Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिंकलो जिंकलो !!!
जिंकलो जिंकलो !!!
भारतीय संघाचे अभिनंदन!
भारतीय संघाचे अभिनंदन!
घशातून मॅच काढली!!
वॉटा गेम...
वॉटा गेम...
अप्रतिम मॅच.
अप्रतिम मॅच.
वॉव, खतरनाक मॅच!!
वॉव, खतरनाक मॅच!!
सूर्याचा तो कॅच ब्रिलियन्ट होता! मोक्याच्या वेळच्या विकेट्स कमाल होत्या!! वेल डिझर्व्ड चँपियनशिप टीम इंडिया!!
अभिनंदन, भारत !!!!! ग्रेट
अभिनंदन, भारत !!!!! ग्रेट मॅचं!!!
इतकं चांगलं खेळूनही द. आफ्रिका हरली त्यापेक्षाही त्यांना चोकर्स म्हणून आता अधिकच हिणवलं जाणार, याचं अधिक वाईट वाटतं.
अभिनंदन भारत आणि टीम!! जबराट
अभिनंदन भारत आणि टीम!! जबराट मॅच!!!
रमड सुरुवातीपासूनच म्हणत होती
रमड सुरुवातीपासूनच म्हणत होती की आपण वर्ल्डकप जिंकणार आहोत!! आणि खरंच जिंकलो!!!
शेवटच्या 5 ओव्हर मधे पेसर्स
शेवटच्या 5 ओव्हर मधे पेसर्स नी कमाल बॉलिंग केली
हार्दिक टीम मधे असल्याचा मेजर फायदा झाला
*हार्दिक टीम मधे असल्याचा
*हार्दिक टीम मधे असल्याचा मेजर फायदा झाला* - खरंय, पण हरण्याची खरी भीती द. आफ्रिकेच्या मनात निर्माण झाली ती बुमराहच्या शेवटच्या षटकाने व सूर्याच्या अफलातून झेलमुळे हेंही आहेच!
अभिनंदन इंडिया आणि टीम!!!
अभिनंदन इंडिया आणि टीम!!!
हरण्याची खरी भीती द. आफ्रिकेच्या मनात निर्माण झाली ती बुमराहच्या शेवटच्या षटकाने व सूर्याच्या अफलातून झेलमुळे हेंही आहेच!)) +१
मस्त मॅच झाली. थ्रिलर एकदम!
मस्त मॅच झाली. थ्रिलर एकदम!
कोहली "आंतरराष्ट्रीय" टी-२० मधून निवृत्त! आयपीएल खेळेल असे दिसते.
आता जेवलो.. जिंकलो नसतो तर
आता जेवलो.. जिंकलो नसतो तर गेले नसते.. आता काही लिहावे अश्या मनस्थितीत नाही.. आनंदाश्रू बघायला मिळाले.. मन भरले.. १९ नोव्हेंबर मधून बाहेर पडलो.
पण हरण्याची खरी भीती द.
पण हरण्याची खरी भीती द. आफ्रिकेच्या मनात निर्माण झाली ती बुमराहच्या शेवटच्या षटकाने व सूर्याच्या अफलातून झेलमुळे हेंही आहेच! >> शेवटपेक्षाही १५ व्या षटकाने म्हणा. क्लासेन च्या मास्टर क्लास नंतर त्या ओव्हर मधे ४ धावा त्यातही दोन डॉट बॉल क्लासेनलाच आहेत. त्यामूळे पांड्याविरुद्ध चान्स घेणे फोर्स्ड होते क्लासेनसाठी.
“ कोहली "आंतरराष्ट्रीय" टी-२०
“ कोहली "आंतरराष्ट्रीय" टी-२० मधून निवृत्त!” - रोहित पण.. अपेक्षित निर्णय.. end of an era!!
जबरदस्त मॅच. कोहलीची मॅच विनिंग इनिंग- अक्षर आणि दुबे दोघांनी दिलेली महत्वाची साथ, बुमराह, अर्षदीपने मोक्याच्या क्षणी टाकलेल्या महत्वाच्या ओव्हर्स, हार्दिकने केलेली कमालीची बॉलिंग (३/२०), सूर्याने पकडलेला अफलातून कॅच - अद्भूत फायनल!! (हार्दिकला आयपीएलच्या वेळी दिलेला मनस्ताप आणि त्याचा संपूर्ण टूर्नामेंटमधे असलेला परफॉर्मन्स पाहून इंडियन फॅन्स काही शिकतील ही अंधुकशी आशा…. we need to learn to respect our players.)
* ऱोहित अॅस अ कप्तान पेक्षा
* ऱोहित 'अॅज अ कप्तान' पेक्षाही - म्हणजे त्याने केलेले बॉलिंग चेंजेस , शांत राहणे इत्यादी (जे आयपील मधेही दिसलेले आहे) बॅटसमन म्हणून त्याने स्वतःचा वर्षभरात केलेला कायापालट बघून त्याने हा कप जिंकण्याचे सार्थक झाले असे वाटले. नुसते अॅग्रेसिव्ह खेळणे नि पिचवरच्या बाउन्स व बाऊंडरी डिस्टंस प्रमाणे अॅग्रेसीव्ह खेळणे ह्यातला जमिन अस्मानाचा फरक त्याने लिलया हँडल केला. टी २० चा सर्वाधिक धावा काढलेला बॅटस्मन नि विनिंग कप्तान म्हणून इथे निवृत्त होणे हि अचूक खेळी होती. ह्यापेक्षा अजून कोण काय अधिक अचीव्ह करणार !!!
)
पांड्या ऑल राऊंडर म्हणून आल्याने टीम कंपोझीशनमधे किती फरक पडला हे उघड झाले. त्याने विनाकारण बू करणार्या महाभागांच्या तोंडावर टिच्चून चांगले खेळणे नि रोहितने मोक्याच्या क्षणी त्याच्यावर दाखवलेला भरवसा ह्या ह्या मुजोर लोकांना दिलेल्या सणसणीत चपराक होत्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
* संघात येण्यासाठी कोहली ने "त्याला ज्याने काही कोहली बनवले आहे" ते सगळे बदलले नि पूर्ण टूर्नामेंटभर फेल गेला. फायनलमधे परिस्थितीने त्याला परत मूळ स्वरुपात जायला भाग पडले नि तो त्याची आजवरची सर्वात मह्त्वाची खेळी करून गेला. लवकर विकेट्स गेल्याचे प्रेशर फक्त तो करू शकतो तसे अॅब्सॉर्ब केले नि शेवटी सुटला. त्याच्या कारकिर्दीसाठी अजून अचूक सांगता नसेल.
* एक अजून मॅन ऑफ द सिरीजचे बक्षिस अक्षरलाही द्यायला हवे होते. बॅटींग, बॉलिंग (एक ओव्हर वगळता नि तीही मुख्यत्वे क्लासेनचा ब्रिलिअन्स होता) नि फिल्डींग - तिन्ही मधे मोक्याच्या वेळी मह्त्वाच्या खेळ्या खेळल्या आहेत.
* बुमराबद्दल अजून काही बोलायला शिल्लक नसावे. टी २० टूर्नामेंट्मधे कोण दर ओव्हर सहाच्या खाली धावा देतो राव ? रोहित-कोहलीपेक्षाही बुमरा- कुलदीप साठी आपण हि टूर्नामेंट जिंकायलाच हवी होती असे मला वाटत होते. अँडी रॉबर्ट्स म्हणाला कि सत्तर- ऐंशी च्या दशकामधे असता तर मरा ला विंडीजच्या चौकडीमधे बॉलिंग ओपन करायला दिली गेली असती (होल्डींग, क्लार्क, रॉबर्ट्स असतानाही ). ह्यापेक्षा अधिक कौतुक कोणी करू शकेल असे मला तरी वाटत नाही.
* टूर्नामेंट्स मह्त्वाच्या मोमेंट्स जिंकून जिंकल्या जातात असे म्हणातात त्याचे आजची मॅच आदर्श उदाहरण होते. मला तरी आज आफ्रिका आज कुठेही चोकर्स वाटले नाहित. स्टबला वर पाठवणे, स्टब-डीकॉकचा स्पिन खेळण्याचा पवित्रा, कुलदीप ला सेट्ल होऊ न देणे, क्लासेनचा कॅल्क्युलेट अॅटॅक सगळेच जबरदस्त होते. ते कि मोमेंट हरले नि आपण त्या जिंकू शकलो हा एकमेव फरक.
* जाडेजाचा अपवाद वगळता फायनल मधे प्रत्येकाने काही ना आही मह्त्वाचे काँट्रिब्युट केले आहे. (कुलदीप ने रन्स
* आफ्रिकेसारख्या फिल्डींगचा मास्टर क्लास असणार्या संघाविरुद्ध आपण फिल्डींगच्या जोरावर एक तरी बाजी पलटवली हि गमतीची बाब आहे. स्कायच्या सगळ्या कारकिर्दीमधले सर्वात मह्त्वाचे काँट्रीब्युशन आज झाले असावे.
* ह्या टूर्नामेंट्च्या प्लॅनिंगवर सर्वत्र द्रविडची छाप होती. प्लॅन ए नि बी असणे नि त्यानंतर ते अमलात आणू शकणे ह्या दोन्ही गोष्टी साध्य करणे द्रविड इंवॉल्व्ह्ड आहे म्हटल्यावर फारशा कठीण वाटत नाहीत. त्याची रिअॅक्शन पुरेशी बोलकी होती. त्याला अजून एकही कप मिळवता आलेला नाही ह्याची जी रुखरुख होती ती दूर झाली.
* पांड्या शेवटी एखादा नो बॉल टाकेल अशी धास्ती होती खरी.
* अर्शदीपने शेवटच्या ओव्हर्स मधे भयंकर मॅच्युरिटी दाखवली नि मोक्याच्या वेळी लाईन-लेंग्थ हरवण्याची परंपरा एकदाची मोडली ह्यामूळे बरे वाटले. बुमरा, अर्शदीप नि मयांक हे पेसर्स त्रिकूट कल्पनेने लाळ गळते आहे.
* भारताच्या फिरकी गोलंदाजीला धार्जिण्या पिचेसवर चाललेली कोल्हेकुई गेले २-३ दिवस सतत वाचल्यानंतर फायनल आपण पेसर्सच्या जोरावर जिंकली ह्याचा जबरदस्त आनंद झाला.
* रायूडू शेवटी मस्त म्हणाला - हा कप त्या सर्व फॅन्ससाठी जे आज आन्हिके, पूजा-अर्चा आटोपून सकाळपासून आहेत त्या जागेवर अजिबात हात, पाय किंवा मांडीही न हलवता बसलेले आहेत.
जाता जाता : * काव्या मरानने क्लासेनला आयपील काँट्रॅक्टबद्दल एकदम योग्य वेळेत फोन केला असे आपण म्हणू शकतो का ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
असामी, परफेक्ट पोस्ट. टोटली
असामी, परफेक्ट पोस्ट. टोटली सहमत!!
असामी मस्त आढावा घेतला आहे.
असामी मस्त आढावा घेतला आहे.
द्रविडने मस्त योजना आखल्या होत्या आणि रोहितच्या टीम ने त्या बरोबर मैदानावर अंमलात आणल्या. पंड्या आणि अर्शदीप ने चांगली बोलिंग केली शेवटी. म्हणजे बुमरा करतच असतो पण बाकीच्यांची साथ महत्वाची.
आता चहा भेळ आणि नुकतेच
आता चहा भेळ आणि नुकतेच हायलाईट संपवून ८३ पिक्चर लावला आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे आलेल्या पोस्ट उद्या वाचेन सावकाश..
आज काहीच वाचायला होणार नाही.. काही लिहायला होणार नाही..
सामना जिंकल्यावर रोहितने जमिनीवर घातलेले लोटांगण आणि कोहलीसोबत मारलेली मिठी.. हेच दृश्य सध्या डोळ्यासमोर आहे. झोपेपर्यंत तेच राहू देतो
असामी - मस्त आढावा!
असामी - मस्त आढावा!
रोहितही टी-२० मधून निवृत्त!
संपूर्ण टूर्नामेंट आपण कधीही
संपूर्ण टूर्नामेंट आपण कधीही (बॅटिंग / बोलिंग / फिल्डिंग करताना) कुणा एकावर अवलंबून नव्हतो हेच यशाचं श्रेय आहे...
आपण जिंकलेल्या प्रत्येक वर्ल्डकप मधे हेच झालं आहे...
* कुणा एकावर अवलंबून नव्हतो
* कुणा एकावर अवलंबून नव्हतो हेच यशाचं श्रेय आहे...* - खरंय व अशी सामूहिक जबाबदारीची भावना व प्रेरणा निर्माण करण्याचं बहुतांशी श्रेय कर्णधाराला जातं. " एक ढोबळ योजना मैदानात उतरण्यापूर्वी आम्ही चर्चेने ठरवतो पण मैदानात त्यात आवश्यक तो बदल करण्याचं स्वातंत्र्य व जबाबदारी प्रत्येक खेळाडूला असते ", ही रोहितची स्पष्ट केलेली भूमिका !
असामी छान पोस्ट
असामी छान पोस्ट
कित्येक जुन्या match ज्यात आयत्या वेळी पेसर नी धोधो मार खाल्लेल्या इनिंग आठवल्या.
पांड्याने देखील तो बॉल लो फुलटॉस दिलेला.
सूर्याने अफलातून catch केला.
जिगर दाखवते ही गोष्ट.
पांड्या च्य वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यातून बाहेर पडून त्याने जो परफॉर्मन्स दिलाय तो जबरदस्त असेच म्हणावे.
आज काहीच वाचायला होणार नाही..
आज काहीच वाचायला होणार नाही.. काही लिहायला होणार नाही..##----// धन्यवाद
कप पेक्षा थोडा जास्त आनंद याचा वाटला
तीन महान लोकं काल रिटायर्ड
तीन महान लोकं काल रिटायर्ड झाली. शर्मा कोहली आणि मी. शर्मा कोहली खेळातून आणि मी मॅच बघण्यातून.
अभिनंदन टीम इंडिया आणि करोडो
अभिनंदन टीम इंडिया आणि करोडो क्रिकेट फॅन्स!
टीम इंडिया , मन:पूर्वक
टीम इंडिया , मन:पूर्वक अभिनंदन !
असामी, छान पोस्ट
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो.
जाडेजा पण रीटायर झाला. गेस इट वॉज कमिंग फॉर अ व्हाईल. आयपीलपासूनच काहीतरी गंडलेले होते त्याचे. ज्या तर्हेने अक्षर कडे त्याचे काम गेले त्यावरून त्याने योग्य निर्णय घेतला असे म्हणता येईल. टेस्ट मधे अजून त्याची जबरदस्त गरज आहे.
पांड्या च्य वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यातून बाहेर पडून त्याने जो परफॉर्मन्स दिलाय तो जबरदस्त असेच म्हणावे. >> मान्य. ज्या तर्हेने त्याला टारगेट केले गेले होते ते अतिशय दुर्दैवी नि हिणकस मनोवृत्तीचे होते असे माझे मत आहे. आम्ही "मुंबई इंडीयन्स चा मॅनेजमेंट चा निषेध करण्यासाठी आयपीएल मधे पांड्याची बू करतो नि देशासाठी खेळताना बू केले जाणार नाही" हा पवित्रा नि त्याचे लंगडे स्पष्टिकरण हे तर अजूनही अनाकलनीय होते. खेळाडू माणूस असतो नि एखाद्याला व्हिक्टीम केल्यानंतर त्याने ते कंपारट्मेंटलाईज करावे ह्या अपेक्षा अपरिपक्व मनोवृत्ती दाखवतात. रोहितवरही विनाकारण ह्या प्रकाराचा दबाव आला नसेल असे म्हणण्याचे धाडस माझ्यात तरी नाही. म्हणून काल सामना जिंकल्यावर त्याने पांड्याला मिठी मारून गालावर पेक केला हे गेश्चर मस्त होते. आपल्या बेअकली फॅन्सच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले असे समजूया. ह्यातून धडा घेऊन असे एखाद्या खेळाडूला व्हिक्टीम बनवले जाणार नाही अशी भाबडी आशा धरूया.
सूर्याच्या कॅच च्या वेळी बाउंडरी सरकलेली होती अशी बोंब सुरू झाली आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सूर्याच्या कॅच च्या वेळी
सूर्याच्या कॅच च्या वेळी बाउंडरी सरकलेली होती अशी बोंब सुरू झाली आहे>>> दोन दिवस थांबा सूर्याचा पाय पण बाऊंड्रीवर पडलेला दिसेल.
https://www.livemint.com
दोन दिवस थांबा सूर्याचा पाय पण बाऊंड्रीवर पडलेला दिसेल.
>>
हे घ्या
कालच दिसलाय
https://www.livemint.com/sports/cricket-news/suryakumar-yadav-touched-bo...
Pages