Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धन्यवाद सगळ्यांना …!!
धन्यवाद सगळ्यांना …!!
सदाबहार. पुलाव + मठ्ठा
सदाबहार. पुलाव + मठ्ठा
Today’s Fail safe lunch menu.
पुलाव आणि मठ्ठा म्हटले की
पुलाव आणि मठ्ठा म्हटले की बालपणीची लग्ने आठवतात. आणि सकाळी मस्त खोबरे कोथिंबीर पेरलेला उपमा. हे पदार्थ लग्नात खायला जास्त मजा यायची
असो,
आजचा माहोल.. आणि आजचा मेनू
चीज ग्रील सँडविच, टोस्ट सँडविच, पंजाबी समोसे आणि ढोकळा इतके पदार्थ खिडकीवर बसूनच दोन कप चहा सोबत खाल्ले. शेवटी भज्या खाताना आणि त्यातही शेवटच्या तीन शिल्लक असतात फोटो काढायचे सुचले
पुलाव आणि मठ्ठा हे कॉम्बो
पुलाव आणि मठ्ठा हे कॉम्बो नाही बघितले कधी.
पुलाव + टोमॅटो सार, पुलाव + कुर्मा, पुलाव + रायता हे सदाबहार मेन्यू आहेत.
मठ्ठ्याचा एकमेव जिवलग मीत्र आहे तो म्हणजे मसालेभात. त्या दोघांच्या मैत्रीला तोड नाही.
मसालेभात + मठ्ठा खरे पार्टनर
मसालेभात + मठ्ठा खरे पार्टनर बरोबर. पण हे कॉंबोही छान लागते. नेहेमी करतो.
मठ्ठ्याची नेमकी कृती कोणी देऊ
मठ्ठ्याची नेमकी कृती कोणी देऊ शकेल का ? ताक आणि मठ्ठा ह्यात काय नेमका फरक असतो ?
Expert नेमके सांगतीलच पण ही
Expert नेमके सांगतीलच पण ही माझी मठ्ठा रेसिपी:
ताजे कमी आंबट ताक + मीठ + भाजलेल्या जिऱ्याची पूड + हिरव्या मिर्ची चे आणि आल्याचे बारीक तुकडे किंवा पेस्ट + किंचित साखर आणि स्टार कँडीडेट म्हणून black salt !! वरुन कोथिंबीर. कधी १-२ मिरे वाटून. सर्व अंदाजपंचे.
Unlike ताक, मठ्ठा थोडा watery असतो/ असावा.
धन्यवाद अनिंद्य
धन्यवाद अनिंद्य
आणि हे सगळं ताकात घालून
आणि हे सगळं ताकात घालून हलवायचं फक्त ना? म्हणजे फोडणी वगैरे नसते ना?
मठ्ठयात जिलेबी बुडवून नाही
म्हणजे फोडणी वगैरे नसते ना? >>> नसते.
मठ्ठयात जिलेबी बुडवून नाही खात का तुम्ही लोक्स
आणि हे सगळं ताकात घालून
आणि हे सगळं ताकात घालून हलवायचं फक्त ना?
हो.
फोडणी नसते
ज्यांना फोडणीशिवाय मनःशांती
ज्यांना फोडणीशिवाय मनःशांती लाभत नाही त्यांनी हे सगळे मिक्स करुन झाले की वरुन बारिक ठेचलेल्या लसणाची झणझणीत फोडणी करुन ओता की… हाकानाका… हवे तर फोडणीचा मठ्ठा म्हणा..
मठ्ठा & सोलकढी म्हणजेच तंद्री
मठ्ठा & सोलकढी म्हणजेच तंद्री लागणे.
ऋन्मेष ते छोले ताट बाहेर चे फूड आहे का? कांदा चकती वरून वाटले..
(No subject)
उपास थाळी
उपास थाळी
सा खि, आमटी, चटणी, उपासाचे चिप्स
अरे वा, साखि अगेन !
अरे वा, साखि अगेन !
आशू हो छोले भटुरे बाहेरचे
आशू हो छोले भटुरे बाहेरचे आहेत.. ताट घरचे आहे

नवरत्न, वाशी.
मला खरे तर छोले भटुरे फार आवडत नाहीत. पण हे टेस्ट केले तर अगदी फोटो काढावे इतके आवडले
छोले भटुरे नवरत्न ?? आम्ही
छोले भटुरे नवरत्न ?? आम्ही टिपिकल उडुपी थाळी किंवा इडली डोसा खायचो. आत्ताही अधून अधून नॉस्टॅल्जिया म्हणून गेलो तरी हेच खातो. एकदा छोले भटुरे ट्राय केले पाहिजेत.
सुख..
सुख..

जन्माष्टमीच्या उपवासनिमित्त
जन्माष्टमीच्या उपवासनिमित्त कोकणात केले जाणारे खास पदार्थ !
१. आंबोळ्या

२. शेंगलाची भाजी
३. काळ्या वाटाण्याचे सांबार
शेंगलाची ?
शेंगलाची ?
जरा विस्कटून सांगा
साज, मसालेभात ?
मसालेभात+जिलबी व मट्ठा मस्त
मसालेभात+जिलबी व मट्ठा मस्त दिसतायत.
जाई छान ताट.
शेंगाला म्हणजे शेवग्याच्या /
अनिंद्य , शेंगाला म्हणजे शेवग्याच्या / शेंगाच्या पानांची भाजी
इंग्रजीत moringa असे नाव आहे
https://www.aaichisavali.com/2018/12/MoringaLeavesStirFry.html?m=1
या लिंकवर फोटो आहे
धन्यवाद सामो
शेंगाला = moringa ! समजले.
शेंगाला = moringa ! समजले.
थँक्यू
जाई ..... यम्म्म्म्
जाई ..... यम्म्म्म्
माझा आवडता बेत
जाई, कोकणातली मेजवानी भन्नाट
जाई, कोकणातली मेजवानी भन्नाट दिसतेय!
शेंगला नाव माहित नव्हते.
शेंगला नाव माहित नव्हते. मोरिंगा नावानेच शेवग्याची पाने इथे मिळतात, खूप म्हणजे खूपच हाय इन आयर्न असतात, रेग्युलरली खायला हवीत. त्याची १ भन्नाट रेसिपी मी केरळी बाई ची पाहिली युट्युब वर. कुणाला इंटेरेस्ट असेल तर देते.
कडवट चव आवडत असली तर दाणे, खोब्रं, कांदा घालून कोरडी करता येईल.
काळा वाटाणा सांबार माझं आवडतं, पण तो मेला शिजतच नाही
.... आलं दु:खं बाहेर 
येस! कोकणातली आजच्या दिवशी
येस! कोकणातली आजच्या दिवशी केली जाणारी स्पेशल रेसिपी..
हे कॉम्बिनेशन सुद्धा आवडीचे आणि भोपळ्याचे वड्यासोबत सुद्धा आवडीचे.
वरच्या आंबोळ्या छान दिसत आहेत..
शेगलाची भाजी,कावा आमटी
शेगलाची भाजी,कावा आमटी,आंबोळ्या याचबरोबर सांजोऱ्या करतात.
स्वस्ति , rmd , धन्यवाद
स्वस्ति , rmd , ऋणमेष धन्यवाद
आशू , केरळ पाक्रू जरूर शेअर करा
Pages