एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्रात कुठल्याशा देवळात पायरीवर राहुलच्या फोटोचं पोस्टर चिकटवलंय. लोकांनी त्यावर पाय देऊन जावं म्हणून. आणि महाराष्ट्र भाजपचा प्रवक्ता त्याचं कौतुक करतोय. राहुलने संसदेत भाजपबद्दल जे म्हटलं तेच तो सिद्ध करतोय.

राहुलने लोकसभेत आधी हिंदू धर्मात हिंसेला थारा नाही, असं सविस्तर सांगितलं. शंकराचं उदाहरण दिलं. त्यानंतर समोरच्या भाजप सदस्यांकडे दोन्ही हात करून - जे लोक स्वतःला हिंदू समजतात ते मात्र हिंसा करतात. तुम्ही खरे हिंदू नाहीच , असं म्हटलं.

हे सगळं समोर बसून बघणार्‍या मोदींनी त्याचा नेह मीप्रमाणे विपर्यास करून अख्ख्या हिंदू समाजाला हिंसक म्हटल्याचा कांगावा केला आणि भाजप समर्थक हे खोटं आहे हे माहीत असूनही तेच धरून बसलेत. त्यात इथलेही आलेच.
राहुलने मोदी म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही, भाजप म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही, संघ म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही, हिंदू धर्मावर तुमचा मक्ता नाही. हे ठणकावून सांगितलं. याचाच खरा राग आहे.

https://www.youtube.com/watch?v=ISu9Q4AfSjQ

लोकसभेची जागा गमावल्यावर अयोध्येच्या रामाला आणि तेथील जनतेला सोडचिठ्ठी देणारे संकुचित वृत्तीचे काय हिंदू समाजाचे नेतृत्व करणार? जय जगन्नाथ!

सध्या रशिया दौऱ्यावर असलेल्या मोदींना रशियाने, ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला आहे.

मोदीने पुतीनला मारलेली मिठी अमच्याकरता निराशाजनक आहे असे झेलन्स्की म्हणाला

पॉपॉला त्या अवॉर्डचं नाव घ्यायला पण टेलिप्रोम्प्टर ठेवावा लागेल

काल इंडिया टुडेवरच्या कार्यक्रमात भाजप प्रवक्ता आणि आय टी सेल प्रमुख आदर्णीय अमितजी मालवीयजींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्या न्याय्य ठरवल्या.

आणि संघ, भाजप यांची विचारसरणी हिंसक आहे असं म्हटलं की यांना राग येतो!

राहुलच्या 'त्या' भाषणानंतर गुजरात भाजपवाल्यांनी तिथल्या एका काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला, तोडफोड केली आणि आपण कसे अहिंसक आहोत हेच दाखवून दिलं.

पॉपॉ फेमस झालं. रील्स आणि मीम मध्येही ट्रेंडिंग आहे. विश्वपॉपॉ असंही एक काय तरी पाहिजे. अभिमान वाटावा असं आजवर काही झालंच नाही. आता तरी झालं पाहिजे.

<< नीट सुद्धा इलेक्शन बाँडच्या वाटेने चालले आहे. >>

------- एका मागून एक घोटाळे घडत आहे पण कुठल्याही घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याबाबत गंभिरता दिसत नाही.

घोटाळ्याचं कुळ आणि मूळ भाजप च असल्याने सैया भये कोतवाल अब डर काहे का.

***

बजेट आले.

त्याची निर्लज्ज समर्थने ही आलीत.

त्या बाईचं तोंड पाहिलं की फक्त एकच गोष्ट कराविशी वाटते.

कावड वाल्यांना पोलीस गाड्या फोडायची देखिल परवानगी आहे.
मुलांच्या शिक्षणावर इतकं लक्ष दिलं तर देशाचं भलं होईल, पण इथे देशाच्या भल्याची कुणाला पडलेली आहे? आम्हाला सत्ता बळकावून लोकांना नागडं बनवण्यात इन्टरेस्ट आहे.

National Crime Records Bureau (NCRB) च्या २०२२ आकडेवारीनुसार देशांत ३०,००० पेक्षा जास्त बलात्काराच्या घटना नोंदविल्या गेल्या. दर पंधरा मिनीटाला एक बलात्कार नोंदविला जात आहे.
https://economictimes.indiatimes.com/news/india/indias-struggles-with-hi...

बलात्काराच्या बहुतेक घटनांत आपला समाज पीडितेलाच दोष देत असतो म्हणून अशा सर्वच गुन्ह्यांची नोंद होत नाही. खरी आकडेवारी कितीतरी पटीने मोठी आहे.

गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. महत्प्रयासाने हजार पैकी एखाद्या घटनांत शिक्षा मिळालीच तर गुन्हेगार फार्लो, पॅरोलवर बाहेरच असतो ( या आठवड्यात आसाराम, राम रहिम यांना फार्लो, पॅरोल वर १ ते ३ आठवड्यांची रजा मिळाली आहे).

काही अत्याचारांच्या घटनांत तर महिनो महिने लागतात साधा FIR नोंदवायला. दिल्ली मधे अनेक महिने महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते. मणिपूर मधे महिलांची नग्न धिंड काढल्यावर ७५ दिवस घटना दाबून ठेवली होती.

सरकार कुणाचेही असले तरी महिलांची सुरक्षितता सातत्याने ढासळत आहे.

१५ ऑगस्टला पंतप्रधानांनी कोलकता घटनेबद्दल उल्लेख केला. छान वाटले.
अशा घटना कमी कशा होतील यासाठी सरकारने, समाजाने काय करायला हवे?

<< क्या पॉ पॉ वॉर रुकवाने जा रे है? >>
नाही हो. टूर प्रोग्राम मध्ये काही देशांना भेट द्यायचे राहिले होते. त्यातला एक यूक्रेन.
मणिपूर? जाणार जाणार आहे. पण मधेच काहीतरी महत्वाचे टपकते. आता बघाना. ममता दीदी. मार दिया जाय या छोड दिया जाय? हाच एक सवाल आहे.

मध्ये ऑट्रिया विएना झाले. झायलिंगर नावाच्या इसमाची भेट झाली. तो तिथे ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ह्या भारतीयांनी वेदात सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा प्रचारक आहे.

Earlier today PM Modi paid tributes at the Gandhi statue in Kyiv. "Paid tributes to Mahatma Gandhi at Kyiv. The ideals of Bapu are universal and give hope to millions. May we all follow the path he showed to humanity," Modi posted on X.

आपल्या संस्कृतीतली दोन हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत ही सर्वात चांगली पद्धत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाऊन संसर्ग रोखण्यास मदत व्हावी हा तिच्या मागचा उद्देश आहे. सर्वांनी ती पाळायला हवी.

असे सांगून नमस्कार करून संसर्ग रोखल्यानंतरच ते मिठी मारतात.
नाहीतर अज्ञानी लोक नमस्कार न करताच शेक हॅन्ड करून मिठी मारतात.

युक्रेन भेटीमधे मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर फुले वाहिली. दोन्ही हात जोडलेले होते. युद्धामुळे लहान मुले गमावलेल्या कुटुं बांसोबत सहानुभूती दाखविली. भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

https://www.hindustantimes.com/india-news/pm-modi-zelensky-visit-martyro...

अनेक महिन्यांपासून मणिपूर मधे अशांतता आहे नव्हे निर्माण केली गेली आहे. शेकडो निरपराध नागरिकांची हत्या झाली , यात लहान मुले, आणि स्त्रिया पण आहेत. त्यांच्या वेदनांवर कधी फुंकर घालणार?

सर्ग जगात दहा वेळा फिरता येते, moneyपूर (अंबानीच्या घरी लग्नात) येथे हजेरी लावता येते पण भारताचा अविभाज्य भाग असलेले मणिपूर ला जाण्याचे धाडस होत नाही . प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारे गांभिर्य नाही.

मणिपूर त्यांच्या मते प्रश्न नसून उत्तर असेल.
तिथे झालेल्या प्रकारांमागे तिथले मुख्यमंत्रीच होते असं सुचवणारी त्यांचीच एक ऑडियो क्लिप समोर आली आहे. ती डॉक्टर्ड आहे, असं मणिपूर सरकारने अर्थातच सांगितलं आहे.
https://www.ndtv.com/india-news/prosecute-manipur-chief-minister-10-kuki...

Pages

Back to top