T20 विश्वचषक 2024 - भारत विश्वविजेता !!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21

काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत-बांग्लादेश वॉर्म अप सामना चालू आहे..
आपण १८२ मारले.. आता बांग्ला फलंदाजी सुरू होईल. मी अर्धा सामना पाहिला. या खेळपट्टीवर हा स्कोअर चांगला वाटत आहे.

आपला ऋषभ पंत उर्फ चुम्मा आज मस्त खेळला. ४ फोर ४ सिक्स.. ३२ चेंडूत ५३ मारून निवृत्त झाला.
हार्दिक पांड्या सुद्धा चांगला हिट करत होता हे बघून बरे वाटले. कारण तो प्लेईंग इलेव्हन मध्ये महत्वाचा प्लेअर आहे आणि खेळणारच आहे.

यशस्वीला खेळवले नाही हे पाहता शर्मा कोहली ओपनिंग असावेत अशी शक्यता वाटत आहे, तो न खेळण्यामागे आणखी काही कारण असल्यास कल्पना नाही.पण दुबे आणि संजू यांनी सुद्धा आज निराशा केली. त्यामुळे या तिघांपैकी कोण खेळेल हे समजत नाही.

फिक्स असलेले पाच फलंदाज - शर्मा, कोहली, पंत, सुर्या, पांड्या

ऋषभ पंतची टीम इंडियाची जाहिरात छान आहे. अपने पैरो पे तो खडा हो गया अभी टीम इंडिया के लिए खडा होना है.
जर कोणाला आठवत असेल तर गबा सिरीज आधी तो संघाबाहेर होता. पण तेव्हा वॉर्म अप सामन्यात जबरदस्त खेळला होता. त्यामुळे पहिल्या कसोटीत सर्बबाद 36 झाल्यानंतर फलंदाजी बळकट करायला संघात आलेला.. पुढे इतिहास घडला.
आज सुद्धा तो वॉर्म अप सामन्यात खेळला!

सकाळी यजमान अमरिकेने कॅनडा विरुद्ध मोठे टारगेट सहज चेस केले.
संध्याकाळी विंडीज पप्पा नु गिनी चा खुर्दा उडवेल असे वाटत आहे.

आयर्लंड बांगलादेश अफगाण या संघानी धक्के दिल्यावरच या स्टेजला मजा येईल.. अन्यथा खरा वर्ल्डकप सुपर 8 स्टेज ला सुरू होईल. त्यात पॉईंट सिस्टीम कशी आहे ते एकदा बघावे लागेल.. प्रत्येकाला बहुदा उर्वरित सात पैकी तिघांशी च सामने खेळायचे आहेत. आधीचे पॉईंट मोजणार का हे सुद्धा चेक करायला हवे..

पहिले दुसरे कोणीही येऊ दे, सुपर एट ग्रूप आधीच ठरले आहेत. ग्रूपमधील तिसरी टीम आली तर मात्र बदल होईल. आणि ती टीम बाहेर जाणार्‍या टीमच्या जागी येईल.
म्हणजे ईंडिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड श्रीलंका असा आपला सुपर एट ग्रूप राहील. जर या टीम क्वालिफाई झाल्या तर..

Eight teams have been allotted pre-decided seedings that they will retain for the Super Eight stage, provided they qualify. These teams, and their seedings, are:

A1 - India, A2 - Pakistan
B1 - England, B2 - Australia
C1 - New Zealand, C2 - West Indies
D1 - South Africa, D2 - Sri Lanka

The seedings for the other teams are not fixed. To understand it further, if D1 and D2 qualify from group D, and D2 top the group, D2 will not be given the D1 slot in the Super Eight stage despite topping the group. They will continue with the pre-decided fixtures in Super Eight that have been scheduled for D2.

But if, say, D3 or D4 qualify in place of, say, D1, the qualified team will replace D1 in the Super Eight.

If D3 and D4 both qualify, then the group topper will play D1's fixtures and the team that finishes second will be allotted D2's matches.

Once the eight teams are known, they will be grouped into Super Eight as follows:

Group 1: A1, B2, C1, D2
Group 2: A2, B1, C2, D1

https://www.espncricinfo.com/story/t20-world-cup-2024-frequently-asked-q...

विंडीज - पापा न्यू गिनी
१३७ टारगेट आणि विंडीज ८-१
पूरन सुद्धा बाद झाला असता. ८-२ झाले असते पण रिव्यूच नाही घेतला.. कसले आहेत.. पाऊस आला आता.

आधीच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो.
त्यात 20-20 हा आणखी बेभरवशाचा फॉरमॅट.
त्यावर हे वेस्ट इंडिजचे पीच अजून चार चांद लावणार..
यावेळी सेमी आणि फायनल कोण जाणार याचे अंदाज बांधायलाच नको.

NAM v OMAN, 3rd Match, Group B
OMAN 109-6 (20) & 109 (19.4)
Match tied (Super Over is in progress..)

सुपर ओवर

अमेरिका आणि कॅनडा दोन्हीची बोलिंग काय फार खास वाटली नाही. >> अरे ते पिच पण दम खाऊ आहे. आम्ही खेळाएल्या प्रत्येक मॅच मधे हाय स्कोअरींग झालेले आठवतेय.

दुबे ला खेळवतील. जडेजा फारसा कामाचा नाही T20 साठी >> जाडेजाला हात नाही लावणार. तीन फास्ट पेसर्स (पांड्या धरून) नि तीन स्पिनर्स असतील असे मला वाटते. त्यामूळॅ ७ पर्यंत बॅटीग खेचली जाईल नि अधिक स्पिनर्स बद्दल आधीच सूतोवाच केलय शर्माने. पांड्या नि दुबे दोघेही खेळले तर चहल किंवा यादव पैकी एकाच्या जागेवर खेळातील. पण तशी शक्यता कमी वाटते.

लंका 77 ला सर्वबाद
थाला फॉर ए रीजन पोस्ट फिरवायला सुरुवात करायची का...

आज नॉर्कियेने कमाल बॉलिंग केली. ह्या आधी अनेकवेळा जे बघितलंय तसंच आयपीएलच्या फॉर्मचा आंतरराष्ट्रीय मॅचेसमधल्या फॉर्मशी फारसा संबंध नसतो.

अधिक स्पिनर्स बद्दल आधीच सूतोवाच केलय शर्माने.
>>>>
वेगवान गोलंदाज सुद्धा राडा घालत आहेत सध्या..

जे काही खेळवा पण पांड्या धरून सहा गोलंदाज खेळवा. दुबेच्या गोलंदाजीवर सहावा म्हणून भरवसा नको.
सामने लो स्कोरिंग होणार असतील तर चांगले विकेट टेकिंग गोलंदाज हवेत.असे वाटते.

नोरकिया बाबत आयपीएल नाही बहुधा खेळपट्टीचा फरक.
नोकिया भारताच्या खेळपट्ट्यांवर मार खातो..
तो दिल्लीसाठी पहिल्यांदा बहुधा दुबईला खेळला. तेव्हा सुद्धा रबाडासोबत कमाल केली होती. ते बघून त्याला रीटेन केला. आणि रबाडाला जाऊ दिले. पण हे अंगाशी आले. पुढे भारतात आयपीएल मध्ये तो मारच खाऊ लागला. रबाडा मात्र चालत होता.

मी ऋषभ पंत चां चाहता असल्याने दिल्ली संघाला बरेपैकी फॉलो करतो..

“ ते पिच पण दम खाऊ आहे.” - आजचं पीच पाहिलंस का? मस्त बाऊन्स, कॅरी आणि मूव्हमेंट आहे. स्विंगही होत होता बॉल. हेच जर इंडिया - पाकिस्तान साठी असेल तर मजा येईल.

जसे सामने सुरू आहेत, जशी गोलंदाजी चालत आहे ते पाहता Drop in piches सर्व फसाद की जड आहेत का?
हे कसे behave करतात याबद्दल आणखी जाणून घ्यायला हवे. एडलेड ऑस्ट्रेलिया वरून मागवले आहेत. तर.वेगवान गोलंदाजांना जास्त फेवर करतील का.. मागे तर वाचलेले की खूप धावा होतील.. पीच बनवण्यात चुकले आहेत का.. किंवा काही सामने झाल्यावर सेटल होतील का...

अरे ते पिच पण दम खाऊ आहे>> पुढे जाऊन बदलेल का? तसे भारताच्या सुरुवातीच्या मॅचेस न्यू यॉर्कला आहेत ते बरंय

“जास्तच स्पाँगी वाटले नाही तुला ?” - ‘स्पाँजी‘ हे एकदम चपखल वर्णन आहे. आता उद्या इंडिया - आयर्लंड ला जर असंच पीच असेल तर दोन्ही टीम्सना बर्यापैकी समान संधी असेल.

भारी बोलिंग आणि वरती म्हटल्याप्रमाणे स्पाँजी विकेट. कसलाही बाऊन्स होतोय बॉल

स्पाँजी बाऊन्स म्हणजे माझ्या माहिती प्रमाणे वेट विकेटवर डॅमपनेसमुळे स्लो आणि लो बाऊन्स होणे..
आज आपण कित्येक बॉल उसळवत होतो

ऋषभ पंत विनिंग शॉट कसला मस्त मारला...
मॅच बघा रे.. जिंकलो पाहिला सामना
शर्मा अर्धशतक मारून निवृत्त झाला..
कसली घाणेरडी खेळपट्टी होती
कुठलाही बॉल वर खाली उसळत आत घुसत होता...

ऋषभ पंत तिसराच कायम आला तर मजा येईल. रोहीत आणि पंत याना जास्तीत जास्त खेळताना बघणे हे एक आनंदाचे कारण आहेच. पण हे दोघे या वर्ल्डकप विशेष कामगिरी करणार असे वाटत आहे. स्पेशली पंत अपघातानंतर थेट भारतीय संघात वर्ल्डकप साठी आला आहे. हा वर्ल्डकप पंतसाठी ओळखला जाईल जसे 2011 युवराजचा होता तसे असेही वाटत आहे

शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. पाच सहा ओव्हर मध्ये जिंकायला पाहिजे होतो ती विनाकारण लांबली. जिंकूनही हरल्यात जमा.

<<मस्त बाऊन्स, कॅरी आणि मूव्हमेंट आहे.>>
मस्त? अहो unpredictable म्हणा.

<<जिंकूनही हरल्यात जमा.>>

८ बाद ५० वरून ९६ पर्यंत शेपटाने खेचले, तेंव्हाच म्हंटले काय चालले आहे काय? आर्शदीपचे एका षटकात ४ वाइड!

मस्त? अहो unpredictable म्हणा.
+786
आज तर शर्मा पंत याना काही गंभीर दुखापत होऊ नये हीच प्रार्थना करत होतो.
पाकिस्तानी गोलंदाज नव्हते नशीब आज समोर.

आजच्या मोठ्या विजयाने आपली सुपर एट सीट जवळपास पक्की झाली आहे. असाच पीच असेल तर पाकिस्तान सोबत आता उगाच जीव काढू नये. जपून खेळावे.

Pages