एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wink

आणि असं पण म्हणतोय कि फॅमिली आता बन आणि मस्का सेपरेट ऑर्डर करतात म्हणे. वेटर मग मस्का मारके देता है!
सोडींयम ज्वालाग्रही क्लोरिन विषारी पण मीठ जीवनाला आवश्यक. हे रसायन FM ना बरोबर समजले आहे.
मर्तिकावर GST आहे का हो.? ऐकून मुडदा पण वायब्रेशन मोड मध्ये जायचा.

काँग्रेसने त्या लाल सिंगला पुन्हा विधानसभेसाठी तिकीट दिलंय. मुळात त्याला पक्षात घ्यायची गरज काय होती? Angry

तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील प्रसादांत जनावरांची चरबी ( animal fat , फिश ऑईल) आढळली यावर गदारोळ उठविला जात आहे.
NDDB CALF lab ( अर्थात गुजरात ) येथे testing का झाले , संबंध काय ? अजून इतर प्रयोग शाळांत पण तपासणी केल्या आहेत असे म्हणतात.

https://www.hindustantimes.com/india-news/tirupati-laddu-row-temple-trus....

सर्व तूप हे 'बीफ फॅट' अस्ते. त्यात नवल काय आहे?

टॅलो म्हणजे रेंडर्ड फॅट. दुधातलं फॅट उर्फ क्रीम तापवून "रेंडर" केलं की तूप बनतं.

अमूल ला नंदिनी विरोधात एन्ट्री मिळावी म्हणून मॅगी मधल्या लेड सारखं आहे हे.

बाकी अमूल च्या तुपात डालडा अस्तं ते वेगळं..

हजारो कोटीच्या आर्थिक व्यावहारातील एक मोठा भाग आपल्या लोकांना मिळावा असा हेतू असण्याची एक शक्यता आहे. एक पुरवठादार बंद करुन दुसरा पण "आपला" आणायचा. खंडणी गोळा करण्यासारखाच एक प्रकार आहे.

आर्थिक फायद्यासाठी देवस्थानाचा, आणि देवस्थानाशी निगडीत कोट्यावधी भक्तांच्या भक्तीचा अपमान करण्याचा हलकटपणा पुन्हा एकदा झाला.

माजी मुख्यमंत्र्यावर खटला भरण्याची भाषा कशासाठी? गुजरात मधे मोरबी पूल पडतो, १३५ लोकांचा दुर्दैवी अंत होतो ( १३५ सदोष मनुष्य हत्या). तिथे दोन दशके सत्ता उपभोगणार्‍या भाजपाचा किंवा माजी मुख्यमंत्री मोदीं यांचा कुठलाही दोष नसतो. मग येथे माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्यावर खटला का भर ण्याची भाषा कशासाठी? उद्देश स्वच्छ दिसत आहे.

तपासणी साठीचे नमुने ९ जुलैला मिळाले, गुजरात लॅबचा रिपोर्ट १६ जुलै तयार झाला.
(अ) आरोप करायला दोन महिने विलंब कशासाठी ?
(ब) सँपल गोळा केल्यावर, एका गलिच्छ हेतूने, त्यात भेसळ केली झाली नसेल कशावरुन? सँपल integrity शी तडजोड होणार नाही यासाठी काय काय प्रयत्न झाले?
(क) lab report ची कॉपी बघायला मिळेल का? कशा कशाचा उल्लेख आहे.
(ड) नवा ठेकेदार कोण आहे? त्याच्या वर ED/ CBI ने कडक नजर ठेवली आर्थिक फायदा कुणापर्यंत पोहोचत आहे हे गुप्त ठेवण्यास मदत होईल.

अमूल ला नंदिनी विरोधात एन्ट्री मिळावी म्हणून मॅगी मधल्या लेड सारखं आहे हे.>>मला पण वाटत हेच कारण असावे. एक देश एक नेता एक भाषा आणि
एक दूध!

आधार कार्ड ची ऐसी तैसी. >>> लेख वाचला, विशेषतः शेवटचा भागात जे लिहिले आहे, QR कोड बद्दल ते तर आधार कार्ड unique असण्याबद्दल शंका व्यक्त करत आहे. जर QR कोड बदलत नसेल कुठल्याही बदलांनंतर तर हे चुकीचे आहे.

सेक्युलरिझम ही एक युरोपीय संकल्पना आहे, ती तिथेच राहू द्या. भारतात तिची गरज नाही - तामिळनाडूचे राज्यपाल रवी.

आणि हे लोक घटना बदलू म्हणतात, असं म्हटलं तर तो अपप्रचार होतो.

टीप - सेक्युलर ही संज्ञा इंदिरा गांधींनी घटनेच्या प्रस्तावनेत जोडली असली तरी सेक्युलरिझम घटनेत अंगीभूत आहे , हे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा स्पष्ट केले आहे.

जगातील सर्व सरकारे आपल्या नागरीकाविषयी संशयपूर्ण असतात. ते काय खातात कुठले पेपर वाचतात कुठल्या पक्षांना मतदान करता
तुमचा IP काय आहे इत्यादी. आपण हळू हळू डिस्टोपिया कडे वाटचाल करत आहोत ही जाणीव पण नाही. सगळ्यांच्या घरात एक एक अलेक्सा आहेत.
उद्या सुलभ मध्ये पण आधार कार्ड मागणार आहेत!

'Badlapur accused attacked cops due to depression'>>> Call a dog mad and shoot him!

एक देश एक निवडणूक, एक घटनात्मक ‘चकवा’!

हा लेख वाचल्यावर लक्षात येईल कोणाला आरक्षण खरेच संपवायचे आहे ते. अशा प्रतिथयश सल्लागारांचे ऐकून नोटबंदी आणि इतर बदल लादले भारतीय जनतेवर.

https://www.facebook.com/mukesh.machkar/posts/pfbid0NrpETeMGJjtwrmuBFVh7...
ह्याचा रेफरन्स मला एके ठिकाणी मिळाला. शेअर करण्यासारखे आहे.
Mukesh Machkar
ह्यांचे आभार मानून

आटपाट नगरातली गोष्ट
आटपाट नगरात एक घर होतं. त्यात काही भावंड एकमेकांबरोबर राहात होती. त्यांच्यातल्या एकाला कुणीतरी सांगितलं की तुमच्या घरातला कचरा अतिशय पवित्र आहे, तो साठवून ठेवा.
त्याने कचरा साठवून ठेवायला सुरुवात केली. काही दिवसांनी घरातून भयंकर दुर्गंध येऊ लागला. नाक दाबून चालण्याची वेळ येऊ लागली. उंदीर-घुशी घरात शिरून घर पोखरू लागल्या. घरातल्या माणसांना घरात राहणं मुश्कील झालं. नाना रोगजंतू पसरून माणसं आजारी पडू लागली.
घरातल्या इतर माणसांनी याला सांगायचा प्रयत्न केला की कचरा हा बाहेर फेकायचा असतो, साठवायचा नसतो, तरच घर स्वच्छ राहतं. तर याने सांगितलं आधी शेजारच्या घरातल्या लोकांना जाऊन सांगा त्यांची घरं स्वच्छ करायला. त्यांची घरं अस्वच्छ असलेली तुम्हाला चालतात, तुम्ही त्यांना एका शब्दाने बोलत नाही आणि फक्त मलाच आपलंच घर स्वच्छ करायला सांगताय. याचा अर्थ तुमची नजर अतिशय पूर्वग्रहदूषित आहे. हिंमत असेल, तर शेजारच्या घरांत जाऊन त्यांना त्यांचा कचरा साफ करायला सांगा, मग माझ्याकडे या.
घरातल्या इतरांनी त्याला परोपरीनं सांगितलं की दादा, इतरांच्या उठाठेवी करण्याच्या आधी आपण आपल्याकडचा कचरा साफ करायचा असतो. आणि हे काही फक्त तुझं घर नाही, आमचंही घर आहे. इथल्या गोष्टींबद्दल बोलण्याचा आणि इथला कचरा काढण्याचा आम्हालाही हक्क आहे. पण, त्याचा हेका काही कमी झाला नाही.
सतत कचऱ्याच्या संगतीत राहून पवित्र कचराप्रेमी सदस्याला आजार झाला.
डाॅक्टर बोलावला गेला. डॉक्टराने तपासून सांगितलं की ही अमुक अमुक औषधं घ्या.
तर त्याच्या कानफटीत मारून रोगी म्हणाला, `तुला फक्त माझाच आजार दिसतो. तू मलाच औषध घ्यायला सांगतोस. तिकडे शेजारच्या घरातले सगळे लोक आजारी आहेत, त्यांना तू एकही औषध सांगत नाहीस. त्यांना तपासत नाहीस. तू पूर्वग्रहदूषित आहेस. तू चालता हो, ताबडतोब.'
असो.
गोष्ट आटपाट नगरातली आहे...
आपण फारशी मनाला लावून घेण्याचं कारण नाही.

गंगाजल-गोमूत्र प्राशन करायला लावून काँग्रेस नगरसेवकांचं शुद्धीकरण? महापौर म्हणाल्या, “आता ते भ्रष्टाचारमुक्त झाले”

मग त्या आधिच्या महापौराला गोमुत्राने- गोमयाने अंघोळ घालायला हवी होती , मग तो देखिल शुद्ध झाला असता की !

Pages