एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< टू ए बी >>
------- एक्स्ट्रॉ 2ab...
एक्स्ट्रॉ मुळेच वजन प्राप्त होते.

कल्पक शीर्षक आहे.

खरं तर मोदींनी आताच काही कारण सांगुन (तेच पटाईत आहेत कारण ठोकुन देण्यात) मी आता सत्तेत राहू इच्छित नाही, मार्गदर्शक बनून राहीन असे केले तर त्यांच्या चाहत्यांत आणि अजुनही कुंपणावर असलेल्या लोकांत त्यांची असलेली इमेज कायम ठेवून बाजूला होतील.

किंवा सलग तीन वेळा पंतप्रधान यादीत नाव नोंदवायचेच आहे म्हणुन एक वर्ष पंतप्रधान आणि ७५ वय पूर्ण झाले की तो नियम लावून मी बाजुला होईन असे आधीच ठरले असेल तर गोष्ट वेगळी.

नाहीतर "मैं ही राज्य हूँ और मेरे शब्द ही कानून है" वाला कोऍलिशन सरकार कसं चालवणार?

की extra 2ab तले आणि cd तले काहीउचलून त्यांना a^2 मध्ये आणण्याचा काही निश्चित प्लॅन आहे?

आत्यंतिक मुस्लीम द्वेषामुळे " कुणाला " डोक्यावर बसविले आहे हे पण कळत नाही , दिसत नाही.

काटजू यांच्या शब्दांत खोपडी मे कुछ नही है.... खाली है.
नॉन बायोलॉजिकली निर्माण झालेली entity - मुसलमान, पाकिस्तान, गांधी, नेहरु या व्यातिरिक्त चार वाक्य बोलू शकत नाही.

https://www.youtube.com/watch?v=y8ZNI2sVb58
बंसुरी स्वराज को अलग अंदाज में आशीर्वाद देते मोदीजी

तिचं मडकं आपल्या मडक्यापेक्षाही कच्च आहे का हे बघत होते का?

with_constitution_8june2024.jpgकाल घटनेला नमस्कार केला.... डोक्याजवळ नेले, आदर दाखविला. छान वाटले.
मोदी यांचे अभिनंदन, चांगले काम करण्याची शेवटची संधी आहे. शुभेच्छा.

मला पण लहानपणी वाटायचे पुस्तक डोक्याला लावल्याने त्यात लिहीलेले आपल्या डोक्यात जाते. पण तसे काही झाले नाही. आता नॉन बॉयोलॉजिकल निर्मीती मधे असे होत असेल तर कल्पना नाही. Happy

भारताचे नवे संसद भवन असा शब्द गुगला. त्या नयनरम्य सोहळ्याची अनेक चित्रे सहज दिसतील.

एक फरक प्रकर्षाने जाणवला. त्या सोहळ्यामधे - कुठेही भारताची राज्य घटना, सन्माननीय राष्ट्रपती दिसत नाही. दिसतात ते सर्व वेगळेच लोक आहेत.... संसद भवनांत यांचे काय काम होते? तेही खास विमानाने यांना दिल्ली मधे आणले होते. अशी विमानसेवा आपल्या पुलवामाच्या जवानांना मिळाली असती तर ? हे माझे कायमचे दु:ख असणार आहे Sad

Trial_8June2024_BB.jpg

चारशे पारचे स्वप्न साकार झाले असते तर कुठले चित्र बघायला मिळाले असते ?

(अ) राज्यघटने बद्दल आदर "दाखविणारे " घटनेला डोक्याजवळ नेणारे चित्र ? (ब) संगोल / धर्मसंसदेसमोर नतमस्तक होणारे चित्र?

२०१४ मध्ये संसद भवनाच्या पायर्‍यांना कपाळ लावून नमस्कार केला होता. आज ते संसद भवन नाही. संसदीय लो कशाहीचं काय झालं ते आपण पाहिलंच आहे. आता घटनेच्या प्रतीला कपाळ लावलंय. घटनेचं रक्षण करायची गरज आहे.

मला रामाची.

बोट धरून नेलं होतं त्याला..

या निकालामुळे मोदींमध्ये फरक पडेल असे वाटणाऱ्यांसाठी.
---
वरची लिंक करेक्ट केलीय.

आणि मोदी जे बोलले ते न्यूज चॅनल्स रंगवून रंगवून दाखवत आहेत.

विकसित भारत की और मोदीजीने उठाया तिसरा कदम. कल लेंगे तिसरी कसम. २०४८ तक मोदीजी रहेंगे भारत के पंतप्रधान नोस्त्रदेमास ने की थी भविष्यवाणी.

आता प्रशांत किशोर म्हणतोय, मायनॉरिटीजची मतं काँग्रेसची हक्काची. त्यात १८% मुस्लिम, २% इतर. कोंग्रेसला २२-२३% मतं पड्लीत ती अशी.
महाराष्ट्र भाजप व शिंंदेसेनेच्या नेत्यांनी सुद्धा महाविकास आघाडीला एवढ्या जागा मुस्लिम मतांमुळे मिळाल्या असं बोलायला सुरुवात केली आहे.
आणि नेटभगवे म्हणणार हे बांग्लादेशींमुळे जिंकले.

मानव, खरं आहे. काहीही बदललेलं नाही.

8june_khurchi.jpeg

चित्र बोलके आहे.

Pages

Back to top