा असेल. "हिंदुस्थानी" हा एक आठवतो. पण त्यात काही विशेष रोल लक्षात नाही, नाच गाणी सोडून.
भूतपटांमध्ये उर्मिला जबर काम
भूतपटांमध्ये उर्मिला जबर काम करायची. मला तिचा सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे - भूत सिनेमात (भूतच ना अजय देवगण बरोबरचा?) तिला रात्री
बेडरुमच्या दरवाजात उभे असलेले भूत दिसते आणि भितीने तिच्या तोंडून शब्द फुटत नाही, हातभर अंतरावर झोपलेल्या नवर्यालाही उठवू शकत नाही, तेव्हाचा अभिनय भारीच होता
“ रंगिला तू किती निरागसपणे
“ रंगिला तू किती निरागसपणे बघितला होतास रे ? “ - रंगिला म्हणजे आमिरखान, जॅकी श्रॉफ, रिमा लागू वगैरे होते, तोच ना रे? rmd- hence proven:)
फा, मला क्रोनोलॉजिकली पटकन आठवत नाही. पण २००० नंतर आलेल्या उर्मिलाच्या सिनेमात, एक हसीना थी, जंगल, पिंजर, भूत हे तिचे चांगले सिनेमे पटकन आठवतात, बाकी नावाजलेल्या हीरोंबरोबर केलेल्या (खूबसूरत, जानम समझा करो, हम तुमपें मरतें हैं, मस्त, दिल्लगी, ओम जय जगदीश ई.) सिनेमांत तिला फारसा वाव नव्हता.
फेफ आले लक्षात
फेफ आले लक्षात
रंगिला म्हणजे आमिरखान, जॅकी श्रॉफ, रिमा लागू वगैरे होते >>>
रिमा लागू पण होत्या का
रिमा लागू पण होत्या का
असामी
असामी
फेफ
चमत्कार नंतर रंगीलाच तिचा मोठा हिट चित्रपट असावा.
रामू प्रयोग करण्याचे धाडस करायचा
त्याकाळाच्या मेन स्ट्रीम सिनेमा पेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करायचा.
काही हॉलिवूड inspired असणार हे आता लक्षात येतं.
तेव्हा हॉलिवूड सिनेमे acess आता इतका सहज नव्हता.
आग मध्ये मात्र प्रयोग फसलाच
त्या आधी हळूहळू मॅजिक कमी होत होते.
दौड सारखा चित्रपट बघा. अचाट आहे पण patch patch मध्ये धमाल आहे.
उर्मिला चे दोन तीन वेडेपणाचे
उर्मिला चे दोन तीन वेडेपणाचे मुव्ही बघितल्यावर नंतर सगळ्याच सिनेमात ती वेडी च वाटायला लागली
तसेच मोठे डोळे करून विस्फारून तोंडाचा भला मोठा आ वासून बघणे टाईप
दौड बघितला आहे. ठीक ठाक आहे.
दौड बघितला आहे. ठीक ठाक आहे. परेश रावल चा विलेन एकदम हटके आहे. पण पिक्चर माझ्या लक्षात राहिला कारण त्यात माझा हिरो नीरज वोरा आहे. हा एक महान स्क्रिप्ट रायटर होता. रंगीला, बादशाहा, हंगामा हे त्याचे नोटेबल सिनेमे. पण त्याचा शेवट भीषण झाला. तो जवळपास आयुष्याचे शेवटचे एक वर्ष कोमात होता. त्याच्या रका मित्राने त्याच्यासाठी एक रूम आणि नर्सची व्यवस्था केली होती.
आधी Sixth Sense पहा आणि मग
आधी Sixth Sense पहा आणि मग तुंबाड पहा.>>> दोन्ही पाहिलेत आणि अनेक महिने गारूड राहिले ..
रंगिला तू किती निरागसपणे बघितला होतास रे ? >>>
उर्मिला १ आवडती हीरोईन- एक हसीना थी, कौन , पिंजर, भूत आणि बरेच इतर चित्रपट आवडलेत तिचे. मला प्यार तुने क्या किया पण जाम आवडला होता तेंव्हा, तिचा शॉर्ट स्टेप कट काय फेमस झाला होता तेंव्हा आणि फरदीन छावा दिसायचा
जंगल मधे ती अति लाडिक अभिनय करून वाया गेलिये.. पण तो पण मस्स्त होता मुव्ही.
रंगिला म्हणजे आमिरखान, जॅकी
रंगिला म्हणजे आमिरखान, जॅकी श्रॉफ, रिमा लागू वगैरे होते, तोच ना रे? >>>
उर्मिला विशेष आवडती वगैरे नव्हती. पण ती आणि रागोव या कॉम्बिनेशनचे पिक्चर्स आवडले बर्यापैकी. रागोव नंतर अंतरा माळी वर लट्टू झाल्याने त्याची जी अवनती झाली ती काही फार पाहण्यासारखी नाही वाटली कधीच. त्यापुढची ( उतरलेली ) पायरी बहुधा निशा कोठारी होती.
मी पण 'मुंजा' पाहिला
मी पण 'मुंजा' पाहिला hotstarवर आल्यावर. 1952 साली विशीच्या आसपास वगैरे वय असलेल्या, कोकणातल्या कानिटकरांच्या मुलीचं नाव 'मुन्नी' ऐकूनच ठेचकळायला झालं. त्याकाळातल्या बेबीआज्या प्रसिद्ध आहेत, पण मुन्नी ही पहिलीच.
कदाचित गोव्यातून समुद्रमार्गे रेमो फर्नांडिस तिकडे कॉन्सर्ट करायला आला असावा आणि त्याचे ओ मेरी मुन्नी गाणे कानिटकर काकाकाकूंना खूप आवडले असावे.
(सौ कानिटकर - आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव मुन्नीच ठेवूया गडे!)
श्र हाहाहा.
श्र हाहाहा.
श्र रेमोच्या गाण्यामुळेच
श्र रेमोच्या गाण्यामुळेच झालं असणार हे.
त्यानिमित्ताने हे गाणं परत डोक्यात वाजलं.
त्याचे ओ मेरी मुन्नी >>>
त्याचे ओ मेरी मुन्नी >>>
श्र
श्र
र्म्द - उर्मिला->अंतरा माळी->निशा कोठारी या पायर्या परफेक्ट आहेत (म्हणजे अॅनॉलॉजी परफेक्ट आहे ). यांच्या निवडीबरोबर रागोवचे दिग्दर्शनही घसरत चालल्याने हे एकदम चपखल आहे. हे लुक्स बद्दल नाही. अंतरा माळी कडे रूढ हिंदी ग्लॅमरस चेहरा नाही. पण "कंपनी" मधे मुंबईच्या गल्ल्यांमधली गर्ल नेक्स्ट डोअर ती बरोब्बर वाटली होती. तिचा "मै माधुरी दिक्षित बनना चाहती हूँ" सुद्धा अगदी टाकाऊ नव्हता असे लक्षात आहे. पण तेवढे एक दोनच.
ती तनिशा सुद्धा रागोवची फेवरिट होती का? सरकार-१ मधे होती. २, ३ बघितलेले नाहीत.
तनिषा निशा कोठारी इतकी फेवरेट
तनिषा निशा कोठारी इतकी फेवरेट नव्हती. सरकार २ मध्ये ती बहुतेक सुरूवातीलाच मरते.
सरकार मध्ये उलट निशा कोठारीलाच तो केकेच्या पिक्चर मध्ये हिरोईनचा रोल आहे ना.
निशा कोठारी असलेले रागोवचे
निशा कोठारी असलेले रागोवचे फक्त डरना जरूरी है आणि अज्ञात पाहिलेत. डजहै ओके होता. अग्यात फार काही आवडला नाही.
आता निशा कोठारी कोण हे शोधणं
आता निशा कोठारी कोण हे शोधणं आलं
छान होती ती.प्रति शोले मध्ये,
छान होती ती.प्रति शोले मध्ये, सरकार मध्ये, जेम्स मध्ये होती.रागोव चा नाईलाज क्रश असावी उर्मिलाने नाही म्हटल्यावर.मध्ये मध्ये पद्मिनी कोल्हापुरे सारखी दिसायची.
श्रद्धा : हाहा:
श्रद्धा
त्याकाळातल्या बेबीआज्या
त्याकाळातल्या बेबीआज्या प्रसिद्ध आहेत >>>> अगदी अगदी. ऑलमोस्ट घरटी एक…
डीटूर(१९४५) हा पिक्चर बघितला.
डीटूर(१९४५) हा पिक्चर बघितला. आवडला. अल रॉबर्ट्स ह्या born looser ची त्याने स्वतः वर्णन केलेली कथा आहे त्यामुळे “माझे काय चुकले? मेरे पास और चारा भी क्या था?”असा टोन आहे. टिपिकल फिल्म नुआर.
अल हा एक पिआनो वादक आहे त्याचे त्याच हॉटेलमध्ये गाणाऱ्या तरुणीवर प्रेम आहे. त्यांना लग्न करायची इच्छा आहे. पण ती नशीब अजमावण्यासाठी हॉलीवूडला जाते. तिचा शोध घेत अल पण हिच हायकिंग करत जाताना त्याला एकजण लिफ्ट देतो. नंतर काय होते? नाही सांगत.
त्याला नंतर एक तरुणी भेटते. ती त्याला एकाच प्रश्न विचारते. काय विचारते? हे ही नाही सांगणार.
B- ग्रेडचे अभिनेते घेऊन उल्मर ह्या अत्यंत प्रतिभाशाली निर्देशकाने केलेला हा सिनेमा आता Film Noir चे क्लासिक म्हणून ओळखला जातो. अत्यंत कमी वेळात(सहा दिवस?) आणि कमी बजेटमध्ये बनवलेला चित्रपट!
ह्यातला थीम सांगायचा झाला तर
“Fate, for some mysterious force, can put the finger on
you or me, for no good reason at all.”
How true!
यू ट्यूब वर आहे. सब टायटल्स आहेत. अवधी फक्त एक तास सहा मिनिटे.
https://www.youtube.com/watch?v=uisCLKbEvNk
Pages