शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६६४ कोकण स्वारीत मालवण बंदराच्या समुद्रात कुरटे बेट हेरले आणि इथली जागा हेरून त्यांनी इथे जलदुर्ग उभारण्याची योजना केली. मोरयाचा धोंड्यावर भुमिपुजन करुन जलदुर्गाची उभारणी सुरु झाली. दरम्यान शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जाउन कैदेत अडकले, मात्र सिंधुदुर्गाच्या उभारणीचे काम थांबले नाही. पुढे सिंधुदुर्ग पुर्ण झाला. इतक्या महत्वाच्या पाणकोटाचे संरक्षण म्हणून त्याचे उपदुर्ग म्हणून राजकोट, सर्जेकोट आणि पद्मगड असे तीन जलदुर्ग उभारले. यापैकी एक राजकोट मालवण किनार्यावर आहे. सिंधुदुर्ग जलदुर्गामुळे पोर्तुगीजांची मुंबई-गोवा हालचालीवर वचक बसला तसेच इंग्रजांच्या राजापुर-मुंबई या हालचालीवर देखील मर्यादा आल्या. सिंधुदुर्ग हा एक प्रकारे शिवाजी महाराजांची पाण्यातील राजधानी म्हणावी लागेल. सभासदाच्या बखरीत याचे वर्णन "चौर्यांशी बंदरा अशी दुसरी जागा नाही" असे वर्णन केले आहे. यावरुन शिवचरित्रात या परिसराचे महत्व जाणवून येईल.
अश्या या महत्वाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक हा पुतळा सिंधुदुर्ग जलदुर्गाच्या आत उभा केला जाणार होता, मात्र जी जागा नौदलाने निवडली होती, ती जागा देण्यासाठी मालकाने नकार दिला म्हणून राजकोटची जागा पुतळा उभारण्यासाठी निवडण्यात आली.
नौदल दिनाच्या निमित्ताने ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण झाले.. याच दिवशी नौदलाचे चिन्ह बदलून शिवाजी महाराजांची मुद्रा हे नौदलाचे अधिकृत चिन्ह केले,
यासंबधतीत काही बातम्याच्या लिंक
या पुतळ्याच्या उभारणीसाठी आलेला खर्च असा.
राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग १ या कामासाठी २४ लाख ८५ हजार २०५ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग २ या कामासाठी २ कोटी ४० लाख ७१ हजार १६९ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरासाठी कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे या कामासाठी २३ लाख २३ हजार २९० रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सजावटीची भिंत बांधकाम करणे यासाठी २५ लाख ३२ हजार ३५९ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरासाठी रस्त्याचे बांधकाम करणे यासाठी २४ लाख ४९ हजार २५४ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात पदपथ बांधकाम करणे यासाठी २५ लाख ५३ हजार ७०८ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात लँडस्केप करणे या कामासाठी १६ लाख २९ हजार ५७५, राजकोट मालवण येथील परिसरातील शौचालयाचे बांधकाम करणे या कामासाठी २५ लाख २८ हजार ६६३रुपये अशा प्रकारच्या टप्प्यांची कामे निश्चित केलेली आहेत.
मात्र इतका खर्च करुन उभारलेला आणि देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते उदघाटन झालेला पुतळा सोमवार २६ ऑगस्ट २०२४ ला दुपारी १२,३० कोसळला. अर्थातच यावरुन गदारोळ सुरु झाला. कारण स्पष्ट होते. एकतर नुकत्याच झाल्लेया लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते, विरोधी पक्ष सबळ झालेला असतानाच आणि महाराष्ट्र विधानसभेची निवड्णुक जाहीर झालेली असतानाच हा भयानक प्रकार सामोरा आला. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे काहीतरी मार्ग काढायचा म्हणून महायुतीने "लाडकी बहीण" योजना राबवली. त्यामुळे महायुतीला थोडेफार अनुकुल वातावरण निर्माण देखील झाले. इतर पक्षांनी अश्या योजना जाहीर केल्या कि त्यांना रेवडी म्हणले जाते, मात्र भाजपने केले कि ते अर्थातच देशहितासाठी असते. असो.
त्याचवेळी बदलापुर येथे भाजपशी संबधीत संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्या बालीकेंवर अत्याचार झाला आणि संतापाची लाट आली. त्यातच या राजकोट शिवपुतळ्याच्या अवमानाची घटना घडली.
सुरवातीला या घटनेचे गांभीर्य बहुधा न समजल्याने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी वार्याच्या जोरामुळे हा पुतळा पडल्याचे सांगितले.
मात्र युगपुरुष, देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय असलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे महाराष्ट्रात आणि देशात उभे केले आहेत, मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची हि पहिलीच घटना घडल्यामुळे संतापाचा उद्रेक झाला आणि या घटनेचे राजकारण सुरु झाले. सुरवातीला वारा जबाबदार आहे असे सांगण्यात आले तरी या वार्यामुळे याच परिसारातील इतर कोणतेही नुकसान झालेले नसल्यामुळे तसेच इतका वार्याचा वेग कोकणार नेहमीच असल्यामुळे हा दावा फोल निघाला. सहाजिकच नवीन लक्ष नौदलाला केले गेले.
वास्तविक नौदल भारताचे आहे, तरीही केवळ एका नेत्याची हुजरेगिरी करणे महत्वाचे वाटत असल्यामुळे सरंक्षक दलाला देखील वेठीला धरताना सताधारी पक्षाला लाज वाटली नाही. यापुर्वी देशाला पदक मिळाचे म्हणून प्रसंगी प्राण पणाला लावून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या विनेश फोगटला वाटेल त्या भाषेत ट्रोल केले गेले, अगदी कपडे काढले असते तर वजन कमी झाले असते असा निर्लज्ज सल्ला दिला गेला. राष्ट्रप्रथमच्या गप्पा मारणार्या या पक्षाचा खरा चेहरा या निमित्ताने पुढे आला. कदाचित नौदलावर जनता टीका करणार नाही या अपेक्षेने नौदलाचे नाव घेतले असावे. अर्थातच नौदलाने यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही.
मात्र यावरुन सरकारवर जोरदार टीका सुरु झाल्यावर एक पुर्ण मुख्यमंत्री आणि दोन अर्धे उपमुख्यमंत्री याना थोडेफार भान आले. यानिमीत्ताने या पुतळ्याच्या शिल्पकार जयदीप आपटे याच्यावरुन गदारोळ सुरु झाला. कल्याणचा रहिवासी असल्यामुळे याला ठाणे कनेक्शन किंवा श्रीकांत शिंदे यांच्यामुळे काम मिळाले अशी शक्यता वर्तवली जाउ लागली. त्यात आपटेच्या फेसबुक पेजचा धांडोळा घेतला गेला, त्यात त्याचे सनातन प्रभातशी संबंध असल्याचे दिसले. त्याची मुलाखत देखील सनातन प्रभातने छापलेली होती. त्यात आपटची सविस्तर माहीती काढली गेली. त्याला इतक्या मोठ्या पुतळ्याचा अनुभव नसल्याचे दिसले. अनुभव नसताना देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते उदघाटन केले जाणार्या पुतळ्याचे काम कसे दिले गेले ? असा प्रश्न उपस्थित झाला.
जयदीप आपटे याने रहेजामधून शिल्पकलेची डिग्री घेतली. मात्र रहेजा स्कुल ऑफ आर्टसम्ध्ये हि डिग्रीच नसल्याचे पुढे आले. म्हणजे खोटी डिग्री हे जयदीप आपटेकडे महत्वाचे क्वालिफीकेशन होते. त्यातच त्याने एक शिवपुतळ्याच्या कपाळावर जखमेची खुण दाखवली.वास्तविक शिवाजी महाराजांची अस्सल चित्रे उपलब्ध असताना आणि त्यात अशी कोणतेही खुण नसताना जयदीप आपटेला हा नसता उद्योग सांगितला कोणी ?
त्यात इतका मोठा पुतळा इतक्या कमी कालावधीत उभा करणे शक्य नसल्यामुळे जयदीप आपटेने थ्री डी प्रिंटरने तयार केल्याचे समोर आले. अर्थातच याचे कारण स्पष्ट होते. या पुतळ्याचे उदघाटन नौदल दिनाच्या दिवशीच करण्याचा प्रधानसेवकांचा अट्टाहास होता. कारण अर्थातच स्पष्ट होते. या पुतळ्याचा लाभ निवडणुकीत करुन घेणे हाच हेतु होता हे उघड आहे. त्यात आपटेला आधी वर्क ऑर्डर दिली गेली आणि मग कोटेशन काढले गेले. वास्तविक असा महत्वाचा पुतळा उभा करायचा तर एखाद्या अनुभवी शिल्पकाराला काम देणे अपेक्षित होते, तसेच याची निवीदा आधी काढणे अपेक्षित होते, पण हे झाले नाही याचा सरळ अर्थ घोटाळा हाच आहे. दरम्यान पुतळा पडल्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी राजकोटला भेट देण्यास सुरवात केली.
याचवेळी आदित्य ठाकरेनी भेट दिली असतानाच त्याचवेळी इथले खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार असलेले दोन सुपुत्र यांनी राजकोटपाशी जाउन पोलिसांच्या उपस्थितीत धमकी दिल्याचे समोरे आले. आधीच या प्रकरणावरुन वाद पेटला असताना राणे पिता-पुत्रामुळे नवीन वाद पेटला. नितेश राणे यांच्या बरोबर जयदीप आपटेचे फोटो समोर आले. आणि आपटेचे राणे कनेक्शन आहे कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला.
त्यात नेहमीप्रमाणे आपटेची जात काढण्यात आली. त्यात काहीही तथ्य नसले, दरम्यान बदलापुर प्रकरणातील आपाटे गायब असताना जयदीप आपटे देखील गायब झाला. गुन्हेगार गायब होत असताना महाराष्ट्राचे गृहखाते आणि मंत्री नेमके काय करत आहेत ? असा प्रश्न निर्माण होतो.
हा सगळा वाद सुरु असताना विरोधी पक्ष या संधीचा फायदा न घेतील तर नवल अशी परिस्थिती असल्यामुळे घटनेचे गांभीर्य समजून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जाहीर माफी मागितली. त्या आधीच उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. अर्थात लोकसभेतील दणदणीत पराभव आणि विधानसभेतील संभाव्य पराभव विचार करुन अजित पवार पुन्हा परतण्यासाठी हि खेळी करत आहेत कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला. पंतप्रधान मोदीनी मागितलेली माफी हि तोंडदेखली आहे असा अरोप विरोधकांनी केला आणि एकंदरीत त्यात तथ्य वाटते, कारण एकतर पंतप्रधानांची देहबोली वेगळीच होती, त्यात कोठेही माफी मागण्याची विनम्रता नव्हती, तसेच या प्रकरणाशी संबध नसताना त्यांनी सावरकारांचा संदर्भ आणला. सहाजिकच विरोधकांकडून सावरकारांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत वापरलेली काकतालीय स्वराज्य आणि कलयाणच्या सुभेदाराच्या सुनेबाबतील सदगुण विकृतीचे वादग्रस्त वाक्ये समोर आणली गेली. यात उपरती होउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची माफी मागितली. विशेष म्हणजे माफी मागणे हि लाजिरवाणी घटना असताना उपस्थित लोक टाळ्या वाजवताना दिसले. व्यक्तीपुजेचे हे हिणकस उदाहरण म्हणावे लागेल.
शिवाय हि माफी केवळ महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक तोंडावर आली असल्यामुळे मागितली गेली, कारण यापुर्वी मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये सप्तर्षीचे असेच उभारलेले पुतळे पडले असताना ना पंतप्रधानांनी माफी मागितली ना तिथल्या मुख्यमंत्र्यांनी !
विशेष म्हणजे इतके सर्व होत असताना दुसरे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ना खेद व्यक्त करत आहेत ना माफी मागत आहेत. याउलट त्यांनी सुरवातीला पोलिसांना धमकी देणार्या नारायण राणेना वाचविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक राणेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे तरीही कोणतीही कारवाई होत नाही.
त्यानंतर शिवाजी माहाराजांनी सुरत लुटलीच नाही, काँग्रेसने खोटा इतिहास शिकवल्याचे वक्तव्य केले. वास्तविक शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे सर्व अस्सल एतिहासिक साधनात पुरावे आहेत. अगदी मोघली कागदपत्रे आहेत. मुख्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे. असे असताना खोटा इतिहास कॉन्ग्रेसने पसरवला असे फडणवीस कोणत्या आधारे म्हणतात ? आणि हा इतिहास खोटा आहे तर गेली दहा वर्ष देशात त्यांचीच सत्ता असताना ते गप्प का होते ?
हा वाद कमी म्हणून की काय फडणवीसांनी पंडीत नेहरुंच्या "डिस्कव्हरी ऑफ इंडीया" या ग्रंथात शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य असल्याचा शोध लावला. वास्तविक अहमदनगरच्या किल्ल्यात कैद असताना सदर ग्रंथ पंडीत नेहरुंनी लिहीला. त्यावेळी उपलब्ध साधनाचा वापर करुन म्हणजे सर जदुनाथ सरकार यांच्या ग्रंथाचा संदर्भ घेउन त्यांनी हा ग्रंथ लिहीला. शिवाजी महाराजांबाबतीत जदुनाथ सरकार आणी नेहरु या दोघांचे ही मत चुकीचे होते आणि त्याची त्यांनी माफीही मागितली. त्यानंतर प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंडीत नेहरुंच्या हस्ते उदघाटनही झाले, जो प्रतापगडावरचे जोरदार वारे आणि पाउस झेलून आजही उभा आहे. तेव्हा असे नाहक वाद उपस्थित करुन फडणवीस काय साध्य करत आहेत ? समजायला मार्ग नाही. त्यापेक्षा बिनशर्त माफी मागणे हा अधिक योग्य पर्याय होउ शकतो. असो.
हे राजकारण सुरु असताना सोशल मेडीयावर याची प्रतिक्रीया उमटली नसती तरच नवल. विशेष म्हणजे जरा खुट्ट वाजले कि तातडीने त्यावर व्यक्त होणारे अंधभक्त या प्रकरणी मिठाची गुळणी घेउन गप्प आहेत. अंधभक्तांच्या व्हॉटस अॅप ग्रुपवर यावर एक शब्द ही निघत नाही. एकाचाही फेसबुक पेजवर यावर अवाक्षर ही लिहीलेले नाही. यु ट्युब चॅनेल चालवणारे गोदी मेडीयाचे पाळीव पत्रकारही चिडीचुप आहेत. मालकाच्या विरोधात ब्र ही काढायचा नाही हे कटाक्षाने पा़ळले जात आहे. काही भक्त मंडळीनी विरोधी पक्षाच्या लोकांनी पुतळ्याच्या पायथ्याशी अॅसिड ओतून बोल्ट मुद्दाम गंजतील अशी व्यवस्था केल्याचा शोध लावला. वास्तविक अलिकडे उदघाटन झालेले अनेक प्रकल्प वादाच्या भोवर्यात सापडले असताना तिथेहि विरोधकांनीच या गोष्टी केल्याचे यांना म्हणायचे आहे काय ? त्यात काही जणांनी मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार असताना छिंदवाडा जिल्ह्यातील सौसरमध्ये शिवाजी महाराजांचा बेकायदेशीरपणे उभा केलेला पुतळा पाडल्याचा व्हिडिओ शेअर करुन जाब विचारायला सुरवात केली. अर्थात असे बेकायदेशीर पुतळे कोणत्याही महापुरुषाचे उभारणे चुकीचेच आहे. शिवाय संसदेच्या आवारात असलेले शिवाजी महाराज,गांधीजी यांचे पुतळे लँडस्केपिंगच्या नावाखाली बाजुला केले , त्यावर हे भक्त चिडीचुप रहातात.
एकंदरीत पुढील बराच काळ या दुर्दैवी घटनेचे पडसाद उमटत रहाणार हे निश्चित . कृपया आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि या घटनेसंदर्भात ताजे अपडेट ही इथे पोस्ट करत रहा.
वाईटातून चांगलं घडतं ते असं -
वाईटातून चांगलं घडतं ते असं - इति दीपक केसरकर.
आधीचा पुतळा नेव्हीने बांधवला. त्यांची जबाबदारी होती. आता राज्य सरकार कसं घुसलं तिथे?
आधीच्या पुतळ्याची पडझड का
आधीच्या पुतळ्याची पडझड का झाली याचा अभ्यास करणार्या तज्ञ (joint technical committee) समितीचा १६ पानी अभ्यास अहवाल राज्यसरकारला मिळाला आहे. अगदीच गोल गोल फिरवले आहे. हे तज्ञ आहेत का वेळ मारुन नेण्यासाठी नेमेलेली कळसूत्री?
https://indianexpress.com/article/cities/mumbai/shivaji-statue-collapse-...
निष्कर्ष :
(१) गंजलेले स्ट्रक्चर. ( internal rusting असे पण वाचले आहे)
(२) सदोष डिझाईन ( faulty design)
(३) खराब देखभाल ( poor maintenance)
(४) पुतळ्याची रचना, फ्रेम ( वजनासाठी) मजबूत नव्हती.
२४ वर्षे वयाच्या कुठलिही डिग्री नसलेल्या unqualified व्यक्तीस कंत्राट देण्याच्या निर्णय प्रक्रियेबद्दल आणि दाखविलेल्या घाई बद्दल कुठे पुसटसाही उल्लेख बातम्यांत " दिसत " नाही. अरे हो, हे टेक्निकल कमिटीच्या अखत्यारित येत नसावे.
Pages