खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

पुलाव आणि मठ्ठा म्हटले की बालपणीची लग्ने आठवतात. आणि सकाळी मस्त खोबरे कोथिंबीर पेरलेला उपमा. हे पदार्थ लग्नात खायला जास्त मजा यायची Happy

असो,
आजचा माहोल.. आणि आजचा मेनू
चीज ग्रील सँडविच, टोस्ट सँडविच, पंजाबी समोसे आणि ढोकळा इतके पदार्थ खिडकीवर बसूनच दोन कप चहा सोबत खाल्ले. शेवटी भज्या खाताना आणि त्यातही शेवटच्या तीन शिल्लक असतात फोटो काढायचे सुचले Happy

IMG_20240824_144226.jpg

पुलाव आणि मठ्ठा हे कॉम्बो नाही बघितले कधी.

पुलाव + टोमॅटो सार, पुलाव + कुर्मा, पुलाव + रायता हे सदाबहार मेन्यू आहेत.

मठ्ठ्याचा एकमेव जिवलग मीत्र आहे तो म्हणजे मसालेभात. त्या दोघांच्या मैत्रीला तोड नाही.

Expert नेमके सांगतीलच पण ही माझी मठ्ठा रेसिपी:

ताजे कमी आंबट ताक + मीठ + भाजलेल्या जिऱ्याची पूड + हिरव्या मिर्ची चे आणि आल्याचे बारीक तुकडे किंवा पेस्ट + किंचित साखर आणि स्टार कँडीडेट म्हणून black salt !! वरुन कोथिंबीर. कधी १-२ मिरे वाटून. सर्व अंदाजपंचे.

Unlike ताक, मठ्ठा थोडा watery असतो/ असावा.

ज्यांना फोडणीशिवाय मनःशांती लाभत नाही त्यांनी हे सगळे मिक्स करुन झाले की वरुन बारिक ठेचलेल्या लसणाची झणझणीत फोडणी करुन ओता की… हाकानाका… हवे तर फोडणीचा मठ्ठा म्हणा..

Screenshot_20240826_160540_Gallery.jpg
उपास थाळी
सा खि, आमटी, चटणी, उपासाचे चिप्स

आशू हो छोले भटुरे बाहेरचे आहेत.. ताट घरचे आहे Happy
नवरत्न, वाशी.
मला खरे तर छोले भटुरे फार आवडत नाहीत. पण हे टेस्ट केले तर अगदी फोटो काढावे इतके आवडले Happy

छोले भटुरे नवरत्न ?? आम्ही टिपिकल उडुपी थाळी किंवा इडली डोसा खायचो. आत्ताही अधून अधून नॉस्टॅल्जिया म्हणून गेलो तरी हेच खातो. एकदा छोले भटुरे ट्राय केले पाहिजेत.

जन्माष्टमीच्या उपवासनिमित्त कोकणात केले जाणारे खास पदार्थ !

१. आंबोळ्या
२. शेंगलाची भाजी
३. काळ्या वाटाण्याचे सांबार
51F5B857-0D14-4F4E-9666-12DAD32A2E89.jpeg

शेंगलाची ?

जरा विस्कटून सांगा

साज, मसालेभात ?

अनिंद्य , शेंगाला म्हणजे शेवग्याच्या / शेंगाच्या पानांची भाजी
इंग्रजीत moringa असे नाव आहे

https://www.aaichisavali.com/2018/12/MoringaLeavesStirFry.html?m=1

या लिंकवर फोटो आहे

धन्यवाद सामो

शेंगला नाव माहित नव्हते. मोरिंगा नावानेच शेवग्याची पाने इथे मिळतात, खूप म्हणजे खूपच हाय इन आयर्न असतात, रेग्युलरली खायला हवीत. त्याची १ भन्नाट रेसिपी मी केरळी बाई ची पाहिली युट्युब वर. कुणाला इंटेरेस्ट असेल तर देते. Happy
कडवट चव आवडत असली तर दाणे, खोब्रं, कांदा घालून कोरडी करता येईल.

काळा वाटाणा सांबार माझं आवडतं, पण तो मेला शिजतच नाही Sad .... आलं दु:खं बाहेर Wink

येस! कोकणातली आजच्या दिवशी केली जाणारी स्पेशल रेसिपी..
हे कॉम्बिनेशन सुद्धा आवडीचे आणि भोपळ्याचे वड्यासोबत सुद्धा आवडीचे.
वरच्या आंबोळ्या छान दिसत आहेत..

Pages