Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
किटाळ - लक्ष्मण माने
किटाळ - लक्ष्मण माने
मार्च - एप्रिल २०१३- उपराकार लक्ष्मण माने यांच्या विरोधात त्यांच्या निवासी/ आश्रमशाळा संस्थांमधील सहा महिला कर्मचार्यांनी एकामागोमाग एक असे बलात्काराचे आरोप केले. ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. या प्रवासाचा आलेख किटाळ म्हणजे किटाळ हे
पुस्तक. त्या बातम्या वाचल्याचे पुसटसे स्मरते आहे. पण तपशिलात वाचल्या होत्या का ते आठवत नाही.
पहिला गुन्हा दाखल होताच माने पत्नीसह फरार झाले. जामीन मिळवणे हा उद्देश. पण एकामागोमाग एक अशा सहा तक्रारी दाखल झाल्या. दोघींनी अॅट्रोसिटीही घातली. ते १२-१५ दिवसांतच सरेंडर झाले. पण पुस्तकात वाचताना हा काळ खूपच मोठा वाटतो. तारखा दिलेल्या नाहीत. आपल्या वेगवेगळ्या सहकार्यांच्या घरी ते राहिले. हे आरोप नक्की कशासाठी झाले असतील, यामागे कोण असेल याचा विचार आणि त्यावर चर्चा चालू होत्या.
वेगवेगळ्या थियर्या मांडल्या. त्यांनी लाखो भटक्या विमुक्तांना बौद्ध धर्मात सामील केलं, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचा रोष ? त्यांच्या संस्थेची जागा कोणा नेत्याला आवडली, त्याला दिली नाही म्हणून? त्यांच्यावर ज्यांचा वरदहस्त त्या शरद पवार किंवा अजित / सुप्रिया यांचंच काम?
त्यानिमित्त महाराष्ट्रातील राजकारणाचे पैलू समोर येतात. काँग्रेस राकॉ मधल्या नेत्यांकडून (पांढरे बगळे) अनुभवाला आलेला जातीयवाद , पवार प्रत्यक्ष आयुष्यात जात मानत / बघत नाहीत, पण राजकारणासाठी त्यांना करावं लागतं (!) , ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल चीड, इ.
बलात्काराबद्दल बोलताना पुरुष नाटकातला कोर्टातला संवाद तसाच्या तसा आला आहे. आरोप करणार्या स्त्रियांबद्दल वाईटसाईट लिहिलं आहे. (बलात्कार ८-१०-१५ वर्षांपूर्वी झाले, नोकरीवरून काढून टाकायची धमकी, नोकरीचं आमिष ). सहकार्यांच्या . त्यातही स्त्री सहकार्यांच्या तोंडून स्वतःसाठी कॅरॅक्टर सर्टिफिकेट सेवादलाचा वारसा, अवचट दांपत्यांची शिकवण. बर्याच मजकुराची पुनरावृत्ती आहे.
स्वतःशी संवादाला मनातले दोन पक्षी म्हटलं आहे. (विश्राम बेडेकरांच्या आत्मचरित्राचं नाव - एक झाड , दोन पक्षी हे आठवलं)
मग पोलिसांत सरेंडर केल्यावर पोलिस आणि न्यायालयीन कोठडीतलं वर्णन , तिथे येणार्या अन्य कैद्यांचे उल्लेख. यातही बलात्कार / विनयभंगाच्या खोट्या तक्रारी - प्रेमप्रकरणाला बलात्काराचं रूप, इ. आहे.
पोलिस कोठडीचं , न्यायालयीन कोठडीचं वर्णन घाबरवणारं आहे. अंदमानात सावरकरांना स्वतंत्र कोठडी होती. इथे मुंबईच्या लोकल डब्यांसारखी गर्दी आणि बाकी परिस्थिती तशीच. माधव गडकरींच्या घराबाहेर बाँबस्फोट केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीने यावर पुस्तक लिहिले होते. उत्तर प्रदेशात पोलिस कोठडीत नळाला फास लावून एक आरोपी मेला, त्याचीही आठवण होते.
ड्युटीवर असणार्या बहुतेक पोलिसांनी त्यांचं पुस्तक किंवा त्यातून पाठ्यपुस्तकात घेतलेले उतारे वाचलेले असतात. त्यांच्याबद्दल आदर असतो. महिला पोलिस त्यांच्यासाठी जेवण आणतात. सोबतचे कैदी त्यांची काळजी घेतात. पोलिशी तपासाचा खाक्या, भाषा , मारहाणीची भीती, आरोपांचे तपशील बलात्काराचं ठिकाण - अस्तित्वात नसलेला बंगला ; आश्रमशाळेतील धान्य कोठी - जिथे पोलिस अधिकारी शिंका खोकल्याने हैराण झाला एच आय व्ही पॉझिटिव्ह असलेल्या स्त्रीचा आरोप - तीन कंडोम वापरून बलात्कार केला!.
सगळ्या आरोपांचा तपास होऊन चार्जशीट फाइल झाल्यावर जामीन. मग पुढे कोर्टातली सुनावणी.
आरोपांमागची सूत्रधार त्यांच्याच संस्थेत पतीसमवेत कार्यरत सलमा नावाची स्त्री. तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते.
हरी नरके, विद्या बाळ यांचे विरोधात गेले म्हणून तर अनिल अवचट, बाबा आढाव, अॅड. वर्षा देशपांडे यांचे समर्थक म्हणून उल्लेख आले आहेत.
मानेंच्या आश्रमशाळा - शिक्षणसंस्था- सरकारी अनुदानातून हा उल्लेख निसटला - धर्मांतराचं, भटक्या विमुक्तांना, पारधी व इतर गुन्हेगार जमातींना नवा मार्ग देण्याचं कार्य याबद्दल काहीच माहीत नव्हतं.
आपल्याकडची नाय व्यवस्था पाहता साडेतीन वर्षांत म्हणजे ते लवकरच दोषमुक्त झाले म्हणायचं. यानिमित्ताने बलात्कार, अॅट्रॉसिटी हे कायदेही कसे अन्यायकारक ठरू शकतात, त्रास देण्यासाठी वापरले जाऊ शकतात , तेही समोर आलं. माने स्वतःही अनु जा/ ज चे असल्याने अॅट्रॉसिटीबद्दल त्यांनी तितक्या तीव्रतेने लिहिलेलं नाही.
ते फरार असताना लोकसत्तेने लिहिलेला अग्रलेख मिळाला.
निर्दोष मुक्तता झाल्याच्या बातमीला तितकी ठळक प्रसिद्धी मिळाली नाही, असं मानेंचं म्हणणं आहे.
खूप वर्षं शोधत असलेली एक
खूप वर्षं शोधत असलेली एक भयकथा सापडली . पाचवी सहावीत असताना वाचलेली .... मुंबईला मामाकडे गेले असताना तिथल्या लायब्ररीत ... पण लेखकाचं नाव बघायचं राहिलं बहुधा ...
जी लेखनशैली आठवत होती त्यावरून धारप किंवा मतकरींची वाटत होती पण त्यांची उपलब्ध असलेली सगळी पुस्तकं वाचली त्यात कुठे सापडली नाही .
र . अ . नेलेकर यांचा कथासंग्रह घेतला जस्ट त्यात सापडली आज शेवटी . एक अंदाज बांधलेला कदाचित यांची असू शकेल , तो खरा निघाला . अजून पूर्ण वाचायचं आहे पुस्तक . धारप मतकरी लेव्हल नाहीये , जरा खालची पायरी आहे ... जे धारप मतकरींनी एफर्टलेसली लिहिलं त्याप्रकारचं प्रयत्नपूर्वक शैली कॉपी करण्याचा प्रयत्न करून लिहिल्याचं जाणवतं . म्हणजे एखाद्या मोठ्या चित्रकाराची कलाकृती एखाद्या दहावीतल्या हौशी विद्यार्थ्याने आपल्यापरीने कॉपी करावी , तसा दर्जात फरक पडतो ... पण लेखकाने त्याच्यापरीने उत्कृष्ट , 100 % दिलेलं आहे हे निश्चित ..
आता हृषीकेश गुप्तेंची मोठी तिची सावली ही कथा मिळायची राहिली आहे - धनंजयच्या एका जुन्या अंकात वाचली होती आणि धारपांचं अवकाशाशी जडले नाते हे पुस्तक ... एवढ्या दोन गोष्टी मिळाल्या की आतापर्यंत शोधलेल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या .
आत्ताच कथा वाचून झाली . झाली वाचून .. ऍक्चुली त्यावेळी म्हणजे सहावीत बहुतेक मी धारप नुकते नुकतेच वाचायला चालू केले होते , 2 - 4 पुस्तकं फार तर वाचली असतील .
त्यामुळे त्यांची शैली आणि यांची यात काही फरक जाणवला नाही ...
आता धारपांच्या सगळ्या पुस्तकांची इतकी वर्षं पारायणं केल्यानंतर फरक झटकन लक्षात येतो .... फारच सामान्य आहे शैली .. म्हटलं तसं हौशी लेखकाने आपण पण भयकथा लिहायच्याच या आवडीपोटी / हौसेपोटी लिहिल्या झालं ..
असो .. कथा ठीक होती , लहानपणी जास्त छाप पडली होती मनावर , आता एवढी ग्रेट वगैरे वाटली नाही .
आपलं नशीब म्हणून आपल्याला धारप मतकरी वाचायला मिळाले , धारप मतकरी हे दोघेजण नसते तर असल्याच लेखकांच्या बी ग्रेड भयकथा , गूढकथा वाचल्या असत्या आपण .. म्हणजे वाचल्या नसत्या अर्थात ... ज्यांना फक्त मराठी वाचनाची सवय आहे , इंग्रजीतल्या त्या प्रकारातल्या साहित्याची ओळख नाही ते वाचक भयकथा हा कमी दर्जाचा प्रकार म्हणून चार हात लांब राहिले असते .
'उचल्या' लिहिणारे लेखक तेच ना
'उचल्या' लिहिणारे लेखक तेच ना?
गेल्या काही महिन्यांत वाचलेली
गेल्या काही महिन्यांत वाचलेली पुस्तकं -
Pietr, The Latvian (Inspector Maigret novel)
Sebastin and Sons (T.M.Krishna)
The Spy Who Came In From The Cold (John Le Carre)
Traces (Patricia Wiltshire)
बारोमास
Educated (Tara Westover)
मोइ कुन? आमी कुन? (मेघना ढोके)
Serious Men (Manu Joseph)
Traces, Sebastian - यावर सविस्तर लिहिण्याची इच्छा आहे. कधी? माहित नाही
पुस्तके कोणत्या विषयावर आहेत
पुस्तके कोणत्या विषयावर आहेत ते थोडक्यात देता येईल. कादंबरी /कथा/ लेख /निबंध ?
उचल्या' लिहिणारे लेखक तेच ना.
उचल्या' लिहिणारे लेखक तेच ना..... हो.
बलुतंच्या तुलनेत (तुलना करू नये हे माहीत असूनही) उचल्या तेव्हा आक्रस्ताळी वाटले होते.
गेल्या आठवड्यात साथसोबत हे सिंधू (उषा) कानेटकर यांचे पुस्तक वाचले.त्यांच्या लेखांचे संकलन आहे.वसंत कानेटकर यांच्या त्या पत्नी.त्यांची लेखनशैली छान आहे.निरनिराळ्या व्यक्तींवर लिहिले आहे. वि. वा. शिरवाडकरांबाबत वाचून लेखक आणि नवरा परस्परविरोधी असतात असं वाटले.
उचल्या की उपरा? उचल्या
उचल्या की उपरा? उचल्या लिहिणारे लक्ष्मण गायकवाड
उचल्या लक्ष्मण गायकवाड, अगदी
उचल्या - लक्ष्मण गायकवाड, अगदी बरोबर फारएन्ड.
उपरा - लक्ष्मण माने.
ह्या वर्षीपासून किती आणि
ह्या वर्षीपासून किती आणि कोणती पुस्तके वाचली ह्याचा ट्रॅक ठेवायला सुरुवात केली आहे आणि शक्यतो महिन्याला एक पुस्तक तरी वाचायचे असं ठरवलं आहे. आताशी चौथा महिना सुरु झालाय अजून तरी जमतंय. डिसेम्बर मध्ये खरं कळेल.
१. Burnout - सोफी किनसेला
काही वर्षांपूर्वी सापडलेली हि लेखिका. विनोदी प्रकारात मोडणार तीच लिखाण. तिच्या पुस्तकातील नायिका कधीच सर्वगुण संपन्न, गुणी नसते. उलट स्वतः च्या गुण दोषांसकट, प्रामाणिकपणे सगळ्या समस्यांवर मात करत पुढे चालत असते. तिची सगळी पुस्तक वाचून झालीयेत. हे नवीनच आलेलं. खूप जास्त नाही आवडलं.
२. The Razor's Edge सॉमरसेट माउघम
असाच एका धाग्यावर या लेखकाचा उल्लेख झालेला तेव्हाच एखाद पुस्तक वाचायचं ठरवलं. पहिल्या महायुद्धानंतरचा काळ. अमेरिका, यूरोप, आणि भारत या तिन्ही खंडांच त्याकालीन चित्रण पाहायला मिळत.
पहिल्या महायुद्धात फायटर पायलट म्हणून काम करत असताना नायकाचा जीव वाचतो पण तो अनुभव त्याच्यासमोर प्रश्न उपस्थित करतो. ज्याचं उत्तर शोधता शोधता तो युरोपात जातो, नंतर भारतात जातो, बराच अभ्यास करतो.
त्यावेळचे युरोपातील सांस्कृतिक जीवन, अमेरिकेतील आर्थिक मंडईतील स्थिती, पाश्चात्य जगातील त्या वेळची सुखासीनता असं बरंच पातळ्यांवर दर्शन घडत.
मला आवडलेल्या गोष्टी, त्या काळातील पात्रे, त्यांचे स्वभाव विशेष ह्या काळातही आपल्याला तसेच बघायला मिळतात.
जुन्या पद्धतीची लिखाण शैली असल्यामुळे सुरुवातीला वाचताना थोडं वेगळं वाटलं किंवा जास्त वेळ लागला.
३. Firefly Lane - ह्या पुस्तकावर बेतलेली नेटफ्लिक्स सिरीज आहे. चांगली आहे. पण त्या सिरीज पेक्षा मला पुस्तक वाचायला खूप जास्त आवडलं.
छन्दिफन्दि >>> रिव्यू आवडला.
छन्दिफन्दि >>> रिव्यू आवडला.
विपू चेक करा.
सॉरी,उपरा.. लक्ष्मण माने.
सॉरी,उपरा.. लक्ष्मण माने.
फारेंड,धन्यवाद!
माउघम याचा उच्चार माॅम करतात.
माउघम याचा उच्चार माॅम करतात. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
खूप वर्षांपूर्वी वाचल्याने
खूप वर्षांपूर्वी लक्ष्मण माने वाचल्याने उचल्या?/उपरा? नाव आठवत नव्हते.
____________________________
अमिताभ घोष यांचे Ibis triology मधले दुसरे पुस्तक river of smoke वाचून संपवले. याबद्दल विकीपान वाचा. चीनशी अफुचा व्यापार करून ब्रिटिश, अमेरिकन लोक कसे गंडवत होते आणि संपत्ती मिळवून शिरजोर झाले याचं संशोधन दहा वर्षे करून छान पुस्तक लिहिले आहे. आता या मालिकेतील तिसरे पुस्तक Flood of fire वाचणार आहे.
धनवंती हो बरोबर आहे तुमचं.
धनवंती हो बरोबर आहे तुमचं. Maugham ह्याचा उच्चार Maum असा
होतो. आता संपादनाची वेळ टळून गेली आहे. क्षमस्व!
अमिताभ घोष यांचे Ibis
अमिताभ घोष यांचे Ibis triology मधले दुसरे पुस्तक river of smoke वाचून संपवले. >>>>
या ट्रिलॉजीतले पहिले पुस्तक 'सी ऑफ पॉपीज' वाचले होते. सुंदर आहे. अमिताव घोष खूप रिसर्च करून लिहितात हे जाणवते.
वरील सर्व पुस्तक परिचय
वरील सर्व पुस्तक परिचय आवडले !
नुकतेच आनंद यादव यांचे
नुकतेच आनंद यादव यांचे घरभिंती वाचले. त्यांच्या आत्मचरित्र मालिकेतील हे तिसरे पुस्तक. भाषा अत्यंत ओघवती. वाक्ये छोटी व सुटसुटीत. छोटे पॅरेग्राफ. संवादांचा योग्य वापर. त्यामुळे वाचन सुलभ होते. कथा वेगाने पुढे सरकते. त्यामुळे कोठेही कंटाळवाणे वाटत नाही. गुंतून जायला होते. व्यक्तींची व प्रसंगांची वर्णने चपखल आहेत. त्यामुळे ते डोळ्यासमोर उभे राहतात. ६०-७० च्या दशकातील त्यांच्या शेतकरी-शेतमजूर कुटुंबाची गरीब परिस्थिती वर्णिली आहे. पण कोठेही बटबटीत वाटत नाही. माणसांचे स्वभाव, त्यांची जिद्द, हताशा, हेकेखोरपणा, लढाऊ वृत्ती या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त केल्या आहेत. वाचावे असे पुस्तक.
Sea of poppies आवडले आहे. आता
Sea of poppies आवडले आहे. आता पुढची पुस्तके वाचणार
ऋतुराज यांनी पै फ्रेंडस
ऋतुराज यांनी पै फ्रेंडस लायब्ररीतर्फे २१ एप्रिलला डोंबिवलीत होणाऱ्या बुक स्ट्रीट उपक्रमाची माहिती दिलेली, तो bb कुठला मी विसरले. त्यामुळे इथेच लिहिते. ऋतुराज यांचे आभार. योग्य bb मिळाला लवकर की हलवते ही पोस्ट.
मी जाऊन आले. तिथे एका व्यक्तीला एक कूपन आणि त्यावर उपलब्ध असलेलं कुठलंही एक पुस्तक फ्री असं होतं. मला वाटलं एक पुस्तक फ्री आणि नंतर हवी असली तर विकत घ्यायची पण विकत संकल्पना नव्हतीच. मी माझी लिस्ट काढलेली भा रा भागवत यांचे आनंदी आनंद गडे, शांता शेळके यांचे चारचौघी आणि शरद बावीस्कर यांचं भुरा. मी विचार केला एक फ्री मिळालं नाही मिळालं तरी तिन्ही विकत घेईन. उपक्रम फक्त एका व्यक्तीला एक पुस्तक फ्री असल्याने , एक कूपन दिलेलं आणि मला एकही पुस्तक मिळेना लिस्टमधले. शेवटी चारचौघी मिळालं. ते चांगल्या अवस्थेत नाहीये पण मिळालं याचा आनंद वाटला. वरती नाव नव्हतं पण मी उचलून उघडले तर चारचौघी, मस्त वाटलं.
या पुस्तक उपक्रमात माझी बारा वर्षाची भाची आणि तिच्या मैत्रिणी रात्रभर पुस्तकं लावायला स्वयंसेवक म्हणून गेलेल्या, त्या लहान असल्याने माझी बहीण व बाकीच्या आईही गेलेल्या आणि त्यांनीही मदत केली. मला भाचीबद्दल आणि एकंदरीत सर्व मदत करणाऱ्या लहान मुलांबद्दल अभिमान वाटला. तिने स्वत:हून हे ठरवलं, आम्ही कोणी न सांगता, त्या निमित्याने पुस्तकं हाताळली तरी. रात्रभर हे करून थोडा वेळ झोपून, तिला सकाळी सध्या नाट्यशिबिर करतेय तिथे जायचं होतं, साडेनऊ दहाला तिथे आली असेल तेव्हा तिच्या आवडीची पुस्तकं मात्र फार नसावीत, उपक्रम बंद व्हायचीही वेळ झालेली. मी सात ते नऊ तिथे होते नंतर निघाले, आमची भेट झाली नाही. मी तिच्यासाठी घेतलं असतं पण ती म्हणाली की स्वत: जाऊन घेईन.
काल जाता आलं नाही. पाहुणे
काल जाता आलं नाही. पाहुणे होते. मागच्या वर्षी गेलो होतो. खूप गर्दी असते सकाळी. चांगला उपक्रम फ्रेंड्स लायब्ररीच्या मालकांचा - श्री पांडुरंग पै. शिवाय सर्व प्रायोजक, कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्वयंसेवकांचा, वाचकांचा उदंड प्रतिसाद .
हो उत्तम उपक्रम. मी लवकर
हो उत्तम उपक्रम. मी लवकर जायचं ठरवलेले पण निघायला पावणेसात झाले, सकाळी सकाळी चालत जायला मस्त वाटलं. पावणे दोन तास होते आतमध्ये, गर्दी आठ वाजल्यानंतर वाढत गेली, तोपर्यन्त तासभर मला निवांत बघता आलं. पै यांचा पुस्तक आदानप्रदान उपक्रम असतो, त्यातली बरीच पुस्तकं इथे होती. अध्यात्मिक, वैचारिक, चरित्र सुस्थितीत होती पण मला मी लिहिलेल्यापैकी हवं होतं आणि लेटेस्ट दिवाळी अंक होते. चारचौघी नसतं मिळालं तर एखादा दिवाळी अंक घेणार होते किंवा पर्यटन पुस्तक. पुस्तकांच्या सहवासात खूप दिवसांनी रहायला मिळालं. कोविड आधीच मी लायब्ररी बंद केल्याने एवढी पुस्तकं आत्ता बघितली.
पै यांनी पुस्तक चळवळ फार मोठ्या स्तरावर नेलीय. दंडवत त्यांना.
चांगला उपक्रम आहे. खूप
चांगला उपक्रम आहे. खूप लोकप्रिय आहे असे दिसतेय.
रंगनाथ पठारे ह्यांनी लिहिलेली
रंगनाथ पठारे ह्यांनी लिहिलेली सातपाटील कुलवृत्तांत ही जाडजूड साडेसातशे पानांची कादंबरी नुकतीच वाचून संपवली. हे पुस्तक आणलं होतं २०२१च्या सुट्टीतच पण त्याचा आकार बघून वाचायला सुरुवात करायचं धाडसच होत नव्हतं आणि मुख्य म्हणजे हाताशी पुरेशा वेळ सलग काही दिवस असणं आवश्यक होतं. अखेर ह्या फेब्रुवारीच्या अखेरीस पुस्तक वाचायला सुरुवाती केली आणि मधले दोन ब्रेक धरून काल पूर्ण केली.
कादंबरी खूप रंजक आहे! मला कादंबरीची कल्पनाच खूप आवडली. आपण कोण, आपले पूर्वज कुठले, ते कुठून आले वगैरे प्रश्नांबद्दल कुतूहल सगळ्यांना कधी ना कधी तरी वाटतचं. हे कुतूहल "मानवी वंश" ह्या इतकं व्यापक नसेल आणि केवळ आपलं कुटूंब / परिवार / आडनाव इतपच सिमीत असेल तरीही त्यातून अनेक सुरस आणि चमत्कारीक गोष्टी सापडू शकतात. हे पुस्तक म्हणजे 'सातपाटील' ह्या कुटूंबाचा कुलवृत्तांत. त्याचा मुळपुरूष श्रीपती (तो खरा सातपाटील नाहीच) ते कथेचा निवेदक देवनाथ सातपाटील ह्यापर्यंत. हा इतिहास सुमारे सातशे वर्षांचा, म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून ते अगदी कोव्हीड-पूर्व वर्ष म्हणजे २०१९ पर्यंतचा. काळाची जाणीव करून देण्यासाठी तत्कालीक ऐतिहासीक घटना प्रकरणांच्या सुरूवातीला किंवा अधेमधे सांगितलेल्या आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांचा काळ, शीवपूर्वकालीन महाराष्ट्र, मुघल राज्य, शिवशाही, पेशवाई, १५० वर्षांचा ब्रिटीश अंमल आणि त्यात घडणार्या सामाजिक, राजकीय घडना आणि स्वातंत्र्योत्तर
काळ अश्या प्रदिर्घ कालखंडात कथा पुढे सरकते. आपल्या शालेय शिक्षणातला इतिहास जसा भारताच्या स्वातंत्र्यापाशी संपतो, पुढचं कोणी शिकवतच नाही. तसच स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांच्या फारश्या नोंदी इथे नाहीयेत.
अतिशय गोळीबंद सुरूवातीनंतर कथेत पुढे घडणार्या घटनाही वाचकाला आवडतील अश्या सुरश, लोभस आहेत! अनेक हव्यावह्याश्या योगायोगांनी आपल्याला आवडेल अश्या पध्दतीने कथा पुढे सरकते. नोंद करण्याजोगी गोष्ट म्हणजे कथेतल्या अनेक स्त्रिया अतिशय धाडसी, विचारांनी पुढारलेल्या वगैरे आहेत. त्याकाळी सामान्य घरांमधल्या स्त्रिया खरोखरच अश्या होत्या का असा प्रश्न पडला. कथेतले सगळे धागे शेवटाकडे येताना छान विणले आहेत. आधी येणारा कुठलाही उल्लेख उगीच नाही आणि त्याचा पुढे काहीतरी संदर्भ येतोच. काही ठिकाणी ते स्पष्टपणे सांगितले आहे, तर काही ठिकाणी ते अध्यारूत आहे.
कथेतल्या पात्रांचा तोंडी असलेली भाषा काळाशी सुसंगत नसावी असं मला वाटतं. उदाहरण द्यायचं झालं तर कथा निवेदकाचा जन्म १९५० सालचा, म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीचा. कथा निवेदक मुंबईला येऊन शिकलेला आणि लेखक, त्यामुळे तो प्रमाण भाषेत बोलतो. पण माझ्या आज्जीच्या पिढीतल्या लोकांचं मी ऐकलेलं बोलणं आणि कथा निवेदकाच्या आईचं बोलणं ह्यात फारस साधर्म्य वाटत नाही (जात आणि प्रांत ह्यातला फरक बाजूला ठेऊनही). शिवाय त्यामागच्या तीन चार पिढ्याही तशीच भाषा बोलतात! पुस्तकाची शेवटची पन्नासएक पानं अतिशय सुरेख आणि तर्कशुद्ध चिंतन आहे. पण हे चिंतन आधीच्या सातशे पानांशी जुळत नाही. म्हणजे आधी इतकी सुंदर रंजक गोष्ट सांगणारा कथा निवेदक अचानक इतका तर्कशुद्ध विचार का आणि कसा करायला लागला आणि जर तो मुळात तर्कशुद्ध होता तर आधीच्या गोष्टीतले तपशील ह्या तर्कांचा कसोटीवर का तपासून पाहिले नाहीत असे काही प्रश्न पडले. म्हणजे शेवटे चिंतन आणि आधीची गोष्ट हे वेगवेगळं लेखन म्हणून सुरेख आहेत पण ते एकत्र केल्यावर ठिगळ लावल्यासारखे वाटतात.
पुस्तक वाचनीय नक्कीच आहे. दोन ओळींची टिवटीव आणि ३० सेकंदांची रिळं इतकाच अटेन्शन स्पॅन असलेल्या माझ्या पिढीला ७५० पानांचं पुस्तक नेटाने वाचून पूर्ण करावसं वाटलं हेच ह्या लेखनाचं यश आहे.
धन्यवाद पराग. मीही २-३
धन्यवाद पराग. मीही २-३ वर्षांपूर्वीच घेतले आहे पण अजून वाचले नाही. वरच्या वर्णनातून 'तुंबाडचे खोत' आठवते.
अन्जू , अहो आभार कसले त्यात.
अन्जू , अहो आभार कसले त्यात.
धन्यवाद. तुम्ही तिथे गेलात आणि तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल.
ती माहिती मी "मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रदर्शने, कार्यक्रम - २०२०" या धाग्यावर टाकली होती. मलाही ती कुठे टाकावी ते नाही कळलं त्या वेळी.
मला नाही जमल जायला. पुस्तक आदान प्रदानाला जाईन
पराग, सातपाटील इंटरेस्टिंग
पराग, सातपाटील इंटरेस्टिंग वाटतेय. Thank you !
ओहह तो bb होता का ऋतुराज. जाम
ओहह तो bb होता का ऋतुराज. जाम विसरले.
Btw मी आणलेलं पुस्तक चौघीजणी आहे. पहिले पान फाटल्याने आणि डोक्यात त्या पुस्तकाचे नाव चारचौघी असावं वाटल्याने तसं लिहिलं.
कुणा एकाची भ्रमण गाथा ह्याच
कुणा एकाची भ्रमण गाथा ह्याच अभिवाचन यूट्यूब वर ऐकत्ये सध्या... दर शनिवार एक भाग प्रकाशित करतात.,. आठवडाभर वाट बघायला लागते .. पण इतकं सुंदर लिखाण आणि वाचन आहे की खरंच शनिवारी सकाळचा चहा ते ऐकताना होतो... Wknd ची सुंदर सुरुवात.
अरुण साधूंचं सिंहासन वाचून
अरुण साधूंचं सिंहासन वाचून झालं . सुंदर आहे . चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यात एवढा इंटरेस्ट आला नाही . वाचताना जसे सगळ्या पात्रांच्या मनातले विचार समोर असतात तसे चित्रपटात नाही पाहायला मिळत जर ते विशेष परिश्रम घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तर ... पण नंतर कधीतरी पाहण्याचा प्रयत्न करेन , त्यावेळी कदाचित आवडेलही .
>>>>>> कुणा एकाची भ्रमण गाथा
>>>>>> कुणा एकाची भ्रमण गाथा ह्याच अभिवाचन यूट्यूब वर ऐकत्ये सध्या... दर शनिवार एक भाग प्रकाशित करतात
बघते.
Pages