दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्लीमधील राजेंद्र नगरमधील कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

डॉ स्नेहलता देशमुख.
डॉक्टर, डीन याबरोबरच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून
मोठं काम.

केरळ मधील मृतांना श्रद्धांजली.
राजेंद्र नगर मधली घटना दुर्दैवी आहे.साधे लॉक काढून बायोमेट्रिक लावले, ते पाणी भरल्यावर बंद पडले आणि लोकांना वेळेत दरवाजा उघडून बाहेर जाता आलं नाही.
दुसऱ्याच्या हलगर्जीपणामुळे जाणारे हे बळी दोषींना कडक शिक्षा मिळून भविष्यात कमी व्हावेत.
रमा ची शाळा एलप्रो नाही ना?

११, ००० V वोल्ट हाय टेन्शन वायरला DJ चा धक्का लागला आणि ९ लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

https://www.youtube.com/watch?v=wzUGd532QaQ

DJ ट्रॉलीची उंची किती असायला हवी या संबंधांत काही नियम नाही आहे? अशाच प्रकारचा अपघांत २०२३ मधे झाला होता. त्यावेळी काही जिवीत हानी पण झाली होती.

हो, हे आठवतं Sad असे अपघात खूप वेळा होतात.सेलिब्रेशनच्या उन्मादात या गोष्टी लक्षात येत नसाव्यात लोकांच्या.

कोल्हापूरहुन अत्यंत यातनादायक बातमी. ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक. शंभर वर्षांहून जुना ऐतिहासिक वारसा हरवला कोल्हापूराने Sad Sad

>> अरेरे असं कसं झालं.
इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट असे कारण दिसत आहे बातम्यांत

>> विजय कदम
श्रद्धांजली_/\_
विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन आणि आता विजय कदम. आपल्या काळातले मराठी नाट्य क्षेत्रातले एक एक बुरुज ढासळत आहेत.

शोभना रानडे.

-
लक्ष्मीकांत ज्ञेय वडे, विजय कदम आणि स्वाती सुब्रमण्यम हे तिघे आकाशवाणी मुंबई घ्या युववाणीमधील कॉफी हाउस या कार्यक्रमात माहीत झाले.

>> विजय कदम<<
अतिशय टॅलंटेड अ‍ॅक्टर. दादा कोंड्क्यांनंतर कोणि खरा न्याय "विच्छा.." तल्या हवालदाराच्या भूमिकेला दिला असेल तर तो विजय कदमांनी.. भावपूर्ण श्रद्धांजली...

दूरदर्शन वर लक्ष्मीकांत बेर्डे नी घेतलेली बेसूर कुमार ( विजय कदम ) यांची मुलाखत अजरामर आहे.

त्या गॅंगरेपपेक्षा जास्त वाईट आहे त्याचा चाललेला कव्हर अप, पुरावे नष्ट करणं, तिथल्या संचालकाला दुसऱ्या दिवशी बढतीवर दुसरीकडे पाठवणं, चाललेल्या प्रोटेस्टमध्ये गुंड सोडून हॉस्पिटलची नासधूस करणं. आय होप सीबीआयला पुरावे खणून काढता येतील.
काही गुन्ह्यांसाठी तरी गुन्हेगारांना दगडांनी ठेचून मारण्याची स्लो आणि पेनफुल शिक्षा असावी असं वाटतं.

भीतीदायक आहे सर्व.दोषीला कडक शिक्षा व्हावी.बहुधा तो विश्वासातला, नेहमीचा येणारा जाणारा होता म्हणून त्याला रात्री च्या वेळी प्रवेश वगैरे सोपे गेले असावे.
मुलीच्या आईबापांना घटना सहन करण्याचं, सावरण्याचं बळ मिळो.
घटना इतक्या वाढल्या आहेत की मन सुन्न होऊन बोथट झालंय

डॉ शंतनू अभ्यंकर. मागच्याच वर्षी त्यांच्या मुलाखती पाहिल्या होत्या. अत्यंत विचारी आणि बुद्धीप्रामाण्यवादी होते. वय फार नसावं. छद्मविज्ञानाच्या विरोधात सातत्याने लिखाण आणि भाषण करत होते. त्यांच्या ब्लॉगवर शेवटची पोस्ट ३१ जुलैची आहे. तत्पूर्वी त्यांनी स्वतः अवयवदान करण्याचा निर्णय घेतला असल्याबद्दल पोस्ट केली होती.

अजून बातमी फार ठिकाणी दिसत नाहीये. अफवा असल्यास क्षमस्व.

>>>>>काही गुन्ह्यांसाठी तरी गुन्हेगारांना दगडांनी ठेचून मारण्याची स्लो आणि पेनफुल शिक्षा असावी असं वाटतं.
निदान कडक शिक्षा तरी हवीच. काही जरबच बसत नाहीये.

>>>>>>१५ ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधानांना हा मुद्दा घ्यावा लागला.
एलिफंट इन द रुम आहे. न घेता जाणार कुठे.
- मी भाषण ऐकलेले नाही. शरदजींच्या विधानावर आधारित माझे विधान आहे.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा