T20 विश्वचषक 2024 - भारत विश्वविजेता !!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21

काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या साठी त्यांना लोकसंख्या १४० कोटी करावी लागेल ना! .. तो प्रश्न त्यांचा आहे , आपला नाही (ईनर मधु मलुष्टे चॅनेल करून वाचा Wink )

मानाचं पान बीसीसीआयबरोबर शेअर करताना किती आवंढे गिळावे लागत असतील कुणास ठाऊक! >> खरय. पण इरिटेटींग सूर आहे बघ ना. ऑसीज बघ. दणकून खेळत होते, दोन मॅचेस वाईट खेळले नि बाहेर गेले पण कोणी अशा पिचवर मॅचेस का ठेवल्या वगैरे रडारड केलेली दिसतेय का ? लंका तर त्याहून वाईट लॉजिस्टीक्स मधे खेळली आहे पण त्यांनीही बोंबाबोंब केलेली नाही. इंग्लंड चा संघ एव्हढा चांगला आहे नि दोन तुल्यबळ संघ एकमेकांशी होपफुली चुरशीची मॅच खेळणार आहेत पण ते राहिले बाजूला. इथे भलतेच सुरू आहे.

४-५ फोर्स एकाच ओव्हरमधे मारले होते अझरने
>>
यातला एक बहुतेक दोन पायांमधून लेग ला फ्लिक केला होता
अझर चा खतरनाक रिस्ट प्ले

ते राहिले बाजूला. इथे भलतेच सुरू आहे.
>>
जास्त चौकार मारलेल्या काउन्ट वरून वर्ल्डकप जिंकणाऱ्यानी तरी आयसीसी च्या रूल बद्दल रडू नये

यातला एक बहुतेक दोन पायांमधून लेग ला फ्लिक केला होता >>> यस! मी ते लाइव्ह पाहिल्याचे आठवते. हर्षा भोगलेलाही वाटले होते बोल्ड झाला अझर. तो म्हंटलाही तसा. नंतर बॉल बाउण्ड्रीकडे जाताना दिसला Happy

फेफ - मलाही तसेच वाटले. पहिले ३-४ ओव्हर्स त्यांचा इण्टेण्ट दिसत होता. नंतर त्यांनी सोडून दिले बहुधा.

पण एक मॅच म्हणून ही भन्नाट होती. एक सेमीची जागा, तीन स्पर्धक आणि मॅच नक्की कशी होते त्यावर ते ठरणे. त्यात पावसाचा गोंधळ. सगळेच भारी होते.

Nortje to Karim Janat, byes, FOUR, that has definitely hit one of the cracks!>>>
cracks! cracks! cracks! ICC!

In all likelihood, this is SA’s game.>>> इतकी घाई नको. सामन्यात अजून खूप cracks आहेत.

चला. गेम ओव्हर. "सोप्पा पेपर" साउथ आफ्रिकेला गेला. उगीच झोपमोड झाली. काय म्हणतात ना ... खालीपिली ग्लास तोडा...

नवीन च्या बोलिंगवर एक लागलेली "निक्" फक्त रशीदला ऐकू आली होती. त्याने निकाल फिरला असता का नाही माहीत नाही. पण एक संधी हुकली हे खरे!

*लबाडांनो म्हणून तुम्हाला फायनलला अफगाणिस्तान पाहिजे होती.* - Wink
तरी पण, अफगाणिस्तान त्यांच्या गुणवत्ता व जिद्दीमुळे फायनलला
येणं आवडलं असतं, हेंही आहेच.

सेमीला पाऊस
फायनलला अफगाण...
यातील एक झाले नाही.. दुसरे बघूया होते का..
नाहीतर इंग्लंड आफ्रिका दोघांना हरवावे लागणार..
तसे जिंकल्यावर मजा असेल.. पण त्यासाठी जिंकले सुद्धा गरजेचे आहे

कालची मॅच बघून भारत पण आज गलपटोय काय अशी भीती वाटत आहे. इंगलण्ड ची गोलंदाची आपल्यापेक्षा जास्त चांगली आहे. कोहली आणि जडेजा भाऊ फॉर्म मध्ये नाहीत तरी जबरदस्ती टीम मध्ये आहेत.

Rain, rain go away
Come again another day.
Rain, rain go away
Little Johnny wants to play.
Big Johnny wants to play.

Rain rain go away,
Come again another day.
Little Johnny wants to play;
Rain, rain, go to Spain,
Never show your face again!

Rain, rain - go away,
Come again another day.
DADDY wants to play.
Rain, rain go away

Rain, rain - go away,
Come again another day.
MOMMY wants to play
Rain, rain, go away.

Rain, rain - go away,
Come again another day.
BROTHER wants to play.
Rain, rain - go away.

Rain, rain - go away,
Come again another day.
SISTER wants to play.
Rain, rain - go away.

Rain, rain, go away,
Come again another day.
BABY wants to play
Rain, rain - go away.

Rain, Rain - go away,
Come again another day.
ALL THE FAMILY wants to play.
Rain, rain - go away.

“पण एक संधी हुकली हे खरे” - खूप मोठी संधी दवडली अफगाणिस्तानने, मॅच च्या काँटेक्स्ट मधे. निकाल बदलला नसताही मोस्टली, पण रंगतदार होऊ शकली असती मॅच.

पावसाची शक्यता, ऑलरेडी पडून गेलेल्या पावसामुळे ओलसर आऊटफिल्ड आणि हवेतली आर्द्रता, नंतर वाढणारी उन्हाची काहिली पाहता, टॉस जिंकणारी टीम पहिली बॉलिंग घेईल का?

कोहली गेला. शर्माची बायको पोरीला सांगते हा असाच नेहमी आऊट होतो आणि पप्पांना रन्स करायला लागतात.

Pages