दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप वाईट बातमी. काय लिहावे तेच कळत नाही.
वैयक्तिक ओळख नसली तरी मायबोलीवर वावर असल्यामुळे ओळखीची होती. सावली उपक्रमासंबंधी बहुतेक बोलणे झाले होते .
तिच्या घरच्यांना यातून सावरायचे बळ मिळो.
भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रत्यक्ष भेट एकदाच झाली होती. पण लेखनातून सामाजिक जाणीव पाझरत असल्याचे पहात आलो आहे. सुपरवुमन सिंड्रोम हा लेख मला फार आवडला होता. मी संदर्भ म्हणुन वापरायचो. अकु ला श्रद्धांजली

धक्कादायक बातमी
प्रत्यक्ष भेट नव्हती पण माबोमुळे माहीत असलेली active व्यक्ती. केव्हातरी प्रतिसादात बोलणे झाले असेल.

श्रद्धांजली

Prayers

2012 साली उपक्रमातून aku ची ओळख झाली , भेट झाली व ऋणानुबंध कायम झाले , मुलांची आत्या व बायकोची जिवलग मैत्रिण कधी झाली ते कळलेच नाही , आम्ही तिला सामाजिक संस्थांचा Encyclopidia म्हणायचो , मदत करण्यात सर्वात पुढे , गुजर निंबाळकर शाळे वरचे छत्र आज हरवले , काय लिहावं, अगदी जवळचं काही तरी हरवलं आज , भावपुर्ण श्रद्धांजली अरुंधती (इरावती )

Pages