Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
By the Time You Read This, I
डपो.
ONLY YOU CAN SAVE MANKIND by
ONLY YOU CAN SAVE MANKIND by TERRY PRATCHETT
जेव्हा जेव्हा जगात कुठेही संघर्षाची ठिणगी पडते तेव्हा तेव्हा मन विचलित होते तेव्हा तेव्हा हे पुस्तक काढून वाचून काढतो. मग हा बरोबर का तो बरोबर असले विचार मनात येऊन चल बिचल होत नाही.
टेरी प्रॅटचेट ह्या महान लेखकाने जॉनी मॅक्सवेल ह्या टीनएजरला हीरो धरून तीन पुस्तके लिहिली. जॉनी मॅक्सवेल ट्रायलोजी.पैकी हे पहिले पुस्तक.
९३-९४च्या सुमारास घरेलू संगणक बऱ्यापैकी पॉवरफुल झाले होते. तेव्हा कॉम्प्युटर गेम्सचे पेव फुटले होते. ग्राफिक्स रीअलीस्टिक होत चालली होती. पृथ्वीवर हल्ला करायला आलेल्या एलीअन शिप्सचा हल्ला परतवून त्यांचा समूळ नायनाट करायची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. तुमचा हात बसला असेल तर तुम्ही न “मरता” हल्ला परतावू शकता. आणि “मेलात” तरी तुम्हाला दोन तीन वेळा जीवदान (lives) असतातच.
ह्या खेळाला त्यावेळी सुरु असलेल्या अमेरिका इराक युद्धाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्या वेळी रोज रात्री टीवीवर कोणी अमेरिकन जनरल (often presented by General “Stormin’ Norman” Schwarzkopf, who was in charge. ) येऊन युद्धाच्या रम्य कथा ऐकवत असे. त्या ऐकून आपला उर अभिमानाने भरून जात असे. अमेरिका महान आहे.
लेखक प्रस्तावनेत काय म्हणतोय?
“On your computer: games that looked like war. On your TV: a war that looked like a game. If you weren’t careful, you could get confused….”
जॉनीच्या घरी त्याच्या आई बाबांचा घटस्फोट झालेला आहे किंवा होणार असतो. दर रविवारी त्याचे बाबा येऊन त्याची चौकशी करून जातात. उपदेश करतात. जॉनी ते निरिच्छपाने ऐकून घेतो आणि सोडून देतो. त्याचे सारे विश्व शाळेतल्या तीन मित्रांपुरते मर्यादित आहे. घरी TP करण्यासाठी तो गेम खेळत असतो.
पण एकदा अघटीत घडते. एलिअन शिपची कमांडर त्याच्याशी “संवाद” साधण्याचा प्रयत्न करते. ती त्याला सांगते, “आम्ही युद्ध करून थकलो आहोत. आम्हाला युद्ध करायची इच्छा नाही. तू आम्हाला एस्कॉर्ट करून आमच्या प्लानेटवर पोचव. सेफ पॅसेज दे.”
मला वाटतंय कि ओळख म्हणून एव्हढे पुरेसे आहे.
युद्ध विरोधी साहित्यापैकी एक अप्रतिम पुस्तक.
संप्रति, परिचय आवडला!
संप्रति, परिचय आवडला!
अमितव, केशवकुल दोन्ही
अमितव, केशवकुल दोन्ही पुस्तकांचा परिचय आवडला.
आजच्या लोकरंग मध्ये आलेली
आजच्या लोकरंग मध्ये आलेली विविध क्षेत्रातील मान्यवरांची वाचन यादी..
https://www.loksatta.com/lokrang/information-about-diwali-and-books-and-...
मी जोशी अभ्यंकर हत्याकांडमधील
मी जोशी अभ्यंकर हत्याकांडमधील मुनवर शहा याचं येस आय एम गिल्टी पुस्तक वाचलं. फारसं काही पटलं नाही. त्यात अभ्यंकर कुटुंबियांचा खून झाला त्या रात्रीचं वर्णन आहे. मुनवर शहाच्या मते तो पूर्ण गोंधळून गेला होता आणि खून बाकी तिघांनी केले. वास्तविकता काहीतरी वेगळी आहे हे पुस्तक वाचताना सारखं जाणवतं खास करून जक्कल गँगमध्ये सामील झाल्यानंतरचे काही प्रसंग. हे पुस्तक म्हणजे फाशीची शिक्षा टाळण्यासाठी स्वतःला निष्पाप दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न वाटला.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/bombaybookies/
https://www.instagram.com/pune_bookies/
सेपिअन्सचा मराठी अनुवाद कुणी
सेपिअन्सचा मराठी अनुवाद कुणी वाचला आहे का? कितपत वाचनीय आहे?
मुळात सेपिअन्स हेच किती वाचनीय आहे?
मुळात सेपिअन्स अत्यंत वाचनीय
मुळात सेपिअन्स अत्यंत वाचनीय आहे, तसंच त्यानंतरचं होमो द्यूसदेखील.
सध्या नेक्सस ऐकायला सुरुवात केली आहे.
माधव
माधव
मी अनुवाद वाचलेला नाही पण मूळ इंग्रजी पुस्तक वाचलेले आहे. अत्यंत वाचनीय आहे. हंटर-गॅदरर पासून आजच्या प्रगत मानव वंशाचा इतिहास आहे. मला आवडलेला भाग म्हणजे नाझी तत्वज्ञानाचे विश्लेषण. अनेक नवीन गोष्टी समजल्या.
सेपियन्स अत्यंत भारी आहे.
सेपियन्स अत्यंत भारी आहे. अनुवाद कसा आहे ते माहिती नाही.
सेपिअन्स, होमो डेअस, २१ व्या
सेपिअन्स, होमो डेअस, २१ व्या शतकासाठी २१ धडे, तिन्ही अनुवाद चांगले आहेत, वाचनीय आहेत.
इतक्या लगेच प्रतिसाद
इतक्या लगेच प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
आपण ज्या जगात वावरतो त्या
आपण ज्या जगात वावरतो त्या जगात आपल्या आजूबाजूला अनेक “जग” अस्तित्वात आहेत आणि आपल्याला त्याची जाणीवही नाही. हे आश्चर्य जनक सत्य मला प्रथम प्रतीत झाले जेव्हा मी पुंज भौतिकी वाचत होतो. त्या समांतर विश्व कल्पनेने मी भारून गेलो होतो. हे समांतर विश्व कुठेतरी दूर आहे, त्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळणे अजून तरी शक्य झालेले नाही. कदाचित कधीही मिळणार नाही.
पण जेव्हा मी टेरी प्रॅट्चेट (Terry Pratchett)चे “Nome Trilogy”( किंवा “Books of the Nomes,” किंवा “The Bromeliad Trilogy”), जे के रोलिंगचे Harry Potter आणि इवा इबटसन च्या भुतांच्या कथा... वाचल्या तेव्हा डोक्यात प्रकाश पडला कि अरे ही समांतर विश्वे आपल्या आजूबाजूलाच आहेत. फक्त त्याचे आकलन होण्याची दृष्टी आपल्याला पाहिजे. वाङ्मय(For that matter any form of Art)ही दृष्टी आपल्याला देते. म्हणतात ना “एक कलाकार अपनी मनकी ऑंखोंसे देखता है.” कुठल्याही कथा ह्या समांतर विश्वात प्रवेश करण्याचे दरवाजे आहेत.
असाच एक गूढ रम्य दरवाजा आहे बुटक्या लोकांची कहाणी “Nome Trilogy”.
हे बुटके लोक आपल्याला आपल्या लहानपाणीच परी कथेतून भेटलेले आहेत. पण टेरी प्रॅट्चेट या कथांना नवीन आयाम देतात.
पन्नास हजार वर्षांपूर्वी काही परग्रहवासी पृथ्वीवर पोहोचले. त्यांचे मुख्य यान पृथ्वी भोवती प्रदक्षिणा करत असते. एका लहान यानातून हे परग्रहवासी पृथ्वीवर निरीक्षण करण्यासाठी येत असताना ते यान पृथ्वीवर कोसळते. या अपघातून वाचलेले परग्रहवासी पृथ्वीवर अडकतात. पृथ्वी भोवती चकरा मारणाऱ्या मुख्य यानाकडे कसे परतायचे ह्याचे ज्ञान त्याना नसते. अनेक पिढ्यानंतर हा भूतकाळ ते विसरून गेले आहेत. हेच ते परीकथेतील चार इंच उंचीचे बुटके!
हे लोक आपल्या मुख्य यानाकडे कसे परततात ह्याची ही रोमहर्षक गोष्ट.
इतके पुरे आहे. जास्त लिहिण्या पेक्षा स्वतंत्र धागाच काढणे श्रेयस्कर.
श्री. ज . जोशी यांचा उत्तर
श्री. ज . जोशी यांचा उत्तर ध्रुव हा कथासंग्रह वाचला .. जरा बोल्ड विषय आहेत , त्याकाळच्या मराठी कथांच्या मानाने . एक वेगळी शैली / टाइपच्या कथा आहेत ... ताकतीचे लेखक होते हे लक्षात येतं ..
अश्लील असाही समज होऊ शकतो पण त्यापेक्षा मनाच्या विकारांना जर मोकळं रान दिलं, कंट्रोल ठेवला नाही तर ते माणसाचं अधःपतन करून त्याला पशूच्या पातळीवर आणून ठेवतात हेच लेखक तळमळीने , पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न करत आहे हे समजतं .. शिवाय सांसारिक आयुष्यात / माणसाच्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या अडचणी , दुःख कसं दाहक वाटू शकतं , तेही मनाच्या दृष्टीकोनामळेच दाहक होतं , जर दृष्टिकोन बदलला तर माणूस स्वतःला होणारा त्रास कितीतरी कमी करून घेऊ शकतो हे लेखक सांगू पाहत आहे असं वाटतं ...
विकारांच्या आधीन होऊन आयुष्य जगणाऱ्या पात्रांच्या मनात डोकावल्यावर वाटतं की मन जितकं कमी विकारी , जितके कमी काम , क्रोध , द्वेष तितका माणूस सुखी , शांत आयुष्य जगू शकतो , त्यासाठी सतत स्वतःच्या मनाचं सिंहावलोकन करून विकार आपल्या मनाचा ताबा तर घेत नाहीत याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे नाहीतर या पात्रांसारखी उद्विग्न मनाची स्थिती असलेलं आपलं आयुष्य झालं तरी पत्ता लागणार नाही ...
एकापरीने जबरदस्त आहे शैली , थोडीशी ग दि माडगूळकरांच्या शैलीशी मिळतीजुळती वाटते ...
यांचीच मी मागे आनंदी गोपाळ कादंबरी वाचली होती ... अल्पवयीन म्हणजे 13 - 14 वर्षाच्या बायकोशी फिजिकल रिलेशन्स ठेवणाऱ्या तिशीच्या गोपाळरावांबद्दल लेखकाच्या मनातला संताप आणि घृणा त्यात व्यक्त झालेली आहे .. त्याकाळच्या मानाने खूप आधुनिक आणि चांगले विचार असणारे लेखक होते हे .
नंदा खरे यांचे गोष्ट माणसाची
नंदा खरे यांचे गोष्ट माणसाची बऱ्यापैकी सेपियन सारखे आहे आणि मराठी लेखकाने लिहिल्यामुळे भाषा चांगली आहे. सेपियन भाषांतर वाचले नाही पण इंग्लिश मध्ये चांगले आहे. मराठीत मुद्दा फार काही मिस होणार नाही. जेरेड डायमंड चे गॅन्स जर्म्स आणि स्टील पण याच विषयावर आहे चांगले आहे
आनंदी गोपाळ डॉ आनंदीबाई
आनंदी गोपाळ डॉ आनंदीबाई जोशींवर आधारित आहे ना? त्यात फक्त एवढंच आहे?
आनंदी गोपाळ मध्ये एवढंच
आनंदी गोपाळ मध्ये एवढंच नाहीये. तिचा लहानपणापासून डॉक्टर होईपर्यंतचा प्रवास आहे. मी अतिपुर्वी वाचलेली पण तिच्या नवऱ्याबद्दल मध्ये मध्ये राग खूप यायचा इतकं आठवतंय. मी शाळेत असताना वाचलीय.
मीही खूप पूर्वी वाचली आहे.
मीही खूप पूर्वी वाचली आहे. गोपाळराव जोशी विक्षिप्त होते.
आनंदी गोपाळ ही कादंबरी आहे.
आनंदी गोपाळ ही कादंबरी आहे. डॉ. अंजली किर्तने ह्यांनी लिहीलेलं पुस्तक बराच अभ्यास करून लिहीलेलं आहे.
सेपियन्सचा मराठी अनुवाद मी
सेपियन्सचा मराठी अनुवाद मी वाचलाय. पण फार क्लिष्ट वाटतो.
म्हणजे मुळात विषयच तसा आहे, पण
अनुवाद फारसा पकड घेत नाही असे मला वाटले.
सरत्या वर्षातलं, २०२४ मधलं
सरत्या वर्षातलं, २०२४ मधलं काही सकस वाचन :--
_/\_
उद्देश पांडित्य प्रदर्शनाचा नाही, तर चांगल्या/ आवडलेल्या पुस्तकांची/लेखकांची नावं इतरांपर्यंत पोचावीत हा आहे.
$$मराठी:-
1. निवेदन - धर्मानंद कोसंबी
2. बुद्धलीला - धर्मानंद कोसंबी
3. हमरस्ता नाकारताना - सरिता आवाड
4. आणि मी - विजय तेंडुलकर
5. राजर्षी शाहू : पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ ( संपादक: डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. मंजुश्री पवार)
6. वानप्रस्थ - गणेश देवी
7. हिंसेचा प्रतिरोध - गणेश देवी
8. व्यक्ती आणि व्याप्ती - विनय हर्डीकर
9. मनसमझावन -- संग्राम गायकवाड
10. अवकाश - जी के ऐनापुरे
11. खून पहावा करून - इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर
12. 5960 आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा-- इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर
13. कानविंदे हरवले - हृषीकेश गुप्ते
14. मंत्रचळ उर्फ वास्तुशांती - दामोदर प्रभू
15. खिडकीचा आरसा - अवधूत डोंगरे
16. डांगोरा एका नगरीचा - डॉ. त्र्य वि सरदेशमुख
17. रक्तातल्या समुद्राचं उधाण - भारत सासणे
18. वैचारिक घुसळण - आनंद करंदीकर
19. पत्र आणि मैत्र - दिलीप माजगावकर
20. कुब्र - सत्यजीत पाटील
21. बिन्दूनादकलातीत - महेश एलकुंचवार
22. माया महा ठगनी - संवेद गळेगावकर
23. सदानंद - विक्रम भागवत
24. ज्ञानेश्वरी: एक अपूर्व शांतिकथा - डॉ. व दि कुलकर्णी
25. जोखमीच्या सावल्या - रंगनाथ पठारे
26. सट्टक - भालचंद्र नेमाडे (कवितासंग्रह)
27. ग्लोबलचं गावकूस - अरुण काळे (कवितासंग्रह)
$$हिंदी:-
1. कहीं कुछ नहीं - शशिभूषण द्विवेदी
2. लोहे का बक्सा और बन्दूक -- मिथिलेश प्रियदर्शी
3. काशी का अस्सी- काशीनाथ सिंह
4. याद हो की न याद हो - काशीनाथ सिंह
5. लोग बिस्तरों पर - काशीनाथ सिंह
6. वे दिन - निर्मल वर्मा
7. अन्तिम अरण्य - निर्मल वर्मा
8. माया लोक - कृष्ण बलदेव वैद
9. कीर्तिगान -- चन्दन पाण्डेय
10. दो पंक्तियों के बीच - राजेश जोशी (कवितासंग्रह)
11. उसका बचपन - कृष्ण बलदेव वैद
12. तितली - मानव कौल
13. घुमक्कड शास्त्र - राहुल सांकृत्यायन
14. एक तानाशाह की प्रेमकथा - ज्ञान चतुर्वेदी
15. सावंत आंटी की लडकियॉं- गीत चतुर्वेदी
16. सिमसिम - गीत चतुर्वेदी
17. वर्षावास - अविनाश मिश्र
18. पटना का सुपरहिरो - निहाल पराशर
19. बेहयाई के बहत्तर दिन - प्रमोद सिंह
20. लपूझन्ना - अशोक पाण्डे
21. कौरव सभा- मित्तर सेन मीत
22. चॉंदपूर की चंदा- अतुल कुमार राय
23. निर्वासन - अखिलेश
24. आछे दिन पाछे गए-- काशीनाथ सिंह
25. मोहन राकेश की डायरी - मोहन राकेश
26. मेरी प्रिय पुस्तकें - ओशो रजनीश
27. रूह - मानव कौल
$$अनुवादित :-
1. द नाईव्ह ॲंड सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट - ओरहान पामुक ( अनु. चिन्मय धारूरकर, जान्हवी बिदनूर)
2. दि रेड हेअर्ड वुमन -- ओरहान पामुक (अनु. सरोज देशपांडे)
3. एक होता गाझा — हकन गुंदे (अनु. उल्का राऊत)
4. द मिडनाईट लायब्ररी — मॅट हेग (अनु. शुभांगना अत्रे)
5. मृत्यूकथा: नक्षली भूमीतील स्वप्ने आणि भ्रम - आशुतोष भारद्वाज (अनु. सविता दामले)
6. सोफीज् वर्ल्ड - जॉस्टीन गार्डर ( अनु. स्मिता लिमये)
7. नाव (द रूम)— दानियल केलमान (अनु. श्रीकांत पाठक)
8. जुगलबंदी: मोदींपूर्वीचा भाजप - विनय सीतापती (अनु.अवधूत डोंगरे)
9. द बुक ऑफ मीरदाद - मिखाईल नाईमी (अनु. तिलोत्तमा देशपांडे)
10. बॉर्न अ क्राईम - ट्रेवर नोआ (अनु. आभा पटवर्धन)
11. ताओ ते चिंग - लाओ त्सू (अनु. अवधूत डोंगरे)
12. ह्युमनकाइंड - रूट्गर ब्रेगमन (अनु. सविता दामले)
13. लपंडाव मृत्यूशी - मारिया अरबातावा, शुमित दत्त गुप्ता( अनु. अनघा भट)
14. स्वीकृत - डाव्हिड वागनर (अनु. सुनंदा विद्यासागर महाजन)
15. कितने पाकिस्तान - कमलेश्वर (अनु. पद्माकर जोशी)
16. पहिला गिरमिटीया - गिरीराज किशोर (अनु. पांडुरंग कापडणीस)
17. अस्तित्वाचा उत्सव - गुणवंत शाह (अनु. मृणालिनी देसाई)
18. श्रीकृष्णाचे जीवनसंगीत - गुणवंत शाह (अनु. भाऊ धर्माधिकारी)
19. इतिवृत्त - प्रियंवद (अनु. चंद्रकांत भोंजाळ)
20. माझा भाऊ बलराज - भीष्म साहनी (अनु. भाऊ पाध्ये)
$$इंग्रजी:-
1. Time shelter - Georgi Gospodinov
2. The humans-- Matt Haig
3. Bird by Bird - Anne Lemott
(तुमचा पांडित्यप्रदर्शनाचा
(तुमचा पांडित्यप्रदर्शनाचा उद्देश नसला तरी) टोटल रिस्पेक्ट
पुढच्या वेळी पुस्तके घेताना ही लिस्ट बुकमार्क करून ठेवतो. अनुवादित मधे सुद्धा इतकी सकस पुस्तके दुकानात गेल्या गेल्या क्वचितच दिसतात.
हिंदीत खूप चांगली प्रकाशित होतात असे तुमच्याच एका धाग्यावर वाचले होते. ती आवड लावून घ्यायला हवी. पुस्तकी हिंदी खूप जड वाटते व ते वाचायची अजिबात सवय नाही. "रागदरबारी" सुद्धा मी मराठीच आणले आहे.
भाजपच्या आलेखावरच्या पुस्तकाच्या लेखकाचे नाव "सीतापती" हे चपखल आहे
आणि "मोदींपूर्वीच्या" संदर्भाने "विनय" हे ही ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एवढी पुस्तके विकत घेऊन वाचलीत
एवढी पुस्तके विकत घेऊन वाचलीत!
बाप रे, संप्रति !!
बाप रे, संप्रति !!
फा +१
कानविंदे हरवले, रूह, मिडनाइट लायब्ररी - ही तीन पुस्तकं माझ्या विश-लिस्टला आहेत. जमल्यास त्याबद्दल लिहा.
रूह आता मराठीतही आलंय बहुतेक.
सरत्या वर्षातलं, २०२४ मधलं
सरत्या वर्षातलं, २०२४ मधलं काही सकस वाचन :--
उद्देश पांडित्य प्रदर्शनाचा नाही, तर चांगल्या/ आवडलेल्या पुस्तकांची/लेखकांची नावं इतरांपर्यंत पोचावीत हा आहे.>>>
वाह.. ७७ पुस्तकं १ वर्षात, महिन्याला ६ पुस्तकं impressive!
पुस्तकाचा विषय काय आहे तो तीन
पुस्तकाचा विषय काय आहे तो तीन चार ओळीत लिहा ना.
मी महिन्याला दहा पंधरा पुस्तकं वाचनालयातून आणून दुसरे दिवशी परत करतो. ( काही तिथेच चाळून ठेवून देतो) यू.आर.अनंतमूर्ती किंवा भैरप्पा यांची नावं ऐकून पुस्तकं आणली पण कर्नाटकातील कुटुंबजीवन, भांडणं, सोवळं ओवळं, कुणी काय करायचं काय नाही, कर्ज, घर चालवणे, गावातील कलह हाच विषय. कथेतील पात्रांची नावं वेगळी पण घटना त्याच. कंटाळवाणी आहेत. विनोदी अजिबात नाहीत. भले लेखकांना विविध पारितोषिके मिळालेली असोत पण वाचन आनंद काही नसतो.
हिंदीत प्रेमचंद इतक्या सहजतेने लिहितो की साध्या सोप्या भाषेत समाजातील व्यंग्य पार उघडे पडते. बिहार उप्र भागांत एक म्हण आहे - हरिजनों को जीना भयंकर, ब्राह्मणों को मरना . महाजन लोक आखीर घी पीहीजाते हैं|
बंगाली लेखक अमिताभ घोष इंग्रजीत लिहितो. काय पुस्तकं असतात. संशोधन आणि पात्र, घटना चोख.
हिंदीतल्या कवींचे बरेच विडिओ यूट्यूबवर आहेत. कंटाळा येतो एकच ओळ थांबून थांबून दोनदा वाचतात. पटकन वाचून दाखवा, आम्ही रवंथ करू नंतर.
एवढी पुस्तके विकत घेऊन वाचलीत
एवढी पुस्तके विकत घेऊन वाचलीत! > नाही, सगळी नाही, यातली १०-१५ लायब्ररीतून मिळाली. बाकी आहेत संग्रही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
७७ पुस्तकं १ वर्षात, महिन्याला ६ पुस्तकं impressive!>> अजून २५-३० पुस्तकं असतील, जी न आवडल्यामुळे किंवा फार न आवडल्यामुळे, यात धरली नाहीत.(एक उदाहरण सांगायचं तर ऐश्वर्या रेवाडकर यांचं 'विहिरीची मुलगी'. हे खराब आहे हे कळायला पूर्ण वाचावं लागलं.!)
रूह आता मराठीतही आलंय बहुतेक.>> हो, आलंय ते मराठीत.
फारएण्ड,
"रागदरबारी" सुद्धा मी मराठीच आणले आहे. >> रागदरबारी भारीचे.! या एका कादंबरीपासून श्रीलाल शुक्लना आयुष्यभर,( आणि मरणोपरांतही) पुरून उरेल एवढं सुख, मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली. रागदरबारीला, धर्मवीर भारतींच्या 'गुनाहों के देवता'ला प्रत्येक पिढीत वाचक मिळत राहतात. त्यांच्या किती आवृत्त्या निघाल्यात ते एव्हाना मोजायचं सोडून दिलं असेल प्रकाशकांनी.
पुस्तकी हिंदी खूप जड वाटते व ते वाचायची अजिबात सवय नाही. >> हां, ते सुरुवातीला वाटतं तसं ! पण एकदा नेट धरून एक-दोन पुस्तकं वाचून काढली की मग शब्द खरखरायचे बंद होतात. मेंदू भाषेच्या लयीशी जुळवून घेतो. ओळींच्या निरगाठी सहज उलगडायला लागतात, अर्थाशी खटपट करायची भानगड उरत नाही. आणि मग स्मूथ जातं वाचायला. म्हणजे मराठी वाचताना आपला जो वेग असतो तोच हिंदी पुस्तक वाचतानाही येतो. मराठी-हिंदी असा काही फरकच उरत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नितीन वैद्य यांचं "वाचन प्रसंग" म्हणून पुस्तक आहे, 'बुक ऑन बुक्स' या कॅटेगरीतलं. पुस्तकांचा छान आस्वाद घेतात ते. त्यांचं हिंदी वाचन खूप आहे. शिवाय सतीश काळसेकर यांनीही हिंदी पुस्तकांबद्दल भरभरून लिहून ठेवलंय. आणि जयप्रकाश सावंत ही आहेत.
हिंदी साहित्य-विश्वाचा पैस, आयाम आपल्याहून बराच विस्तृत आहे. आपण आपलं प्रेमानं म्हणत राहतो की 'मराठी साहित्य मराठी साहित्य' पण ते काय खऱ्याचं नाही. (म्हणजे मला समजा एखाद्या जाणकार हिंदी भाषिक वाचकानं विचारलं की तुमच्या मराठीतले काही उत्तम लेखक सुचव, तर त्याला काय सांगायचं या प्रश्नच आहे. एक-दोन नावं सोडली तर रेकमेंड करण्यासारखं फारसं काय दिसत नाहीये. म्हणजे तिकडे प्रेमचंद, अज्ञेय,मुक्तिबोध, कृष्ण बलदेव वैद, काशीनाथ सिंह, मोहन राकेश, कमलेश्वर, श्रीलाल शुक्ल, परसाई, मनोहर श्याम जोशी, निर्मल वर्मा असे एकापेक्षा एक 'पहिलवान' लेखक मागच्या शतकात एकेक उत्कृष्ट रचना करत होते, त्या बघता, आपल्याकडचे त्या काळातले मोठे/ लोकप्रिय म्हणवणारे लेखक- प्रकाशक- अभिजन ऐतिहासिक -पौराणिक कादंबऱ्यांच्या उद्यानात बागडत होते.
या शतकातल्या, मिलेनिअल जनरेशनच्या लेखकांमध्येही हिंदी वाले कुठल्या कुठे आहेत !! म्हणजे नमुन्यादाखल तुम्ही फक्त गीत चतुर्वेदीचं "सिमसिम" किंवा " पिंक स्लीप डॅडी" वाचून बघा. लगेच फरक लक्षात येईल. (हा गीत चतुर्वेदी मुंबईत च जन्मला, वाढला. छान मराठी येतं त्याला, पण मातृभाषा हिंदी असल्याने हिंदीत लिहितो)
भाजपच्या आलेखावरच्या पुस्तकाच्या लेखकाचे नाव "सीतापती" हे चपखल आहे. आणि "मोदींपूर्वीच्या" संदर्भाने "विनय" हे ही>> विनय सीतापती साऊथ इंडियन आहेत. ते पुस्तक रोचक आहे ! वाजपेयी-अडवाणी-संघ यांच्याबाबत बऱ्याच अंतरंग गोष्टी आहेत त्यात ! कुठून कुठून लेखकानं एवढी माहिती काढलीय !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'नरसिंहावलोकन" म्हणून एक पी व्ही नरसिंहरावांवर एक पुस्तक आहे याच लेखकाचं, अवधूत डोंगरेंनी अनुवाद केलाय. तेही चांगलंय. पण हे 'जुगलबंदी' जास्त चांगलंय
संप्रति, बापरे!
संप्रति, बापरे!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फारएण्ड, विनय हर्डीकरांच्या बाबतीत नावाच्या अर्थाची पंचाईत होईल
विनय काय कमी आहेत का ! कुणी
विनय काय कमी आहेत का ! कुणी कटियार घ्या, कुणी सहस्रबुद्धे घ्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages