T20 विश्वचषक 2024 - भारत विश्वविजेता !!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21

काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

USA v WI, 46th Match, Super 8 Group 2
USA 75-4 (11)
Corey Anderson*: 2 (6)
Milind Kumar: 6 (8)
Roston Chase 1-0-4-1
West Indies opt to bowl

कुलदीप यादव तिसरी..
संपवला सामना
आता उद्या अफगाण ऑस्ट्रेलिया बघायला मजा येईल..
वन डे वर्ल्डकप का बदला

आपल्यात कोणी मोठा स्कोअर करत नाहीये, ऑरेंज कॅपला जात नाहीये, पण थोडे थोडे रन वेगात मारून भारताचा स्कोअर करत आहेत..

मुद्दाम सोडली असावी. कारण तो फलंदाज बॉल खात होता. >> हळू बोला, आय सी सी ने ऐकले तर फाईन लागेल अखिलाडूपणाबद्दल.

पण जर ऑस्ट्रेलियाने आपल्याला दणकून हरवले आणि अफगाणिस्तान बांगलादेशसोबत मोठ्या फरकाने जिंकली तर तिघांचे चार पॉईंट आणि रनरेट वर आपण पण बाहेर जाऊ शकतो अशीही एक शक्यता आहे Lol

आपल्या फलंदाजीचे म्हणाल तर सूर्याचे दोन गरजेला आलेले अर्धशतक आहेत. तो फॉर्मात आहे म्हणू शकतो. शर्मा कोहली त्यांच्या लौकिकाला साजेशा धावा नाहीत पण स्ट्रगल करत आहेत असे वाटत नाहीत. त्यांच्या धावा कधीही येऊ शकतात असे वाटते. पांड्याच्याही धावा लागल्या गेल्या सामन्यात. तो आयपीएल मध्ये जे झाले त्यातून बाहेर आला आहे. शिवम दुबे हा बोनस आहे. कधीतरी तो अचानक वचपा काढणारी खेळी करू शकतो. अक्षर जडेजा यांच्या धावा सध्या मोजायची गरज नाही. तर ते संघात असल्याने फलंदाजी कागदावर आठ पर्यंत आहे असे वाटते आणि पुढच्या फलंदाजांना आणखी आक्रमक खेळता येते. आपला एप्रीच हाच राहिला आहे. म्हणून न्यू यॉर्क पीचेस वर सिराज असताना कुलदीप आधी अक्षर जडेजा संघात होते.
राहता राहिला पंत तर हा वर्ल्डकप ऋषभ पंतचा आहे अशी एक फिलिंग पहिल्यापासून होती ज्याला खुद्द आयुष्याने दुसरा चान्स दिला आहे. आणि निवड समितीने देखील त्याला एकही आंतरराष्ट्रीय सामना टेस्ट न करता आयपीएलचे थोडे फार सामने बघून थेट वर्ल्डकपमध्ये खेळवले आहे. आणि आतापर्यंत त्या विश्वासाला जागत त्याच्या भारतातर्फे सर्वाधिक धावा आणि वर्ल्डकपचे रेकॉर्डब्रेक झेल आहेत. तो आपला लकी चार्म ठरेल यावेळी असे वाटत आहे.

मी जेव्हा पोस्ट केलं ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर तेव्हा 3 बाद झाले होते. पोस्ट केलं आणि लगेच चौथी विकेट गेली. तेव्हा अफगाणिस्तानला पण वाटलं नसेल की ऑस्ट्रेलिया हारू शकते. पण मला खेळपट्टीचा अंदाज आला होता.विशेष करून आपण झोपेतून उठतो आपला मेंदू काही वेळ काम करत नसतो तेव्हा मी हे पोस्ट केलं.म्हणजे मला किती इन डेप्थ नॉलेज असेल बघा.

मी झोपायच्या आधीच अफगाण वन डे वर्ल्ड कप बदला घेणार हे ठरवून आणि तशी पोस्ट टाकून शांतपणे झोपून गेलो.
उठलो आणि तसे घडताना पाहिले Happy

हायलाइट पाहिल्या आता..
कमिन्स ने आज सुद्धा हॅटट्रिक घेतली.. आणि वॉर्नर ने कॅच सोडली नसती तर चारात चार झाल्या असत्या

अफगाण ओपनरने अवघड खेळपट्टीवर कमाल फलंदाजी केली. तीच दोन्ही संघातील फरक ठरली आज..

मी झोपायच्या आधीच अफगाण वन डे वर्ल्ड कप बदला घेणार हे ठरवून आणि तशी पोस्ट टाकून शांतपणे झोपून गेलो.>>>
तू तुझं उदाहरण देऊ नको. सेहवाग डबल सेंच्युरी केलेला पहिला खेळाडू ठरला कारण सचिन देव होता. त्याचप्रमाणे तू आमच्या मायबोलीकरांचा देव आहेस. त्यामुळे तुझं उदाहरण देऊन आम्हाला लाजवू नकोस. तुला कोण वर्ल्ड कप जिंकणार हे पण माहित आहे फक्त आमची मजा निघून जाईल म्हणून तू सांगत नाहीस. ज्याप्रमाणे पुरातन काळात देव भक्तांच्या सहवासात रुप बदलून यायचा तसाच तू आमच्यासाठी आहेस.

RSA choking as usual!
ओह! नाही चोकले. RSA अखेर जिंकले.
What a roller coaster match. मी लकी म्हणून बघायला मिळाली!

मी सुद्धा पाहिली तयारी करता करता.. त्यामुळे चर्चा करायला फार वेळ मिळाला नाही
पण आजच्या मॅच मुळे एक गडबड झाली.
आता आपल्याला सेमीला इंग्लंडचा सामना करावा लागेल. कारण 40+ फरकाने हरलो नाही तर आपणच पहिले असू.
ऑस्ट्रेलिया किंवा अफगाणला आफ्रिका भेटेल. दोघांची मजा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आताच बाद केले पाहिजे. नाहीतर इंग्लंड नंतर आपल्याला पुन्हा त्यांच्याशी भिडावे लागेल..

*नाहीतर इंग्लंड नंतर आपल्याला पुन्हा त्यांच्याशी भिडावे लागेल..*- सध्या आपली तयारी, अनुभव व फॉर्म बघता, असला विचार इतरांनी आपल्याबद्दल करावा हे अधिक योग्य ! Wink
आजच्या सामन्यासाठी भारताला , विशेषत: रोहित व विराटला, शुभेच्छा !

आधीच कमजोर असलेल्या हृदयात काल रात्रीपासूनच धड धड सुरु झालीये.
वेस्ट ईन्डिज ची तिसर्‍या विक्व्टची भागी दारी बघता बघता झोप लागली, वाटले वेस्ट इंडिज जिंकणार!
सकाळि उठून पाहिले तर डकवर्थ लुईस!! नाहीतर वेस्ट इंडिज जिंकू शकत होते.

जाऊ द्या.
अमेरिकन टीमचे कौतुक करावे तितके थोडे. भाउ म्हणतात त्याप्रमाणे जर काही पैशाची लालुच दाखवली नि अमेरिकेत क्रिकेट आआले,

मग तीन वर्षांनी अफगाणिस्तान वि. अमेरिका फायनलला.

Pages