Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो हा कमल हसन चाच दोष आहे
हो हा कमल हसन चाच दोष आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रक्षाबंधन मुळे वायफाय बहिणी
गचु
फारएण्ड >>> तुफान पोस्ट
फारएण्ड >>> तुफान पोस्ट
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
याचा स्वतंत्र धागा निघालाच पाहिजे.
फा
फा![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आलोकनाथ रॅण्डमली मरतो>>>
आलोकनाथ रॅण्डमली मरतो>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
वेगळा धागा पाहिजेच यासाठी!
फारएन्ड
फारएन्ड![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
K3G ने वैताग आणलेला.
Overmarketing होते
गारवा ऑडिओ कॅसेट घेतली की K3G फ्री
एकाने बिंदीया चमकेगी गाणे असलेली कॅसेट घेतली त्यालाही K3G फ्री.
आमच्या रूम मध्ये आम्ही 4 जण होतो आणि K3G च्या 6 कैसेट्स होत्या
कधी नव्हे ते लतादीदी चा सूर कानावर पडल्यावर तोंडावर नापसंती छटा यायची ती , त्यातली धून ऐकून.
पिक्चर बघणे तर दूरच.
नंतर अचानक तो चित्रपट सुपर डुपर हिट असल्याची बातमी आली.
चाची 420 तुफान भारी भट्टी जमलेला चित्रपट.
“Overmarketing होते” - अ
“Overmarketing होते” - अ तिप्रचंड!!! सिनेमात अभिषेक बच्चन आहे इथपासून सचिन तेंडुलकरचा कॅमिओ असणार आहे इथपर्यंत गोष्टी ऐकल्या होत्या.
फा - घेच बाबा मनावर - एकदा एक यश रायचंद असतो ….
> फा - घेच बाबा मनावर - एकदा
> फा - घेच बाबा मनावर - एकदा एक यश रायचंद असतो …
+१ त्यातली ती शहरुख ची हेलिकॉप्टर एंट्री अगदीच पुचाट होती.
(मेरी नजरसे….) कभी खुशी कभी
(मेरी नजरसे) कभी खुशी कभी घम (स्पेलिंग त्यांनी केलंय. मला नका विचारू)
करीनाचे नाव पूजा असले तरी तिने लंडनमधे ‘पू’ नाव धारण केलेले असते. तिच्या भुमिकेला एवढे सुटेबल नाव सापडले नसते.
लहानपणीचा चब्बी मुलगा मोठेपणी एकदम चिझल्ड हृतिक होतो. करीअर, सेटल होणे वगैरेची चिंता नसल्याने बिछडलेल्या भावाला शोधणं हाच त्याच्या आयुष्याचा पर्पज असतो.
आलोकनाथ रॅंडमली मरत नाही. शाहरुख परंपरेच्या नावाखाली काजोलबरोबर ब्रेकऑफ करायला येतो तेव्हा (मिठाईवाला, नॅचरली तुपकट बाऊजी (दुसरं कोण?)) आलोकनाथ मेल्यामुळे काजोलचा आधारवड बनून तिच्याशी लग्नच करून टाकतो. तेव्हा जे काय प्रेमाचे २-४ क्षण दाखवलेत तेवढेच. अदरवाईज आग और पानी में जेवढी केमिस्ट्री असेल तेवढीच केमिस्ट्री शाखा-काजोलमधे आहे. पण न पाहिलेल्या बाईने करवा चौथसाठी सरगी पाठवल्यामुळे तिला भरून वगैरे येतं.
एरवी काजोल ‘तुम मुझे चांदनी चौक से बाहर निकाल सकते हो, पर मेरे अंदर से चांदनी चौक कैसे बाहर निकालोगे?’ मोडमध्ये वावरते.
मुळात त्यांना दिल्ली सोडून लंडनला का जावं लागतं समजत नाही. नालासोपारा/भिवंडी/विजयवाडा/तिरुचिरापल्ली इथेही राहू शकले असते. रायचंद थोडाच जाणार होता शोधायला? ‘जन गण मन’लाही प्रॉब्लेम आला नसता. पण करण जोहरचा पिक्चर….
तिसरी चौथीत असलेला हृतिक पार ग्रॅज्युएट झाला तरी एका पोराचे आईबाप असलेले का-शाखा क्रायोजेनिकली फ्रीज केल्यासारखेच दिसतात. शाखा नॉर्मल जॅकेटमधून सुटमध्ये व का सलवारसुटमधून साडीत येवढाच फरक. परंपरेने हाकलवले तरी का पारंपारिक पोशाख काही सोडत नाही. साउथ हॉलमधल्या पंजाबिणी एकवेळ वेस्टर्न कपडे घालतील पण केजोच्या लंडनमधल्या पंजाबिणी मात्र दिल्लीत दिवाळी पार्टी करत असल्यासारख्या वावरतात.
मध्येच २ आज्या एकदम पांढऱ्या शुभ्र कपड्यात पॉश आश्रमात का कायश्याश्या ठिकाणी भेटतात आणि एक आज्जी मरून जाते. (असले आश्रम कुठे असतात? तिथे कपडे एवढे छान कोण धुवून देतं? डेथ सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम नाही का होत?) म्हणून समस्त रायचंद कुटुंब तिथे भेटतं व तिथे जया भादुरी एक ड्वॉयलॉक मारून रिबेल करते. आधी का करत नाही कोण जाणे? किंवा बापाने घराबाहेर काढलं तर आई-मुलाने एकमेकांशी संवाद न ठेवण्याचं कारण काय?
राणी मुखर्जी हुश्शार. या दलदलीत पाय घातला नाही. काठावर उभं राहून तिने मस्त डान्स केला. थोडक्यात निसटली.
धमाल चालू आहे
धमाल चालू आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
के3जी चा वेगळा धागा झालाच पाहिजे!!
फा आणि माझे मन, धमाल
फा आणि माझे मन, धमाल लिहिलयं! पेशल धागा हवा.
पुढची "जय जय जय जय हे" ही ओळ
पुढची "जय जय जय जय हे" ही ओळ मात्र तो विसरतो >>> त्यापुढचे ह्रितिकने शिकवलेले चिमखडे बोल बरे लक्षात राहतात आणि!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शाखा लंडनला जाउन नक्की काय करतो हे मला अजूनही समजलेले नाही >>> त्यांच्याकडे लंडनला जायची एक आपली जनरल परंपरा आहे (म्हणजे परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन मधलीच असावी ती). मग शिकायचं असेल तरी लंडनला, घर सोडून रहायचं असेल तरी लंडनला वगैरे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला अजून ती पत्ता शोधून देणारी वेबसाईट चेक करायची आहे
बाकी पण असंख्य रत्नं आहेत यात, का सोडलीस फा?
चब्बी मुलगा मोठेपणी एकदम चिझल्ड हृतिक होतो >>> माझेमन
लहानपणी काळे असलेले ह्रितिकचे डोळे मोठेपणी अचानक घारे होतात हे ही लिही!
मला अजूनही राणी मुखर्जीशी शाखा ने लग्न न केल्याने परंपरेचा भंग कसा होतो ते समजलं नाहीये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
“ लहानपणी काळे असलेले
“ लहानपणी काळे असलेले ह्रितिकचे डोळे मोठेपणी अचानक घारे होतात हे ही लिही!” - ज्जेब्बात!! डोळ्यांचा रंग बदलतो, अकरावं बोट फुटतं.
मॅचच्या शेवटच्या बॉलवर षटकार मारून मॅच जिंकून देतानाही मॅच सुरू होण्याआधी असणारी लकाकी त्या रेड चेरी वर असते.
लकाकी त्या रेड चेरी वर असते >
लकाकी त्या रेड चेरी वर असते >>> काय अभ्यास काय अभ्यास!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मॅचच्या शेवटच्या बॉलवर षटकार
मॅचच्या शेवटच्या बॉलवर षटकार मारून मॅच जिंकून देतानाही मॅच सुरू होण्याआधी असणारी लकाकी त्या रेड चेरी वर असते. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
यावरून आठवले. या सगळ्या "हीरोने शेवटच्या बॉलवर सिक्स मारून मॅच जि़कण्याच्या" सीन्स मधे प्रतिस्पर्धी कॅप्टन इतका बिनडोक असतो की हीरो सिक्स मारायचा प्रयत्न करणार हे माहीत असून स्वतःसकट सगळे फिल्डर्स "आत" लावतो व त्यांना उलटे पळत जाउन कॅच पकडायचा प्रयत्न करावा लागतो.
केथ्रीजी बद्दल थोडे थांबा पब्लिकहो. "संयुक्त" धागा उघडतो. माझेमन, र्म्द, व इतरांच्या कॉमेण्ट्स धमाल आहेत. आशू२९ - हो तो सीन एकदम डोक्यात जाणारा आहे. उगाच अकारण हेटाळणी करते तिची.
धागा उघडला आहे. लाभ घ्या व
धागा उघडला आहे. लाभ घ्या व द्या. तुमच्या पोस्ट्सही तिकडे कॉपी करा म्हणजे तुमच्याच आयडीच्या नावाने येतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
https://www.maayboli.com/node/85510
फारच धमाल धागा आहे तो फारएण्ड
'कल्की' नेटफ्लिक्सवर आला आहे, का बघायचाय पण? ज्यांच्याकडे नेटफ्लिक्स नाही, त्यांना समाधान वाटावे अशी आनंदाचीच बातमी आहे खरेतर.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
महाभिकार, भंगार, बंडल शब्दही कमी पडावेत व माणूस निशब्द होऊन 'टॉम अँड जेरी' बघायला जावा एवढी ताकद आहे. प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन तिघेही इतके विचित्र दिसत होते. कथाही विचित्र होती किंवा कथा नव्हती फक्त VFX होते आणि त्याच्या आसपास आवाज, हो..तोंडानेच काढून संवादनिर्मिती, पात्रनिर्मिती वगैरे केली असावी. प्रभास अतिशय जड, मंद वाटला. चपळाई नसताना मारलेल्या उड्या बऱ्या दिसत नाहीत.
काही संवाद चालू असताना मधेच अलेक्सा टाईप मशीन आगाऊ बोलत होते . मारामारी आधी तेलगू जुने गाणे आणि मारामारी सुरू झाली की 'मैनू लेहंगा लेले मेहंगा' टाईप बीट्स असणारे पंजाबी गाणे सुरू झाले. सगळ्याच वंशाचे लोक एक्स्ट्रा म्हणून घेतले होते व सगळेच्या सगळे 'हिंग्लिश' बोलत होते. व्हिलन हस्तर सारखा वाटला. शरीरावर सात-आठ प्लग लावून चार्ज करत ध्यानात बसला व उठून कुणाला तरी मारून पुन्हा केबल लावून ध्यानस्थ बसला. 'ये ह्यूमन बिईंग भी बडे वीक होते है, अब वॉर तो होके रहेगी' ,'इतने युनीट्स वेस्ट कर दिये,' भैरवा बडा क्रेझी है, काशीको तुम्हे प्रोटेक्ट करना पडेगा' वगैरे संवादांची रेलचेल आहे. चीप क्वालिटी व्हिडिओ गेम बघतोय असा त्रास डोळ्यांनाही होऊ लागला.
अचानक रामगोपाल वर्मा दिसला व प्रभासला दाक्षिणात्य उच्चारात म्हणाला 'पाईव ताऊजंड युनिट्स का ये सिरम है, सिर्फ कॉम्प्लेक्स में मिलता है'. नंतर दिशा पटनीने प्रभाससोबत 'बेस्ट फ्रेंड-बेस्ट फ्रेंड कुस्ती' खेळली. ही नेहमीच 'जॉग ब्रा'ची जाहिरात करत फिरत असते. काळ डिस्टोपियन असो, सद्य असो वा अंबानीकडचे लग्न असो. घेतला वसा टाकत नाही. नंतर प्रेग्नंट बायकांची प्रयोगशाळा दाखवली, दीपिका 'फर्टाईल' नसतानाही प्रेग्नंट झाली म्हणे. यशस्वीपणे प्रयोगातले सिरम गर्भात न सांभाळू शकणाऱ्या स्त्रियांना मोठ्या मशीनमध्ये घालून आपापले सिरम परत काढून, गडगडणाऱ्या घसरगुंडीवरून आगीत लोटले.
असह्य होऊन बंद केला.
अस्मिता ,
अस्मिता ,
राजामौळी देखील आहेत गेस्ट अपियरन्स राम गोपाल वर्मा सारखा. व्हिडिओ गेम आणि इकडून उचल, तिकडून उचल असेही वाटले VFX
संपता संपेना आणि संपल्यावरही संपला नाहीच.
अजून एक पार्ट येणारे.
व्हिलन कमल हसन हाय
तेवढा बघूच शकले नाही, नाहीतर
झकासराव,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
संपता संपेना आणि संपल्यावरही संपला नाहीच.>>>>
तेवढा बघूच शकले नाही, नाहीतर हे टायपायला जिवंत राहिले नसते. कार्टून अमिताभ अतिशय वाईट दिसत होता, कमल हसन ओळखूच आला नाही. माहिती नव्हते काहीच. सहजच लावला पण आवर्जून बंद केला.
Arrival मागे बघितलेला तेव्हा
Arrival मागे बघितलेला तेव्हा समजला नव्हता आणि त्यामुळे आवडला नव्हता. आज परत बघितला. समजला आणि आवडला.
अस्मिता
अस्मिता![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आम्ही कल्की थेटरात तेलुगू पाहिल होता.. आवडला सगळ्यांना..
काल हिंदीत परत पाहिला...
स्त्री 2 बघितला...आमच्या
स्त्री 2 बघितला...आमच्या गावात चक्क हिंदी सिनेमा आलेला आहे...
त्रिपाठी, राजकुमार राव, तो एक खुराणाचा भाऊ आणि पाताल लोकचा हातोडा..चौघांची कॉमेडी धमाल...आवडला...मजा आली..हहपुवा...
कल्की चा असा रिव्ह्यू
कल्की चा असा रिव्ह्यू लिहिल्याबद्दल धन्यवाद. मी तो पाहिल्यापासून का पाहिला मोडमध्ये आहे.
कल्की या रत्नासाठी सेपरेट
कल्की या रत्नासाठी सेपरेट धागा करण्याची गरज आहे. अस्मिता, मी_अनू मनावर घ्या.
कल्की नेफ्लि वर आला म्हणून
कल्की नेफ्लि वर आला म्हणून दोन वेळा बघायचा प्रयत्न केला. झोप च लागतेय. महा भयंकर बोरिंग. एक तर ते तसले व्हिडिओ गेम टाइप व्हिएफेक्स, अल्ट्रा फ्युचरिस्टिक डिस्टोपिअन जग, विचित्र अवतारातले व्हिलन्स हे मुळातच आवडत नाही. हिंदीत तर अगदीच ऑड. त्यात जो लेखक सौदिंडियन सिनेमातले खेडेगावातल्या अचाट हिरोचे टिपिकल चोळी परकर की हाफ साडीतल्या गाव की गोरीसोबत छेड्छाड चे सीन्स लिहितो त्यानेच फ्युचर वर्ल्ड मधले ड्रॅमॅटिक अॅक्शन सीन्स लिहिले तर जे काय होईल ते सुजर्या प्रभास चे मेलोड्रामॅटिक सीन्स, अमिताभ चा ए आय जनरेटेड यंग अवतार,दीपिकाचे कंटाळवाणे कॅरेक्टर - जवान मधे काय किंवा पद्मावती काय किंवा इथे काय सेमच दिसणे वागणे. त्या व्हिलन च्या एन्ट्री चा सीन जेम्तेम पाहिला अन मग धन्यवाद करून टाकले.
स्त्री-२ पाहिला काल रात्री
स्त्री-२ पाहिला काल रात्री थिएटरमधे. छान आहे. मला पहिला भाग खूप आठवत नव्हता, पण त्यामुळे काही फारसं अडलं नाही.
ही नेहमीच 'जॉग ब्रा'ची
ही नेहमीच 'जॉग ब्रा'ची जाहिरात करत फिरत असते. काळ डिस्टोपियन असो, सद्य असो वा अंबानीकडचे लग्न असो. घेतला वसा टाकत नाही >>>
फक्त VFX होते आणि त्याच्या आसपास आवाज, हो..तोंडानेच काढून संवादनिर्मिती, पात्रनिर्मिती वगैरे केली असावी >>>
चपळाई नसताना मारलेल्या उड्या बऱ्या दिसत नाहीत. >>>
संपता संपेना आणि संपल्यावरही संपला नाहीच. >>
त्यात जो लेखक सौदिंडियन सिनेमातले खेडेगावातल्या अचाट हिरोचे टिपिकल चोळी परकर की हाफ साडीतल्या गाव की गोरीसोबत छेड्छाड चे सीन्स लिहितो त्यानेच फ्युचर वर्ल्ड मधले ड्रॅमॅटिक अॅक्शन सीन्स लिहिले तर जे काय होईल ते सुजर्या प्रभास चे मेलोड्रामॅटिक सीन्स >>>> अस्मिता, झकास, मै
येउ दे नवीन धागा. नेफिवर गेले दोन तीन दिवस समोर येत असूनही अजूनही क्लिक करावासा वाटलेला नाही.
इंडियन2 काल 15 मिनिटं पाहिला
इंडियन2 काल 15 मिनिटं पाहिला.काहीही आहे.पण कमल हसन 5 मिनिट मराठी आणि 5 मिनिट गुजराती बोलला याचे कौतुक वाटले.
मी घरातल्या लहान मेम्बराना हे समजवायचा पदोपदी प्रयत्न केला की हिंदुस्तानी इतका वाईट नव्हता, अगदी त्यात बाईचा मासा, माश्याचा सिंह सिंहाचा हंस बनून उडून जातो वगैरे लीला असल्या तरी.पण 25 मिनिट इंडियन 2 चा ट्रॉमा इतका होता की लोक 'आता 5 मिनिट पण हिंदुस्तानी बघायला नको' म्हणाले.
चपळाई नसताना मारलेल्या उड्या
चपळाई नसताना मारलेल्या उड्या बऱ्या दिसत नाहीत>>> अस्मिता![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अनू कल्की बघून ही १ ओळीत आटोपलेस..नॉट फेयर.
मी अनेक दिवसांनी काल स्त्री २ थियेटर ला पाहिला. एक्दम फुल्ल टू पैसा वसूल, कॉमेडी पण जेन्युईन & हसवणारी आहे, व्हॉअॅप वरून ढापलेली नाही. जंप स्केयर आहेत भितीदायक असा नाही पण पीजी १३ आहे. पुर्ण थियेटर खदखदून हसत होते.
राजकुमार, पंकज त्रि. & अभिसेह्क बॅनर्जी अभिनय एकदम मस्त.
ह्या भागात अपारशक्ती ला फारसे काम नाही. श्रध्दा ला एंट्री मस्त दिलीये, बाकी मधाळ हसायचे , गोड दिसायचे आणि राजकुमार ला साथ द्यायची हे काम चांगले केलेय तिने.
विषेश मेन्शन म्हणजे- तमन्ना. ही बाई पडद्या वर काय दिसते :O म्हणजे पुरुष तर पुरुष, स्त्रियांची नजर ही हटत नाही, चेहरा, नाच, त्वचा आहाहा सोउंदर्याचा आयटम बाँब. फार आकर्षक दिसते.
जना (अभिषेक) च्या आई च्या
जना (अभिषेक) च्या आई च्या भूमिकेत पंचायत मधील भूषण ची बायको आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages