Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे सगळे युक्तिवाद पुढे जाऊन
हे सगळे युक्तिवाद पुढे जाऊन फायनलला अफगाण आले तर स्वतःची समजूत काढण्यासाठी आहेत. खरं हेच आहे की अफगाणिस्तान एक दुबळा संघ आहे. २००३ च्या वर्ल्ड कपला लंकेने ऑस्ट्रेलियाला हरवून आपली आणि लंकेची फायनल व्हावी अशी सुप्त ईच्छा लोकांच्या मनात होती कारण ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत लंका सोप्पी होती. तशीच सुप्त ईच्छा अफगाणिस्तान फायनलला यावी ही आतापण आहे. आपण जेवायला बसावं आणि कोंबडी स्वतः येऊन मीठ मसाल्यात लोळावी, स्वतः ओव्हन टेंप्रेचर सेट करुन त्यात बसावी आणि आपल्याला आयती तंदुरी मिळावी त्यातला हा प्रकार आहे. नका रे एव्हढ्या अपेक्षा ठेऊ पुढे जाऊन फसाल आणि मानसिक आघात होईल. आपण शक्यतो ग्रह तारे अमुक रेषेत आले तरच मोठ्या टूरनामेंट जिंकतो.
thanks धनि
thanks धनि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरं हेच आहे की अफगाणिस्तान एक
खरं हेच आहे की अफगाणिस्तान एक दुबळा संघ आहे. >> नुसते आकडे बघितले तर हे खरे आहे असे म्हणू शकतो. पण त्याच बरोबर त्यांची सध्याची गोलंदाजी नि विंडिजमधली पिचेस हे एकमेकांना एकदम पूरक आहेत हे नाकरता येत नाहीत. त्याच बरोबर ट्रॉट नि ब्राव्हो आल्यापासून त्यांचे डावपेच सुधारले आहेत, ढोबळ चूका टाळल्या जात आहेत, फिल्डींग शार्प झाली आहे. कॅरीबीयन लीग मधे खेळल्याचाअ फायदा त्यांछ्या बॉलर्स ना झाला आहे हे दिसते आहे. त्यामूळे सध्या दुबळा म्हणणे धाडसाचे वाटते. पण त्याच बरोबर ते ज्या प्रकारे जीव तोडून खेळत आहेत त्याल एक लिमिट आहे हे नाकारण्यात काहीच पॉईंट नाही. सेमी मधले उरलेले तीन संघ, ऑसी, पाकिस्तान ह्यांपैकी कोणाशीही अफगाणिस्तानच्या सलग ४-५ मॅचेस घेतल्या तर तर निकाल अफ्हाणिस्तानच्या बाजूनेच लागेल असे कोणीही ठामपणे म्हणेल असे मला वाटत नाही.
ऑसी पेक्षा बांग्लादेश टीम जास्ती इरिटेटिंग आहे असे मला वाटते. सतत वैतागलेले नि भडकलेले असतात. सगळे जग आपल्यावर अन्याय करून राहिले आहे अशाच स्पिरिटमधे खेळत असतात. फारसे काही न करताही अॅटीट्यूड दाखवत असतात.
ऑसी पेक्षा बांग्लादेश टीम
ऑसी पेक्षा बांग्लादेश टीम जास्ती इरिटेटिंग आहे असे मला वाटते. सतत वैतागलेले नि भडकलेले असतात. सगळे जग आपल्यावर अन्याय करून राहिले आहे अशाच स्पिरिटमधे खेळत असतात. फारसे काही न करताही अॅटीट्यूड दाखवत असतात. >>>
हो टोटली. अरे लेको तुम्ही बोलिंग करताना नुसता ८०ज च्या बदला घ्यायला निघालेल्या हीरोचा चेहरा करून फास्ट टाकल्यासारखे करत असाल, पण जर स्लिप लावली नसेल तर त्याला क्रिकेट मधे "अॅग्रेसिव्ह" म्हणत नाहीत
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
८०ज च्या बदला घ्यायला
८०ज च्या बदला घ्यायला निघालेल्या हीरोचा चेहरा करून >>
सगळे अॅंग्री यंग मॅन मोडमधेच असतात कधीही. तुम्ही कधी बांग्लादेशी फॅन्सना भेटला आहात का ? ते यमीपेक्षा शंभर पट मोडमधे असतात. प्रत्येक हरलेला सामना हा समोरच्या संघाने काहीतरी चीट केले आहे किंवा बीसीसीआयचे कारस्थान असल्यामूळेच हरला आहे असा सूर असतो. पूर्ण वर्ल्ड कप बांग्लादेशची बॉलिंग त्यांना तारून नेत आली आहे नि बॅटींग कोहलीपेक्षा गंडली आहे हे उघड दिसते आहे पण लक्षात कोण घेतो.
@ बोकलत
@ बोकलत
2003 साली लंका फायनल यावी ही इच्छा माझ्याही मनात होती. कारण तो सोपा पेपर होता.
आता अफगाण फायनल यावी हे सुद्धा सोयीचे आहे. इतरांसाठी नाही पण आपल्यासाठी तो सोपाच पेपर आहे. कारण आपण त्यांच्या बॉलरना इतरांच्या तुलनेत चांगले खेळतो.
त्यामुळे भारत अफगाण फायनल झालेली आवडेल. पण हो, त्याने वर्ल्डकप जिंकल्याचा आनंद किंवा त्याची किंमत जराही कमी होणार नाही.
पण ऑस्ट्रेलिया नंतर कोणाचे टेन्शन होते तर ते इंग्लंडचे. तेच सेमील आलेत. त्यांना आधी रोखायला हवे. फ्लॅट पीच मिळाला तर ते चोपून काढतील.
बांगलादेश उर्फ नागीण डान्स हरल्यावर पाकिस्तान हरण्यापेक्षा जास्त आनंद होतो हे आधीही इथे लिहिले होते. त्यामुळे त्याच्याशी सुद्धा सहमत. स्पोर्ट्समन स्पिरिट नावाचा प्रकारच नाहीये. किमान सभ्यता सुद्धा नाहीये. फुलं झोपडपट्टी टीम आहे.
(इथे झोपडपट्टी हा शब्द आर्थिक परिस्थिती वरून टिप्पणी करणारा नाहीये)
अमेरिकेत कुठे बघायला मिळेल
अमेरिकेत कुठे बघायला मिळेल मॅच?
Submitted by रीया on 25 June, 2024 - 09:33
>>>>>
अमेरिकेतल्या मॅचेस संपल्या..
आता बघायला वेस्टइंडीजला जावे लागेल
मस्त झाली मॅच! आता सेमी फायनल
मस्त झाली मॅच! आता सेमी फायनल आणि फायनल बघायला मजा येईल. भारत फायनलला पोचावा आणि जिंकावा ही प्रार्थना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या एका स्नेह्याच्या सर्व कुटुंबाने अनेक महिन्यांपासून अफगाणिस्तानावर बहिष्कार टाकला आहे. अगदी अफगाण-पाक सामन्यात ते पाकिस्तानला पाठिंबा देतात. ज्या देशात महिलांना शून्य हक्क आहेत त्या देशाला पाठिंबा देऊ शकत नाही असे त्यांचे ठाम मत आहे. ते खरं तर मनाला पटत असले तरी खेळात राजकारण आणू नये हेही तितकंच खरं.
अगदी अफगाण-पाक सामन्यात ते
अगदी अफगाण-पाक सामन्यात ते पाकिस्तानला पाठिंबा देतात. ज्या देशात महिलांना शून्य हक्क आहेत त्या देशाला पाठिंबा देऊ शकत नाही असे त्यांचे ठाम मत आहे.
<<<<<
लोकं खूप ईमोशनल फुल्स असतात, संबंध नसताना इमोशन्स जोडतात.
तशीही तलिबानी दहशत तिथल्या देशाच्या संमतीने नाही आलेली, जबरदस्तीने लादली आहे .
कौतुक अफगाण क्रिकेट टिमचे आहे , तालिबानी सत्तेचं नाही !
तालिबान आणि सामान्य अफगाणी
तालिबान आणि सामान्य अफगाणी नागरीक यात बरेच जणांचा गोंधळ उडतो.
त्यात पाक अफगाण मध्ये पाकला सपोर्ट देत असतील तर फारच गोंधळ उडाला आहे.
त्यांनी जर मनाची पाटी कोरी करून थोडे खोलात जाऊन जाणून घेतले तर कदाचित जास्त कौतुक वाटेल अफगाण संघाचे असे मला वाटते.
तशीही तलिबानी दहशत तिथल्या
तशीही तलिबानी दहशत तिथल्या देशाच्या संमतीने नाही आलेली, जबरदस्तीने लादली आहे .>>> याच्यावरच त्यांचा आक्षेप आहे. अमेरिकेने अफगाणी सरकारला सर्व सुविधा, शस्त्रास्त्रे दिली होती आणि अमेरिका निघून गेल्यावर मूठभर तालिबान्यांपुढे अफगाणी लोक शस्त्रे टाकून, काहीही प्रतिकार न करता शरण आले, त्यांच्या जाचक प्रथांविरोधात आवाज उठवत नाहीत त्याचा त्यांना राग आहे. स्नेह्यांचे वडील ८० च्या सुमारास काबूलमधे कामानिमित्त होते. तेव्हाचा प्रगत देश, स्त्रियांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हे सर्व त्यांनी पाहिले आहे. आणि आज त्याच्या बरोबर विरोधी परिस्थिती आहे. क्रिकेट टीमही कधीच अफगाणी स्त्रियांच्या बाजूने बोलत नाही यांची त्यांना खंत आहे. त्यामुळे आपण कधीच अफगाण संघाला पाठिंबा देणार नाही हा त्यांचा ठाम निर्धार आहे. अफगाण सेमी फायनलमधे गेले म्हणून ते आता साउथ अफ्रिकेला सपोर्ट करत आहेत.
असो. या धाग्यावर अफगाण विजयामुळे हे फारच अवांतर झाले.
काल रात्री आपल्या मॅचची
काल रात्री आपल्या मॅचची हायलाइट बघत होतो. अक्षरने जी काय कमाल कॅच पकडली ती पाहून सचिनची आठवण आली. मी लहान होतो तेव्हा सचिनची पण अशीच सेम कॅच साउथ आफ्रिकेच्या प्लेयरने पकडली होती. २००० च्या आधीची गोष्ट असेल. नऊ विकेट गेल्या होत्या सचिन आणि कोणतरी बॉलर खेळत होता. कोणाला माहित आहे काय ती मॅच.
सचिनची पण अशीच सेम कॅच साउथ
सचिनची पण अशीच सेम कॅच साउथ आफ्रिकेच्या प्लेयरने पकडली होती. २००० च्या आधीची गोष्ट असेल. नऊ विकेट गेल्या होत्या सचिन आणि कोणतरी बॉलर खेळत होता. कोणाला माहित आहे काय ती मॅच.
>>
करेक्ट
१९९७ साऊथ आफ्रिका टूर
ऍडम बाकर नी घेतला होता कॅच
सचिन १६९ वर आऊट झाला होता (तेंव्हा त्याचा टेस्ट मधला सर्वोच्च स्कोअर १७९ होता)
बहुतेक केपटाऊन ला झाली होती ती टेस्ट
अझर नी पण १०० केले होते
तिसऱ्या टेस्ट मधे जोहान्सबर्ग ला द्रविड नी १४८ करून पाहिलं टेस्ट शतक केलं होतं...
आणि समोर गगन खोडा होता काय?
आणि समोर गगन खोडा होता काय? सचिनचे रन बघून तो पण जोश मध्ये आला होता आणि मारत होता.
अझर नी पण १०० केले होते
अझर नी पण १०० केले होते
>>>
अरे काय आठवण काढली..
बेक्कार पार्टनरशिप झाली होती दोघांची. नुसते तुडवत होते. क्लासिकल बझबॉल.m कसली मजा येते ती बघायला.. संध्याकाळी तासभर टीव्हीच्या शोरूम समोर बघत उभे होतो.. जागचे हलले नव्हतो
आणि समोर गगन खोडा होता काय?
आणि समोर गगन खोडा होता काय?
>>
नाही
खोडा माझ्यामते ९८ मधे इंडिया - केनिया - बांगलादेश दरम्यान झालेल्या तिरंगी कोकाकोला कप मधे टीम मधे होता. त्या फायनल ला सचिन मारताना बघून त्यानेही जोशात काही शॉट खेळले होते. पण तो टेस्ट खेळल्याच आठवत नाही.
त्या सिरीज मधे जतिन परांजपे चा ही डेब्यू झाला होता. वन डे डेब्यूला पहिल्या बॉल वर सिक्स मारायचं रेकॉर्ड केलं होतं त्यानी...
नुसते तुडवत होते
नुसते तुडवत होते
>>
येस... अझर नी क्लूस्नर ला बेकार मारलं होतं
BCCI
BCCI
हेड ऑफिस मुक्काम पोस्ट मुंबई .
Branch Office
C\O
ICC
Street 69, Dubai Sports City, Sh Mohammed Bin Zayed Road, Dubai, PO Box 500 070, UAE
सब कुछ तुम्हारे लिये. तुम्ही हो माता...
Ref -rediff article
'You Can't Have Two Semi-Finals With Different Rules'
https://www.rediff.com/cricket/report/t20-world-cup-rain-could-end-engla...
इंग्लंडचा माजी कर्णधार हुसेन
इंग्लंडचा माजी कर्णधार हुसेन आणि आर्थरटन काय म्हणत आहेत.
And I think England are going to beat India in Guyana and South Africa will be too good for Afghanistan so it will be a South Africa versus England final.'
मुंघेरीलाल.
*इंग्लंडचा माजी कर्णधार हुसेन
*इंग्लंडचा माजी कर्णधार हुसेन आणि आर्थरटन काय म्हणत आहेत.* - नुसतं म्हणायला काय जातं , पैज घ्यायला तयार आहेत का ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आज गिलख्रिस्टने कुठेतरी रोहितच्या कप्तानीचं, विशेषत: गोलंदाज निवडीचं व वापरण्याचं, कौतुक केलंय व रोहितला त्याचं हवं तितकं श्रेय मिळत नाहीय, असं म्हटलंय.
बांग्लादेश चे डावपेच अनाकलनीय
बांग्लादेश चे डावपेच अनाकलनीय होते. मिड-इनिंग्ज ब्रेकमध्ये इक्वेशन सरळ होतं. १२.१ ओव्हर्स मधे ११६ रन्स करून अ सेमी-फायनल ला क्वालिफाय व्हायचं होतं. पहिल्या ३ ओव्हर्समधे त्यांनी सुरूवात पण दणक्यात केली. मधला सगळा भाग ओलांडून पुढे जाऊ. शेवटच्या १९ बॉल्समधे ४० रन्स हवे होते. लिटन दास खेळत होता आणि त्यांनी प्रयत्नच नाही केले. (नंतर त्यांनी कारण दिलं कि पहिल्या ३ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स पडल्यानंतर त्यांनी शटर डाऊन केलं). शुद्ध वेडेपणा होता हा. नुसते जिंकले असते तरी घरीच जाणार होते. पण १२.१ ओव्हर्समध्ये जिंकले असते तर सेमी-फायनल ला गेले असते. ह्यापेक्षा मोठं मोटिव्हेशन काय असू शकलं असतं?
ह्यापेक्षा मोठं मोटिव्हेशन
ह्यापेक्षा मोठं मोटिव्हेशन काय असू शकलं असतं? >> पहिल्या तीन ओव्हर्स मधे मारायचे पण विकेट्स गेल्या तर नुसते जिंकण्यावर (तुला नाही, मला नाही घाल कुत्राला मोड) लक्ष द्यायचे असा आधीच ठरलेला प्लॅन होता असे लिटन नंतर म्हणाला. बांग्लादेशबद्दल हे शक्य आहे. तसेही त्यांचे आफगाणिस्तानशी भारी वाकडे आहे. (आता तुम्ही अजून कोणाशी वाकडे नाही असेही म्हणू शकता)
येस... अझर नी क्लूस्नर ला
येस... अझर नी क्लूस्नर ला बेकार मारलं होतं >> थांब सचिन - अझर वाल्या सामन्यामधे असा क्लूस्नर च्या मागे लागला नव्हता हात धुवून. तेंव्हा सगळ्यांनाच चांगले चोपले होते. तुला क्लूस्नर ला बेदम तुडवलेले आठवतेय ते कलकत्त्यामधे क्लूस्नर च्या डेब्यू मॅच मधले आठवतेय. तेंव्हा ४-५ फोर्स एकाच ओव्हरमधे मारले होते अझरने. (बिजलानी ला छेडले म्हणून असा जोक होता) पन शेवटी क्लूस्नर ने सामना जिंकून दिला होता तो![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अरे दुपारी माझी ही पोस्ट आली
अरे दुपारी माझी ही पोस्ट आली नाही वाटते.. मी सुद्धा नेमके कलकत्ता सामन्याची आठवण काढलेली.
अझरने कलकत्त्याला तुडवलेला.. कलूजनरला पाच सलग फोर वगैरे.. ती सुद्धा नेहमी या सामन्याच्या जोडीने आठवते..
एकदा शोधून बघायला हवे हायलाईट.. अशा आठवणीतल्या सामण्यांच्या..
अझहर कलकत्ता रेकॉर्ड फार
अझहर कलकत्ता रेकॉर्ड फार बेकार होता..
शंभरच्या वर सरासरी होती ..
पटकन गूगल केले तर हे आकडे हाती लागले
Mohammad Azharuddin's record at Eden Gardens: 7 Tests, 860 runs, 107.50 average, 5 hundreds, 182 highest score.
'You Can't Have Two Semi
'You Can't Have Two Semi-Finals With Different Rules'
https://www.rediff.com/cricket/report/t20-world-cup-rain-could-end-engla...
>>पॉम्स नेहमीप्रमाणे रडत आहेत आधीच. दोन्ही मॅचेस ना २५० अॅडिशनल मिनिटस मिळत आहेत. एका मॅच ला दोन दिवसांमधे विभागून तर दुसर्या मॅच ला एकाच दिवशी (जे जास्त तापदायक आहे रात्री बारापर्यंत सामना चालू राहणार हे बघता). सेमी फायनल दोन वेगवेगळ्या दिवशीच हव्यात ह्यात काही चूक नाही. आता सामने जिथे खेळाले जाणार नि ९०% रेव्हेन्यू जिथून येणार हे जगाच्या दोन विरुद्ध टोकावर आहेत ह्याला आय सी सी काय करणार ? फायनल वीकेंडलाच हवी हा कॉमन सेन्स आह नि भारताच्या सोयीने ठेवायची तर विंडीजमधल्या शनिवारी रात्रीच ठेवावी लागणार जेणे करून एक राखीव दिवस राहणार उघड आहे. आधीच्या फेर्या सोमवार पर्यंत लांबलेली असल्यामूळे तीन दिवसांमधे दोन सेमी ठेवणॅ ह्यापेक्षा अजून काय पर्याय होता ? दोन्ह मॅचेस एका दिवशी ठेवल्या तर तुम्ही क्लीयरली एका मॅच ला फायनांशियली डीस अॅडवांटेज देणार हे उघड आहे.
भारताला ते गयानामधेच मॅच खेळणार हे माहित होते म्हणून तसा संघ निवडला भारत सेमी मधे जाणारच हे ग्रूहितक आहे. विंडीज मधली सगळी पिचेस बर्यापैकी एक सारखी असताना गयानालाच मॅच खेळणार हा अॅडवांटेज कसा काय होतो ? उलट पॉम्स पेक्षा भारताने य्यु एस नि विंडीज अशा दोन वेगवेगळ्या टाईप्स च्या पीचेस चा सामना केलाय.
इंग्लंड ने ९०% रेव्हेन्यू जनरेट करावा नि मग इंग्लंडलापण हवे तिथे मॅच ठेवायची मक्तेदारी मिळेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
*पॉम्स नेहमीप्रमाणे रडत आहेत*
*पॉम्स नेहमीप्रमाणे रडत आहेत* - अगदींच रडायला लागले म्हणून लआमचा एक माणूस त्यांना प्राईम मिनिस्टर म्हणून दिला तरीही...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इंग्लंड ने ९०% रेव्हेन्यू
इंग्लंड ने ९०% रेव्हेन्यू जनरेट करावा... >>> त्या साठी त्यांना लोकसंख्या १४० कोटी करावी लागेल ना!
“पॉम्स नेहमीप्रमाणे रडत आहेत
“पॉम्स नेहमीप्रमाणे रडत आहेत आधीच.” - त्यात नवीन काही नाही. ‘आम्ही व्हिक्टीम्स आहोत‘ हे वाक्य कुठल्याही ब्रिटिशाने पुढची २०० वर्षं तरी उच्चारू नये. स्वतंत्र भारताविरूद्ध टेस्ट दौरा करताना अधिकृत इंग्लंडची टीम पाठवायला लाज वाटते म्हणून ‘एमसीसी’ ची टीम पाठवणार्या ब्रिटीशांना आयसीसीतलं मानाचं पान बीसीसीआयबरोबर शेअर करताना किती आवंढे गिळावे लागत असतील कुणास ठाऊक!
तुला क्लूस्नर ला बेदम
तुला क्लूस्नर ला बेदम तुडवलेले आठवतेय ते कलकत्त्यामधे क्लूस्नर च्या डेब्यू मॅच मधले आठवतेय. तेंव्हा ४-५ फोर्स एकाच ओव्हरमधे मारले होते अझरने. (बिजलानी ला छेडले म्हणून असा जोक होता) पन शेवटी क्लूस्नर ने सामना जिंकून दिला होता तो
>>
ते आधी
तिथे अझर नी ७७ बॉल मधे १०९ हाणले होते, पण क्लूस्नर ला सलग ५ फार मारूनही त्याच्या १४ ओव्हर मधे ५.३५ च्या रेट नी ७५ धावा निघाल्या होत्या
दुसऱ्या डावात त्यानी ८ विकेट्स काढून सामना जिंकावला होता
https://www.espncricinfo.com/series/south-africa-tour-of-india-1996-97-6...
या मॅच मधे पहिल्या डावात क्लूस्नर नी शतक केलं होतं
अझर नी ११० बॉल मधे ११५ केल्या होत्या (१९x४, १x६)
अन् क्लूस्नर च्या १२ ओव्हर मधे ७.३३ च्या रेट नी ८८ धावा चोपल्या होत्या..
https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-south-africa-1996-97-6...
Pages