Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अर्शद वारसी एक मुलाखतीत
अर्शद वारसी एक मुलाखतीत म्हणाला कि प्रभास कल्कीमध्ये जोकर सारखा दिसतो. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले. नॉर्थ vs साउथ , बॉलीवूड vs टॉलीवूड असा रंग देण्याचा प्रयत्न झाला. बिचारा अर्शद. खऱ्याची दुनिया नाही हेच खर.
https://www.ndtv.com/entertainment/explained-arshad-warsi-prabhas-contro...
कल्की बघून झाल्यावर तो चिरफाड
कल्की बघून झाल्यावर तो चिरफाड साठी परत बघण्याची शक्ती उरली नाही
त्या अर्षद वारसी ला लोकांनी ट्रोल केले.पण प्रभास चं पात्र काहीतरीच बनलंय.धड कॉमेडी नाही धड फायटर नाही असं.शिवाय पंजाबी स्टाईल गाणं का? हल्ली दक्षिणेला उत्तरेची किमान काही इलेमेंट किंवा कलाकार घातले नाहीत तर नॉर्थ मध्ये पिक्चर वर बहिष्कार येईल अशी भीती वाटते का?
अर्षद वारसी चं पुढचं वाक्य पाहिलं तर 'या पिक्चर मध्ये प्रभासला जोकर बनवून टाकलंय, त्यात मेल गिब्सन सारखे रोल करण्याचे कॅलिबर आहे' असा अर्थ निघतो.म्हणजे खरं प्रभास चाहत्याने चिडायला नको, ही टीका दिग्दर्शक निर्माता यावर जास्त आहे.त्यांचे चाहते चिडले तर जास्त रिलेव्हन्ट ठरेल.
दीपिका च्या अभिनयाचं कौतुक होण्याइतका रोल तरी आहे का तिला?काहीही भावनिक चढउतार नाहीत, 80% वेळ गाडीत बसून राहणे रोल.
त्यातल्या त्यात अमिताभ चं कौतुक पटतं.पण रोल मुळातच त्या शक्तीचा लिहिलाय.साधारण कोणीही सिनियर चांगल्या अभिनेत्याने चांगला केलाच असता.
कमल हसन जवळपास एक्सट्रा आहे.बहुतेक दुसऱ्या भागात बराच असेल.
अगदी त्यात बाईचा मासा,
अगदी त्यात बाईचा मासा, माश्याचा सिंह सिंहाचा हंस बनून उडून जातो वगैरे लीला असल्या तरी>>>>
हे मला जाम आठवत नाहीये. पण पहिला भाग टेलिफोन धुनमें हंसनेवाली कॅटेगरीतला बटबटीत असला तरी एंटरटेनिंग होता.
शिवाय पंजाबी स्टाईल गाणं का?
शिवाय पंजाबी स्टाईल गाणं का? हल्ली दक्षिणेला उत्तरेची किमान काही इलेमेंट किंवा कलाकार घातले नाहीत तर नॉर्थ मध्ये पिक्चर वर बहिष्कार येईल अशी भीती वाटते का?
>>
काल मुंज्या बघताना हेच वाटलं
बाकी सिनेमा ठीकठाकच
तो हीरो अन् साईड किक पंजू रात्री सीक्रेट डिस्कस करायला मंडईत का जातात.. केवळ लोकेशन अवेलेबल आहे म्हणून?? की पुणं दाखवतोय हे कळायला सोपं जावं म्हणून...
अर्थात थोडं पुढे बुधवारात गेले असते तर खूप मुंन्या मिळाल्या असत्या अन् सिनेमा तिथेच संपला असता (एंड क्रेडिट्स ला मुंज्या बदनाम हुवा वाजवत)
रच्याकने,
रच्याकने,
स्त्री 2 बघायचा आहे. पण वीकेंड ला संध्याकाळी प्राईम शो साठी 1550, 1350, 1250 चं किंवा इतर शो साठी 950, 800, 700 चं तिकीट काढणं जिवावर आलं
वीकडे ला हेच दर 450, 350, 250 आणि 300, 250, 200 आहेत...
हो आम्ही पण तिकिटं पाहिली आणि
हो आम्ही पण तिकिटं पाहिली आणि रद्द केला बेत.
वर्किंग डे ला सकाळी 8 किंवा दुपारी 1 चा शो चेक करा.तिकीट एकदम कमी केलेलं असतं.
(वीकडे वाले वाक्य नंतर वाचले.बॉलिवूड, तेही मोठी स्टार कास्ट.त्यामुळे रेट जास्त.कंतारा शनिवारी 80 रु तिकिटात पहिला होता झिऑन ला)
विशाल पिंपरी ला दर कमी असतात.पण आता खूप गर्दी क्लोज जागेत बघायची फार सवय नाही राहिली.त्यामुळे मोठ्या भरलेल्या थिएटरमध्ये बसायला जरा क्लॉस्ट्रो वाटतं.
अँकी डोन्ट टेल मी , तिकीट
अँकी डोन्ट टेल मी , तिकीट दर इतके आहेत सिनेमाचे ?
मी थिएटर मध्ये जाऊन सिनेमा न पहाण्याचा इरादा केला आणि गेली ५ वर्ष तो पाळते आहे त्यामुळे मला काहीच कल्पना नाही .
पण अँग्री यंग मेन चे सिनेमे पुन्हा थिएटर मध्ये लावले , तर नक्की जाईन बघायला. त्यातही काला पत्थर , जंजीर , आणि शोले फक्त .
तसा शोले पण पाहिलाय थ्रीडी मध्ये .
बाकी कल्की वगैरे सिनेमाची चिरफाड वाचून हसून मेले .
मी स्त्री एक दोन , इंडियन कल्की काहीच पाहिलेलं नाही .
तुंबाड पुन्हा येतोय असे समजते
तुंबाड पुन्हा येतोय असे समजते. बहुधा येत्या ३० ऑगस्टला.
तुंबाड पुन्हा येतोय असे समजते
तुंबाड पुन्हा येतोय असे समजते. बहुधा येत्या ३० ऑगस्टला.
कल्की साठी प्रतिसाद भारीच
कल्की साठी प्रतिसाद भारीच सगळे
स्त्री 2 इतके रेट्स तिकिटांचे?
बाबओ
स्त्री 2 बघायचा आहे. पण
स्त्री 2 बघायचा आहे. पण वीकेंड ला संध्याकाळी प्राईम शो साठी 1550, 1350, 1250 >>>खर कि काय? लोक महान आहेत. बाहेर येउन शिव्या देत नाहित का? इतका फालतु सिनेमा आहे!
बापरे इतके दर तिकिटांचे?
बापरे इतके दर तिकिटांचे? म्हणजे हे थियेटर वाले ठरवतात का? आणि मुव्ही टू मुव्ही दर वेगळा असतो का? एरिया वाईस तर असतच असेल.
इथे मी वीकांताला ८$ म्हणजे अंदाजे ४८० रुपयांना पाहिला.
आमच्या इकडं मल्टीप्लेक्स दर
आमच्या इकडं मल्टीप्लेक्स दर १५०-२००/- इतकेच असतात.
हो, मुव्ही टू मुव्ही आणि
हो, मुव्ही टू मुव्ही आणि थिएटर टू थिएटर(आणि मग टाईम ऑफ डे, विकडे विकेंड नुसार) दर वेगळा.
प्राईम ने उर्फी जावेद वर
प्राईम ने उर्फी जावेद वर डॉक्युमेंटरी बनवली आहे.इच्छूकांनी चेक करावी.
(No subject)
मुंज्या कोणी पाहिला का? मला
मुंज्या कोणी पाहिला का? मला डोकं बाजूला ठेवून बघावा लागला.
ओढून ताणून बनवल्या सारखा वाटला. खरंच तुंबाडची सर नाही याला.
कल्की पाहिला तेव्हा
कल्की पाहिला तेव्हा अस्मिताची पोस्ट आलेली नव्हती नाहीतर आधीच सावध झाले असते. आपण कुठेही एंगेजच होत नाही त्या पिक्चर मधे. आठवतील त्या सगळ्या साय-फाय, डिस्टोपिअन वगैरे हॉलिवूड मूव्हीजचा काला आहे त्यात. प्रभासचं टपोरी बोलणं असह्य होतं. शिवाय तो नुसता शरीरानेच नव्हे तर चेहर्याने पण बोजड असल्याने 'अरे भाई कहना क्या चाहते हो' असं आपल्याला वाटतं.
दिशा पट्टाणीचा सगळा भाग गाळला असता तरी चाललं असतं इतका तो उगाच आहे. संवादांबद्दल अस्मिताला मम! सुरूवातीचं पंजाबी गाणं सुद्धा डोक्यात गेलं. हल्ली पंजाबी गाणं नसेल तर सिनेमा पास करत नसावेत. बुज्जी नावाची अॅलेक्सा अत्यंत फालतू बडबड करत राहते. व्हीएफेक्सच करायचे होते तर कमल हसनला घेतलंय तरी कशाला? त्या पात्राचं लॉजिकच कळलं नाहीये मला. कुठल्याच पात्राचं कळलंय असं वाटत नाहीये आता
शंबाला नामक ठिकाण अतिशय गुप्त आहे असं फक्त तिथल्या लोकांनाच वाटत असावं. कारण कोणीही उठून कोणालाही शंबालाला नेत असतं. शिवाय तिथे सेफ राहण्याची युक्ती काय तर म्हणे झाडाच्या ढोलीत रहायचं. दिपिका शंबालाला गेल्यापासून प्रत्येक माणूस तिला हमे यहाँसे निकलना होगा, यहाँ खतरा है असं सांगत असतो, पण प्रत्यक्षात तिला वेळेत कोणीही कुठेही घेऊन जात नाही.
कसला कॉम्प्लेक्स, कसलं युद्ध, कसलं सिरम आणि सीडिंग, कोण यास्किन, कसलं प्रोजेक्ट के कशाकशाची टोटल लागत नाही. ती आपणच आपल्या बुद्धीच्या जोरावर लावून घ्यायची. बरं याला एक मायथालॉजिकल फोडणी म्हणून अश्वत्थामा, कर्ण वगैरे पात्रं आहेत. व्हिलन लोकांना अर्जुनाचं गांडीव धनुष्य सापडतं ज्याला कोणी हात लावू शकत नसतं, पण त्या सो कॉल्ड सिरमच्या एका थेंबाने म्हणे कमल हसन उर्फ यास्किन ममीमधल्या इम्होथेप सारखा रिजनरेट होतो आणि गांडीव सहज उचलू शकतो. का?
अजून खूप लिहीण्यासारखं आहे पण इतकं लिहून दमायला झालंय. शिवाय काही गोष्टी नीट आठवत नसतील ( डोक्याने ताबडतोब असल्या मेमरीज सप्रेस केल्या असण्याची शक्यता आहे ) तर पुन्हा पिक्चर रेफर करण्याइतकी हौस अजिबातच नाहीये. त्यामुळे आत्तापुरतं इतकंच असो
रमड, वाचताना हसू आले तरी
रमड, वाचताना हसू आले तरी कोतबो पोचला गं. उगा पुन्हा बघून शहीद होऊ नका. कुणी कितीही 'धागा काढा, धागा काढा' म्हटले तरी 'सिर सलामत तो पगडी पचास' विसरू नका.
मला विश्वास बसत नाहीये मी हे लिहितेय, पण 'ब्रह्मास्त्र' यापेक्षा चांगला होता.
अनु
त्यात मेल गिब्सन सारखे रोल करण्याचे कॅलिबर आहे' असा अर्थ निघतो.>>> बापरे, आता VFX वाला 'The patriot' यायचा प्रभासला घेऊन, तेही पंजाबी गाण्यासहित. अर्शद वारसीने उगाच आयडिया दिली.
पण 'ब्रह्मास्त्र' यापेक्षा
पण 'ब्रह्मास्त्र' यापेक्षा चांगला होता >>> टोटली
उगा पुन्हा बघून शहीद होऊ नका >>> छे गं! चान्सच नाही
मला अजून बराच कोतबो ओतायचा होता. पण खूपच स्पॉयलर्स होतील म्हणूनही आवरतं घेतलं.
होऊ देत स्पॉयलर्स...असं पण
होऊ देत स्पॉयलर्स...असं पण कोण बघायला (मरायला) जातंय..
त्रागा नीट च पोचला र्म्द.
मुंज्या ना कॉमेडी ना हॉरर.
मुंज्या ना कॉमेडी ना हॉरर.
बालभूतपट वाटला.
बालभूतपट वाटला.
बालभूतपट वाटला.
>>
मुंज्याचं सारखं लगीन लगीन ऐकून वाटलं की आता बहुतेक हा बाबा लगीन.. या ढींचाक ढीचाक करणार
हॉलीवूडवाल्यांनी हॉरर/साय
हॉलीवूडवाल्यांनी हॉरर/साय-फाय ला हात लावू नये. अगदी तुंबाड धरून. तुंबाड बघून मी स्वतःला घाबरवण्याचा खूप खूप प्रयत्न केला पण कसचे काय.
Rmd
Rmd
Spoiler
शेवटी तो तिला घेऊन जातो तेव्हा सिताहरण दृश्य वाटलं मला.
झकासराव म्हणजे अगदीच महाभारत
झकासराव म्हणजे अगदीच महाभारत मीट्स रामायण होईल ते. प्रभास भैरव आहे की महाभारतातलं कॅरॅक्टर याबद्दल पण घोळ घालून ठेवलाय कल्कीवाल्यांनी.
मला अजून बराच कोतबो ओतायचा
मला अजून बराच कोतबो ओतायचा होता. पण खूपच स्पॉयलर्स होतील म्हणूनही आवरतं घेतलं>>>>
इथे एवढं वाचुनही जे महाभाग पाहायला जातील त्यांना स्पॉयलर्सच्या फटकेच द्यायला हवेत….
बालभूतपट बघू की नको, आपलं
बालभूतपट बघू की नको, आपलं hotstar आहे म्हणून विचारते.
अंजु, सुरुवातीला थोडे जंप
अंजु, सुरुवातीला थोडे जंप स्केअर आहेत, भीती वाटत असेल तर दिवसा बघायला हरकत नाही.
शिवाय तो नुसता शरीरानेच नव्हे
शिवाय तो नुसता शरीरानेच नव्हे तर चेहर्याने पण बोजड असल्याने
>>
बाहुबली मधे खपून गेला
पण एकुणातच प्रभास ठोकळा कॅटेगरी आहे... (At least हिंदी रिलीज मधे तरी)
आदिपुरूष, साहो आणि आता कल्की...
Pages