Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छल्ला मस्त झालिये भाजी.
छल्ला मस्त झालिये भाजी.
अनिंद्य >> आमच्या कडे कधी कधी उकडपेंडी आणि कधी कधी भाजणीचे उप्पीट म्हणतात.
ऋतुराज, ऋन्मेष, अनिंद्य >> धन्यवाद
बाजरीचीच भाकरी आहे. पण ती फ्रोजन फक्त घरी भाजलेली आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
केया > धन्यवाद. फार काय विशेष रेसीपी अशी नाही. आधी कोरडे खोबरे, धणे, जीरे, लाल मिरची, मिरे, खसखस हे कोरडे भाजून घेतले. मग थोड्या तेलावर कांदा आणि लसूण भाजून घेतला. हे सगळे बारीक वाटून घेतले. एका कढईत तेल घेऊन त्यावर चार चिरा पडलेली वांगी शालो फ्राय करून घेतली. ती बाजूला काढून ठेवली. मग त्यात मोहरी हिंग फोडणी करून त्यात वाटलेला मसाला परतला. पाणी घालून उकळले. थोडे हळद आणि अगदी चिमूटभर पाहिजे तो मसाला घातला. मग उकळली आलेल्या रस्यात वांगी सोडली. ती शिजली की फायनली मीठ आणि हवे असल्यास गूळ घालून सारखे केले. वरून कोथींबीर.
आज मी रणबीर ब्रारच्या
आज मी रणबीर ब्रारच्या रेसिपीने पुदीना चिकन हंडी व मदतनीस मुलीने लच्छा पराठा बनवला.
फोटो काढायला विसरले.
फोटो काढायला विसरले..>>> छान
फोटो काढायला विसरले..>>> छान झाले, आम्हाला कोबी पराठे खायचे आहेत.
धनि..वेगळी आहे रेसिपी.. मिरे
धनि..वेगळी आहे रेसिपी.. मिरे आणि खसखस कधीच वापरली नाहीये वांग्याच्या भाजीत.. दाकू आणि खोबरे घालते..
Pages