मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दस्तावेज मंटो - भाग १

सआदत हसन मंटोंच्या कथांचा हा संग्रह आहे. मी स्टोरीटेलवर त्रिलोक पटेल ( ज्यांच्या आवाजात मी 'राग दरबारी' ऐकली होती) यांच्या आवाजात ऐकला.
या संग्रहात बऱ्याच (पंचवीसेक) कथा आहेत. त्यातल्या तीन-चार कथा सोडल्यास बाकी सगळ्या कथा या वेश्या आणि/किंवा त्यांचे ग्राहक यांच्याबद्दल आहेत. समाजातला हा एक भाग, ज्याचा आपल्याला उल्लेखही करावासा वाटत नाही, कधी विचार केलाच तर अगतिकता, असहायता, घृणा, चीड अशा प्रकारच्या नकारात्मक भावनाच मनात येतात. पण वेश्या काय आणि त्यांच्याकडे जाणारे ग्राहक काय, ही माणसंच असतात. मंटोंच्या कथा या त्या 'माणसांच्या' कथा आहेत. त्यांचा मुख्य भर हा ती ती व्यक्तिमत्त्वं उभी करण्यावर आहे.

यात लाहोरच्या हीरामंडीमधल्या 'तवायफ' आहेत, (माझ्या समजुतीनुसार जिचा मुख्य व्यवसाय गाणं/नृत्य हा आहे, पण शरीरविक्रय जिला वर्ज्य नाही, अशी स्त्री म्हणजे तवायफ) तशा मुंबई-दिल्ली-लाहोरच्या अंधाऱ्या गल्ल्यांमधल्या वेश्याही आहेत. ग्राहकांमध्ये श्रीमंत आहेत तसे गरीब आहेत. या व्यवसायाशी संबंधित इतक्या बारीकसारीक, गुंतागुंतीच्या तपशिलात जाऊन कथा लिहिणं हे कठीण आणि धाडसी आहे. गूगल केल्यावर दिसलं की मंटोंवर एकूण सहा वेळा ( तीन वेळा ब्रिटिश भारतात आणि तीन वेळा पाकिस्तानात) अश्लीलतेचा आरोप होऊन खटला दाखल झाला होता. एकदा झालेला दंड वगळता इतर प्रत्येक वेळी ते निर्दोष मुक्त झाले. मी ज्या कथा ऐकल्या त्यात मला कुठेही अश्लीलता जाणवली नाही. वेश्यांबद्दल लिहिताना बीभत्स किंवा कामुक वर्णनं न करताही प्रभावीपणे कसं लिहिता येतं, याचं हे उदाहरणच आहे. समर्थ लेखकाचं हे वैशिष्ट्यच आहे. हल्ली खूपदा आपण 'आधुनिक' आहोत हे दाखवण्यासाठी उगाचच कथेत समलैंगिकता घुसडलेली दिसते. (कथेत समलैंगिकता किंवा लैंगिक संबंधांचं वर्णन असण्याबद्दल हरकत नाही, पण ते उगाच आणायचं म्हणून आणण्याला हरकत आहे.)
वेश्याव्यवसायाव्यतिरिक्त इतर विषयांवर ज्या कथा आहेत, त्याही छानच आहेत. मराठीत साधारणपणे किरण गुरवांची किंवा भालचंद्र नेमाड्यांची (मी फक्त कोसला वाचली आहे) जी शैली आहे, तशा शैलीतल्या या कथा आहेत. कथावस्तू चारपाच वाक्यात संपण्यासारखी, पण खरं सामर्थ्य कथा रंगवण्याचं.
मंटोंचं साहित्य खूप आहे. गूगल केल्यावर त्यांच्या 'ठंडा गोश्त' नावाच्या कथेबद्दल वाचलं आणि मग लक्षात आलं की खूप वर्षांपूर्वी कुठल्या तरी दिवाळी अंकात मी या कथेचा अनुवाद वाचलाय. ती कथाही खूप प्रभावी आहे.

मंटोच्या कथा सीअरिंग असतात. छोट्याश्या कथांमधून एखादे वेगळेच बहुदा धक्का देणारे वास्तव आणि पात्रांचे मनोव्यापार उलगडून दाखवतात. मराठीमध्ये राजन खान किंवा भारत सासणे यांच्या कादंबऱ्या जनरली अशा (म्हणजे वेश्याव्यवसाय नाही ममव जगाला माहित नसणारे वास्तव दाखवणाऱ्या) असतात. श्याम मनोहर किंवा किरण नगरकरांएवढी त्यांची प्रसिद्धी झाली नाही. किंवा मराठीतले महत्वाचे साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख झाली नाही.

एक लिहायचं राहिलं वरती.
मी या कथा मूळ ऊर्दूत ऐकल्या त्यामुळे खूप शब्द अनोळखी होते. काही ओळखीचे, पण अर्थ माहिती नसलेले, असे. पण संदर्भाने अर्थ समजले. शिवाय काही ठिकाणी निवेदक वाचताना अर्थ सांगतात. उदाहरणार्थ 'शिद्दत से, यानि कि तीव्रता से' Happy त्यामुळे बरं झालं. ऊर्दू ही किती रुबाबदार भाषा आहे याची परत एकदा जाणीव झाली. उदा. शेजाऱ्याला 'हमसाया' असा एकदम सुरेख शब्द आहे. 'सब्ज' म्हणजे हिरवा आणि 'सुर्ख' म्हणजे लाल हे नवीन ज्ञान झालं. 'सब्ज लॉन पर लेटे हुए' यातला हा शब्द मी 'असेल काही तरी' म्हणून सोडून दिला होता. Lol 'सुर्ख लबों पर' वगैरे तर कित्येक गाण्यांमध्ये ऐकलंय, पण अर्थाचा कधी विचारच केला नव्हता!
या कथा ऐकण्याच्या निमित्ताने काही सुंदर शब्दांचे अर्थ कळले.

मंटोच्या अनुवादित कथांचा संग्रह वाचला होता.
यूट्यूबवर अनेक कथा उर्दूतून ऐकल्या होत्या.काहींचे
नाट्यरूपांतर पाहिले होते. मंटो च्या जीवनावर एक सिरीयल देखील पाहिली होती.खूप सुरेख होती.
पाकिस्तानी सिरियलचा बोलबाला ऐकून त्या पहायला सुरुवात केली होती.प्रथम बरेच अडायला झाले होते.मग गुगलकाकांना विचारून घेत होते.नंतर हळूहळू कळत जाते.
वावे,माझेमान तुमचे प्रतिसाद आवडले.

त्यांच्या 'ठंडा गोश्त' नावाच्या कथेबद्दल वाचलं आणि मग लक्षात आलं की खूप वर्षांपूर्वी कुठल्या तरी दिवाळी अंकात मी या कथेचा अनुवाद वाचलाय...... मीही.

'सब्ज' म्हणजे हिरवा >>>

थोडं अवांतर : आम्ही शाळेत असताना गॅदरिंगला एक नाटक केलं होतं. त्यात तीन पर्‍या होत्या- लाल परी, नीलम परी, सब्ज परी. त्या-त्या रंगाचे कॉस्च्युम्स होते. तेव्हा सब्ज म्हणजे हिरवा हे ज्ञान झालं होतं.

आणि एक अमितकुमारचं गाणं आठवतंय (१९८० च्या दशकातलं)
एक सब्ज-परी
मेरे ख्वाबों में
आती है
चली जाती है

वावे धन्यवाद
मग सूर्खीयां म्हणजे लालिमा असणार का?
पण बातम्यात असत ते सूर्खीयां (ते या वर अर्धचंद्र जमेना) म्हणजे शीर्षक, मथळा ते पूर्वी लाल शाईने लिहायचे म्हणे.. गुगलून पाहिले.

देवकी Happy
माझेमन, राजन खान आणि भारत सासणे प्रसिद्ध आहेत की. मी त्यांची कुठली पुस्तकं नाही वाचलेली, पण दिवाळी अंकांमध्ये वगैरे जे वाचलंय ते आवडलंय. Happy
ममव जगाला माहिती नसणारं वास्तव >> माझं वैयक्तिक मत सांगते. माझ्या दृष्टीने वास्तव दाखवणारी कथा असो वा नसो, ममव असो वा नसो, कथा कशी लिहिली आहे ते सगळ्यात महत्त्वाचं. ममव वास्तव/कल्पनारंजन प्रभावीपणे दाखवलं असेल तर मला ती कथा वाचायला आवडेल आणि गरीब/वंचित समाजाबद्दल कथा आहे, पण कृत्रिम, अतार्किक आहे किंवा सपाट आहे, तर मला वाचायला नाही आवडणार.
प्रीति, आता असे एकदम नाही आठवणार. त्यातल्या त्यात हे दोन चार आठवतायत.
मकबूल - प्रसिद्ध
मुकम्मल - संपूर्ण, नामुकम्मल - अपूर्ण.
बेदार - जागा ( जागृत)

ऋतुराज >> आहा! मलापण सुर्खियाँ आठवला होता सुर्ख ऐकताना, गूगल करायला विसरले.होते. मस्तच!!

बंगालीत सोबुझ म्हणजे हिरवा हे बांगलादेशातून आलं असेल.
तिन्ही लेखक वाचले नव्हते. शोधतो.
__________________________________________________
अज्ञात मुंबई
(कहाणी मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची)
लेखक नितीन साळुंखे
मनोविकास प्रकाशन, ऑक्टोबर २०२२.
ISBN 978-93-90060-84-9
पाने ३००
काळी पांढरी चित्रे /फोटो २०

अनुक्रमणिका
मुंबईचा राजा बिंब आणि महिकावती
गेटवे ओफ इंडियाचा शिवाजी पुतळा आणि भाऊ साठे
वाळकेश्वरची श्रीगुंडीदेवी
प्रभादेवीची श्री प्रभादेवी
श्री महिलक्ष्मी
वरळीचा बांध
मुंबईची पहिली कापड गिरणी
राणीचा पुतळा आणि प्लेगचा प्रकोप
एस्प्लनेड हॉटेल
भायखळ्याचा खडा पारशी
माझगावची व्युत्पत्ती
माहीमचा कॉजवे
दादरचा शोध
कथा टिळक पुलाची
दादरचा कोतवाल गार्डन
मुंबईतला पहिला गुजराती व्यापारी
गोदीतला स्फोट
वरील ठिकाणांची लेखी माहिती मिळाल्यावर तिथे प्रत्यक्ष जाऊन लेखकाने धांडोळा घेतला आहे.
************

मराठी साहित्याचा परिचय
विलास शिरसाट.
कोमल प्रकाशन,२०१३.
पाने ३२५
साहित्यातील लेखक,कवीं आणि त्यांच्या कृतींची यादी दिली आहे. सर्वांची दीर्घ समीक्षा करणे अवघड आहे तरी प्रयत्न खूप चांगला आहे.
*************************
आत्मनेपदी
आत्मचरित्र, रत्नाकर मतकरी,
१६६ पाने
समकालीन प्रकाशन,२०२०
या लोकप्रिय लेखकाचे चरित्र कुणी लिहीलेले नाही बहुतेक. लेखकाने त्याच्या लेखन प्रवासावर प्रकाश टाकला आहे. सहाव्या वर्षी पहिलीत जाण्याअगोदर त्यांना वाचायला शिकवले होते आणि घरातील बरीच नाटकांची पुस्तके वाचून झाली होती.
सोळाव्या वर्षी एकांकिका लिहून लागले. खूप मागणी होती आणि धडाधड लिहून देत होते.

राजन खान आणि भारत सासणे प्रसिद्ध आहेत की >>> अजिबात प्रसिद्ध नाहीत असे नाही पण चटकन कुणी माझे आवडते लेखक म्हणून यांची नावं घेतली आहेत किंवा बुकस्टॉलवर पहिलं पुस्तक त्यांचे उचलले जाते या अर्थाने.
कथेच्या प्रभावीपणात ममव/वंचित वास्तव यांचा फरक पडत नाही हे खरं आहे. तरीही (मला) माहित नसलेलं वास्तव प्रभावीपणे मांडण्यात हे दोघे माहीर आहेत असे म्हणायचे होते मला.

सब्ज़ अणि सुर्ख़ बरोबर ज़र्दपण आहे. ज़र्द म्हणजे पिवळा. पिवळ्या गोड भाताला नॉर्थ इंडियन जर्दा म्हणतात.

छान माहिती वावे! ते इतकी वर्षे ऐकलेल्या उर्दू शब्दांचा अर्थ अचानक माहीत झाला की एकदम बर्‍याच गाण्यांचे अर्थ क्लिअर होतात. मला ते सुर्ख वगैरे कधीतरी मधे असेच समजले होते. हसरत जयपुरीच्या गाण्यांत सुर्ख खूप असतो. सब्ज बहुधा माहीत नव्हते किंवा लक्षात नव्हते. हिरव्या नसलेल्या भाज्यांनाही सब्जी म्हणतात का आता बघायला हवे Happy

बंगाली शोबुज शब्द या बंगाली गाण्यात ऐकला होता. एका मित्राकडून हेमंतकुमारची काही बंगाली गाणी ऐकली होती. त्यात हे होते. त्यात काही इतर हिंदी गाण्यांचीच चाल असलेली कदाचित मूळ बंगाली गाणी होती. हे एक उदाहरण. चालीवरून लगेच लक्षात येईल. पण ते शोबुज वाले गाणे हिंदीत आहे का आठवत नाही. आणि त्यात माती शोबुज कशी हा ही एक प्रश्न आहेच Happy माती काळी व तांबडी ऐकली आहे. गुलजार चाचांनी तिला आणखी कोणत्यातरी रंगात रंगवली असेल पण हिरवी कधी ऐकली नव्हती Happy

हिरवी कधी ऐकली नव्हती Happy>> काळ्या/ लाल मातीवर हिरवळ उगवली की झालेच. शोबुज.

फागुनेर मोहोनाय
https://www.youtube.com/watch?v=LTtMuq6ZSFg
भूमी बँड च्या ह्या मस्त गाण्या त शोबुजे शोबुजे ह्रिदोय कॅमोन करे असा उल्लेख आहे . प्रेमाचे वातावर न असल्या ने हृदय हिरवे हिरवे गार झाले आहे असा अर्थ आहे.

वावे, मंटोच्या कथांबद्दल/पुस्तकाबद्दल मस्त लिहीलंय..त्या अनुषंगाने चाललेली चर्चा पण मस्त. सब्ज म्हटल्यावर मला पण ते "एक सब्जपर" गाणं आठवलं..पण सब्जचा अर्थ माहिती नव्हता, तो कळला आता.

बेदार - जागा ( जागृत)
>>>
एक क़यामत हुई बेदार, ख़ुदा खैर करे
मी आत्तापर्यंत याला बेज़ार समजायचे. क़यामतीलाही बेज़ार करणारे प्रेम फारसे पटत नव्हते. पण असेल बुवा कविकल्पना म्हणून गप्प बसायचे. It makes perfect sense now.

प्रतिसाद आवडल्याचं लिहिणाऱ्या सगळ्यांचे आभार.
इतकी वर्षे ऐकलेल्या उर्दू शब्दांचा अर्थ अचानक माहीत झाला की एकदम बर्‍याच गाण्यांचे अर्थ क्लिअर होतात. >> हो अगदी.

प्रणव सखदेव लिखित 'काळे करडे स्ट्रोक्स' वाचलं. अजिबात आवडलं नाही! डोबिंवलीत रहाणार्‍या आणि दादरच्या रूईया कॉलेजात मासकॉम शिकणार्‍या तरूणाची ही कथा. हल्ली जशी वेबसिरीजची एक अलिखित चेकलिस्ट असते, तशी चेकलिस्ट घेऊन लेखक लिहायला बसला होता की काय असं वाटतं. व्यसनं, शिव्यायुक्त भाषा, सेक्स - चेक्ड; समलिंगी संबंध, नात्यातले शरीर संबंध - चेक्ड; एकावेळी एक नाही तर अनेक "प्रेम"कथा उर्फ लफडी - चेक्ड; पूर्ण वाया गेलेला पण दिलदार वगैरे मित्र - चेक्ड; मार्ग दाखवणारी एखादी "फादरली फिगर" - चेक्ड; अपघाती मृत्यू, आत्महत्या - चेक्ड!! कथानायकाला सगळीच्या सगळी अतिशय चमत्कारीक माणसं भेटतात आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात नॉर्मल काही घडतच नाही. सगळच चमत्कारीक! शेवटी अचानक चालू (म्हणजे "continuous") वर्तमान काळातलं कथानक सुरू होतं आणि मग समजतं की आता फ्लॅशबॅक संपला. एकंदरीत वास्तववादी लिहायच्या नावाखाली काहीतरी भडक लिहीलय आणि मुळ कथाबीजही ठिकच आहे. त्यातल्या त्यात मुंबईच्या पावसाचं आणि मुळशीच्या रिसॉर्ट आणि परिसराचं निसर्ग वर्णन जे छान चित्रदर्शी आहे, तेव्हडं आवडलं.

पराग Happy हे किंवा या लेखकाचं कुठलंच पुस्तक वाचलेलं नाही, पण आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचंय ते. अशा प्रकारच्या काही कथा वाचलेल्या आहेत.

एक क़यामत हुई बेदार, ख़ुदा खैर करे
मी आत्तापर्यंत याला बेज़ार समजायचे.
>>>
हैला! सेम!
आता पुन्हा ते गाणं ऐकणार!

मीना प्रभू यांची जवळजवळ सर्व प्रवास वर्णन वाचली आहेत...
आत्ताच उत्तरोत्तर वाचून संपवलं... नेहमीप्रमाणे छान ओघवत लिखाण...या पुस्तकात बरीचशी चित्र असल्यामुळे अजून छान वाटलं वाचताना...शेवटचं northen lights च वर्णन फारच सुंदर..
पण मला एक गोष्ट कायम खटकते त्यांच्या लिखाणात ....भारताबद्दल लिहिताना त्यांच्या लिखाणात कायम किंचित नाराजीचा सूर असतो. इथली वाहतूक, गर्दी किंवा चालीरीतींबद्दल...

  • एखादी गोष्ट गमावण्याचे दुःख हे त्याच किमतीची गोष्ट मिळवण्याच्या आनंदापेक्षा दुप्पट असते. - (loss aversion)
  • विकत घेतलेली एखादी गोष्ट चांगली नाही किंवा उपयोगाचे नाही हे कळाल्यावर सुद्धा आपण पैसे वसूल करण्यासाठी ती वापरत राहतो. - (sunk cost fallacy)
  • समोर आलेल्या माहिती मधून आपल्या मतांना अनुकूल गोष्टीच आपण स्वीकारतो आणि आपल्या मतांशी प्रतिकूल असलेल्या माहितीकडे आपण दुर्लक्ष करतो. - (confirmation bias)
  • जी माहिती मेंदूला सहज उपलब्ध आहे व आठवायला खूप सोपी आहे अशा माहितीचा आपल्या विचारांवर अधिक प्रभाव पडतो. (Availability bias)
  • एखाद्या क्षेत्रात फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तींकडे पाहून त्या क्षेत्रात यशस्वी होणे सोपे आहे असा विचार आपण करतो. त्या क्षेत्रात अपयशी ठरलेल्या अनेक लोकांची माहिती आपल्यासमोर येत नाही. - (survivorship bias)
  • एखाद्या कॉलेजमधील मुले यशस्वी झाली तर त्या कॉलेजमुळे झाली असा विचार आपण करतो. परंतु त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी बरीच मुले मुळात हुशार असतात हे आपण विसरतो. - (swimmer’s body illusion)
  • धूम्रपान वाईट आहे हे माहीत असूनही धूम्रपान करणारी व्यक्ती आपल्या कृतीचे लंगडे समर्थन करण्याचा प्रयत्न करते. - (cognitive dissonance)

    आपण विचार करताना अशा अनेक वैचारिक चुका करतो. या वैचारिक चुकांची यादी रॉल्फ डॉबेली लिखित “द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली” या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकात एकूण 99 प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरण स्वतंत्र आहे त्यामुळे क्रमशः वाचनाची गरज पडत नाही. प्रकरणे छोटी व सुटसुटीत आहेत त्यामुळे एका बैठकीत वाचून होतात. भाषा सुगम आहे. या पुस्तकाचे मराठी भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे.
    https://dl.flipkart.com/s/YyU7KmNNNN

  • @माबोवाचक, विचार पटताहेत.
    ------...............
    J.D. Vance चर्चेत आले आहेत, त्यांच्या पुस्तकाचं( Hillibilly elegy) संक्षिप्त वर्णन instaread वर सापडलं. आता मूळ पुस्तक उडत उडत वाचता येईल.

    हिलीबिली पुस्तकाच्या मानाने मुवी बेतास बात आहे. मधे काळही बराच गेलाय.
    आता तर काय खुद्द लेखकानेच पलटी मारली आहे. असो.

    Pages