लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील कुमार/ कपूर या घोटाळ्यावरून दमा मिरासदारांनी सांगितलेला एक जुना किस्सा आठवला.
आणीबाणीच्या काळात त्यांचा बेळगावला कथाकथनाचा कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी ‘माझी पहिली चोरी’ ही कथा सांगितली होती. दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमाची बातमी वृत्तपत्रात छापून आली. परंतु त्यात मात्र,
“मिरासदारांनी ‘माझी पहिली चोळी
ही कथा सांगितल्याचा” उल्लेख होता ! मिरासदारांनी ते कात्रण बराच काळ जपून ठेवले होते.

( ध चा मा झाल्याने कधी कधी विनोदही होतो ! )

अखेर तेथून जाणारे वन्यजीव अभ्यास रसोश लोधी यांनी हौशी वाहनचालकांना समजावले व बछड्यांचा मार्ग मोकळा केला व ते वाघिणीसह जंगलात मार्गस्थ झाले.
https://epaper.loksatta.com/article/Mumbai-marathi-epaper?OrgId=9738c513...
"ते" म्हणजे बछडे बरं का! वन्यजीव अभ्यासक सरोश लोधी नव्हे. त्यांचे नाव सरोश आहे की रसोश? आणि "अभ्यास" हा शब्द अभ्यासक असा हवा होता.
१) ही बातमी पहिल्या पानावर छापण्यासारखी आहे का?
२) संदर्भ लक्षात घेऊन समजून वाचन करावे अशी सर्वांचीच अपेक्षा असेल तर लोकं मराठी भाषा करमणूक म्हणून वाचतील. त्यातील गांभीर्य नष्ट होईल.

हवामान बदलाचा एक परिणाम म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या कालावधीत सूक्ष्म वाढ होणे. पण लोकसत्तेने विश्लेषण करताना, 'दिवसाचा कालावधी वाढला' याचा अर्थ 'रात्रीपेक्षा दिवस मोठा झाला' असा असल्याचा जावईशोध लावलाय!
https://www.loksatta.com/explained/climate-crisis-is-making-days-longer-...
IMG-20240717-WA0036.jpg
हे 'अनेक' कोण असतील?
बहुधा मूळ माहिती इथून घेतली असावी- https://www.cnn.com/2024/07/15/climate/polar-ice-melting-day-length-time...

9 ऑगस्टच्या छापील मटामधील विशेष चौकटीतील बातमी :

कुशल मनुष्यबळ नसल्याने पाठ्यपुस्तकांमध्ये चुका होण्याचे प्रमाण वाढणार
बालभारतीत 80 टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त
विज्ञान, हिंदी, गणित, इतिहास व इंग्रजी अशा विषयांसाठी विशेष अधिकारी उपलब्ध नाहीत".

(कवितांची निवड हा मुद्दा आता फारच गौण ठरणार ! Happy

लोकसत्ता विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर "यशस्वी भव" ही लेखमालिका चालविते/तो. वेगवेगळे शालेय शिक्षक हे लेख लिहितात.
आज बीजगणितातील अंकगणिती श्रेढी वर लेख आहे.
एका उदाहरणात ४ ने नि:शेष भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्या किती असे विचारले आहे.
त्यासाठी श्रेढीचे समीकरण रचले आहे.
ते सोडवताना शेवटून दुसरी पायरी गाळून सरळ २२४ असे उत्तर दिले आहे.
२२५ हवे ना?

sakal mistake.png

दशक ? >>> शतक हवे.
खुद्द संपादकांच्या लेखात तपशीलाची मोठी चूक दिसल्याने अडखळायला झाले.

उपसंपादकांच्या कुंभकर्णी डुलक्या आता सर्वव्यापी झाल्यात !

मासला :
IMG_6976.jpeg

वाचकांच्या सोयीसाठी मी पीतकांडी वापरली आहे.

हसा, दुसरे काही शक्य नाही Lol

आत्याचे वैभव >>> मराठी मालिकेतल्या आत्याला काहीही अशक्य नसतं. अधिक स्पष्टीकरणाकरता फारएण्डशी संपर्क साधावा. Happy

रच्याकने आत्याच्या जागी काय शब्द असावा याचा किडा माझ्याही डोक्यात वळवळतोय. मी माझ्यापुरता तब्येतीचे वैभव असा अर्थ लाऊन घेतला आहे.

आत्याबाई ला बोलवा
आत्म्याचे वैभव असेल का? Biggrin
पायावर चालण्याचा प्रयत्न करा>>>>>>हातावरही चालून पाहिले पाहिजे

पायावर कसे चालायचे???

“कुशल मनुष्यबळ नसल्याने पाठ्यपुस्तकांमध्ये चुका होण्याचे प्रमाण वाढणार
बालभारतीत 80 टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त>>>>>>
बघा…. आणि विरोधक म्हणतात बेरोजगार वाढताहेत…

आत्याबाई ला बोलवा ?

तसेही टिप्स “जेष्ठां”साठी आहेत. किती जेष्ठांच्या आत्याबाई हयात आहेत आणि पैकी किती वैभव राखून आहेत हे बघावे लागेल.

हे जमले की मग “काढदून” ची धून कोण काढतयं ते ऐकायला दून valley गाठावी लागेल. त्यासाठी अनेक “पाय्या” चढणे आले ! एकूण सोपे दिसत नाही काम Lol

उत्स्फूर्तपणे हसू येणे आरोग्याला चांगले असते. ते काम वरील सूचना फलकाने केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन टाकू !

प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवरून इथे एवढी चर्चा होते, आज इतके दिवस झाले तरी इथल्या कोणालाही कलकत्ता प्रकरणाची दखल घ्यावीशी वाटली नाही का? का दर वेळेप्रमाणे फक्त डॉक्टर्स चा प्रश्न, त्यांनी आपसात मिटवावा अशीच भूमिका घेतली जाणार? का दर वेळेस हे प्रश्न फक्त डॉक्टर्स आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्येच विरून जातात? एकदा तरी समाज आमच्यामागे उभा राहील का? की जबाबदारी ही फक्त आमचीच समाजाप्रती असते? आणि समाजाची आमच्याप्रती काहीच नसते??

का दर वेळेप्रमाणे फक्त डॉक्टर्स चा प्रश्न, त्यांनी आपसात मिटवावा अशीच भूमिका घेतली जाणार? का दर वेळेस हे प्रश्न फक्त डॉक्टर्स आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्येच विरून जातात>>>>

दु:खद घटना धाग्यावर चर्चा झाली. हा धागा वेगळा आहे.

‘दर वेळेस’ चा संदर्भ कळला नाही.

वृत्तपत्र नाही, पण मला फ़ेसबुक फ़ीडमध्ये अकारण “किचन टिप्स मराठी” हे पेज पुनःपुन्हा दिसते. दिव्य(तम) मराठी आहे ! मूड ख़राब असला, उदास वाटत असेल तर ज़रूर बघा/ वाचा असे सुचवतो.

खदखदून हसू येईल ही खात्री. फक्त खणखणीत आवाजात मोठ्याने वाचा Happy

वानगीदाखल : IMG_7054.jpeg

आणि हे :

IMG_7055.jpeg

Pages