Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वरती कौन चित्रपटाची चर्चा
वरती कौन चित्रपटाची चर्चा वाचून राहवले नाही. हा माझा अतिशय आवडता चित्रपट. संपूर्ण चित्रपट RGV ने केवळ पनवेल मधल्या एका बंगल्यात शूट केला आहे म्हणे. विशेषतः त्या चित्रपटातल्या वातावरण निर्मितीमुळे आणि इतर अनेक बाबतीतल्या वेगळेपणामुळेच मला प्रचंड आवडलेला हा चित्रपट आहे. अनेक बाबतीत रामूने हा चित्रपट अतिशय हटके बनवला आहे.
१. फक्त तीनच पात्रे: अखंड चित्रपटात फक्त तीनच पात्रे आहेत.
२. एकही गाणे नाही: गाणे हा हिंदी चित्रपटाचा आत्मा असतो. पण यात एकही गाणे नाही.
३. शुन्य टाईमलॅप्स: पटकथा प्रत्यक्षात घडणारी घटना असती तरी तितक्याच वेळात घडली असती जितक्या वेळेचा हा चित्रपट आहे. एकाही मिनिटाचा टाईमलॅप्स घेतलेला नाही.
४. एकच लोकेशन: पूर्ण चित्रपटात फक्त एक आणि एकच लोकेशन आहे.
इतक्या बाबींत भिन्न असूनही चित्रपट आपली पकड सोडत नाही. कुठेही कंटाळवाणा नाही. अशा प्रकारचा हा कदाचित एकमेव चित्रपट असेल. खूप खूप आवडलेला चित्रपट (एका इंग्लिश चित्रपटावर तो बेतला आहे असे काही ठिकाणी वाचले म्हणून तो इंग्लिश चित्रपटसुद्धा बघितला. पण मला साधर्म्य आढळले नाही)
इथे पाहता येईल:
https://www.youtube.com/watch?v=fwRoUvH9VL8
>>>>Fate, for some mysterious
>>>>Fate, for some mysterious force, can put the finger on
you or me, for no good reason at all.”
How true!
मस्त!! बघते हा सिनेमा.
सामो आभार. निश्चित बघा.
सामो
आभार. निश्चित बघा.
कौन बाबत अगदी सहमत...तो
कौन बाबत अगदी सहमत...तो आत्ताच्या सोशल मिडियाच्या काळात आला असता तर लोकानी प्रचन्ड उचलुन धरला असता.
कौनबाबत अनुमोदन. मस्त होत
कौनबाबत अनुमोदन. मस्त होत सिनेमा. काय झालं की राम गोपाल वर्माला नंतर.
उर्मिला ची चर्चा चालू आहे तर.
उर्मिला ची चर्चा चालू आहे तर.. तिचा आणखी एक मूव्ही होता.. नाव आठवत नाही..अजय देवगण, अक्षय खन्ना..
अक्षय वकील असतो त्यात आणि अजय उर्मिला च्या मागे लागलेला असतो बहुतेक..मग हा वकील सोडवतो.. असं काही तरी आहे.. त्यात अजयचा अभिनय मात्र छानच होता..!
दीवानगी!
दीवानगी!
https://www.youtube.com/watch?v=RqteLT-4vMI
तो अजय देवगण ड्रम वाजवत असतो,
तो अजय देवगण ड्रम वाजवत असतो, मुहब्बत मुहब्बत गाणं यातच आहे ना?
अनू ते कयामत कयामत गाणं ..
अनू ते कयामत कयामत गाणं ..
पण ते ह्यातलं नसावं. ते क्रूस वर घडतं. तो दिवाने मुव्ही..त्यात खरंच अ.दे. चा डबल रोल आहे.
दिवानगी ड्युएल पर्सन्यालिटी वर होता. १ च अ.दे. छान होता तो.
अजय भरात होता तेंव्हा. त्यात उर्मिलेला फारसा वाव नाही. कायम २ हिरोंमधे अडकलेली हिरोईन.. उर्मिला, माधुरी सुद्धा.
काय मेमरी..इतके दिवे अभ्यासात लावायचे तर..असो.
दिवानगी ड्युएल पर्सन्यालिटी
दिवानगी ड्युएल पर्सन्यालिटी वर होता. १ च अ.दे. छान होता तो.>>>>
मस्त होता… ड्युएल पर्सनॅलिटीचा भास उत्पन्न करुन अजय देवगण गुन्हा करतो. परत बघायला हवा. खिळवुन ठेवणारा आहे.
काय मेमरी..इतके दिवे अभ्यासात
काय मेमरी..इतके दिवे अभ्यासात लावायचे तर..असो.>>>
हाही अभ्यासच.. आणि इतका भारी की अभ्यास होतोय हे कळतही नाही.
काश शाळेने अमुकच विषय अभ्यासायचे हा हट्ट सोडला असता.. कित्येकांनी बालवयातच कित्येक विषयांत पिएचड्या मिळवल्या असत्या..
कौन, प्यार तुने क्या किया,
कौन, प्यार तुने क्या किया, चायना गेट थेटरात पाहिले होते. रा ग व मस्त चित्रपट काढायचा तेव्हा.
रा ग व मस्त चित्रपट काढायचा
रा ग व मस्त चित्रपट काढायचा तेव्हा.
रंगीला!
माझ्या मते हा कल्ट पिक्चर आहे.
विशेषतः उर्मिलाचे ड्रेस.
आणि कोरिओग्राफि.
मला तो दिवाने अजिबातच आठवत
मला तो दिवानगी अजिबातच आठवत नाहीये.त्याच्या ऐवजी कानून वगैरे आठवतायत अजय उर्मिला चे.तुझे लिफ्ट कार मे दे दू तो गिफ्ट मुझे क्या दोगी वगैरे(इथे उर्मिला ने '17 रुपये पर किलोमीटरने जितके होतील तितके पैसे प्लस जीएसटी' असं उत्तर दिलं तर काय भारी पोपट होईल ना)
दिवानगी , primal fear वर
दिवानगी , primal fear वर आधारित होता.
इथे उल्लेख केलेले बरेचसे
इथे उल्लेख केलेले बरेचसे पिक्चर्स मला आठवतच नाहीयेत, कधी आले आणि कधी गेले.
मग हा तर माहित सुद्धा नसेल.
...
दिवानगी माझ्या लक्षात राहिला,
दिवानगी माझ्या लक्षात राहिला, कारण अ.दे. चं नाव त्यात तरंग दाखवलय. उर्मिला अक्षय बरोबर हुंदडायला गेली की लागलीच अ.दे. चं डोकं फिरायचं. त्या आधी तो गरीब गाय असतो.
तर ..माझ्या बहिणी चं ही डोकं फिरलं/ती चिडली की मी तिला तरंग आलाय तुझ्यात आता असं चिडवायचे
अजूनही हसतो आम्ही त्यावरून..
प्राईमवर The Visitor बघितला.
प्राईमवर The Visitor बघितला. ऑस्कर नॉमिनी आहे असं दिसलं म्हणून बघायला घेतला.
खूप छान सिनेमा आहे, आवडला. एक कनेक्टिकटचा प्रोफेसर जो आपल्या न्युयॉर्क मधल्या अपार्टमेंट मधे काही कामानिमित्त जातो तेव्हा त्याला कळतं की तिथे एक इललिगल इमिग्रंट्स कपल राहतंय. आधी तर तो त्यांना घराबाहेर काढतो पण नंतर अशा काही घटना घडत जातात की तो त्यांना
त्याच्या घरात राहायलाही जागा देतो आणि त्यांच्या प्रॉब्लेम्स मधे मदत पण करत जातो.
एकूणच फार सुंदर आहे मुव्ही. त्या कपलमधला मुलगा या प्रोफेसरला अरेबिक ड्रम वाजवायला शिकवतो. आधी खूप रिझर्व्ह, शाय असलेला प्रोफेसर त्याच्या सहवासात हळूहळू खुलत जातो. त्याने आधी ४-५ वेळा त्याच्या बायकोचा पियानो शिकण्याच्या प्रयत्न केलेला असतो पण का माहित नाही अयशस्वी ठरत असतो. इथे त्याला हळूहळू तो सुर सापडून आनंदाने ठेका धरायला शिकतो हे ट्रांझिशन फार मस्त दाखवलंय.
छान पोस्ट अंजली. साधर्म्य
हो अस्मिता तोही मस्तच होता.
हो अस्मिता तोही मस्तच होता. अशा एकलकोंड्यांशी मी फार रिलेट करू शकते. खुलत नाही कशाने तो भाग वेगळा
तामिळ यू टर्न प्राईम वर
तामिळ यू टर्न प्राईम वर पाहिला. सामांथा प्रभू चा असे रोल करायचा हातखंडा होत चाल्लाय.
चित्रपट ठीक आहे, थिलर, हॉरर जोनर आहे. वेगवान असल्याने बघायला छान वाटतो.
सामांथा सारखी रुपवान मुलगी लट्टू असूनही ऑफिस कलीग ची तिला स्लो & स्टेडी आणि जेमतेम ट्रीटमेंट बघून साउथ टपोरी ओव्हर द टॉप फ्लर्टींग संकल्पनेला जरासा तडा जातो.
शेवट अगदीच पुचाट आहे.. १ टाईम वॉच.
प्राईमवर The Visitor >>>
प्राईमवर The Visitor >>> नोटेड!
तोच का यु turn ज्यात जवळच्या
तोच का यु turn ज्यात जवळच्या माणसामुळेच मायलेकी मरतात आणि भूत होऊनही समजत नाही कोणी मारले ते, हायवेवर दगड काढून यु turn घेणाऱ्या प्रत्येकाला मारत सुटते ती. साऊथला इतक्या महत्वाच्या रस्त्यावर अशी दगडे कशी ठेवलेली, नीट डिवायडर कसे नाहीत हे वाटलेलं सिनेमा बघून. इतका स्लो होता तो. प्राइम वर नव्हता बघितला, टीव्हीवर कुठे बघितलेला नवऱ्याने आठवत नाही, मी येता जाता बघितला.
प्राइमवरचा हा नसेल तर बघायला हवा.
डिव्हायडर ची दगडं काढून
डिव्हायडर ची दगडं काढून युटर्न मारणे, फुटपाथवरचे बॅरीकेड काढून फुटपाथवर गाड्या घालणे हे आता हायवेवर प्रत्यक्ष इतकं पाहतेय की पुण्यात किमान महिन्याला 1 भूत तयार झालं असतं.तो पिक्चर आवडला होता.
हो हो अंजू. भूत असून तिला
हो हो अंजू. भूत असून तिला पास्ट मधे जाऊन बघता येत नाही की कोणी नक्की यु टर्न घेतला, आणि अॅक्च्युअली ज्याच्या मुळे रामायण घडलं, त्याला म्हणे तुम्हे जिंदा रखना ही तुम्हारी सजा है, बाकीच्या यु टर्न वाल्यांना १० जणांना खचाखच संपवते.


माझी मुलगी ते बघून म्हणाली, सीमेंट लाऊन फिक्स का नाही करत ते डीवायडर?
मग मुलांना सांगावं लागतं की वाईट वागणार्यांना भिती वाटावी म्हणुन असा मुव्ही काढला आहे
माझा गिल्ट प्लेझर - नायक अनिल कपूर वाला !
पण हिंदी यूटर्न मध्ये खून भूत
पण हिंदी यूटर्न मध्ये खून भूत करत नाही(स्पॉयलर बद्दल माफी.)
साऊथ मध्ये भूत खून करतं का?
स्पॉइलर
स्पॉइलर
.
.
.
.
.
.
.
.
साऊथ मध्ये भूत खून करतं का?>>> हो
स्पॉइलर ची वाट
वाचला, एडिट कर
वाचला, एडिट कर
इथे स्पॉयलर लिहायला पांढरी शाई नाही.बहुतेक फॉन्ट टॅग पण नाही.
Prime वर lion हा मूव्ही
Prime वर lion हा मूव्ही पाहिला, २०१७ मध्ये आलेला आहे. नाव आणि कथा यांचा काहीही संबंध नाही. चित्रपट खूप आवडला, खऱ्या गोष्टीवर आधारीत आहे, हे शेवटी titles मध्ये कळलं. एक मजूर वस्तीतला ५ वर्षांचा मुलगा हरवतो, तो कुठे जातो मग पुढे त्याच्याबरोबर काय घडतं, तो पुन्हा घरी येऊ शकतो का? नक्की बघा. मला असे साधे सुंदर चित्रपट खूप आवडतात.
Pages