अंत: अस्ति प्रारंभ: - 3 - {संयम} - {SharmilaR }

Submitted by SharmilaR on 12 September, 2024 - 01:57

अंत: अस्ति प्रारंभ: - 3 - {संयम} - {SharmilaR }

मुळात ती शांत प्रवृत्तीची!

लेकरांना अंगा खांद्यावर खेळवणारी ती. तिच्याजवळ चार घटका निवांत बसलेल्या जीवांना शांतवणारी ती. माहेरवाशीणीचं गुपित ऐकणारी अन् लेकुरवाळीची आसवं स्वत:त रिचवणारी ती.. कुशीत आलेल्याचं तन-मन निर्मळ करणारी ती..

पण.. पण.. ज्यांना तिने आंघोळी घातल्या, त्यांनीच तिला मलिन केलं. ज्यांचा ती विसावा होती, त्याच लोकांनी तिला गृहीत धरलं.. आक्रसून तिने जगायचं कसं..? जायचं तरी कुठे?

मग उधाणलेला तो तिच्या भेटीला आल्यावर.. तिच्या संयमाचा काठ सुटला अखेर! वाटेत येईल, ते ती गिळत सुटली होती.

आणि आता तिच लोकं आक्रंदून तिला विनवत होती, माते..कृपा करं गं आमच्यावर.. आवर सावर स्वत:ला..
खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !
**************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त जमलीयं कथा ..
तुम्हांला छान सुचलीयं कल्पना

अरे मस्त!
एक नंबर जमली आहे शर्मिला! अगदी मार्मिक सुचले आहे.