खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

चॉकलेट्स मस्त…. मोर्डे कंपाऊंड वापरले का??

मी एका दिवसाचा चॉकलेट मेकिण्ग कोर्स केलेला १०-१५ वर्षांपुर्वी. तेव्हा प्लॅस्टिक मोल्ड आणले होते. काल येताना ते सोबत घेऊन आले. वेगवेगळ्या फ्लेवरची चॉकलेट बनवायचा विचार आहे. प्रॉब्लेम हा की सगळी माझ्याच पोटात जातील Happy Happy

आज पोळा म्हणून पोळी. अर्थात पुरणाची आणि होम मेड.

सोबत आमसुलांचे सार / कट / आमटी.

मस्त Rhyme होते पोळा - पोळी. Lol
05d6b72f-3a3d-483d-bc59-59154551f73e.jpeg

अनिंद्य, तुम्ही केलीत का?? एकदम क्रेविंग आले पु पो खाण्याचे. इथे विकतची मिळते पण घरची मजा त्यात नाही.

कोको पावडर, मिल्क पावडर, पिठीसाखर आणि बटर एवढेच घटक वापरले. तू नळी वर बघून केले पहिल्यांदाच.

@ साधना,

सौभाग्यवती मुख्य भूमीकेत आणि मी पाहुणा कलाकार होतो.

बाहेरची कोरडी वाटते + री हीट करुन मज़ा येत नाही. “Hot desserts”हा आपला भारतीय USP का सोडायचा गार वातड पुरणपोळी किंवा गुलाबजाम खाऊन ?

घरी केली तर कमी गोड, कमी जाड, कुरकुरीत टेक्शर, मनाप्रमाणे तूप + तवा-ताट-तोंड यांची सुपरफास्ट धावस्पर्धा असे हजार नखरे करता येतात Happy

विकतची ती सुद्धा नकली म्हणजे महाराष्ट्रीय टच नसलेली प्लास्टिक पिशवीत येतात तसली पुरणपोळी एकदा घरी आणली होती. अर्थात पुरणपोळी म्हणून नाही तर टी टाईम स्नॅक्स म्हणून आणली होती. साहजिकच मला बोअर आणि सुकी वाटली. अन्न वाया कुठे घालवावे असा विचार करत एक ट्राय म्हणून मी त्यावर भरमसाठ तूप चापडून चोपडून तिला ओवन मध्ये गरम केले. आणि काय आश्चर्य. ती खाणेबलच नाही झाली तर चक्क आवडली. मी त्यानंतर सुद्धा पुन्हा काही वेळा ती विकत घेऊन तसेच करून खाल्ले इतपत आवडली. पण अर्थात टी टाईम स्नॅक्स म्हणूनच. सणासुदीला कोणी तीच मला पुरणपोळी म्हणून दिले तर तोंड आंबट होईल. तिथे आईच्या हातचीच हवी.

आजचा मेनू..
चायनीज पार्टी !

IMG-20240904-WA0017.jpg

चायनीज बाहेरपेक्षा नेहमी घरचे जास्त आवडते. बाहेरचे एकाच जागेहून दोन तीन पेक्षा जास्त वेळा ऑर्डर केले की बोर होऊ लागते Happy

तोंपासू दिसत आहे.
येस्स बाहेरचे चायनिज कधी कधी मंचुरियन वगैरे आतून कच्चेच असतात, तर कधी नूडल्स ओव्हरकूक्ड.
घरचं मस्त लागतं.

तसेच गेली अनेक वर्ष, घरचा पिझ्झच हीट जातो, थीन बेस वरचा & पोटात ४ भाज्या पण जातात.
बाहेरचा खूप महाग, अ ति चीज चा मारा, फक्त एखादी भाजी/ चीज पिझ्झा असा प्रकार असतो.

धन्यवाद
हे लपवून ठेवले होते मी.
लेकरांना समजत नाही त्यांनी एका मोल्ड मधले संपवले एकाच फटक्यात.
Lol

>>>>त्यावर भरमसाठ तूप चापडून चोपडून तिला ओवन मध्ये गरम केले. आणि काय आश्चर्य. ती खाणेबलच नाही झाली तर चक्क आवडली.
मस्त.

आशू, मला पिझा मात्र बाहेरचा आवडतो. त्यात सुद्धा नॉर्मल हॉटेलमध्ये इंडियन स्टाईल मिळतो तसा नाही आवडत फार. कारण हेच की त्यात भाज्या जास्त असतात ज्या मला आवडत नाहीत. मला चीज मध्ये इंटरेस्ट असतो. पण चीज मला पिझा मध्येच आवडते. सँडविच पावभाजी किंवा कुठल्याही भाज्या यात बिलकुल आवडत नाही. तरी हल्ली लेकीमुळे चीज मॅगी आवडू लागली आहे. बनवतो मीच त्यामुळे सुद्धा असेल.

बाकी चायनीज घरी बनवण्याचा अजून एक एडवांटेज म्हणजे मुलांच्या आवडीनुसार कमी तिखट बनवता येते. वरचा फोटो जरी भडक झणझणीत वाटत असला तरी तिखटपणा मुलांना झेपेल असाच आहे. स्पेशली मंच्युरीअन ड्राय आणि ग्रेव्ही दोन्हीवर तुटून पडतात ते..

भाज्या जास्त असतात ज्या मला आवडत नाहीत. मला चीज मध्ये इंटरेस्ट असतो>>> म्हणजे तुमच्या घरात ३ बाळं आहेत ज्यांना जबरदस्ती भाज्या घाऊ घालणे टास्क आहे Lol

सौंच्या जयपुर दौऱ्याचे फलविशेष- जाळीदार घेवर. यानंतर आता परत मकरसंक्रांतीलाच खाता येतील.

d751cfd1-aef2-4331-a262-1a82c51667ea.jpeg

असे बेसिक आवडतात, वर भदाभदा साखरयुक्त रबडी फासलेले घश्यात अडकतात.

आणि फेमस रावत कचोरी. Fully Stuffed and Just the right amount of spice. मझा आला !

2c00256d-f28c-4787-a6fa-69fc08e9d189.jpeg

वर aashu29 यांनी लिहिले होते तेव्हांपासूनच कचोरीचे क्रेव्हिंग होते फार. Happy

आशू हो Lol
प्राजक्ता धन्यवाद Happy

@ कचोरी, जी आपल्याकडे चाट-फरसाण दुकानात मिळते, मध्ये खड्डा करून त्यात दही विथ गोड तिखट चटण्या आणि शेव टाकून देतात तशी आमच्याकडे फार आवडते. काही दुकानात ती कात्रीने कापून देतात जेणेकरून खायला सोयीचे पडेल. पण त्यात मज्जा नाही. त्यात सगळ्या चटण्या शोषल्या जातात. खरी मजा डबक्यातून रस ओघळण्यातच आहे Happy

मानव, दिल्ली 6 जसे परांठा-चाट-कबाब साठी तसे जयपुर 6 घेवर साठी जगत्प्रसिद्ध. पारंपरिक हलवाई फक्त श्रावण आणि मग पौष महिन्यातच विकतात, ते बेस्ट. जितके कमी add ons तितकी श्रेष्ठ चव Happy

घेवर अगदी मधमाश्यांच्या पोळ्यापासून तयार केल्या सारखे दिसत आहे.>>>> हेच लिहीणार होते.
ओव्याच्या पानांचा भात!
20240905_194652.jpg

फोटॉ क्लॅरीटी जबरदस्त आहे अनिंद्य. तोंपासू.
कचोरी यम्म्म्म्म.
घेवर मला आवडत नाहीत, एकदा बोसट्/शिळा वास येणारे खाल्ले तेंव्हापासून ते आवडत नाहीत.

…फोटो क्लॅरीटी जबरदस्त…

थँक्यू. ७ वर्ष जुना iPhone करतोय काम Happy घेवर मी वर्षातून दोनदा खातो. मुहूर्त आणि सोर्स पाहूनच.

मंजूताई, रंगीबेरंगी भात छान. मी असा ओव्याच्या पानांऐवजी ताजी पालक प्यूरी टाकून करतो.

Pages