राजकोट शिव पुतळ्याच्या निमीत्ताने
Submitted by दुर्गविहारी on 2 September, 2024 - 15:51
शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६६४ कोकण स्वारीत मालवण बंदराच्या समुद्रात कुरटे बेट हेरले आणि इथली जागा हेरून त्यांनी इथे जलदुर्ग उभारण्याची योजना केली. मोरयाचा धोंड्यावर भुमिपुजन करुन जलदुर्गाची उभारणी सुरु झाली. दरम्यान शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जाउन कैदेत अडकले, मात्र सिंधुदुर्गाच्या उभारणीचे काम थांबले नाही. पुढे सिंधुदुर्ग पुर्ण झाला. इतक्या महत्वाच्या पाणकोटाचे संरक्षण म्हणून त्याचे उपदुर्ग म्हणून राजकोट, सर्जेकोट आणि पद्मगड असे तीन जलदुर्ग उभारले. यापैकी एक राजकोट मालवण किनार्यावर आहे.
विषय:
शब्दखुणा: