Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकांच्या तडफडीला अंत नाही.
@ सूर्या कॅच वरून निर्माण होत असलेला वाद
काही लोकांच्या तडफडीला अंत नसतो. हे चालायचेच. अजूनही काही सुचत नाहीये. शर्मा पुन्हा दिसणार नाही 20-20 मध्ये.. पण ठिक आहे. आता त्याला मोठ्या स्पर्धातच बघायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा टेस्ट चॅम्पियनशिप, दोन्ही पैकी किमान एक कप पुन्हा उचलताना बघायचे आहे. वन ऑफ द बेस्ट कप्तान आणि त्याहून बेस्ट लीडर आहे तो.. पण लोकांना फक्त आकडे कळतात. नावासमोर किती ट्रॉफी आहे हे बघितले जाते. त्यामुळे ती हवी होती. आणि अजून हव्यात कारण तो ते डिझर्व करतो!
नोव्हेंबरला सर्व सामने जिंकून तो फायनल हरला. आयपीएल मध्ये कप्तानी गेली. फलंदाजीत कधीच त्याला कोहलीच्या तोडीचा मानसन्मान मिळाला नाही जो मिळायला हवा. पण त्याने करून दाखवले.
अपघातातून आलेला पंत, आयपीएल मुळे वितुष्ट आलेला पांड्या, फॉर्म गेलेला कोहली, वन डे वर्ल्डकप मध्ये व्हीलन ठरलेला सूर्या, एकही ट्रॉफी पदरी नसलेला जगातला ऑल टाईम बेस्ट गोलंदाज बुमराह, ज्याने वैयक्तिक कारकिर्दीत दोन टोके पहिली असा कुलदीप, संघात जडेजा असूनही ज्यावर विश्वास दाखवला असा अक्षर, ज्याचा दिनेश मोंगिया किंवा विजय शंकर होतो असे वाटणारा शिवम दुबे... या संघात प्रत्येकाची एक स्टोरी आहे. या सर्वांना सोबत घेत करून दाखवले शर्माने हेच आता अंतिम सत्य राहणार आहे !
जलने वाले जलते रहे.. शर्मा जी चलते रहे
T20 International मधून दोन
T20 International मधून दोन दिग्गज खेळाडू निवृत्त होताना....
जगात सर्वाधिक धावा
No.1) रोहीत शर्मा - 4231
No.2) विराट कोहली - 4188
जगात सर्वाधिक सामनावीर
No.1) विराट कोहली 16
No.3) रोहीत शर्मा 14
जगात सर्वाधिक सिक्स
No.1) रोहीत शर्मा - 205
जगात सर्वाधिक फोर
No.2) रोहीत शर्मा - 383
No.3) विराट कोहली - 369
जगात सर्वाधिक शतके
No.1) रोहीत शर्मा - 5
जगात सर्वाधिक अर्धशतके
No.1) विराट कोहली - 38
No.3) रोहीत शर्मा - 32
जगात सर्वाधिक वेगवान शतक
No.1) रोहीत शर्मा - 35 चेंडू
जगात सर्वाधिक यशस्वी कप्तान
No.1- रोहीत शर्मा
सर्वाधिक 50 विजय
सर्वाधिक 80% विनिंग रेशिओ
आणि
एक वर्ल्डकप
कोहली, रोहित नि जाडेजा
कोहली, रोहित नि जाडेजा तिघांनी एकदम मस्त पणे निवृत्ती जाहिर केली. कोहलीची ओपन सिक्रेट होती त्यामूळे पहिल्या मुलाखतीमधे त्याने जाहीर केल्यावर शर्माने त्याच्या मुलाखतीमधे स्वतःच्या निवृत्तीबद्दल एक चक्कार शब्द काढला नाही नि कोहली ला त्याची मोमेंट घेउ दिली. शर्माने आपली निवृत्ती नंतर शांतपणे प्रेस काँफ मधे जाहिर केली. जाडेजाने दुसर्या दिवशी. मस्त सिक्वेन्सिंग केलय तिघांनीही एकमेकांबद्दल असलेला आदर दाखवत.
मला वाटले की शर्माचे नक्की
मला वाटले की शर्माचे नक्की होत नव्हते. पण ही चांगली वेळ आहे हे पाहून मग निर्णय घेतला.
वर्ल्डकप नंतर नेहमीप्रमाणे
वर्ल्डकप नंतर नेहमीप्रमाणे आयसीसीने बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूंचा संघ जाहीर केला. अकरामध्ये सहा प्लेअर भारताचे आहेत. पण मजेशीर गोष्ट अशी की चार मुंबई इंडियन्सचे आहेत जे आयपीएल मध्ये तळाला होते
संघभावना आणि एकजूट किती महत्त्वाची असते हेच यातून दिसते
भारतीय संघ आणि त्या संघाला जोडून ठेवणारा कर्णधार रोहित शर्मा हे सारेच हा विश्वचषक खऱ्या अर्थाने डीझर्व्ह करतात
The team of the ICC Men’s T20 World Cup 2024 (in batting order) is:
Rohit Sharma (captain) - India
Rahmanullah Gurbaz (wicketkeeper) - Afghanistan
Nicholas Pooran – West Indies
Suryakumar Yadav - India
Marcus Stoinis - Australia
Hardik Pandya - India
Axar Patel - India
Rashid Khan - Afghanistan
Jasprit Bumrah - India
Arshdeep Singh - India
Fazalhaq Farooqi – Afghanistan
12th player: Anrich Nortje - South Africa
World Cup Winning Captain
World Cup Winning Captain Rohit Sharma performance
Most Runs
No.1 - Gurbaz - 257 Runs
No.2 - Rohit Sharma - 257 Runs
Highest Score
No.1 - Pooran - 98
No.3 - Rohit Sharma - 92
Most Fifties
No.1 - Rohit Sharma - 3
Most Sixes
No.1 - Pooran - 17
No.3 - Rohit Sharma - 15
Most Fours
No.1 - Head - 26
No.3 - Rohit Sharma - 24
Batting Strike Rate 156.31
Indian Captain Rohit Sharma No.1 for India in all above Categories.
Captain leading from the front
सर, वरचा प्रतिसाद रोहित
सर, वरचा प्रतिसाद रोहित शर्माच्या दुसऱ्या धाग्यावर टाकला, ते समजू शकतो. पण तोच तो प्रतिसाद इथे पण?
असो, प्रतिसाद काऊंट वाढवण्याच्या तुमच्या अथक प्रयत्नांना माझा पण थोडा हातभार लावला आहे, प्रयत्न गोड मानून घ्यावा. (५४७)
अरे वर्ल्डकप जिंकलो आहोत आपण.
अरे वर्ल्डकप जिंकलो आहोत आपण..
आणि तुम्ही अजून माझे प्रतिसाद किती झाले यातच अडकले आहात..
कुच्छ बडा सोचो यार..
आता चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वर नजर आहे माझी..
बाकी भारतीय कर्णधाराचा पराक्रम या धाग्यावर टाकायला काय हरकत आहे हे अनाकलनीय आहे..
जितके वेळा या वर्ल्डकप मधील शर्माची फटकेबाजी, बुमराहच्या विकेट आणि सूर्याची कॅच बघतो अंगावर शहारे येतात.. अजूनही बाहेर पडलोच नाही मी या हँगओव्हर मधून.. तुम्ही मोजा प्रतिसाद.. मी राहतो याच धुंदीत
आणि हो.. वरच्या सर्व पोस्ट
आणि हो.. वरच्या सर्व पोस्ट आणि त्यातील आकडे कुठून कॉपी पेस्ट नाहीत.. आवड आहे क्रिकेटची.. लाडका खेळाडू आहे रोहीत शर्मा.. सारे स्वतः शोधून संकलन केले आहेत.
जेव्हा जग त्याच्या विरोधात होते तेव्हा मी त्याच्या सोबत होतो... आज त्याचे हे यश बघून उर अभिमानाने आणि आनंदाने भरून येणारच
<किती वर्ष, किती केलंत त्या
<किती वर्ष, किती केलंत त्या चर्चेत ! आता व्हा तुम्हीही निवृत्त !!!
क्रिकेटर निवृत्त होतात..
क्रिकेटर निवृत्त होतात.. क्रिकेटप्रेमी नाही.. हे आपण या व्यंगचित्रातून शिकलो
सध्या पुढची पिढी घडवत आहे..
पूर्ण कुटुंबच रोहीत शर्मा फॅन क्लबात आहेत
* क्रिकेटर निवृत्त होतात..
* क्रिकेटर निवृत्त होतात.. क्रिकेटप्रेमी नाही * - दुर्दैवाने हे इतरांना कळत नाहीं, हे आपण या व्यंगचित्रातून शिकलो !
*सध्या पुढची पिढी घडवत आहे..* - येस, खेळाडू येतील, जातील... खेळ सुरूच राहील, हीच खरी गंमत आहे !!!
हे आज सकाळी मिळाले
हे आज सकाळी मिळाले

अरे वर्ल्डकप जिंकलो आहोत आपण.
अरे वर्ल्डकप जिंकलो आहोत आपण..
आणि तुम्ही अजून कुणाचे रन किती झाले / छक्के किती झाले / ५० किती झाले यातच अडकले आहात..
कुच्छ बडा सोचो यार..
आता चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वर नजर आहे माझी..
>> असं म्हणत आकडे गोळा करताय..
जरा सांभाळून..
एक डोळा T20 वर्ल्डकप च्या आकड्यात अन् एक डोळा CT / WTC वर ठेवता ठेवता चकणे व्हाल
क्रिकेट आणि गणित !
क्रिकेट आणि गणित !
दोन्ही माझ्या आवडीचे विषय आहेत..
त्यामुळे आकड्यात खेळणे माझा छंद आहे
20-20 कप्तानीचे मोस्ट wins .. विनिंग ratio वगैरे आकडे उद्या आणतो..
रोहित शर्मा तरुणपणीच कॅप्टन
रोहित शर्मा तरुणपणीच कॅप्टन झाला असता तर आता शर्माच्या नेतृत्वाखाली भारताकडे हमखास चार पाच वर्ल्ड असते.
अबब बाबा.. कसली बेकार गर्दी
अबब बाबा.. कसली बेकार गर्दी उसळली आहे मरीनड्राईव्हला... भारतीय संघाला चिअर करायला... नंतर फोटो शेअर करतो
(No subject)
(No subject)
(No subject)
वाडेकर व कपिलच्या विजयी
वाडेकर व कपिलच्या विजयी संघांच्या मुंबईतील मिरवणुकीत मी नाचलो होतो व त्या वेडेपणाला मीच स्वतःला हंसत असतो; पण कालचा मुंबईतील ' खास वेड्यांचा पसारा ' बघून दिलासा वाटला !!! अधून मधून असं वेडं होणं खरंच बरं असावं, असंच आता वाटतं !!
वाह
वाह
माझीही इच्छा होती.. पण गर्दी अशीच असणार याची कल्पना होती. मुलीपासून ही न्यूज लपवून ठेवली होती. अन्यथा ती डोक्यावर बसली असती. आणि अश्या गर्दीत तिला नेणे शक्य नव्हते.
गर्दी मात्र खरेच आपेक्षेपेक्षा खूप जास्त होती.
म्हणजे लोकांना खरेच किती आतुरता होती या विजयाची...
चला झाला एकदाचा नयनरम्य सोहळा
चला झाला एकदाचा नयनरम्य सोहळा. आता पुढचा कप वीस तीस वर्षांनी कधी जिंकतील तेव्हा जिंकतील. काय माहित आपण असू नसू.
टर आता धागा बंद करा.
टर आता धागा बंद करा.
काही दिवस क्रिकेटबद्दल बोलण्या ऐवजी दुसरा काही विषय काढा.
बंदच करणार होतो ते ही बातमी
बंदच करणार होतो ते ही बातमी कानावर पडले..
"I am pleased to announce the prize money of *INR 125 Crores* for Team India for winning the ICC Men's T20 World Cup 2024. The team has showcased exceptional talent, determination, and sportsmanship throughout the tournament. Congratulations to all the players, coaches, and support staff for this outstanding achievement!" Jay Shah wrote on X after India's triumph.
Big match Big Player
Big match Big Player
Captain Rohit Sharma never lost a T20 final
5 IPL trophies
1 CL
1 Nidahas Trophy
1 T20 world cup
T20 स्पर्धात 8 वेळा फायनल आणि 8 वेळा विजय!
अविश्वसनीय आकडे आहेत
फायनल मध्ये समोरचा संघ सुद्धा स्पर्धेत सर्वोत्तम असतो. बलाढ्य आणि फॉर्ममध्ये असतो. अश्या संघांशी 8 सामने खेळून आठ वेळा त्यांना मात देणे. 100 टक्के विनिंग रेशिओ ही अदभुत कप्तानी आहे
आणि ते सुद्धा 20-20 अश्या बेभरवशाचा फॉरमॅट मध्ये...
*आणि ते सुद्धा 20-20 अश्या
*आणि ते सुद्धा 20-20 अश्या बेभरवशाचा फॉरमॅट मध्ये...* - खूप महत्त्वाचा मुद्दा ! आधी क्रिकेट खेळच बेभरवशाचा, त्यात टी 20 म्हणजे कहरच !! एकही सामना न हरता ही स्पर्धा जिंकण महाकठीण व म्हणूनच असा जल्लोष समर्थनीय !!!
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/YvgTMFkaY9snT843/?mibextid=Ls6BEq
हा व्हिडिओ बघा
वानखेडे वर रोहीत शर्माची मुलाखत चालत असताना मध्येच त्याने हार्दिकचे असे काही कौतुक केले की लोकांनी हार्दिक हार्दिक चा नारा दिला. जिथे काही दिवसा पूर्वी त्याला छपरी छपरी ऐकावे लागत होते. त्यालाही अत्यानंदाने भरून आले. आणि त्याने उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. रोहीत शर्मा तर माणूस म्हणून ग्रेट आहेच. पण हा एकंदरीत प्रवास हार्दिकला सुद्धा एक चांगली व्यक्ती बनवेल. मुंबईच्या क्रिकेट प्रेमींनी दाखवून दिले की त्यांना क्रिकेटच्या स्पिरीटची किती जाण आहे. त्यांचे क्रिकेटवर किती प्रेम आहे
त्यांचे क्रिकेटवर किती प्रेम
*...त्यांचे क्रिकेटवर किती प्रेम आहे*
अहो, मरीन ड्राईव्हवर तुम्हाला नाचताना बघून तुमच्या क्रिकेटपेक्षाही तुमच्या नाचाने धडकी भरलीय आपल्या बंड्याला ! क्रिकेटचं कोचिंग सोडून डान्सच्या क्लासला जातोय तो आता !!!
Maharashtra govt announces Rs
Maharashtra govt announces Rs 11 crore prize for T20 World Cup-winning Indian team
याची काही गरज नव्हती
बोर्डाने सव्वाशे करोड दिले होते..
आपल्या राज्याने का दिले?
Pages