प्रकाशचित्रांचा झब्बू ३ - श्रीमंती माझ्या नजरेतून

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 09:23

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.

आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमड, हाथ मिलाया..
तुम्ही सांगितलेलीही आहेत. तेव्हा आईकडे दिली होती वाचायला.
आणि Epub तर अजून बरीच आहेत.

IMG-20240804-WA0119.jpg
ही उसनी श्रीमंती. सरदार पटेल स्मारकामध्ये लाभलेली. बाकी खरी ग्रंथसंपदा माझ्या पुस्तक दर्पण चॅनेल वर दिसतेच. (रिक्षा झाली की काय :फिदी :))

ग्रेट! इथे धारप फॅन बरेच आहेत तर! याबद्दलची बाकी चर्चा मात्र धारपांच्या धाग्यावर नेऊया Happy उगाच संयोजक रागवायचे!

धारप श्रिमंती! वाह.
हर्पेन, ५कीमी स्विमींग क्याबात है! अभिनंदन. आदर अजून च वाढला.

आर्मी हून १ महिन्याने (२ दिवसांसाठी) घरी आलेला मुलगा, आईच्या चेहर्यावरची माया, अभिमान आणि सगळं काही! श्रिमंती माझ्या नजरेतून!

IMG_2751.jpg

आशू ग्रेट !! आणि सुंदर फोटो Happy

कविन हो .. खिडकीची सीट.. आणि ती सुद्धा वार्याच्या दिशेने Proud
मी याच श्रीमंतीत वाढलोय Happy

माझे सोबती :
shabdkosh photo.jpg
दररोज काही वेळ या मंडळींच्या सहवासात घालवणे म्हणजेच शब्दश्रीमंत होत जाणे !

कविन हो .. खिडकीची सीट.. आणि ती सुद्धा वार्याच्या दिशेने >>>>
लोकल' आयुष्यातली श्रीमंती >>>
दोघानाही +१

मुंबईच्या श्रीमंतीचा विषय निघालाच आहे तर.....

नवीनच मुंबई सी एसटी स्टेशनला कोणी उतरले असता हे वैभव नक्कीच मोहात पाडत असेल..

IMG_20240914_120252.jpg

वा अतरंगी..
आणि अशी फुल टँक असलेली गाडी घेऊन चार मित्रांना बरोबर घेऊन रोड ट्रिप करु शकणं हे तर ऐश्वर्य..

कविन हो .. खिडकीची सीट.. आणि ती सुद्धा वार्याच्या दिशेने Proud >> मला मिळायची फक्त पावसाळ्यात Rofl Rofl

Lol

मी अश्यावेळी प्लास्टिक पिशवी सोबत बाळगायचो. ती सीट जर आधीच भिजलेली असेल आणि तिथे कोणी बसले नसेल तर पिशवी टाकून दिमाखात बसायचो. तीच पिशवी मी बॅगेत ओली छत्री ठेवायला वापरायचो.

होय ऋ मी ही असच करायचे म्हणूनच पावसाळ्यात विंडो सीट मिळायची.

आमची श्रीमंती... घरात कायम खेळ पसरलेला... अक्षरशः उड्या मारत आणि नीट खाली बघूनच चालावं लागतं कायम.

20230905_102221.jpg

कविन हो .. खिडकीची सीट.. आणि ती सुद्धा वार्याच्या दिशेने Proud >> मला मिळायची फक्त पावसाळ्यात>>> हा हा हा!

आमची श्रीमंती... घरात कायम खेळ पसरलेला... अक्षरशः उड्या मारत आणि नीट खाली बघूनच चालावं लागतं कायम.>>> मस्त!

ममो ताई मस्तच.. यात तर आम्हीही टाटा अंबानी आहोत>>>>> Happy कधी काळी ह्या ग्रुपमध्ये आम्हीही होतो Happy

Pages