प्रकाशचित्रांचा झब्बू ३ - श्रीमंती माझ्या नजरेतून

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 09:23

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.

आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Loving Family, Strong Solidarity, Boundless Affection, Bonding Traditions.

कुटुंब, एकी, प्रेम, परंपरा.

65442a18-04bf-4324-9f2b-99ee0ba33d08.jpeg

चश्म-ए-बद- दूर.
नज़र ना लगे.
Knock on the wood.

# गर्भश्रीमंती.

छान आहे हा धागा.
निरु, मस्तच वाटलं बघून , खरे श्रीमंत आहात....

छान आहे हा धागा.
निरु, मस्तच वाटलं बघून , खरे श्रीमंत आहात....

>>> + १

हे रोज पहायला मिळणं हा समृद्ध अनुभव नाही का..?

पोपटांची माळ

हम पंछी एक तार के..

शुक-बहात्तरी..

पोपटांचे झाड

निरू दा
शुकशुकाट आहे सगळा हा

सगळ्यांची प्रचि भारीच

ऋन्मेष यांच्याशी शतशः सहमत. श्रीमंती म्हणजे हीच - आपले कुटुंब. Happy

निसर्ग सौंदर्याची लयलूट, रानफुले, पक्षी, प्राणी, खारुताई, रॉबिन्स, स्टारलिंग्ज अगदी कावळेही, चिउताई. म्हणजे श्रीमंती.

मर्मभेद सारखी पुस्तके, कवितांची पुस्तके, खरे तर बेरोजगार असतानाचा रिकामा स्वतःकरता असलेला वेळही श्रीमंती Happy

हा अजुन एक कौटुंबिक फोटो -

बाल्कनीतील श्रीमंती..

ही आमची पाळलेली चिमणी बाळे..

खाण्यासाठी आ वासून आक्रोश करताना..


आणि ही त्यांची आई..
एका पिल्लाला भरवताना..


अ'निरु'द्ध , ही माझ्याकडची. पाळलेली मात्र नाहीत.

e5a608f7-04d0-4002-85d8-d70f2aac9bda.jpeg

# Songs of hunger

वार्षिक बाळंतपणे सुखरूप पार पाडण्याबद्दल reward म्हणून बुलबुल गाणी म्हणून दाखवतात. (व्हिडिओ कसा डकवायचा मालूम नै मेरेकू)

वर पोपटांचे झाड माळ दुकान गोडाऊन सगळे आले आहे.. इतर पक्षी सुद्धा मस्त.
लॉकडाऊन दिवस आठवले. मी आणि मुलगी दर संध्याकाळी गच्चीवर टाकीवर जाऊन बसायचो/झोपायचो. तेव्हा मिनी सी शोर वरून पक्ष्यांचे थवे डोक्यावरून उडत जायचे. त्यात पोपटांचा थवा आमचा फेवरेट होता.. त्याआधी कधी मला पक्षीनिरीक्षणाची आवड नव्हती. पण लॉकडाऊन काळाने बरेच शिकवले. त्यातले हे एक श्रीमंती कश्यात शोधावी आणि कश्यात मोजावी Happy

सामो +786 फोटो बघून छान वाटले. आणि तुमच्याकडून ते अपेक्षित सुद्धा होते Happy

Pages