एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मानव, खरं आहे. काहीही बदललेलं नाही. >>

------- फरक पडेल अशी अपेक्षा कशाच्या आधारावर ?

रोखे गैरव्यावहारांत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावरही त्यात काही चूक झाली हे मान्य नव्हते . बाहेर भाषणात रोखे गैरव्यावहाराला विरोध करणार्‍यांना धमक्या.... अहंगंडा सोबत कमालीचा अशिक्षितपणा आणि उर्मटपणा आहे.

फरक पडेल अशी आशा, अपेक्षा निवडणुकीबद्दलच्या धाग्यावर बऱ्याच जणांनी व्यक्त केली आहे.
भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही, जागा , मते घटली म्हणून कोर्स करेक्शन करतील , असं वाटत़य.
काहींना वाटत़ंय नितीश, चंद्राबाबू यांना लगाम घालतील.‌

या चित्राला काही अर्थ नाही. पैशाच्या जोरावर ते पक्ष फुटतील. यापुढे जनतेची पकड नाही, जो होईल तो पैशाचा खेळ.

अमितव - पैशाच्या जोडीला धाक/ धमक्या/ हिंसा..... आणि त्यामधे तर मास्टरी आहे.

पराभवाची चिकीत्सा करुन आपले काय चुकले हे बघण्यापेक्षा फैजाबादेत निवडून दिले नाही म्हणून तिथल्या मतदारांना शिक्षा करायची भाषा आहे.

आता 5 वर्ष तरी भीती नाही, हवं ते करता येईल.
फ20 ने आज मुद्दा मांडला की उबाठा ला मुंबईत विशिष्ट समाजाची मतं मिळाली. विधानसभेला हाच समाज भाजपला लाथ मारेल तेव्हाच कळेल

हो!

एकंदरीतच युपी, महाराष्ट्र, फैजाबाद इ ठिकाणी मुस्लिम एक गठ्ठा मते मिळाली अशा पोस्टीं व्हायरल होताहेत.

आता विगु सरळ सरळ घुसपेठीया, ज्यादा बच्चे पैदा करने वाले म्हणतात, आणि ये सत्ता मे आये तो मंगलसूत्र, भैस अन काय काय छिनके इनकी व्होटबँक को देंगे सांगत फिरतात तर दुसरी काय अपेक्षा करणार?

Screenshot_20240609-005751.jpg

मस्त...

एव्हढी जुमलेबाजी करुनही ४०० पार झाले नाही म्हणून चेहेरा किती पडलेला दिसत आहे. अरे, अभिनय करण्यात तरबेज आहे ना थोडे तर स्मित आणा.

मुस्लिम समाज हा उबाठा किंवा काँग्रेस कडे झुकला आहे असे म्हटले जाते ह्याचाच अर्थ पंतप्रधान /सरकार हे त्या समाजामध्ये सुरक्षित भावना निर्माण करण्यात नालायक ठरले आहे.

फ20 ने आज मुद्दा मांडला की उबाठा ला मुंबईत विशिष्ट समाजाची मतं मिळाली. विधानसभेला हाच समाज भाजपला लाथ मारेल तेव्हाच कळेल>>>>
फडणवीस हे नॅरेटिव्ह मुद्दाम तयार करत आहेत, कारण त्यांना विधानसभा निवडणुकीत याची सहानभूती वापरून हिंदू मतांचे पर्सेंटेज वाढवून ध्रुवीकरणाचा फायदा उठवायचा आहे. आणि सोबतच शिवसेनेला पक्षफोडी मुळे मराठी-हिंदू मतदारांची सहानभूती मिळाली आहे या ह्या विजयामुळे तयार झालेल्या नॅरेटिव्हला ही काउंटर करायचे आहे.
निदान आकडे तरी ग्राउंडवरची परिस्थिती वेगळी आहे असं दाखवत आहेत. त्यांच्या नॅरेटिव्ह मधला फोलपणा समजून घ्यायचा असेल तर ज्या ईशान्य मुंबई मतदारसंघाचा दाखल दिला जातो ( ज्यात मुस्लिमबहुल मानखुर्द विधानसभा मतदारसंघ येतो ) त्यातील २०१९ मधील आणि २०२४ मधील मतविभागणी समजून घ्यायला हवी.

matadaan.JPG

इथे संजय दीना पाटील यांना जवळपास १६०००० मते गेल्यावेळेच्या तुलनेत वाढलेली दिसतात.
जर पूर्णपणे फडणवीसांच्या नॅरेटिव्ह च्या कलाने जरी गेले तरी वाढलेले ३०००० मतदार आणि वंचित चे घटलेले ५३००० मतदान हे पूर्णपणे मुस्लिम असल्याचे मानले (जे की सर्वार्थाने अशक्य आहे कारण वंचित ला मतदान करणारा मागासवर्ग ही मानखुर्द मध्ये मोठ्याप्रमाणात आहे. ) तरीही ही वाढ ८०००० मतांच्या आसपास येऊन थांबते.

म्हणजेच हा ही निष्कर्ष निघू शकतो की या वेळेला संजय दीना पाटील यांच्या वाढलेल्या १६०००० मतांमधील तब्बल ८०००० मते ही त्या हिंदूंची होती ज्यांनी मागील वेळेस मनोज कोटक यांना मत दिले होते ( गेल्या वेळी ही मुस्लिम वोटर्सनी भाजपाला - मनोज कोटकला मत दिले नव्हते हे गृहीत धरून. ) त्या ९५००० मतांमधून जी भाजपाची या वेळेस कमी झाली आहेत.

२०१९ वोट शेअर VS २०२४ वोट शेअर

आता हिंदूंची ही मते कमी व्हायला फक्त पक्ष फोडला हेच कारण आहे असे मानणेही चुकीचे ठरेल. यात पक्ष फोडाफोडी, गुजरातेत गेलेले व्यवसाय आणि त्यावर भाजपने दिलेला गुजराती उमेदवार, जरांगे फॅक्टर, भाजपचे भ्रष्टाचार्यांना अभय देणे, त्यांची राज्य आणि देशपातळीवरील बेबंदशाही अशी अनेक कारणे असू शकतात . पण यावेळी पारंपरिक हिंदू वोटर्सनी सुद्धा भाजपच्या विरोधात मतदान केले हे फडणवीस काय, कुणीही पुराव्यानिशी नाकारू शकत नाही.

*जॉर्नालिस्ट: विक्रांत पाटील*

*मोदी-शाह जोडगळीला जेलमध्ये जायचे नाही, त्यामुळे सर्व संवैधानिक आणि पक्षीय पातळीवरील प्रोस्यूजर डावलून मोदींना सत्तेच्या बोहल्यावर चढण्याची घाई झालीय; संघ, भाजपाला न विचारता, चर्चा न करता गुजराती लॉबीचा परस्पर खेळ का सुरू आहे? जाणून घ्या सारे काही ...*

• सर्वात आधी, मोदींना स्वतः या पराभवाची जबाबदारी घ्यायची नाही. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे आपले लाडके कळसूत्री प्यादे पराभवाची जबाबदारी घ्यायला पुढे केले. त्यामुळे मोदींना पराभवाची जबाबदारी घ्यायला लावण्याचा जोर कमी होईल. दुसरीकडे आपसूक योगी आदित्यनाथ यांच्यावर उत्तर प्रदेश पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याचा दबाव येईल. अर्थात योगी-फडणवीस यांचा पराभवाशी अर्थाअर्थी काडीचाही संबंध नाही. तिकीट वाटपापासून सर्व खेळ अमित शाह यांनी केले. प्रचारात फक्त मोदींचा चेहरा वापरला गेला आणि त्यांनी "मी-मी", "मैं-मै" करत निवडणूक लढली. "मोदींना मत" मागितले गेले. भाजपाला गुंडाळून ठेवले गेले. आता संघाची गरज नाही, असे जाहीरपणे सांगण्यापर्यंत इथपर्यंत गुजराती लॉबीची मग्रुरी, अहंकार वाढला. "एनडीए सरकार" हा तर निवडणूक लढताना विषयच नव्हता. *या निवडणुकीतील पराभव, हा मोदींना नाकारणारा जनादेश आहे," असे संघ आणि संघटन पातळीवर भाजपाला स्पष्टपणे वाटते.

*- विक्रांत पाटील 8007006862 (WA)*
Vikrant@Journalist.Com

• संघाने मोदींना जबाबदारी स्वीकारायला लावण्यासाठी दबाव वाढवला आहे. काल नागपुरात संघाची तातडीची बैठकही झाली.* या बैठकीत असले कुबड्यांचे, खिचडी सरकार चालवू नये, असा एक मतप्रवाह संघात, भाजपात आहे. "इंडिया"ला सरकार बनवू द्या, नंतर बघू, असा हा मतप्रवाह आहे. दुसरीकडे, सत्ता घ्यायची असेल तरी पंतप्रधानपदी मोदी नको, असा सूर आहे. त्यादृष्टीने नितीन गडकरी, मध्यप्रदेश एकहाती शत-प्रतिशत जिंकवून देणारे शिवराजसिंह चौहान, राजनाथ सिंह यांची नावे चर्चेत आली आहेत. नितीन गडकरी यांचे नाव चर्चेत येताच गुजराती लॉबीने फडणवीस यांना राजीनामा नौटंकी करण्याचे आदेश दिले.

*गडकरी, शिवराज, राजनाथ, वसुंधरा ही पक्षातील विरोधी मंडळी सक्रिय होण्याच्या आधीच मोदींना खुर्चीवर जाऊन बसायचे आहे. त्यामुळेच त्यांनी हाता-पाया जोडून तातडीने नितीश-चंद्राबाबू यांना दिल्लीत बोलावून समर्थन पत्र मिळवले. त्यानंतर उतावीळ मोदी हे निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना निवडणूक प्रक्रिया संपविल्याचे संवैधानिक चौकटीत अधिकृतरित्या कळवण्यापूर्वीच राष्ट्रपती भवनात पोहोचले*
(ही सगळी घाई करताना मोदींनी बायपास केलेल्या सगळ्या प्रोसेस नेमक्या काय आहेत, ते पुढे विस्ताराने दिले आहे.)
आता, ही मोदींची घाई का? आपण जर लवकर पंतप्रधानपदाच्या खुर्चीत जाऊन बसलो नाही, तर आपल्याला जेलमध्ये जायला लागतेय, हे मोदी-शाह पक्के जाणून आहेत. त्यामुळेच भाजप संघटन, संघ हे सक्रिय होण्याच्या आत, त्यांना वेळ न देता मोदींना बोहला गाठायचा आहे. अर्थात ते तितके सोपे नाही. "मोदी हे देशातील सर्वात बोगस नेते आहेत," ही चंद्राबाबू यांची विचारधारा आहे. मोदींनी गुजरात दंगल घडवून आणली असा आरोप करत त्यांचा राजीनामा मागणारे चंद्राबाबू हे पहिले नेते! नितीश यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. हे दोन्ही नेते मुस्लीम आरक्षणाचे समर्थक आहे. त्यावर सविस्तर नंतर कधीतरी चर्चा करू.

• अयोध्येत पराभवानंतर आता विकृत अंधभक्त देशातील हिंदूंनाच शिव्या घालत आहेत. मोदींनी तर परवा संबोधनात "जय श्रीराम"ला तलाक देत "जय जगन्नाथ"चा नारा दिला. उत्तर प्रदेशने लाथाडले आणि ओडिशाने सत्ता दिली म्हणून या माणसाने "जय श्रीराम"च सोडून दिले. कसले हे हिंदुत्व? मोदी आता भगव्या जॅकेटमध्ये नव्हे तर हिरव्या जॅकेटमध्ये दिसू लागले आहेत. त्यांच्या बॅकड्रॉपला उर्दूमध्ये गठबंधन सरकारची अक्षरे दिसू लागली आहेत. ताठ कण्याचे मोदी पटेल, शिंदे आणि तटकरे यांच्यासारख्या सामान्य वकूबाच्या माणसानसमोर झुकताना दिसत आहेत. चंद्रा-नितीश यांचे तर पायच धरायचे बाकी राहिले आहेत. हे अध:पतन आहे. अहंकार, माज, मग्रूरी पुरती ठेचली गेली आहे. मात्र, काहीही करून, कुणाच्याही हाता-पाया जोडून संघ-भाजप सक्रिय होण्याआधी मोदींना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर जाऊन बसायचे आहे. तसे झाले नाही तर त्यांना शाहांच्या सोबतीने जेलमध्ये उर्वरित आयुष्य घालावे लागेल. शिवाय, अदानी यांचा बाजार उठण्याची भीती असल्याने संपूर्ण गुजराती लॉबी सक्रिय झाली आहे. परवाचा मोदींचा संबोधन कार्यक्रम हा भाजपाचा नव्हता तर गुजराती लॉबीचे आयोजन होते. अयोध्येत पराभव का झाला? तर, स्थानिक लोकांना हद्दपार करून तिथे गुजराती मंडळींना घुसडण्यात आले आहे. सर्व व्यवसाय, ठेके हे गुजराती ठेकेदार, कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. अयोध्येतील 80% हिंदू जनता आणि भगवान श्रीराम असेच नाही कोपले. सत्तेचा हा खेळ मोदी-शाह यांना वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. ज्या संघाला यांनी डावलले, ज्या सरसंघचालक मोहन भागवत यांना गुंडाळून ठेवले, ज्या भाजप पक्ष संघटनाला फाट्यावर मारले, ते काय गप्प बसणार आहेत काय? हे काय कमी की काय, समोर तेल लावलेला पैलवान तयार आहेच. जाता-जाता आणखी एक - चंद्राबाबू यांचा या दुनियेतील सर्वात बेस्ट फ्रेंड कोण आहे, ते माहीत आहे का तुम्हाला? अखिलेश यादव!

*संघ-भाजपाला डावलून, अतीव घाईत, पंतप्रधानपदाच्या बोहल्यावर चाडण्यासाठी उतावीळ मोदींनी बायपास केल्या या सगळ्या प्रोसेस -*

1. निवडणूक आयोगाला राष्ट्रपती भवनात जाऊन अधिकृतरित्या राष्ट्रपतींना कळवावे लागते की, लोकसभा निवडणूक प्रोसेस संपली आहे.
2. त्यानंतर नव्या लोकसभेचे गठन केव्हा करायचे ते अधिसूचित केले जाते.
3. पंतप्रधान राजीनामा देतात आणि त्यानंतर राष्ट्रपती त्यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्यास सांगतात.
4. राष्ट्रपती सर्वात मोठ्या पक्षाला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित करतात.
5. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी (फ्लोअर टेस्ट) साधारणतः आठवडाभरापासून ते 2-3 आठवड्याचा कालावधी दिला जातो. अर्थात, राष्ट्रपती स्वतःच्या अधिकारात ही मुदत सहा महिन्यापर्यंत लांबवू शकतात. (तसे आजवर कधी झालेले नाही!)
6. राष्ट्रपती/घटनेच्या पातळीवरील या प्रोस्यूजरशिवाय इतर घटना पक्षीय पातळीवर घडतात - जर गठबंधन सरकार येणार असेल तर सर्व पक्ष मिळून आधी निमंत्रक निवडतात.
7. त्यानंतर सर्व सहभागी घटक पक्षांचा किमान समान कार्यक्रम निश्चित होतो.
8. गठबंधन पक्षांची बैठक होते आणि त्यात संसदीय दलाचा नेता निवडला जातो.
9. सहभागी सर्व घटक पक्ष नव्याने निवडलेल्या नेत्याच्या नेतृत्त्वात आपापसात सहमतीने खातेवाटप व इतर पदांबाबत ठरवतात.

*- विक्रांत पाटील 8007006862 (WA)*
Vikrant@Journalist.Com

Chaila

तो दुःखद घटना धागा कुठे गेला

निकम्मो ताई परत अनर्थ करणारे

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू राजवटीत मुस्लिम आरक्षण सुरूच राहणार आहे म्हणे

कर्नाटकात ज्यांच्या काळात मुस्लिम आरक्षण दिलं त्यांचा मुलगा कुमारस्वामी यांनी कॅबिनेटची शपथ घेतलीय

आज शपथविधी सोहळ्याला शाहरुख खान खास आमंत्रित होता

मालदीवचे मोहम्मद

सेशेल्सचे अहमद

बांगलादेशच्या शेख
हजर होते

M फॉर मोदी

M फॉर मुस्लिम

M फॉर मुजरा,मुघल,मटणमच्छी,मंगळसूत्र, म्हैस...

NEET घोटाळा = VYAPAM घोटाळ्याचे नॅशनल रूप.

मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे करून अशिक्षित गुलाम तयार करायचे आहेत यांना

स्पर्धा प्रवेश परीक्षा या गरीब - अंडर प्रिव्हिलेज्ड वर्गावर अन्यायकारक आहेत. या परीक्षांसाठी क्लासेस लावले नाही तर यश मिळणे कठीण. कारण तिथे तंत्राचा भाग मोठा आहे. हे क्लासेस खाजगी क्षेत्रात उद्योगासारखे (इंडस्ट्री) सारखे चालतात.

मायबोलीच्या सामाजिक जाणीव उपक्रमांत सावली शिक्षण संस्थेला मदत केली जाते. माझ्या एका मावसबहिणीच्या करवी या संस्थेत शिकलेल्या एका मुलीच्या नीट परीक्षेच्या क्लाससाठी मदतीचे आवाहन माझ्यापर्यंत आले. दोन लाख रुपयांची गरज होती. मी फूल ना फुलाची पाकळी अशी मदत केली. तिची गरज भागली का ते कळले नाही.

Pages