बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे. बघितलं नाही दोन दिवस. समहाऊ कंटाळाच आलाय. पिकनिक गँगला आता सरेंडर गँगही म्हणावं लागेल की काय. अभिजीत जखमी झाला आहे काय, एक फोटो बघितला.

टीम बी उर्फ पिकनिक गँग मधील सगळ्यांनी निक्कीला थँक्यू म्हटले पाहिजे. तिने बॅग परत दिल्या म्हणून पिकनिक ग्रुप खेळू तरी शकला आणि आता त्या टीम मधून एक कॅप्टन उमेदवार ही मिळेल. बिग बॉसला यांच्यावर दया आली म्हणून त्यांनी मध्यस्ती केली नाहीतर हरले होते बिचारे. आर्याला तर शून्य गेम कळतोय. तिकडे अभिजित, अंकिता नंतर जर कोणाला टॉप 5 मध्ये न्यायचे असेल तर हीचा नंबर येऊ शकतो (सगळ्याच लंगड्या गाई किंवा सगळी वासरे). निक्कीने बॅग परत केल्या नंतर ही बॅग चोरत होती. किती ते कॉपी कॅट.

बायस्ड संचालक ही ग्रुप बी मध्ये सामील झाली आणि 8 विरुद्ध 7 असा संखिकी खेळ असताना, त्यात ग्रुप ए मध्ये सूरज, घनश्याम, निखिल व योगिता असे निष्क्रिय खेळाडू असताना सुद्धा पिकनिक गँगने बॅग किती भरल्या/वाचवल्या तर 8 आणि यांनी भरल्या/वाचवल्या 11. तरी बर सूरजने थोडावेळ वैभवला अडवले. निखिल तर शून्य उपयोग. शेवटी पहिल्या फेरीत जिंकले हेच. मग वर्षा आजीबाई आणि पॅडीकाका नी माघार घेतली. त्यांना बहुतेक पहिल्या दिवसापासून कॅप्टन बनायचे नाहीये. या आधीही एक दोन वेळा यांनी थेट माघार घेतली होती. आता दुसऱ्या फेरीत अरबाज आणि निक्कीने अटॅक करायला घेतला तर यांची पुन्हा दैना होणार. बघुया आज काय होतय.

ग्रुप बी फॉर बावळट !!! सगळे जुने बिबॉ न बघताच आलेत का? अजिबात कळत नाहीये त्यांना गेम.
आर्याला तर शून्य गेम कळतोय. >>>> अ‍ॅक्चुअली आर्याला एकटीला गेम समजतो असे वाटते पण तिला ग्रुप ला कन्ट्रोल करता नाही येत.
किती सरळ गोष्ट आहे. कोणताही टास्क फेअर खेळला जात नसतो, पिरियड. हे बिबॉ आहे हे ऑलिंप्क्स नव्हे सरळ गेम खेळायला Lol बिबॉ मधे कोणताही खेळ नियमाने खेळला जात नाही तर नियमातले लूपहोल्स ( जे इतकेही अवघड नसतात) पाहून जिंकला जातो. पिशवीत मोती भरायचेत तर फक्त मोती नव्हे तर पिशव्याही चोरीला जाऊ शकतात हे कळायला इतके का अवघड आहे ?? बाळाला दूध आणि लंगोट बदलायचा टास्क असेल तर वरकरणी दिसतात त्या नियमाने खेळले तर कोणीच जिंकणार नाही!! Lol मग दूध, लंगोट, किंवा बाळच पळवले तरच तुम्ही जिंकू शकता हे नविन नाहीये!! आर्याला कळते काय होणार आहे , काय चोरीला जाऊ शकते वगैरे . ती एकटीच फाइट करत होती. खर तर संचालक सुद्धा बाय्स्ड असणार हाही एक नियमच म्हणा. Happy वर्षाला तो चान्स होता. तिने म्हणायचे ना, तुम्ही पिशव्या चोरल्यात तर संचालक म्हणून मी ग्रुप बी ला विनर करणार.
बाकीचे अजून बिगुल वाजला नाही म्हणत रडत बसले. बावळट!!!
त्यात ग्रुप ए मध्ये सूरज, घनश्याम, निखिल व योगिता असे निष्क्रिय खेळाडू >>>> उलट टास्क मधे सूरज आणि घन्श्याम व्यवस्थित नडतात. योगिता आणि निखिल नक्कीच निष्क्रीय आहेत पण.

हाहाहा, निक्की पुढारीला रॅम्प वॉम शिकवतेय आणि पुढारी हायहिल्स घालून फॉलो करतोय तिला, काय नमुना आहे, कुठून आणले याला बिबॉ? अरबाझ निक्की पेक्षा ही पेअर एन्टरटेनिंग आहे, मला तर #निढारी हॅशटॅगही सुचलाय Rofl
https://youtu.be/Kn8lViiYdYI?si=R8img9ejCledttj7
निक्कीचे ड्रेसेस एक से एक मस्तं ग्लॅमरस आहेत बाकी , इतरांना इन्टिमिडेटिंग वाटेल असा वावर आहे तिचा , she’s here to rule !

टीम बावळट्ट ने पुन्हा मूर्ख निर्णय घेतले! कॅप्टनशिप साठी उमेदवारांचा क्रम लावण्याची पावर त्यांना होती. टीम ए ने त्यांच्या बुद्धीला ओवर एस्टिमेट केले Rofl त्यांना वाटले आता बहुमताने आपल्याला हे बॉटम ला ठेवणार आणि आपल्या टीम मधल्या योगिता, निखिल, सूरज ला जास्त गुण देणार. पण कसले काय सर्वात जास्त क्रम निखिल ला दिला पण २ अरबाज ला. अन ३ जान्हवी?? अन स्वतःच्या टीम मधल्या योगिता अन सूरज ला शेवटी ठेवला. काय हे लॉजिक !!!
अजून काय बोलायचं आता! :डोक्याला हातः

काय एकेक दिव्य नमुने भरले आहेत टीम बी मधे.... टीम ए स्पेशली अरबाज, निक्की पुर्ण तयारीनिशी उतरलेत... कितीही व्हिलनपणा केला तरी स्मार्ट खेळतात.... मोती टास्क मधे वैभव ला मुद्दाम दुसर्‍या टीम मधे टाकलं... तर त्याने हिरो बनायच्या ऐवजी माती केली... काल तर सांगत होता.. पिशव्यांमधे मोती कमी भरले, फेकुन दिले ईई ... थोडक्यात ज्या टीम मधे होता त्यांच्याशी चीटींग केली. आता परत शिव्या खाणार रितेश च्या... मठ्ठ आहे वैभव....
लंगोट चोरण्याच्या प्रसंगावरुन तरी मोती ठेवायच्या पिशव्या चोरी होउ शकतात हे टीम बी ला कळायला पाहिजे होतं... निक्की सगळ्या पिशव्या घेउन गेली.. ती कितीही आवडत नसली तरी हा बेस्ट गेम प्लॅन होता... टीम बी रडत बसले त्यामुळे शेवटी बिबॉ ला नाईलाजाने मधे पडावं लागलं... अरे माठांनो इतके पैसे घेतलेत...आधीचे सिझन जरा नीट बघुन अभ्यास करुन यायचं ना...
फ्रेंच फ्राईज च्या टास्क मधे पण टीम बी चा माठपणा.. निक्की अरबाझ ला सगळ्यात कमी फ्राईज द्यायचे ना... स्वतः च्या टीम ला जरा फेवर करायचं... अर्थात अरबाज, निक्की फ्राईज हिसकावुन घेउच शकतात त्यामुळे कोणालाही कितीही फ्राईज दिले तरी ताकदिने आणि डोक्याने खेळणाराच जिंकणार आहे आज...
निकी आणि छोटा पुढारी एकत्र बघवत नाहीत.... सोमीवर अतिशय घाण कमेंट आहेत त्याच्यासाठी. बाहेत आला आणी वाचलं तर रडेल....
हील्स घालुन कॅटवॉक .. काहीही... त्यावेळी निक्की ने भारी डायलॉग मारला त्याला. " तु कॅमेरा शोधु नकोस.. रस्ता शोध" हा हा हा...

निक्कीचे ड्रेसेस एक से एक मस्तं ग्लॅमरस आहेत बाकी , इतरांना इन्टिमिडेटिंग वाटेल असा वावर आहे तिचा , she’s here to rule ! >>
येस... एव्हन तिचे नाईट ड्रेसेस पण एकदम ग्लॅमरस असतात... नीट छान राहते.. अंकिता, आर्या, योगिता ने शिकावं जरा... अंकिता चा हिरवा स्वेटशर्ट बघुन कंटाळा आला.. निकी ला जोरदार स्पॉन्सर्स आहेत....बाकीच्याना मिळाले नसतील का ?

अरे काय गाढव लोक आहेत टिम बी, एकालाही पावशेर सुद्धा अक्कल नाही !
सूरजला सर्वात शेवटी ठेवले ? अरबाझ आणि जान्हवी नं २ आणि ३ ? अरे काय गांधीगिरी , खरच मठात प्रवोचन करायला पाठवा, बिबॉ मधे कसले फेअर रहायची खुमखुमी Uhoh
हाकला सगळ्यांना, एकाचीही लायकी नाही इथे रहायची !
आय कान्ट बिलिव्ह इट , पण आत्ता पर्यन्त सर्वात वाईट सिझन ४ होता त्यातले लोकही या मठ्ठोब्यां पेक्षा चांगले होते मग !
अपुर्वा, किरण माने, इक्या, तेजु , अमृता देशमुख या सगळ्यांबद्दल आता मला भयंकर आदर वाटायला लागलाय Happy

सूरजला सर्वात शेवटी ठेवले ? अरबाझ आणि जान्हवी नं २ आणि ३ ? अरे काय गांधीगिरी , खरच मठात प्रवोचन करायला पाठवा, बिबॉ मधे कसले फेअर रहायची खुमखुमी........
+1111111111
अगदी सहमत.
पण खर सांगायच तर,टीम Aजिंकणार हे जस निश्चित होत,तसच जिंकल्यावर जान्हवी,निक्की आणि अरबाज या त्रिकुटापैकीच कँप्टन होणार हेही निश्चित होत.
त्यामुळे सूरजला शेवटी ठेवल काय,किंवा दामलेला ,काही फरकच पडला नसता.
शेवटी मारामारी करायची आहे,पहिल्यावर अरबाजला ठेवल असत ,तर मारामारी झालीच नसती,करणार कोण,एकटा सूरजच,योगिताच्या चेहर्यावरची आतातर माशीपण हलत नाही.कधी एकदा घरी जाते अस झाल आहे तिला,दामले फार काही करेल अस नाही,
सूरजला पहिल ठेवल तरीही बाकीच्या त्रिकुटाने मिळून त्याला हरवलच असत.
तिसर्या सिझन मध्ये जस जय ग्रुप टास्कच कँन्सल होईल अस खेळायचा ,ते ही या बावळट ग्रुपला कळत नाही.खरच कोरी पाटी घेऊन आले आहेत.
खरतर तेही चांगल आहे,कारण अभ्यास करून आलेल्यांचा सिझन बघायला पण कंटाळाच येतो.पण मग बिबॉसने सगळेच विद्यार्थी न शिकलेले पाठवायचे.
हे म्हणजे बालवाडी विरुध्द पोस्ट ग्रँज्युएट अस चालू आहे.
तो वैभव बिनधास्तपणे काल हसत सांगत होता की मी बॉल्स कमी भरले,मुद्दाम एरिनासमोर अरबाजला जायला सांगितले. म्हणजे धक्क्यावर यावरून बोलणी खाता येतील आणि फुटेज मिळेल,हे ही यांना माहित आहे,इतक्या तयारीच्या लोकांसमोर तुम्ही नुकतच अ,आ इ गिरवायला लागलेल्यांना आणल आहे,कसा तग धरणार सिझन?
बिबॉस तर चक्क बुली गँगला.उघडउघड सपोर्ट करत आहे.
अभिजित सावंतला बहुतेक आता खरच पश्चाताप होत आहे की आपण इथे का आलो.कारण तो प्रथितयश मेनस्ट्रीममधला प्लेबँक सिंगर नसला तरीहघ त्याचे देशात आणि बाहेर भरपूर शोज चालू असतात,कदाचित त्याने आता सांगितल असाव की गणपतीपासून शोज चालू होतील,मला.मोकळ करा नाहीतर मानधन वाढवा.कारण इंटरेस्ट एकदम निघून गेल्यासारखा वागत आणि वाटत आहे.
एकंदरीत अँनालिसिस केला तर विनर बुली गँगपैकी एक, जर मागच्यावेळेसारख व्हिलन गँगमधल्यांना विनर केल,तसाच निर्णय झाला तर,नाहीतर 100%सूरज
मला तर तिसर्या आठवड्यातच खात्री पटली आहे की सूरजला करतील अनलेस त्याने स्वत:काही माती खाल्ली नाही तर.
बाकी सगळा सिझन अंधारच आहे.

एव्हन तिचे नाईट ड्रेसेस पण एकदम ग्लॅमरस असतात... नीट छान राहते.. अंकिता, आर्या, योगिता ने शिकावं जरा... अंकिता चा हिरवा स्वेटशर्ट बघुन कंटाळा आला..>>> +१
निक्की आणी गॅन्ग जेवढे एफर्ट घेतेय तेवढेही त्याना घ्यायची खरच गरज आहे का इतके बाकिचे मन्दोबा आहेत...एकातही विनिग अ‍ॅटिट्य्ड नाही, बीबॉस ने आडून आडून इतक सुचवल की फक्त टास्क आला की खेळु नका बाकी पण काहि ना काही करा...पण पिकनिक वाले आरामात बसुन असतात... टास्क मधेही आधिच गिव्ह अप मारतात.
यापेक्षा ऑडियन्सला घ्या....बघा कसे गेम खेळतात.

पिकनिक गॅंगला गेम आणि एकूण बिबॉ काही केल्या कळत नाहीये. योगिता, सुरजला खालचे क्रमांक दिले तर अरबाज, निकी आणि जान्हवीला वरचे. खेळ कळत नाहीये हे दिसतंय पण ज्यांना नाव ठेवायची त्यांनाच कॅप्टन म्हणून योग्य समजायचे. मज्जा आहे सगळी. तरी बिबॉ पिकनिक गॅंगला पूर्ण मदत करतोय. एकीकडे धनंजयने जान्हवीचे खाणे काढले त्यावरून शाब्दिक वाद झाले, अभिजितचे कोणी ऐकत नाही, अंकिता इमेज जपतेय तर पॅडी आपल्याच विश्वात दिसतोय. तर दुसरीकडे घनश्याम आणि निकीचे जे काही सुरु आहे, ते अगदी बोरिंग आहे. बिबॉ काही करा, जरा जुन्या खेळाडूंना परत आना.

बिबॉस तर चक्क बुली गँगला.उघडउघड सपोर्ट करत आहे. >>>> उलट आहे, ते बावळट ग्रुप ला चमच्याने भरवतायत, लिंबू टिंबू ला दोनदा आउट झाल्यावर एकदा आउट असे देतात तसेही देऊन झाले. पण या मठ्ठांना गेम काय तेच कळत नाहीये. सपशेल सरेन्डर करतात नाहीतर म्हणतात जाऊ दे मग आम्ही खेळतच नाही. निकी जसे सर्व प्रकारचे कन्टेन्ट भरभरून देते आहे त्यावरून तिनेच हा शो जिंकायला पाहिजे.
पुढारी आणि निकी एन्टरटेन करतात पण पुढार्‍याचे ताई ताई म्हणून मिठ्या मारण्यावरून सोमिवरचे पब्लिक हुर्यो उडवत आहे.
काल बावलट ग्रुप च्या पिकनिक सेशन मधे पण ते बोलणे चालू होते.
वीकेन्ड ला चांगले लाथाडले पाहिजे या बावळट ग्रुप ला.
अजून एक क्लिप पाहिली त्यात अ‍ॅज युज्वल पिकनिक सेशन सुरु आहे आणि जान्हवी त्यांना चिडवायला पिकनिक बास्केट नेऊन देते तिथे. तर हे लोक ख्या ख्या करत वर मीठ मसाला अन प्लेट्स मागतायत तिला Lol

योगीताचा प्रोमो पाहिला, सरप्राइजिंग्ली ती टास्क्स मधे भारी खेळतेय, निक्कीला लोळवतेय , चावतेय Proud मागच्या कॅप्टन्सीलाही छान खेळली होती !
इमोशनली स्ट्राँग राहिली तर आवडेल ती पब्लिकला !

चावली म्हणून बाहेर काढतील तिला Lol

एनिवे योगीताला टास्क समजतो अगदी ढोल अडवायचा, हेही ती सांगत होती, कोणी लक्ष दिलं नव्हतं, तिच्यात ठामपणा नाहीये, आपलं म्हणणं मांडण्यात कमी पडते. ती चांगली खेळते.

मी अजिबात बघितलं नाही या आठवड्यात.

ती अंकिता उलट पॅडी ला म्हणतेये= एका क्लिप मधे की योगिता ने अति केले. आपण डिग्निटी सोडून अनफेअर खळायचे नाही वगैरे. Uhoh भजन करा पिकनिक स्पॉट वर मग.

एक मात्र आहे कलर्सची हिरॉईन ही स्वभावाने जशी दाखवलेली, मनाने चांगली तशीच आहे. कलर्सची व्हिलन ही प्रत्यक्षात इथे तरी व्हीलनच आहे.

दामलेला पाठवा घरी, योगिता राहूदे. योगिताला मानसिक आधार द्या बिग बॉस. ती आणि सूरज चांगले प्लेअर आहेत.

ती अंकिता उलट पॅडी ला म्हणतेये= एका क्लिप मधे की योगिता ने अति केले. आपण डिग्निटी सोडून अनफेअर खळायचे नाही वगैरे. >>> धन्य अंकीता माताजी. आता हे योगिताला सांगून तिचा कॉन्फीडन्स नको घालवूस. जशास तसं ही म्हण माहीती नाहीये का माताजींना.

योगिता नडतेय तो प्रोमो बघून आले. पब्लिक खुश आहे तिच्यावर, कलर्स फेसबुक पेजवर लिहीलंय झिंज्या उपट त्यांच्या (निक्की, जान्हवी) आणि तुला बाहेर जायचं आहे तर त्यांना नडून जा.

सूरज … यस्स फायनली तिसर्‍या आठवड्यात या सिझनचा विनर दिसायला लागलाय !
सूरज आणि योगीता मस्तं खेळले , सूरज त्या बैलाला भिडला आणि योगीतानेही मस्तं दमवलं त्या २ म्हशींना Happy
सूरज काय अ‍ॅटिट्युड देत होता, अशा शून्यातून आलेल्या, हलाखीच्या परीस्थीततून आलेला माणुस जेंव्हा ट्स्स्क्स मधे चमकतो तेंव्हा ते वेगळ्याच लेव्हलला जाऊन बसतो टास्क..तिथे कोणी पैलवान वगैरे दिसत नाहीत मग स्क्रीनवर !
आर्या वरूनच निक्की अरबाझ अ‍ॅन्ड टिमला जे इरीटेट करत होती ते पण फार आवडलं , करेक्ट अ‍ॅटिट्युड आहे तिच्यात !
वर्षाताईंनी कौतुक केलं सूरजचं , छान वाटलं, थिस बॉय डिझर्व्स ऑल द अ‍ॅप्रिसिएशन !
आज टिम बी ने थोडफार टिम स्पिरीट दाखवलं, पॅडीही मस्तं टोमणे मारत होता , जर आम्ही पिकनिकला आलोय तर हे लोक काय हनीमुनला आलेत का ? :टाळ्या:
फोन टास्क मधे वर्षा उसगावकर अ‍ॅक्टिंग करत होती, अभिजीत, पॅडी जेन्युइन वाटले पण सूरजने इथेही बाजी मारली.
सूरज एकटाच १००% अनफिल्टर्ड रॉ आहे , त्याचं बोलणं खूप जेन्युइन आहे , आज सगळ्या इमोशन्स दाखवल्या त्यानी !
आजच्या एका एपिसोडवर व्होटिंग केले तर सूरज क्लिअर विनर आहे !
एक गोष्ट क्लिअर होतेय निक्की अरबाझ पेक्षा जास्तं कनिंग आणि दुष्टं वैभव आणि जान्हवी आहेत !
निक्की आणि अरबाझ आधी रिअ‍ॅलिटी शोज करून आलेत त्यामुळे निदान कॅमेरासाठी कधीतरी सॉफ्ट साइड दाखवतात पण वैभव -जान्हवी १००% व्हिलनगिरी करतात .

डीजे मस्त कमेंट.

योगिता, सुरज भारी खेळले. सुरजला एकट्याला ६५% वोटस असतात नेहेमी. तो एम सी स्टॅनसारखा काही न करता विनर होणार नाहीये, तर मस्त खेळून होईल विनर. रिपिट थोडा भाग या दोघांसाठी बघितला. जान्हवीचा रथ अजूनही चार बोटं वरती आहे. योगिताकडे काहीच फ्राईज राहीले नव्हते म्हणून खुनशी आनंद व्यक्त करत होती. ती नडली तुम्हाला ते बघा.

मालवणी भाषा महत्व अधोरेखित केलं मुद्दाम बिग बॉसने. मालवणी ही मराठीची बोली भाषा असूनही अरबाज आणि वैभव जे म्हणाले त्यावर पब्लिकने जाम झोडलंय. बघुया हा मुद्दा येतो का विकेंड वारमधे.

काल बावळट पिकनिक ग्रुप पैकी उसगावकर आणि अभिजित जान्हवीने फळ बास्केट दिल्यावर बिबॉसने खरच दिली आहे हे जान्हवीच बोलण खर मानून जी पलटी मारली आणि उठछन आत येऊन बसले,ते अंकितासारखच मलाहघ खटकल.
अरे इथे कोण त्या बिबॉसच ऐकत तरी आहे का,हे गेले उठून,आता बावळट नाही तर बिनडोक वाटायला लागले आहेत।
बाकी काल त्या ग्रुपकडून एक गोष्ट क्लिअर झाली की ते इमेज सांभाळूनच खेळणार,त्यामुळे आतातर ते भाऊंच पण ऐकणार नाहीत आणि बिबॉसच पण.
याआधीच बुली ग्रुपने बिबॉसला गुंडाळल आहे
त्यामुळे आता बिबॉसला च प्रश्न पडला असेल की आता करायच काय?
बावळट ग्रुपला ,विशेषकरून सूरजला सोमिवर सिंपथी आणि पाठिंबा मिळत असला तरी त्यांचा खेळ किती उंचावेल हा प्रश्न आहेच.सूरजला तर गेमही कळत नाही.पण वोट्स प्रचंड आहेत.जर यावेळी व्हिलन गँगचा विनर कोणी झाला,तर मराठी बिबॉस जवळजवळ बंदच होईल.
मग बिबॉसला या सिझनमध्ये केवळ आणि केवळ सहानुभूतीवर विनर करावा लागेल आणि तो एकच आहे.सूरज.

सहानुभूतीवर विनर करावा लागेल >>> कालचा एपिसोड पाहून तसे वाटत नाही.
काल सूरज एकदम छा गया!! टास्क मधे न घाबरता बैलाला नडला. तेही निकी - जान्हवी आम्हाला टच केले म्हणत वुमन कार्ड खेळण्याची वाटच पहात असून पण त्यांना काही चान्स न देता फाइट दिली त्याने!! आणि काल त्या फोन च्या फडतूस इमोशनल टास्क मधे पण त्याने एकट्याने बोललेले इतके जेन्युइन आणि टचिंग वाटले. बाकी सगळे नौटंकी. वर्षा आता दिवसेंदिवस ओवर नाटकी ( आणि चक्रम) वाटते आहे. अभिजीत ने काल बरा स्टँड घेतला संचालक म्हणून.
सूरज टास्क नंतर पण त्या दोघी मुलिंना जाऊन म्हणाला मी मुलींना टच करत नाही आणि केले नसते. माझ्या आईने मला शिकवलंय. अरबाज ला पण म्हणाला मी तुला हर्ट केले नसते वगैरे, अरबाज आणि व्हिलन गँग पण नरमाईने बोलली नंतर त्याच्याशी.
एका अनसीन क्लिप मधे पण सूरज बावळट गँग शी बोलताना म्हणतो, त्याचे एका मुलीवर प्रेम होते पण तिने शहरातला गोरा मुलगा पसंत केला आणि याला गुलिगत धोका दिला, त्यानंतर मग याने टिक्टॉक स्टार होऊन स्वतःचे नाव करून दाखवले. अभिजीत आणि इतर त्याला काय नाव त्या मुलीचे असे विचारतात तर सूरज ने अजिबात सांगितले नाही, म्हणे ती तिच्या अयुष्यात सुखी आहे , ती राहू देत मी कशाला त्यात बिब्बा घालू. मी अनाथ मुलीशी लग्न करणार आहे असेही एकदा म्हटला होता एका क्लिप मधे. थोडक्यात, दिसतो तितका आणि इतर त्याला समजतात तसा बेअक्कल नाहीये तो, आणि अडाणी असला तरी सुसंस्कृत आहे. असाच खेळत राहिला तर नक्कीच विनर पोटन्श्यल आहे त्याच्यात.

सहानुभूतीवर विनर करावा लागेल >>> कालचा एपिसोड पाहून तसे वाटत नाही.
काल सूरज एकदम छा गया!....
काल सूरज भिडला,वादच नाही.पण सहानुभूतीसाठी एवढ्याचसाठी,की,त्याला टास्क अजिबात कळत नाही,स्टँड घेता येत नाही,त्याच्याच ग्रुपमधले त्याला सहज मँनिप्युलेट करतात तर बुली गँग तर सहज आपल्या बाजूला वळवेल.
बर ,तो काल भिडला,पण सोमिवर पहिल्या आठवड्यापासून त्याला प्रचंड सपोर्ट आहे.
खेळून सपोर्ट मिळाला तर ठीक आहे,पण अस सिंपथीवर मिळणार असेल,काहीही कंटेंट न देता तर मग ज्यांच्या जीवावर शो सध्या खेचला जात आहे,ते कितीही सोमिवर व्हिलन असले तरी त्यांना विनर न करण, हेही अयोग्य ठरेल.

सिंपथी आहे त्याला त्याच्या अर्थिक परीस्थीती मुळे पण अजुन एक कारण म्हणजे तो निदान खेळतोय अलफिल्टर्ड , त्याचा वावर पॉझिटिव आहे , बाकी टिम बी मधले सगळे शुद्ध तूपातले लोक सभ्यतेचा बुर्॑खा पांघरून बसलेत आम्ही फेअर खेळणार करत Uhoh
पब्लिकला बैलबुद्धी मस्क्युलर , प्लॅस्टिक सेलिब्रीटिजही नकोयेत आणि बावळट पिकनिक वालेही नकोयेत, मग सूरज रिलेट होतोय आणि आवडतोय !

पब्लिकला अपेक्षित होतं तसं झोडलं वैभवला. मालवणी भाषा मराठी भाषेची बोलीभाषा आहे हे सांगितलं रितेशने त्याला. गद्दारीबद्दलही झोडले. निक्की आणि आर्याला आईपणावरुन बोलणी खावी लागली. आज निक्कीला कशाचाच काही फरक पडत नव्हता, ती खाली मान घालून प्रत्येक टिप्पणीवर हसत होती. निक्कीचे स्वत:चे बिग बॉस सुरू आहेही म्हणाला. अरबाजलाही बोलणी खावी लागली, निक्की gang सतरंजी उचला कार्यकर्त्यालाही बोलले.

सुरजचे योग्य कौतुक केलं. योगीताचेही केलं. बुली gang आणि पिकनिक gang दोघांना मस्त बोलला रितेश. इरीनालाही जागा दाखवली. निक्की pady मध्ये pady योग्य होता हे सांगितलं. टास्कमध्ये बाहुलीची वाट लावली त्यावरही बोलला.

एकंदरीत चांगला झाला एपिसोड, फक्त मला रितेशचा सूट अजिबात आवडला नाही.

बाकी सुरज अभिजीतला म्हणाला तेच खरं होणार असं दिसतंय , तो म्हणाला मी शेवटी आलो, शेवटी ट्रॉफी घेऊन जाणार. अभिजीत म्हणाला आवडेल मला तसं झालं तर.

बाकी सुरज अभिजीतला म्हणाला तेच खरं होणार असं दिसतंय , तो म्हणाला मी शेवटी आलो, शेवटी ट्रॉफी घेऊन जाणार. अभिजीत म्हणाला आवडेल मला तसं झालं तर.
<<<
टोटली, बिबॉने ते वाक्यं दाखवलं म्हणजे त्यांचाही पोटेन्शिअल विनर आहेच तो !
मी आत्ताच इमॅजिन करतेय सूरजचा टॉप ५ मधे आल्या नंतर जर्नी व्हिडिओ आणि त्यात हे त्याने म्हंटलेले वाक्यं इन द एन्ड
आजचा धक्का चांगला झाला, रितेश मांजरेकरां इतका ओरडून चिडून बोलत नाही , शान्तपणे बोलतो पण मुद्दे सगळे घेतोय जे जे पब्लिकला खटकले ते सगळे !
मलाही मालवणी बद्दल् कनफ्युजनच आहे, वेगळी भाषा नाही तर मग नाव भाषेचे नाव वेगळे का ? भाषेचा लहेजा वेगळा असतो सगळीकडे हे मान्यच पण बरेचसे शब्दं क्रियापदही वेगळी वाटतात ऐकताना मालवणीचे !
असो, क्लिअर केले बिबॉ टिमने आज.
Btw किरण माने आणि मांजरेकरांचे पर्सनल ग्रजेस त्यांनी काही दिवसांपूर्वी रितेशचे कौतुक करून मांजरेकरांना टोमणे मारून पुन्हा एकदा दाखवून दिलेत, माने लिहितात छानच !
https://www.facebook.com/1460418198/posts/pfbid0ZcvsS8gDxcyvS5gdnsCfxC7Y...

डिजे बहुतेक बोलीभाषेची नावं स्वतः ची वेगळी आहेत सगळीकडे पण त्या मराठीच्या बोलीभाषा आहेत. उदा. अहिराणी, संगमेश्वरी, आगरी, वऱ्हाडी वगैरे असंख्य आहेत महाराष्ट्रात.

आमची चित्पावनी नावाची बोलीभाषा होती कधी काळी, हे आम्हाला आत्ता आत्ता समजलं, ती भाषा गोव्यातल्या आणि कर्नाटकात फार पूर्वीपासून स्थायिक झालेल्या काहीजणांना अजूनही येते, ते आपापसात बोलतात, ती भाषा साधारणपणे गोवा आणि कारवार कोकणी आहे त्याच्या जवळ जाणारी वाटते मला. अनेक पिढ्या आम्ही प्रमाण मराठीच बोलतो, सासरी माहेरी. असो अवांतर आहे, सहज लिहिलं.

सध्या तरी सूरज,अभिजित, जान्हवी,अरबाज,उसगावकर/पँडी,एक वाईल्ड कार्ड ,योग्य असेल तर असेच फायनलिस्ट वाटत आहेत.
निक्कीला बहुतेक जस तिसर्या सिझनमध्ये मीराला मिडनाईट एव्हिक्शनने काढल ,तस काढू शकतात.
जसा सिझन पुढे जाईल तस कळेलच.
पण जवळपास हे क्लिअर आहे की सूरजच विनर होईल,कारण पहिले दोन आठवडे काहीही न.करूनसुध्दा वोटिंग मध्ये पहिला होता,आतातर या आठवड्याचा हीरोच आहे,त्यामुळे तो काही जाणार नाही ,जर त्यानेच काही माती खाल्ली नाहीतर.
बाकी दामले,योगिता,पुढारी, डीपी,अंकिता जातील
त्यांना फारसा महत्वाचा वाटत नसावा बिगबॉस.
रितेशचा धक्का छान झाला.पण त्याने फार काही फरक पडेल अस वाटत नाही.
रितेश अरबाजविरुध्द वैभवला उसकवण्याचा खूप प्रयत्न करत आहे,पण सध्यातरी काही होत नाहीते जर झाल तर मात्र मजा येईल.
खुर्चीसम्राट टास्क आणा आता.कंटाळा येत आहे.निदान या टास्क मुळे आठवडा इंटरेस्टिंग तरी होईल.

मिनल-विशाल च्या सिझन मधे जस जयच्या मागे तो शिदे त्याचा अस्टिटन्ट म्हणुन फिरत होता तस वैभव अर्बाझच्या मागे मागे असतो अस दिसतय...टास्क फारसे बघत नाही त्यामूळे सुरजचा गेम बघितला नाहि पण रितेश कौतुक करतो म्हणजे चान्गल असेल..निकिला कणभरही फरक पडत नाही बोलणे खावुन...रितेशचा सूट हॉरिबल होता.

कॅप्टनशिप टास्क आणि कालचा धक्का एपिसोड लागोपाठ बघितले. दोन्हीत बघून एक मात्र नक्की वाटले की यांच्याकडे चांगल्या खेळाडूची कमी आहे. सुरजचे कौतुक सुरू आहे, तो खेळतोही चांगला पण त्याला विजेता करणे कठीण दिसते. तो असाच खेळत राहिला तर टॉप 5 मध्ये जाणार पण विजेता नाही होणार. बरीच गणिते असतात त्या मागे. हा शो संपल्यावर कॉन्ट्रॅक्ट मिळतो, त्यातून पुढील काम दिले जाते.मेघा धाडेचा अपवाद सोडता नंतरच्या सगळ्या विजेत्यांना बऱ्यापैकी कामे मिळाली आहेत. ती सुद्धा मोस्टली लीड रोल. सूरज बाबतीत तसे काही होईल असे सध्यातरी वाटत नाहीये. सूरज ऐवजी विजेता कोणाला करायचा हा मोठा प्रश्न बिग बॉस टीम समोर असणार आहे.

अरबाज/वैभव पैकी कोणाला केलं तर ए टीम (विलेन गँग) अयोग्य होईल. बी टीम (पिकनिक गँग) मधील इतर कोणी विजेता दिसत नाहीये. आता पर्यंत 1 महिला आणि 3 पुरुष विजेते या शो ने दिले आहेत. आता दुसरी महिला विजेती द्यायची असेल तर निक्की/जान्हवी या दोही पुढे दिसतात. अंकिता मैदानात उतरत नाहीये. योगिता ला घरी जाण्याचे डोहाळे लागले आहेत, वर्षा आजी खेळत नाहीत (आता पर्यंत 3न्ही वेळा कॅप्टनशिप टास्क मध्ये माघार घेतली आहे), आर्या बालिश आहे. इरिनाची गाडी मराठी धड्यांच्या पुढे जात नाहीये.

अभिजित आणि पॅडीकाका हे सुद्धा विजेता मटेरियल दिसत नाहीत. पॅडीकाकानी सुद्धा आता पर्यंत 3न्ही वेळा कॅप्टनशिप टास्क मध्ये माघार घेतली आहे. धनंजय तर नेहमी माघार मोड आणि अडजस्टमेंट मोड मधे.

एकुणात बघता फक्त 3 आठवडे झाले आहेत आणि एकही खेळाडू योग्य दिसत नाहीये. मस्त पैकी वाइल्ड कार्ड खेळाडू अनावे आणि यंदा त्यांना जिंकण्याचा वाव दिसत असल्याने त्यापैकी एकाने शो जिंकून इतिहास घडवावा.

Pages