शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६६४ कोकण स्वारीत मालवण बंदराच्या समुद्रात कुरटे बेट हेरले आणि इथली जागा हेरून त्यांनी इथे जलदुर्ग उभारण्याची योजना केली. मोरयाचा धोंड्यावर भुमिपुजन करुन जलदुर्गाची उभारणी सुरु झाली. दरम्यान शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जाउन कैदेत अडकले, मात्र सिंधुदुर्गाच्या उभारणीचे काम थांबले नाही. पुढे सिंधुदुर्ग पुर्ण झाला. इतक्या महत्वाच्या पाणकोटाचे संरक्षण म्हणून त्याचे उपदुर्ग म्हणून राजकोट, सर्जेकोट आणि पद्मगड असे तीन जलदुर्ग उभारले. यापैकी एक राजकोट मालवण किनार्यावर आहे. सिंधुदुर्ग जलदुर्गामुळे पोर्तुगीजांची मुंबई-गोवा हालचालीवर वचक बसला तसेच इंग्रजांच्या राजापुर-मुंबई या हालचालीवर देखील मर्यादा आल्या. सिंधुदुर्ग हा एक प्रकारे शिवाजी महाराजांची पाण्यातील राजधानी म्हणावी लागेल. सभासदाच्या बखरीत याचे वर्णन "चौर्यांशी बंदरा अशी दुसरी जागा नाही" असे वर्णन केले आहे. यावरुन शिवचरित्रात या परिसराचे महत्व जाणवून येईल.
अश्या या महत्वाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक हा पुतळा सिंधुदुर्ग जलदुर्गाच्या आत उभा केला जाणार होता, मात्र जी जागा नौदलाने निवडली होती, ती जागा देण्यासाठी मालकाने नकार दिला म्हणून राजकोटची जागा पुतळा उभारण्यासाठी निवडण्यात आली.
नौदल दिनाच्या निमित्ताने ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण झाले.. याच दिवशी नौदलाचे चिन्ह बदलून शिवाजी महाराजांची मुद्रा हे नौदलाचे अधिकृत चिन्ह केले,
यासंबधतीत काही बातम्याच्या लिंक
या पुतळ्याच्या उभारणीसाठी आलेला खर्च असा.
राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग १ या कामासाठी २४ लाख ८५ हजार २०५ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग २ या कामासाठी २ कोटी ४० लाख ७१ हजार १६९ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरासाठी कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे या कामासाठी २३ लाख २३ हजार २९० रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सजावटीची भिंत बांधकाम करणे यासाठी २५ लाख ३२ हजार ३५९ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरासाठी रस्त्याचे बांधकाम करणे यासाठी २४ लाख ४९ हजार २५४ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात पदपथ बांधकाम करणे यासाठी २५ लाख ५३ हजार ७०८ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात लँडस्केप करणे या कामासाठी १६ लाख २९ हजार ५७५, राजकोट मालवण येथील परिसरातील शौचालयाचे बांधकाम करणे या कामासाठी २५ लाख २८ हजार ६६३रुपये अशा प्रकारच्या टप्प्यांची कामे निश्चित केलेली आहेत.
मात्र इतका खर्च करुन उभारलेला आणि देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते उदघाटन झालेला पुतळा सोमवार २६ ऑगस्ट २०२४ ला दुपारी १२,३० कोसळला. अर्थातच यावरुन गदारोळ सुरु झाला. कारण स्पष्ट होते. एकतर नुकत्याच झाल्लेया लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते, विरोधी पक्ष सबळ झालेला असतानाच आणि महाराष्ट्र विधानसभेची निवड्णुक जाहीर झालेली असतानाच हा भयानक प्रकार सामोरा आला. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे काहीतरी मार्ग काढायचा म्हणून महायुतीने "लाडकी बहीण" योजना राबवली. त्यामुळे महायुतीला थोडेफार अनुकुल वातावरण निर्माण देखील झाले. इतर पक्षांनी अश्या योजना जाहीर केल्या कि त्यांना रेवडी म्हणले जाते, मात्र भाजपने केले कि ते अर्थातच देशहितासाठी असते. असो.
त्याचवेळी बदलापुर येथे भाजपशी संबधीत संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्या बालीकेंवर अत्याचार झाला आणि संतापाची लाट आली. त्यातच या राजकोट शिवपुतळ्याच्या अवमानाची घटना घडली.
सुरवातीला या घटनेचे गांभीर्य बहुधा न समजल्याने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी वार्याच्या जोरामुळे हा पुतळा पडल्याचे सांगितले.
मात्र युगपुरुष, देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय असलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे महाराष्ट्रात आणि देशात उभे केले आहेत, मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची हि पहिलीच घटना घडल्यामुळे संतापाचा उद्रेक झाला आणि या घटनेचे राजकारण सुरु झाले. सुरवातीला वारा जबाबदार आहे असे सांगण्यात आले तरी या वार्यामुळे याच परिसारातील इतर कोणतेही नुकसान झालेले नसल्यामुळे तसेच इतका वार्याचा वेग कोकणार नेहमीच असल्यामुळे हा दावा फोल निघाला. सहाजिकच नवीन लक्ष नौदलाला केले गेले.
वास्तविक नौदल भारताचे आहे, तरीही केवळ एका नेत्याची हुजरेगिरी करणे महत्वाचे वाटत असल्यामुळे सरंक्षक दलाला देखील वेठीला धरताना सताधारी पक्षाला लाज वाटली नाही. यापुर्वी देशाला पदक मिळाचे म्हणून प्रसंगी प्राण पणाला लावून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या विनेश फोगटला वाटेल त्या भाषेत ट्रोल केले गेले, अगदी कपडे काढले असते तर वजन कमी झाले असते असा निर्लज्ज सल्ला दिला गेला. राष्ट्रप्रथमच्या गप्पा मारणार्या या पक्षाचा खरा चेहरा या निमित्ताने पुढे आला. कदाचित नौदलावर जनता टीका करणार नाही या अपेक्षेने नौदलाचे नाव घेतले असावे. अर्थातच नौदलाने यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही.
मात्र यावरुन सरकारवर जोरदार टीका सुरु झाल्यावर एक पुर्ण मुख्यमंत्री आणि दोन अर्धे उपमुख्यमंत्री याना थोडेफार भान आले. यानिमीत्ताने या पुतळ्याच्या शिल्पकार जयदीप आपटे याच्यावरुन गदारोळ सुरु झाला. कल्याणचा रहिवासी असल्यामुळे याला ठाणे कनेक्शन किंवा श्रीकांत शिंदे यांच्यामुळे काम मिळाले अशी शक्यता वर्तवली जाउ लागली. त्यात आपटेच्या फेसबुक पेजचा धांडोळा घेतला गेला, त्यात त्याचे सनातन प्रभातशी संबंध असल्याचे दिसले. त्याची मुलाखत देखील सनातन प्रभातने छापलेली होती. त्यात आपटची सविस्तर माहीती काढली गेली. त्याला इतक्या मोठ्या पुतळ्याचा अनुभव नसल्याचे दिसले. अनुभव नसताना देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते उदघाटन केले जाणार्या पुतळ्याचे काम कसे दिले गेले ? असा प्रश्न उपस्थित झाला.
जयदीप आपटे याने रहेजामधून शिल्पकलेची डिग्री घेतली. मात्र रहेजा स्कुल ऑफ आर्टसम्ध्ये हि डिग्रीच नसल्याचे पुढे आले. म्हणजे खोटी डिग्री हे जयदीप आपटेकडे महत्वाचे क्वालिफीकेशन होते. त्यातच त्याने एक शिवपुतळ्याच्या कपाळावर जखमेची खुण दाखवली.वास्तविक शिवाजी महाराजांची अस्सल चित्रे उपलब्ध असताना आणि त्यात अशी कोणतेही खुण नसताना जयदीप आपटेला हा नसता उद्योग सांगितला कोणी ?
त्यात इतका मोठा पुतळा इतक्या कमी कालावधीत उभा करणे शक्य नसल्यामुळे जयदीप आपटेने थ्री डी प्रिंटरने तयार केल्याचे समोर आले. अर्थातच याचे कारण स्पष्ट होते. या पुतळ्याचे उदघाटन नौदल दिनाच्या दिवशीच करण्याचा प्रधानसेवकांचा अट्टाहास होता. कारण अर्थातच स्पष्ट होते. या पुतळ्याचा लाभ निवडणुकीत करुन घेणे हाच हेतु होता हे उघड आहे. त्यात आपटेला आधी वर्क ऑर्डर दिली गेली आणि मग कोटेशन काढले गेले. वास्तविक असा महत्वाचा पुतळा उभा करायचा तर एखाद्या अनुभवी शिल्पकाराला काम देणे अपेक्षित होते, तसेच याची निवीदा आधी काढणे अपेक्षित होते, पण हे झाले नाही याचा सरळ अर्थ घोटाळा हाच आहे. दरम्यान पुतळा पडल्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी राजकोटला भेट देण्यास सुरवात केली.
याचवेळी आदित्य ठाकरेनी भेट दिली असतानाच त्याचवेळी इथले खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार असलेले दोन सुपुत्र यांनी राजकोटपाशी जाउन पोलिसांच्या उपस्थितीत धमकी दिल्याचे समोरे आले. आधीच या प्रकरणावरुन वाद पेटला असताना राणे पिता-पुत्रामुळे नवीन वाद पेटला. नितेश राणे यांच्या बरोबर जयदीप आपटेचे फोटो समोर आले. आणि आपटेचे राणे कनेक्शन आहे कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला.
त्यात नेहमीप्रमाणे आपटेची जात काढण्यात आली. त्यात काहीही तथ्य नसले, दरम्यान बदलापुर प्रकरणातील आपाटे गायब असताना जयदीप आपटे देखील गायब झाला. गुन्हेगार गायब होत असताना महाराष्ट्राचे गृहखाते आणि मंत्री नेमके काय करत आहेत ? असा प्रश्न निर्माण होतो.
हा सगळा वाद सुरु असताना विरोधी पक्ष या संधीचा फायदा न घेतील तर नवल अशी परिस्थिती असल्यामुळे घटनेचे गांभीर्य समजून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जाहीर माफी मागितली. त्या आधीच उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. अर्थात लोकसभेतील दणदणीत पराभव आणि विधानसभेतील संभाव्य पराभव विचार करुन अजित पवार पुन्हा परतण्यासाठी हि खेळी करत आहेत कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला. पंतप्रधान मोदीनी मागितलेली माफी हि तोंडदेखली आहे असा अरोप विरोधकांनी केला आणि एकंदरीत त्यात तथ्य वाटते, कारण एकतर पंतप्रधानांची देहबोली वेगळीच होती, त्यात कोठेही माफी मागण्याची विनम्रता नव्हती, तसेच या प्रकरणाशी संबध नसताना त्यांनी सावरकारांचा संदर्भ आणला. सहाजिकच विरोधकांकडून सावरकारांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत वापरलेली काकतालीय स्वराज्य आणि कलयाणच्या सुभेदाराच्या सुनेबाबतील सदगुण विकृतीचे वादग्रस्त वाक्ये समोर आणली गेली. यात उपरती होउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची माफी मागितली. विशेष म्हणजे माफी मागणे हि लाजिरवाणी घटना असताना उपस्थित लोक टाळ्या वाजवताना दिसले. व्यक्तीपुजेचे हे हिणकस उदाहरण म्हणावे लागेल.
शिवाय हि माफी केवळ महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक तोंडावर आली असल्यामुळे मागितली गेली, कारण यापुर्वी मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये सप्तर्षीचे असेच उभारलेले पुतळे पडले असताना ना पंतप्रधानांनी माफी मागितली ना तिथल्या मुख्यमंत्र्यांनी !
विशेष म्हणजे इतके सर्व होत असताना दुसरे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ना खेद व्यक्त करत आहेत ना माफी मागत आहेत. याउलट त्यांनी सुरवातीला पोलिसांना धमकी देणार्या नारायण राणेना वाचविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक राणेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे तरीही कोणतीही कारवाई होत नाही.
त्यानंतर शिवाजी माहाराजांनी सुरत लुटलीच नाही, काँग्रेसने खोटा इतिहास शिकवल्याचे वक्तव्य केले. वास्तविक शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे सर्व अस्सल एतिहासिक साधनात पुरावे आहेत. अगदी मोघली कागदपत्रे आहेत. मुख्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे. असे असताना खोटा इतिहास कॉन्ग्रेसने पसरवला असे फडणवीस कोणत्या आधारे म्हणतात ? आणि हा इतिहास खोटा आहे तर गेली दहा वर्ष देशात त्यांचीच सत्ता असताना ते गप्प का होते ?
हा वाद कमी म्हणून की काय फडणवीसांनी पंडीत नेहरुंच्या "डिस्कव्हरी ऑफ इंडीया" या ग्रंथात शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य असल्याचा शोध लावला. वास्तविक अहमदनगरच्या किल्ल्यात कैद असताना सदर ग्रंथ पंडीत नेहरुंनी लिहीला. त्यावेळी उपलब्ध साधनाचा वापर करुन म्हणजे सर जदुनाथ सरकार यांच्या ग्रंथाचा संदर्भ घेउन त्यांनी हा ग्रंथ लिहीला. शिवाजी महाराजांबाबतीत जदुनाथ सरकार आणी नेहरु या दोघांचे ही मत चुकीचे होते आणि त्याची त्यांनी माफीही मागितली. त्यानंतर प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंडीत नेहरुंच्या हस्ते उदघाटनही झाले, जो प्रतापगडावरचे जोरदार वारे आणि पाउस झेलून आजही उभा आहे. तेव्हा असे नाहक वाद उपस्थित करुन फडणवीस काय साध्य करत आहेत ? समजायला मार्ग नाही. त्यापेक्षा बिनशर्त माफी मागणे हा अधिक योग्य पर्याय होउ शकतो. असो.
हे राजकारण सुरु असताना सोशल मेडीयावर याची प्रतिक्रीया उमटली नसती तरच नवल. विशेष म्हणजे जरा खुट्ट वाजले कि तातडीने त्यावर व्यक्त होणारे अंधभक्त या प्रकरणी मिठाची गुळणी घेउन गप्प आहेत. अंधभक्तांच्या व्हॉटस अॅप ग्रुपवर यावर एक शब्द ही निघत नाही. एकाचाही फेसबुक पेजवर यावर अवाक्षर ही लिहीलेले नाही. यु ट्युब चॅनेल चालवणारे गोदी मेडीयाचे पाळीव पत्रकारही चिडीचुप आहेत. मालकाच्या विरोधात ब्र ही काढायचा नाही हे कटाक्षाने पा़ळले जात आहे. काही भक्त मंडळीनी विरोधी पक्षाच्या लोकांनी पुतळ्याच्या पायथ्याशी अॅसिड ओतून बोल्ट मुद्दाम गंजतील अशी व्यवस्था केल्याचा शोध लावला. वास्तविक अलिकडे उदघाटन झालेले अनेक प्रकल्प वादाच्या भोवर्यात सापडले असताना तिथेहि विरोधकांनीच या गोष्टी केल्याचे यांना म्हणायचे आहे काय ? त्यात काही जणांनी मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार असताना छिंदवाडा जिल्ह्यातील सौसरमध्ये शिवाजी महाराजांचा बेकायदेशीरपणे उभा केलेला पुतळा पाडल्याचा व्हिडिओ शेअर करुन जाब विचारायला सुरवात केली. अर्थात असे बेकायदेशीर पुतळे कोणत्याही महापुरुषाचे उभारणे चुकीचेच आहे. शिवाय संसदेच्या आवारात असलेले शिवाजी महाराज,गांधीजी यांचे पुतळे लँडस्केपिंगच्या नावाखाली बाजुला केले , त्यावर हे भक्त चिडीचुप रहातात.
एकंदरीत पुढील बराच काळ या दुर्दैवी घटनेचे पडसाद उमटत रहाणार हे निश्चित . कृपया आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि या घटनेसंदर्भात ताजे अपडेट ही इथे पोस्ट करत रहा.
<< व्यक्तीपुजेचे हे हिणकस
साधी गोष्ट आहे, पुतळा पडला याचा अर्थ त्याची क्वालिटी चांगली न्हवती. त्याची चौकशी व्हायला पाहिजे. पुतळा पडल्याने अगदी काही जगबुडी होत नाही आणि शिवाजी महाराजांचा अपमान/त्यांचे कर्तृत्व कमी होत नाही. वादच घालायचा असेल तर पूर्वी झालेला ठाण्याच्या गडकरी रंगायतनचा किस्सा आठवतो. गडकरी यांचा एकच कान का दाखवला म्हणून पण वाद झाला होता.
<< व्यक्तीपुजेचे हे हिणकस उदाहरण म्हणावे लागेल. >>
भारतात व्यक्तीपूजा करण्याची आणि देवत्व बहाल करण्याची भलतीच हौस आहे, हेच खरे. मग ती व्यक्ती सचिन तेंडुलकर असो, लता मंगेशकर असो किंवा शिवाजी महाराज असो. त्यातही राजकारण इतके की फक्त शिवाजी महाराज का म्हटले, छत्रपती का म्हटले नाही म्हणून डोकी फोडणार आणि आंदोलन होणार. व्यक्तीपूजा केली जाणारी व्यक्ती आवडती पाहिजे, नुसती कामगिरी महत्त्वाची नाही, मगच व्यक्तीपूजा होणार. अन्यथा जे.आर.डी.टाटा यांची पण व्यक्तीपूजा झाली असती, त्यांचा पण एखादा पुतळा, रस्त्याला नाव, विमानतळाला नाव वगैरे प्रकार झाले असते. पण नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मग काय, उद्या महाराष्ट्राचे नाव बदलून शिवाजीराष्ट्र झाले तरी आश्चर्य वाटणार नाही.
टीप १: हे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे. कुणाचाही अपमान करायचा हेतू नाही. पण व्यक्तीपूजेचा उबग आला आहे.
टीप २: मी भारतीय पोष्टाची तिकिटे गोळा करतो. (Philately) त्यात सुद्धा व्यक्तीपूजा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते, कदाचित त्यातूनही व्यक्तीपूजेचा तिटकारा वाढला आहे.
चांगले लिहिलेत.
चांगले लिहिलेत.
<तातडीने त्यावर व्यक्त होणारे अंधभक्त या प्रकरणी मिठाची गुळणी घेउन गप्प आहेत.> - कामं केली की कधी कधी चुका होतात. काँग्रेस कधी कामच करत नसे, त्यामुळे चुकाही होत नसत असं चारपाच लोकांनी लिहिलेलं वाचलं. म्हणजे एकाने कोणीतरी लिहिलं असेल आणि इतरांनी कॉपी पेस्ट केलं असेल.
पडलेल्या पुतळ्याचे फोटो टाकले
पडलेल्या पुतळ्याचे फोटो टाकले नाहीत या बद्दल धन्यवाद . अगदी बघवत नाही.
ताशी ४५ कि मी वेगाच्या वार्यामुळे पुतळा पडला असे वक्तव्य अगदी हास्यास्पद आहे. मोदी यांची माफी म्हणजे उद्धटपणा चा कळस आहे. माफीवीराला मधेच घुसडावून जनतेचे लक्ष इतरत्र भरकटविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. आता लोकांना कळायला लागले आहे. किती दिवस मुर्ख बनविणार?
१- २ फूटाच्या चार मुर्ती बनविण्याचा अनुभव असणार्या, २४ वर्षे वयाच्या आपटेला एव्हढे मोठे कंत्राट कसे मिळाले ? डिग्री पण बनावट? भ्रष्टाचाराबद्दल काहीच गांभिर्य नाही आहे.
<< काही भक्त मंडळीनी विरोधी
<< काही भक्त मंडळीनी विरोधी पक्षाच्या लोकांनी पुतळ्याच्या पायथ्याशी अॅसिड ओतून बोल्ट मुद्दाम गंजतील अशी व्यवस्था केल्याचा शोध लावला. >>
------ समुद्राच्या पाण्यात मिठ कुठून आले, कुणी मिसळले हे पण गृहखात्याने बघायला हवे.
लेख योग्य वाटला. काही भाग
लेख योग्य वाटला. काही भाग पटला नाही. पहिल्या दिवशी प्रकरण गंभीरपणे घेतले गेले नव्हते हे अगदी बरोबर वाटले. नौदल, कमलनाथ, नेहरू हे विषय फडणवीसांनी आणायची गरज नव्हती. ते विषय जिव्हाळ्याचे असल्यास ते त्या त्या वेळी ऐरणीवर आणायला हवे होते. महाराजांचा पुतळा पडला, शुद्ध माफी मागणे व अजून भव्य स्मारक उभारणे एवढेच करायला हवे. मोदींच्या माफी मागण्यात 'देहबोली योग्य नव्हती' हा मुद्दा काढून प्रकरण आणखी विखारी करण्यात आले. मोदींनी सावरकर हा विषय यात घेण्याची गरज नव्हती.
गेल्या काही वर्षांत काही महापुरुषांचे उल्लेख, त्यांच्याबद्दलचे सार्वजनिक संभाषण / वर्तन हे सगळे अति संवेदनशील विभागात पोचलेले आहे. यामुळे असे झाले आहे की सामान्य माणसाच्या मनातील खऱ्या श्रद्धेचे स्थान आता भीतीने घेतले आहे. महाराजांचा पुतळा पडणे हे सामान्य माणसाच्या (आणि राजकारण्यांच्याही) दैनंदिन आयुष्यावर 'प्रत्यक्षात' जितका प्रभाव पाडते त्यापेक्षा कितीतरी अधिक परिणाम एक होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळण्याचे असतात. तो प्रसंग हळूहळू विस्मरणात जातो व महाराजांचा पुतळा पडणे हे सत्तापालटासाठीचे हत्यार ठरू शकते याची जाणीव प्रखर होते.
आव्हाडांच्या हातून अनवधानाने बाबासाहेबांचे चित्र असलेला कागद फाडला गेला त्यावरही राजकारण व्हायला नको होते. त्यांनीही सपशेल माफी तीन, चार वेळा मागितली. माफी मागताना तेही हळवे झाले होते असे नाही.
फक्त आता इतकेच झाले आहे की 'विरोधकांचे श्वास घेणेही चुकीचे आणि आपले खून करणेही वैध' या पातळीला दोन्ही बाजू पोचल्या आहेत (केव्हापासूनच, खरे तर).
बाबासाहेबांना कळणार नाही की त्यांचा फोटो या देशात चुकून फाडला गेला, दादोजींना कळणार नाही की लाल महालातील त्यांचा पुतळा ते विशिष्ट जातीचे असल्याने मुद्दाम कचऱ्याच्या गाडीतून पु ल उद्यानात नेऊन भिरकावण्यात आला, खुद्द महाराजांना कळणारही नाही की त्यांच्या असंख्य पुतळ्यांपैकी एक पुतळा पडला, पण होर्डिंगखाली मेलेल्यांचे नातेवाईक, बदलापुरच्या चिमुरड्यांचे भावविश्व, गोमांस घेऊन जातो म्हणून मार खाणारा वृद्ध ही प्रकरणे 'फावल्या वेळात चघळायची' ठरतील.
पुतळा प्रकरणातील भ्रष्टाचार बाहेर यावा व आरोपींना कायद्यानुसार शक्य तितकी कडक शिक्षा व्हावी.
=====
>>> जनतेचे लक्ष इतरत्र भरकटविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. आता लोकांना कळायला लागले आहे. किती दिवस मुर्ख बनविणार?
दहा वर्षे बनवत आले आहेत, लोकांनी अजून पाच वर्षे मूर्ख बनवायला परवानगी दिली नुकतीच! लोकांना शहाणे बनवू शकणारे 'निवडून येण्यात' स्वारस्यच दाखवत नाहीत तर लोक तरी काय करणार!
'विरोधकांचे श्वास घेणेही
'विरोधकांचे श्वास घेणेही चुकीचे आणि आपले खून करणेही वैध' या पातळीला दोन्ही बाजू पोचल्या आहेत (केव्हापासूनच, खरे तर).>>>
वा, अगदी अचूक लिहिलं आहे
छान पोस्ट, बेफि
छान पोस्ट, बेफि
धागा आवडला. चांगला आढावा
धागा आवडला. चांगला आढावा घेतला आहे.
वरची बेफिंची प्रतिक्रिया ही बरिचशी पटली. व्यक्तीपूचेचा उबग आहे. या सगळ्याच महापुरुषांना आता इतिहासात बंद करुन टाकावे आणि त्यांचं नावही काढू नये आणि वर्तमानात आणि भविष्यात बघावे. पण तसे न व्हावे ही तो श्रींची इच्छा! सो बसा बोंबलत, काही होणार नाही.
नालायक लोकानी नौदलालाही
नालायक लोकानी नौदलालाही भ्रष्ट ठरवले, ह्याना आणखी दोन महिने झेलून महाराष्ट्र कंबरड्यात लाथ घालून हाकलून लावणार आहे. भाजप हे शेणापट्ट्यातील पक्ष शेणपट्ट्यातच बरा.
का? नौदल भ्रष्ट नसतं का?
का? नौदल भ्रष्ट नसतं का? जितका समाज भ्रष्ट तितकेच नौदल ही भ्रष्ट असणार ना! ते त्या समाजातूनच येतात ना?
तिथे पुतळा बसवायची कल्पना
तिथे पुतळा बसवायची कल्पना कोणाच्या डोक्यात आली? पाच महिन्यांत पुतळा बसवून हवा, अशी कोणाची इच्छा होती? याचे लेखी पुरावे मिळणार नाहीत.
गडबडीने उद्घाटन करण्याचा
गडबडीने उद्घाटन करण्याचा हव्यास
लोक इतरांची व्यक्तिपूजा करतात. पण काही लोक जिथे तिथे स्वतःचीच पूजा करतात आणि करून घ्यायचा घाट घालत असतात
भाजपा आणि शिंदे सेनेने पुतळा
भाजपा आणि शिंदे सेनेने पुतळा प्रकरण अतिशय चुकीच्या प्रकारे हाताळले. त्यामानाने अजित पवार योग्य रिॲक्ट झाले,माफी मागून मोकळे. लोकसभा निवडणुकीच्या आदी उद्घाटनाचा दबाव नक्कीच टाकला असणार. विरोधी पक्ष ह्याचा भरपूर फायदा उठवणार अस दिसतय.
काय झालं कोण चुकलं हे बाहेर
काय झालं कोण चुकलं हे बाहेर येईलच.
धडे घेणारे घेतीलच, धडे शिकवणारे शिकवतीलच लवकर.
दादोजींना कळणार नाही की लाल
दादोजींना कळणार नाही की लाल महालातील त्यांचा पुतळा ते विशिष्ट जातीचे असल्याने मुद्दाम कचऱ्याच्या गाडीतून पु ल उद्यानात नेऊन भिरकावण्यात आला>>
कोंडदेवाचा पुतळा हटवला कारण मुळात तो तिथं असायलाच नको होता. इतिहासाच्या साधनांत तळटीपेएवढंच महत्त्व असलेलं हे नाव काल्पनिक गोष्टी सांगून रंगवून रंगवून मोठं केलं गेलं. या हातचलाखीत 'कादंबरीकार' पुरंदरेंचं योगदान मोठं आहे. पुढे याच बनावट धाग्यादोऱ्यांचा विस्तार करत जेम्स लेननं हगून ठेवलं, हे असलं कोण सहन करणार होतं?
(यासंदर्भात एक उदाहरण आठवतं. सरदेसाईंनी नानासाहेब पेशव्यांवर एक ग्रंथ लिहिलाय. त्याला शेजवलकरांची पन्नास पानांची अतिशय उत्तम प्रस्तावना आहे. अगदी जरूर वाचावी अशी आहे. त्यात शेजवलकरांनी इतिहासकराची दृष्टी कशी साक्षेपी असावी, यासंबंधी मांडणी केली आहे. यावर तात्कालिक एक संशोधक त्यांना म्हणालेले की, 'अहो, पेशव्यांबद्दल लिहितांना आपण जरा जपूनच लिहिलें पाहिजे, नाहीतर हे ब्राह्मणेतर लोक आपल्याच वाक्यांचा आहेर आपणांस करतील व त्यांचा आपल्याविरुद्ध उपयोग करतील'. यातून त्या संशोधकाची इतिहासाबद्दलची कल्पना काय असावी, यावर प्रकाश पडतो.)
पुरंदरे, बेडेकरांनी कागदपत्रं गोळा करण्यासाठी भरपूर पायपीट केली, हे सगळं मान्य आहे, त्याबद्दल आदर आहे. पण मांडणी करताना, लिहिताना जो साक्षेप पाळायला पाहिजे होता, तो पाळला नाही. राजवाडे, गजानन भास्कर मेहेंदळे, वा सी बेंद्रे, इरावती कर्वे, कुरूंदकर यांच्यावर कुणी आक्षेप घेत नाही, जात काढत नाही. कारण त्यात इमानदारी दिसते. भ्रामक शब्दबंबाळ बुडबुडे दिसत नाहीत. वाचताना, हे समाजमनाला मॅनिप्युलेट करायला, कळपासारखं एकाच दिशेनं हाकायला लिहिलंय, असं वाटत नाही.
ते आव्हाडांचं महाडमधलं आंदोलन हे मुळातलं 'मनुस्मृती जाळण्याचं आंदोलन' होतं, जे बाबासाहेबांच्याच विचारांना धरून होतं. आंदोलन तापलं असतं तर मनुस्मृती चं झेंगट संघ भाजपवर शंभर टक्के उलटलं असतं. बचाव करताना तोंडाला फेस आला असता. ते याप्रकरणी गुंगारा द्यायला एक सेफ एक्झिट शोधत होते. ती आव्हाडांच्या अनावधानाने फोटो फाडण्यातून आयतीच मिळाली.
अभ्यासक्रमात गुपचूप मनुस्मृती घुसवायला निघालेले लोकच पुन्हा 'बाबासाहेबांचा अपमान' 'बाबासाहेबांचा अपमान' म्हणून बोंबलायला लागले. संघ भाजपवाले अशा गंमतीजंमती नेहमी करत राहतात. त्यात काही नवीन नाही. आधी खोडी काढायची आणि उलटा रट्टा बसला की कांगावा करायचा.
महाराजांचा पुतळा पडणे हे सामान्य माणसाच्या (आणि राजकारण्यांच्याही) दैनंदिन आयुष्यावर 'प्रत्यक्षात' जितका प्रभाव पाडते त्यापेक्षा कितीतरी अधिक परिणाम एक होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळण्याचे असतात>>
ही अशी तुलना, सांगड अस्थानी आहे. पेट्रोलपंपावरचा होर्डींग पडून जीव जातो. जीवाचं काय? उद्या जायचा तो आज जाईल. असाही तसाही जातोच आहे.
परंतु महाराजांशी संबंधित जे जे काही असतं, त्यासोबत लोकांच्या भावना, श्रद्धा गुंतलेल्या आहेत. त्यांच्या नावाचा घोष ऐकला तरी आतून काहीतरी ऊबदार असं वहायला लागतं. लोकांच्या मनात जे काही पावित्र्य, मांगल्य, अभिमान, अस्मिता, मनीमानसीचा मानबिंदू, प्रेम, आदर, जिव्हाळा, भक्कम आश्रयस्थान असं जे काही असतं, ते महाराजांशी जोडलं गेलं आहे. हे नसेल तर सगळा वजूद च खतम होतो. तो काही फक्त महाराजांचा पुतळा नसतो. हे सगळं असतं. पुतळा पडतो तेव्हा हे सगळं कोसळून पडतं. या शब्दासाठी माफ करा, पण जे कुणी या घटनेला जबाबदार आहेत, त्यांनी सरळसरळ हरामखोरी केलेली आहे.
नॉन बायोलॉजिकल मोदी हे चमको प्रवृत्तीचे आहेत. सतत स्वतःला चमकवायची संधी शोधत असतात. संधी मिळत नसेल तर घाईघाईनं काहीतरी इव्हेंट तयार करून तिथं प्रकट होतात. ध्यानाला बसतानाही शेकडो कॅमेऱ्यांच्या लखलखाटाची सोय आधी करून ठेवतात.
महाराष्ट्रातलं महाराजांचं स्थान सगळ्या जगाला माहितीय. मोदीनाही माहितीय. लोकसभेच्या तोंडावर त्यांच्या नावानं काय पदरात पाडून घेता आलं तर बघावं, म्हणून तो पुतळा अक्षम्य, गुन्हेगारी स्वरूपाच्या हलगर्जीपणानं उभा केला. त्याच्या अनावरणाचा देशभर इव्हेंट केला. आता पुतळा पडल्यावर सगळी ढकलाढकली करून झाल्यावर लपवायला तोंड राहिलं नाही म्हणून व्हॉट अबाऊट्री करत दरडावल्यासारखी माफी मागतायत. असं कसं चालेल?
भाजपाने निवडणूका तोंडावर
भाजपाने निवडणूका तोंडावर आलेल्या असतांना विक्रमी वेळेत पुतळा उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले होते. नेहेमीच निवडणूकीतला फायदा हाच एकमेव उद्देश भाजपाचा असतो. आता विरोधकांनी पुतळ्याचे राजकारण का करायला नको? अर्थात तेव्हढा मुरब्बीपणा, कोडगेपणा , खोटेपणा विरोधकांकडे नाही.
झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची, दोषी व्यक्तींवर कारवाई करायची, पण आता गृहमंत्र्यांना सुरत लुटीचा प्रश्न महत्वाचा वाटतो. जनतेचे लक्ष इतरत्र वळविणे आणि आपटेला पळायला पोषक वातावरण कोण तयार करत आहे?
तुम्ही विरोधकांना मुगल,
तुम्ही विरोधकांना मुगल, औरंगजेब, अफजलखान असं काय काय म्हणणार आणि त्यांनी पुतळा पडल्याचं राजकारण करू नये अशी अपेक्षा ठेवणार?
मोदी उत्तम, उत्कृष्ट वक्ते आहेत म्हणे. मग माफी मागतानाचा त्यांचा आवाज माफी फेकून मारल्यासारखा वाटतो, असं म्हटलं तर काय चुकलं?
आता तो शिल्पकार गायब झाला. मुळात त्याची निवड कशी झाली? त्याचं नाव कोणी सुचवलं?
पुतळ्याचं अनावरण करायला राजा आला, त्याच्यासाठी हेलीपॅड बांधले केले गेले, त्याला किती खर्च आला? ते कायमचे वापरात राहणार आहेत का?
महाराजांनी सूरत लुटली नाही असं म्हणून फडणवीसांनी पुन्हा एकदा गुजरातचरणवंदना केली आणि महाराष्ट्रद्वेष दाखवला.
अयोध्येत अर्धवट बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून रामाला वापरलं. त्याचं फळ मिळालं. इथे कमअस्सल दर्जाचा पुतळा घाईघाईत उभारून महाराजांना वापरायचा प्रयत्न केला. त्याचंही फळ मिळेल.
>>> पेट्रोलपंपावरचा होर्डींग
>>> पेट्रोलपंपावरचा होर्डींग पडून जीव जातो. जीवाचं काय? उद्या जायचा तो आज जाईल.
सुरेख लिहिता आपण!
होर्डिंगखाली दबलेले सगळे
होर्डिंगखाली दबलेले सगळे मृतदेह बाहेर निघाले नव्हते, तोवर त्याच उपनगरात राजाचा रोड शो झाला होता की!
त्या मृतांना राजाने श्रद्धांजली वाहिली होती का?
>> सुरेख लिहिता आपण! >>
>> सुरेख लिहिता आपण! >>
आपणही वरती सुरेख पीळ टाकलेत !
बापरे! केवढा राग आहे लोकशाही
बापरे! केवढा राग आहे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेत्याबद्दल!
हे सगळे बदलून टाका मित्रांनो, आवडत्या नेत्याला विजयी करा
ते लोकशाही पद्धतीने निवडून
ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेत यावर त्यांच्याच अर्थमंत्र्यांच्या पतीचा विश्वास नाही.
अरे पण हा कसला क्रायटेरिया
अरे पण हा कसला क्रायटेरिया आहे?
भ्रष्टाचार करणारे, द्वेष पसरवणारे, गुन्हे करणारे कित्येक नेते आहेत ते कुठल्या पद्धतीने निवडुन येतात?
राग, लोभ हे नेते काय करतात किंवा दिवे लावतात यावरून लोक ठरवतील ना. त्यात लोकांमध्ये दुमत जरी असले तरी लोकशाही पद्धतीने निवडुन येण्या न येण्याचा संबंध काय?
हिटलर!
हिटलर!
रशिया चायना नॉर्थ कोरिया इराण सगळीकडे लोकशाहीच आहे.
आपणही वरती सुरेख पीळ टाकलेत !
आपणही वरती सुरेख पीळ टाकलेत !>>> जबरदस्त! और ये रहा सिक्सर!
57 people died in hoarding
57 people died in hoarding collapse. Those families are destroyed. Please read up on concept of dependents. School children elders needing care .all for now fault of theirs. Respect the victims over cold logic.
महाराजांचा पुतळा पडला, शुद्ध
महाराजांचा पुतळा पडला, शुद्ध माफी मागणे व अजून भव्य स्मारक उभारणे एवढेच करायला हवे. >>> हो. ते सावरकर, सूरत बिरत त्यात कशाला आणले काय माहीत. ८-१० महिन्यांत पुतळा कोसळतो, तो ही शिवाजी महाराजांचा. यात खूप हलगर्जीपणा झालेला दिसतो. आणि विरोधक राजकारण करणारच. राजकारण भाजपने काय कमी केलेले नाही पूर्वी अशा बाबतीत.
कोंडदेवाचा पुतळा हटवला कारण मुळात तो तिथं असायलाच नको होता >> कहाँ से कहाँ पहुच गये! Wrong at so many levels म्हणतात तसे झाले हे.
एकतर पुरंदर्यांनी इतिहासकथनाचे नियम पाळले नाहीत. शब्दबंबाळ्/भावनिक लिहीले. हा "साहित्यिक" आक्षेप झाला. तो ठीक आहे. पण त्यावरून "हातचलाखी", "मॅनिप्युलेट", "एका दिशेने हाकायला" वगैरे आरोप केले आहे त्त्याचा बेसिस काय? त्याहून वाईट म्हणजे त्यांचा संबंध जेम्स लेन शी जोडून जणू काही यात पुरंदर्यांचाच हात असल्यासारखे ध्वनित केले आहे. पुरंदर्यांनी नक्की काय अजेंडा राबवला आहे त्या पुस्तकात? मी किमान ३-४ वेळा ते वाचले आहे. मला तरी त्यात काही अजेंडा बिजेंडा जाणवला नाही. ते पुस्तक २०-३० वर्षे मराठी लोक वाचत होते, त्यांचे जाहीर कार्यक्रम बघत होते. कोणाला दिसला नाही तो अजेंडा? राष्ट्रवादी वेगळा पक्ष झाल्यावर त्यांना अचानक साक्षात्कार झाला. त्यांचे लेखन शब्दबंबाळ जरूर आहे. पण साहित्यिक आरोप वेगळे आणि इतके हीन आरोप वेगळे.
आणि त्याही पुढे जाऊन - एक शाहीर्/कादंबरीकार म्हणून त्यांचे स्वातंत्र्य आहे जसे दाखवायचे तसे. तरीही - पुरंदर्यांनी दादोजींना बळंच मोठे केलेले नाही. त्यांनी ज्या घटना लिहील्या आहेत त्या "शिवाजी अॅण्ड हिज टाइम्स" मधेही नोंदल्या आहेत जदुनाथ सरकारांनी.
शेवटी, कोणत्याही संघटनेला हे स्वतःच ठरवून पुतळे हलवण्याचा अधिकार कोणी दिला? त्याचे समर्थन कशाला? तो हलवणार्यांत दोन माजी न्यायाधीशही होते. आणि वर हे म्हणे पुरोगामी.
आपटेला पकडला.
आपटेला पकडला.
आपटे अपेक्षे पेक्षा बराच लवकर
आपटे अपेक्षे पेक्षा बराच लवकर पकडला गेला. आता पुतळा उभारणी मधे झालेला भ्रष्टाचार बाहेर निघेल. कंत्राट आपटेला कसे मिळाले ? कुणी शिफारस केली होती? पात्रता निकष काय होते?
design, proposal, शिल्पाचा आराखडा आपटे , पाटील यांनी दिला असला तरी त्याला मान्यता देणारे कोण अधिकारी होते? त्यांच्यावर दबाव कुणी आणाला ?
भरत यांनी वर महत्वाचा प्रश्न विचारला आहे. पुतळा तिथे उभारला जावा , विक्रमी वेळेतच उभारला जावा अशी मागणी कुणाची होती?
३० फुटाचा पुतळा उभारु शकत नाही हे सिद्ध झाले आहे आणि अशा वेळॅए गप्पा १०० फुटाच्या करणे हास्यास्पद वाटते. जो बूंद से गई वो हौद से नही आती.
<< 57 people died in hoarding
<< 57 people died in hoarding collapse. Those families are destroyed. Please read up on concept of dependents. School children elders needing care .all for now fault of theirs. Respect the victims over cold logic. >>
------ सहमत. प्रत्येक जिव महत्वाचा आहे.
नैसर्गिक आपत्ती वर आपले नियंत्रण नाही, प्रयत्नाने मनुष्यहानी / वित्तहानी कमी करु शकतो. infrastructure projects वर आपले १०० % नियंत्रण आहे. त्या मधे होणार्या गलथानपणा मुळे होणारी जिवीत हानी सदोषमनुष्यहत्या या प्रकारांत मोडू शकते.
नियमबाह्य आकाराचे भले मोठे होर्डिंग पडून ५५+ लोकांचे प्राण जाणे किंवा मोरबीचा पूल पडून १३५ लोकांचा मृत्यू व अशा सहज टाळता येणार्या घटना सदोषमनुष्यहत्या या प्रकारांत मोडतात.
Pages