दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यावेळी आमच्या घरातून धुराचे लोट दिसतायेत. आमचे लाईट्स गेलेत. आमच्यापासून साधारणपणे सहाशे मीटर्सवर हा एरिया आहे.

आमचे लाईट्स गेलेत. >>>> तिथे कंपनीत आग पसरू नये म्हणून लाईट घालवले आहेत. समोरच शाळा आहे ती खाली केलीय. असे अचानक मुलांना घरी पाठवले तर घरी इतर कोणी नसणाऱ्या पालकांची किती तारांबळ उडाली असेल.

ओह.काळजी घ्या.देव करो काही जीवितहानी नसावी यावेळी.>>>> +१
शिवखोरी गोळीबार मृतांना श्रद्धांजली !

आवाज नाही आला यावेळेस त्यामुळे लोकं घाबरली नाहीत. आग तर मोठी होती. बाहेरुन कंपनी जळून खाक झाल्याची दिसते आतमधून माहीत नाही.

बाप रे… तुम्ही काळजी घ्या. आय होप की सर्व काही आटोक्यात आहे?
Submitted by MazeMan on 12 June, 2024 - 11:17>>> आमची कंपनी जरा लांब होती. दोन चार तासात आग विझवली बहुतेक. लोकं जखमी वैगरे झाल्याची बातमी नाही.

आम्ही ठीक आहोत. यावेळी दारं खिडक्या वाजणं, स्फोटाचा आवाज ऐकू आला नाही. बेडरुमच्या गॅलरीतून धुराचे लोट दिसत होते पण ते सरळ वर जात होते, आमच्या भागात पसरला नाही धूर त्यामुळे त्रास नाही झाला.

बोकलत काळजी घ्या.

मंगाफ (कुवैत ) येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला Sad . मृतांमधे ४५ भारतीय नागरिक आहेत, यातील बहुतेक लोक केरळ, तमिळनाडू राज्यातील आहेत.

श्रद्धांजली Sad
बातमी पहिली होती.अतिशय दुर्दैवी घटना.

ओह?!! Sad Sad

If anybody wants to pay their last respects, they can come to Vaikuntha Crematorium by 130 am.

अकु- अशा गोड नावाने फेमस असलेली मैत्रीण गेली.

तिची असोशी , कळकळ आणि धडाडी या गोष्टी पाहून मायबोलीच्या सामाजिक उपक्रमात आलो, पण तिच्यासोबत काम करणं इतकं सोप नव्हतं. कामाची झाडाझडती घेण्याची तिची पध्दत ‘टोटली डिफरंट अशी होती. त्यामुळे तिचा फोन आला की रिपोर्टिंग मध्ये कुठेही चूक होणार नाही, अशा तयारीत असावं लागायचं.,

अकु, मिस यू..

अरे बाप रे Sad फारच वाईट बातमी. २०११ च्या सुमारास संयुक्ता ग्रृपमुळे अरुंधतीशी अगदी रोजचा संपर्क होता. तिच्याचमुळे एकावर्षी सावली सेवा Trust मदत आणि म्हणून तिच्याबरोबर जाऊन त्या संस्थेच्या शाळेला भेट पण देता आली. तिच्याचमुळे मी Listening to World Music हा UPenn - Coursera course पण केला. गेल्या अनेक वर्षात काहीच संपर्क नव्हता, ह्याची मात्र आता रूखरूख वाटतेय. Sad Sad

शॉकिंग आहे. श्रद्धांजली.
माझ्या शाळेत होती, माझ्या वयाची होती. सेम बॅच.
अमृता प्रीतम च्या काव्याचे 'नऊ स्वप्नं' असे फार सुंदर भाषांतर केलेले आहे तिने.निव्वळ आरस्पानी, निवळशंख पाण्यासारखे शांतवणारे व लोभस. माझा फार आवडता लेख आहे तो. वर काढते.

Pages