दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे. काय केलं असतं म्हणजे ते लोक वाचले असते असा विचार मनात येत होता. ह्यूमन चेन केली असती तर जमले असते का? पाणी जोरात येतंय हे आधीच लक्षात कसे आले नाही वगैरे प्रश्न आहेतच. निष्काळजीपणा किंवा अडाणीपणामुळे हकनाक माणसे जिवानिशी गेली Sad

- आधी तिथे त्यांनी जायलाच नको होते

- असे काही होत आहे हे बघून अचानक मानवी साखळी करणे, (आणखी एक फेसबुकवर वाचलेला उपाय, की) बायकांनी (लाज व ) साड्या सोडून व दुपट्टे देऊन ते एकत्र बांधून त्यांच्याकडे फेकणे (अश्या वर्षा सहलीला साड्या नेसून कोण बायका जातील हे माहीत नाही) (हा उपाय स्त्रीनेच सुचवला आहे)

हे दोन्ही करणे सुचणे तरी शक्य आहे का? त्यात ते अंतर केवढे मोठे होते!!

भुशी डॅम दुर्घटनेतील दुर्दैवी जीवांना श्रद्धांजली अर्पण!

खरेच, निसर्गाला हलक्यात घेऊ नये, इंदोरलाही असेच झाले होते

मिल्की वे मध्ये उडी मारलेले धावडे आर्मी मॅन, उत्कृष्ट स्विमर, जिम प्रशिक्षक होते.अश्या माणसाचा धबधब्यात वाहून मृत्यू झाला Sad बाकी सामान्यजन, अनोळखी पाण्याची सवय नसलेले, त्यांचा टिकाव लागणे अजूनच कठीण.
सर्व मृतांना श्रद्धांजली. अश्या घटना कमी होवोत, आपत्कालीन मदत वेळेवर मिळो.दोन्ही घटनांचे व्हिडिओ डोक्यातून जात नाहीत.प्रचंड अस्वस्थ करणारे आहेत.

>> मिल्की वे मध्ये उडी मारलेले धावडे आर्मी मॅन, उत्कृष्ट स्विमर, जिम प्रशिक्षक होते.अश्या माणसाचा धबधब्यात वाहून मृत्यू झाला
>> बाकी सामान्यजन, अनोळखी पाण्याची सवय नसलेले, त्यांचा टिकाव लागणे अजूनच कठीण.

दोन वेगळ्या (व वेगळ्या प्रकारच्याही) घटना आहेत हो. बातम्यांनुसार, त्यांनी ताम्हिणी मधल्या भर प्रवाहात आत्मविश्वासाने उडी मारली परंतु वाहून गेले. लोणावळ्याच्या घटनेत मात्र प्रवाह नसलेल्या पात्रात अचानक पाणी आल्याने दुर्घटना घडली. अगदी असेच पाताळपाणी धबधबा (मध्यप्रदेश) येथे २०११ साली घडले होते.

बादवे, लोणावळ्यात याधीही पर्यटक त्या झऱ्याच्या कोरड्या पात्रात जाऊन बसत होते असे दिसून येते. गुगलवर लोकांनी फोटो अपलोड केलेले दिसत आहेत.

हो.वेगवेगळ्या आहेत खऱ्या.पण दोन्हीकडे निसर्गाने स्वतःची अनप्रेडिकटेबिलिटी दाखवून दिलीय, या अर्थाने म्हणायचं होतं.
धबधबा, समुद्र अश्या ठिकाणी थोडं आत जाऊ, तसंही कमी पाणी आहे असा मोह होत असेलच.पण अचानक आलेल्या पाण्याचा वेग/पायाखाली रेती/धबधबा गुरुत्वाकर्षण या नेहमीच्या पाहण्यात आणि अनुभवात नसलेल्या गोष्टी पटकन लक्षात येत नसतील.

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली.
हे अपघात टाळण्यासारखे आहेत.
बायकांची संख्या जास्त असण्यात नवल नाही. कारण पायघोळ कपडे, सोबत मुलंबाळं त्यामुळे पळण्याचा वेग कमी पडतो. काही (अगदी सुशिक्षित) बायकांनाही चालताना सोबतचं माणूस मागे पडलं की बचकन जिथल्यातिथे थांबण्याची सवय असते. दररोज शाळेच्या गर्दीत अनुभवतेय. पण ती गर्दी स्लो असते, आसपास मुलं असण्याची जाणिव (आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याची आदिम भावना) व शिट्या वाजवत गर्दी कमी करणारे वॉचमन यांचे कोऑर्डिनेशन यामुळे गोष्टी मॅनेज होतात.

एल्फिस्टनच्या चेंगराचेंगरीनंतर एक सुचना वाचली होती की दुर्दैवाने स्टॅंपीडमधे खाली पडलात तर कुशीवर वळून तत्काळ फिटल पोझिशनमधे जा व डोकं हात दुमडून कव्हर करा. मार तर बसेल पण महत्वाचे अवयव चिरडून व फुप्फुसं एक्स्पांड न करता आल्याने श्वास गुदमरून मरण्याची शक्यता कमी होईल.

Sad part is devotees wanted to have a closer darshan of the bhole baba and collect soil from near his feet. That is why the stampede. As per today's times of india. People are so desperate. And CM is going to search if there was a conspiracy!!!

इंडियन एक्स्प्रेस म्हणतंय , many falling on the uneven surface while trying to collect soil the preacher had walked on before he left the venue.
अपेक्षेपेक्षा खूप जास्त गर्दी जमणे हे चेंगराचेंगरीचे आणखी एक कारण.
स्थानिक इस्पितळात पुरेशा सोयी / मनुष्यबळ नसल्याने मृतांची संख्या वाढली.

कोण हा बाबा? इतक्या मोठ्या गर्दीचे असे बेपर्वा नियोजन करणारा?
मला तर प्राईम वरील आश्रम चीच आठवण झाली!

हाथरस चेंगराचेंगरी >>

Initial reports suggested more than 15,000 people had gathered for the event, which had permission for about 5,000.
धार्मिक स्थळांजवळ चेंगराचेंगरी होणे, हे भारतात बऱ्यापैकी नियमितपणे होत असते, त्यामुळे आश्चर्य वाटले नाही.

Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the universe.
- Attributed to Albert Einstein

इं. ए. च्या बातमीनुसा ८०,००० लोक अपेक्षित होते. त्यापेक्षा भरपूर जास्त लोक आले. उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांच्या हवाल्याने त्यांनी लिहिले आहे.

धार्मिक स्थळांजवळ चेंगराचेंगरी होणे, हे भारतात बऱ्यापैकी नियमितपणे होत असते, त्यामुळे आश्चर्य वाटले नाही.>>>

कोणाकोणासाठी वाईट वाटायचे असे आता वाटतेय. लोक आपल्या पायाने स्वतःच्या प्राक्तनाकडे चालत जातात असे दिसतेय.

नियमांबद्दल बेपर्वाई व शिस्तीचा अभाव हे भारतियांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे अशा घटना घडत राहतात. जे गेले त्यांच्याबद्दल क्षणिक वाईट वाटते.

दीड किमी फरपटत नेऊन परत रिव्हर्स मारून महिलेला मारल्याच्या घटने बद्दल ही वाईट वाटले. ड्रींक & ड्राईव्ह कधी थांबणार Sad

माणगाव मधे एक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर इन्स्टावर रील करण्याच्या नादात दरीत पडून गेली. बचाव कार्य टीमने धोका पत्करून ३०० फूट खोल उतरून तेही धुव्वाधार पावसात तिला वर आणलं तेव्हा म्हणे ती जिवंत होती पण उपचारादरम्यान मरण पावली.
काय हे रिल्सचं फॅड जिवावर बेततंय तरी इतका काय अट्टाहास आहे हा.

काल वाचली ती बातमी. हल्ली अशा वाईट बातम्या सारख्याच येत आहेत ऐकायला. Sad
इथे पहा तो स्पॉट : जिथे लोकांना फोटो घ्यायचा मोह होतो.
https://www.facebook.com/share/r/nAHFbbjxjQaHxsyF/?mibextid=UalRPS
कसला डेन्जरस अहे बघायला सुद्धा!
सेल्फी, रील्स इ. च्या एक्साइटमेन्टने मेन्दू हाय झाल्यामुळे बेसिक ह्यूमन इन्स्ट्निक्ट - स्वतःचे सर्वायवल, स्वतःच्या जिवाची काळजी हे नम्ब होत चालले आहेत की काय अशी भिती वाटते!!

हो.वाईट वाटलं वाचून.शिवाय ती काही काळ गंभीर जखमी होती(बहुतेक 5 तास.)
ईश्वर आत्म्याला शांती देवो.इतकी उत्साही डायनॅमिक तरुण व्यक्तिमत्त्वं अकाली गेलेली बघून वाईट वाटतं.

किती जीवावर उदार होतात, फार वाईट वाटलं तिच्याबद्दल.

रेस्क्यू टीमचं खरोखर कौतुक. त्यांनी जीवाचा आटापिटा केला, ती वाचायला हवी होती.

होय, वाचली होती ही बातमी. सीए होती म्हणे ती. काय मुलं ही आणि कसले फॅड हे? Sad

त्या आधी पंधराच दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात एक मुलगी जिला कार चालवता येत नव्हती, तिला कार रिव्हर्स घ्यायला लावून एकजण बाहेर उभा राहून कौतुकाने शूटिंग करत होता. तिला क्लच कसला तो माहीत नव्हता. दाबला एक्सलरेटर तिने आणि कार सहित थेट दरीत कोसळली मागच्या Sad

Pages