एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जलदुर्ग सिंधूदुर्गा शेजारी जंजिरे राजकोट वर उभारलेला शककर्ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडला!!!

गडपती शिवरायांनी खळाळत्या समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वर्षानंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यांचा चिराचिरा शिवाजी महाराजांच्या आणि हे गड किल्ले बांधणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत. पण आज सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवला गेलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा एक वर्षभराच्या आतच धाराशाही झालेला आहे.
हा पुतळा बसवला त्याचवेळी माझ्यासारख्या अभ्यासकाने या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल आणि याच्या मजबुतीबद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही. याबद्दलही त्यावेळेला आम्ही पोस्ट लिहून लोकांसमोर आलेलो होतो. पण याकडे सबंधितानी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर 3-4 फेब्रुवारी 2024 ला मी या पुतळ्याला भेटी दिली होती. आणि त्यावेळीही हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही. हे शिल्प बदलावे असे निरीक्षण नोंदवले होते.

खरंतर नौदलासारख्या प्राख्यात आस्थापनेने केलेले काम हे चिरंतन व्हायला पाहिजे; इतकं ते मजबूत आणि सुंदर असायला हवं होत. भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील, ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल.तर त्याच्या मजबूती कडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही?

शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता. पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष झालं.
आज संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचं शिवछत्रपतींचे स्मारक हे जमीन दोस्त झालेलं पाहून भारताची - भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल! याचा आपण विचार करावा. आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेत असताना शिवाजी महाराजांचे भले उंच पुतळे तयार करून आणि ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील तर अशी स्मारके आपण उभी करावीत का? याचाही शिवप्रेमीनी विचार करावा. हा पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बसवणारे यांच्या हेतू विषयी आता आपल्याला शंका घेण्यास जागा आहे. ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार आहोत का???

इंद्रजित सावंत ,
26-8-2024,
कोल्हापूर.

पनवतीचा हात लागलेली आणखी एक गोष्ट जमिनीदोस्त! हे यांचे बेगडी शिवप्रेम!

अरेरे! गेल्या डिसेंबरात मी मालवणला गेलो होतो. त्याच्या पंधरा एक दिवस आधीच मोदींचा मालवण दौरा आणि त्या पुतळ्याचं अनावरण झाले. रस्ते एकदम चकाचक केले होते. दुरून अनेकदा तो पुतळा दिसला होता.

String of policemen who had beaten Faizan and 4 other Muslim men during 2020 Delhi violence. They had also taken them to the hospital. 4 years later, their names go missing from the hospital records.

त्या नागरिकांना आज समोर आणले ( जिवंत असतील अशी अपेक्षा करतो) तर ते अशी काही मारहाण झालीच नाही असे सांगतील.

निर्भया घटनेनंतर, महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे लावण्यात आले होते. काही ठिकाणी दिल्ली पोलीसांनी हे कॅमेरे पण फोडले होते, मारहाणीचा पुरावा मागे रहायला नको म्हणून काळजी. गुगलल्यावर या तोडफोडीचे तसेच दगडफेकीमधे सहभाग घेतल्याचे व्हिडीओ बघायला मिळतात.

<< ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार आहोत का??? >>

----- अपेक्षा अवास्तव आहे.

गुजरात मधे मोरबी पूल पडला आणि १३५ निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले. घड्याळ दुरुस्त करणार्‍या कंपनीला एका पूलाच्या डागडूजीचे काम मिळते. राज्यात दोन दशके भाजपाचा कारभार आहे. लोकांना धर्माच्या नशेमधे मस्त चूर करुन ठेवले आहे, त्यामुळे चर्चाही होतांना दिसत नाही.

लोकसभा निकालानंतर कट्टर भाजप समर्थक सगळ्या सोशल मीडियावरून गायब आहेत. केंद्र सरकारची गाडीही यू टर्न घेत चालली आहे .

महाराजांचा पुतळा पड्ण्याची घटना अगदीच वाईट आहे.

बातमीत हवेचा वेग हे एक कारण सांगत आहे. ४५ किमी/ तास वेगाच्या वार्‍याला जोरदार वारे strong wind म्हणायचे ? किती हास्यास्पद प्रतिक्रिया द्यायची. FIR दाखल केला आहे पण कुणाविरुद्ध ? आर्टिस्ट, कंत्राटदार हे कामे करत असतील तर त्यांच्या कामाची पहाणी/ तपासणी काही झाली नव्हती?

https://www.business-standard.com/india-news/shivaji-maharaj-statue-coll...

shivaji statue.jpg

२४ वर्षांच्या शिल्पकाराने पाच महिन्यांत पुतळा घडवला.

हे बघा आपल्याकडे सगळं काही विज्ञान आधीपासूनच आहे, सगळे शोध आपणच लावले आहेत.
फक्त समुद्र किनारी खारे व जोराचे वारे वाहु शकते, याचा शोध अद्याप लागला नव्हता.
तो ही आता लागला आहे , तर त्यावर अधिक संशोधन करून अशा वातावरणात तग धरेल असा नवा पुतळा परत उभारू की. त्यात एवढा बाऊ करण्यासारखे काय आहे?
अनुभवातूनच माणुस शिकतो ना? (आम्ही सत्तेत असताना) सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

कशाकशाची कराल. शेकडो मेट्रोमार्ग, विमानतळे, हायवे पूल, बोगदे, सरकारी इमारती याच शुभहस्ते रोज सुरु होताहेत.

घरी रहा सुरक्षित रहा, फिरायचेच असेल तर जंगलात भटका, बाहेर कधी, पूल पडेल, रस्ता खचेल, रेल्वेचे अपघात होतील, पुतळे पडतील, होर्डिंग्ज पडतील सांगता येंत नाही.

जय शहा icc चा तर अरुण जेटलीचा पोरगा bcci चा अध्यक्ष होणार. काही नतद्रष्ट ह्याला घराणेशाही म्हणतील पण त्यांना काय कळणार राष्ट्रहित कशात असतं ते? Happy

लोकसभेला फटका बसल्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी संघ दक्ष झाला आहे. एक उद्योजक आहेत जे संघाचे कार्यकर्ते आहेत. ते आता तीन महिने आपला कामधंदा बाजुला ठेवुन निवडणुकीसाठी वाहुन घेणारेत म्हणालेत

आता त्याच जागेवर शंभर फूट उंचीचा पुतळा उभारणार आहेत असे मंत्री केसरकर म्हणालेत. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहेत. लाज नावाचा प्रकार माहितच नाही.

नौदलावर जबाबदारी ढकलायचा प्रयत्न झाला.
कंत्राटाचे काम २४ वर्षाच्या आपटेला कशाच्या आधारावर / पात्रतेवर दिला होता? या आधी १-२ फुटाच्या चार मुर्ती बनविल्या होत्या.
आपटेला पत्र नौदलाच्या कुठल्या अधिकार्‍याने दिले होते? नावाची शिफारस कुणी केली?

एव्हढ्या विक्रमी वेळांत पुतळा पूर्ण झाल्यावर ना हरकत प्रमाण पत्र कुणी दिले होते ? त्यासाठी दबाव कुणी आणला गेला होता का?

या पुतळ्याच्या कारभारांत भ्रष्टाचार झाला आहे हे स्पष्ट आहे. भ्रष्टाचारी व्यक्तीं ची ED, CBI चौकशी करतील का?

कोकणात वादळ वारे नवीन आहेत का, काहीही कारण देतात. एवढे मोठे मोठे शिल्पकार असताना, फार अनुभव नसलेल्याला कसं काम मिळालं.

राणे पिता पुत्र पुतळा पडला त्यापेक्षा मी, मी करण्यात मग्न. काहीही बरळत बसतात.

एनिवे फार वाईट वाटलं पुतळ्याचे वाचून.

कालचं माफीचं वक्तव्य म्युट करून पाहिलं तर माफी मागताहेत असं वाटेल का?
पुतळा प्रकरणी वेगळा धागा बनता है इतकं काय काय चाललं आहे. उद्या वेळ काढतो त्यासाठी.
---
बोरिवली ठाणे - भुयारी मार्ग - नॅशनल पार्क खालून. याचं काम निवडणूक रोखे फेम मेघा इंजिनीयरिंगला मिळालं आहे. बोगद्याच्या environmental impact चा अभ्यास करायला दोन वर्षे लागतील. पण बोगद्याचं काम या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे.

पर्यावरणाची नासाडी करण्याचे परिणाम वायनाडपासून दिसताहेत. वातावरण बदलामुळे पावसाचं रूप बदललंय. सारखे फ्लॅश फ्लड येताहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, केरळ, गुजरात सगळीकडे हेच. तरी धडा घेणार नाही.

राजकारण करू नका म्हणतायेत........राजकारण करणे चुकीचंच आहे......
पण भाजपने तरी काय वेगळ केलं असते......उलट हे कमीच आहे.......
भाजपने आतापर्यंत बंद,संप केले असते......राजीनामे घ्यायला लावले असते...
त्यांव्यामानाने हा विरोधी पक्ष खूपच कमकुवत आहे.

मोदींची माफी(?) बघितली. "काय, समजले काय? माफी मागतोय मी माफी!" टाइप माफी आणि नेहमीप्रमाणे मग स्ट्रॉमॅन व्हॉटअबाऊटरी.

भारताबाहेर युक्रेनमधे गांधी समाधी पुतळ्यासमोरचे वक्तव्य करतांना गांधी यांची आठवण काढायची आणि भारतात आल्यावर गांधी हत्येचा कट रचणार्‍या माफीवीराच्या माफीनाम्याची चिकीत्सा.

<< राजकारण करू नका म्हणतायेत........राजकारण करणे चुकीचंच आहे...... >>
----- मुंबईवर हल्ला झाला होता तेव्हा २४ तासांत अहमदाबाद मधून धावत धावत मुंबईत आले होते, त्यावेळेच्या पंतप्रधांनाना दोष द्यायला.... ते राजकारण नव्हते.

दोन वर्ष झाले मणिपूर जळत आहे पण तिथे जाण्याचे धाडस काही होत नाही.

Pages